मित्रांनो, या लेखात आपण थ्री ब्लॅक क्रोझ या कॅन्डलस्टिक पॅटर्नची ओळख करून घेणार आहोत.
या अगोदरच्या लेखात आपण थ्री व्हाइट सोल्जर्स या पॅटर्नची माहिती घेतली असून आपण तो लेख देखील जरूर वाचा.
थ्री ब्लॅक क्रोझ हा थ्री व्हाइट सोल्जर्सच्या अगदी तंतोतंत सारखाच मात्र विरुद्ध पॅटर्न होय.
थ्री ब्लॅक क्रोझ हा एक ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.
थ्री व्हाइट सोल्जर्स हा एक बुलिश तर थ्री ब्लॅक क्रोझ हा एक बेअरिश कॅण्डलस्टिक पॅटर्न आहे
आपण आता थ्री ब्लॅक क्रोझ पॅटर्नची सविस्तर माहिती आणि त्याचा ट्रेडींगसाठी वापर कसा करावा हे बघूया.
थ्री ब्लॅक क्रोझ
खालील चित्रात मी थ्री ब्लॅक क्रोझ कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.
आपण चित्रात बघू शकतो हा पॅटर्न लगतच्या तीन लाल कॅण्डलपासून तयार झाला आहे.
आता आपण हा पॅटर्न तयार कसा होतो ते सविस्तरपणे बघूया
सोयीसाठी मी सर्व कॅण्डलला एक, दोन, तीन असे क्रमांक दिले आहेत.
पहिल्या क्रमांकाची कॅण्डल एक लाल कॅण्डल आहे आणि या कॅन्डलेपासूनच आपला पॅटर्न तयार होण्याची सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या कॅन्डलची सुरुवात हि पहिल्या कॅन्डलच्या खालच्या निम्या भागात झाली आहे.
दुसऱ्या कॅन्डलची सुरुवात निम्याहुन वरच्या भागात झाल्यास मार्केटमधील बुल्सची बरीच ताकद शिल्लक असल्याचे आपण समजू शकतो म्हणून दुसऱ्या कॅन्डलची सुरुवात हि खालच्या ५०% भागात होणे गरजेचे आहे.
दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग हि गॅपअप किंवा गॅपडाउन असू शकते.
याशिवाय दुसऱ्या कॅन्डलची क्लोझिंग प्राइस हि पहिल्या कॅन्डलच्या लो प्राइसपेक्षा जास्त असणे गरजेचे.
यालाच आपण लोअरलो तयार होणे असे देखील म्हणू शकतो.
वरील सर्व नियम तिसरी कॅण्डल तयार होतांना सुद्धा लागू होतात.
म्हणजेच तिसरी कॅण्डल दुसऱ्या कॅन्डलच्या खालच्या भागात ओपन व्हायला हवी आणि तिची क्लोझिंग प्राइस हि दुसऱ्या कॅन्डलच्या लो प्राइसपेक्षा अधिक असायला हवी.
सर्वात महत्वाचं म्हणजे या पॅटर्नच्या तीनही कॅण्डलला एक नियम लागू होतो या तीनही कॅन्डलने आपल्या अगोदरच्या कॅन्डलचा हाय ब्रेक करता कामा नये.
अशाप्रकारे थ्री ब्लॅक क्रोझ कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो.
थ्री ब्लॅक क्रोझ आणि व्हॉल्युम
मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे कि व्हॉल्युम हा स्टॉकमधील ट्रेण्डची ताकद दाखवतो म्हणूनच इतर पॅटर्न प्रमाणे या पॅटर्नमध्ये देखील व्हॉल्युमला विशेष महत्व आहे.
या पॅटर्नमध्ये प्रत्येक कॅन्डलचा व्हॉल्युम देखील चढत्या क्रमाने असल्यास स्टॉकमध्ये मंदी येण्याची शक्यता अधिक दृढ होते.
याउलट व्हॉल्युम जर कमी होत असेल तर आपण विक्रीपूर्वी अजून जास्त वाट बघण्याची गरज आहे कारण कमी होणारा व्हॉल्युम स्टॉकमध्ये कमी होणाऱ्या किंमतीवर विक्री करण्याची मानसिकता कमी होत असल्याचे दर्शवतो तेव्हा आपण ट्रेड घेण्यापूर्वी काही काळ थांबलेलेच बरे नाही का ?
मित्रांनो, कधी कधी आपल्याला चार्टवर शेवटच्या कॅन्डलचा व्हॉल्युम इतर दोन्ही कॅन्डलपेक्षा जास्त मात्र दुसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्युम पहिल्या कॅन्डलपेक्षा कमी झालेला आढळतो मात्र हा देखील विक्रीसाठी एक चांगला संकेत समजला जाऊ शकतो.
व्हॉल्युम अजून चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी मी खाली व्हॉल्युमचे काही प्रकार देत आहे.
ॲडव्हानसिंग ब्लॉक
खालील चित्रात मी ॲडव्हानसिंग ब्लॉक पॅटर्न आणि स्टॉल्ड पॅटर्न दाखवले आहेत.
चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण बघू शकतो कि थ्री ब्लॅक क्रोझ समोर एक सपोर्ट लेव्हल तयार झाली आहे आणि बेअर्सला स्टॉकची किंमत या सपोर्ट लेव्हलच्या खाली ढकलण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
त्यामुळेच आपण हि सपोर्ट लेव्हल ब्रेक होण्याची वाट बघायची आहे आणि नंतरच ट्रेडमध्ये एन्ट्री घ्यायची आहे.
आपल्याला वरील पैकी कोणताही पॅटर्न आढळल्यास आपण ट्रेण्ड कन्फर्म होण्याची वाट बघायची आहे.
स्टॉल्ड पॅटर्न
स्टॉल्ड पॅटर्न हा स्टॉकमध्ये सुरु होऊ पाहणारा डाउनट्रेंण्ड अजून कन्फर्म न झाल्याचा संकेत आहे.
आपण बघू शकतो कि थ्री ब्लॅक क्रोझ पॅटर्न तयार होत असताना सुरवातीच्या दोन कॅण्डल बेअरिश मोमेन्टम दाखवत आहेत मात्र तिसरी कॅण्डल हि शॉर्ट कॅण्डल तयार झाली आहे.
शॉर्ट कॅण्डल तयार झाल्यामुळे आपण बेअर्स आता कमजोर झाल्याचे म्हणू शकतो.
म्हणूनच स्टॉल्ड कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर आपण अजून चांगला बेअरिश सिग्नल मिळण्याची वाट बघणे गरजेचे आहे.
थ्री ब्लॅक क्रोझ चार्टवर
आपल्यासोबत टाटा मोटर्स कंपनीचा डेली चार्ट आहे.
आपण बघू शकतो कि चार्टवर सुंदर थ्री ब्लॅक क्रोझ पॅटर्न तयार झाला आहे आणि त्यानंतर टाटा मोटर्सच्या स्टॉक मध्ये भरपूर घसरण झाली.
चार्टवर थ्री ब्लॅक क्रोझ पॅटर्न रेझिस्टन्सजवळ तयार झाल्यास तो अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतो.
अशाप्रकारे आपल्याला थ्री ब्लॅक क्रोझ पॅटर्न आढळल्यास आपण स्टॉक मध्ये विक्री करायची आहे.
आपण जर याआधीच स्टॉकमध्ये शॉर्ट पोझिशन घेतली असेल तर थ्री ब्लॅक क्रोझ पॅटर्न हा ट्रेण्ड कॉन्टीनुएशन दाखवत असल्याने आपल्याला अजून जास्त प्रॉफिट होऊ शकतो.
याउलट आपण जर स्टॉकमध्ये लॉन्ग पोझिशन घेतली असेल तर थ्री ब्लॅक क्रोझ पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला पोझिशन एक्झिट करण्यासाठी देखील सावध रहायचे आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण थ्री ब्लॅक क्रोझ कॅन्डलस्टिक पॅटर्न समजावून घेतला.
आपण आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा.
अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.
आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
कॅन्डलस्टिक ॲनालिसिस
- कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? मराठी | What is Candlestick Chart & Candlestick in Marathi
- हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Hammer Candlestick Pattern in Marathi
- एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Engulfing Candlestick Pattern in Marathi
- डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Dark Cloud Cover Candlestick Pattern in Marathi
- पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Piercing Candlestick Pattern in Marathi
- बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bullish Harami Candlestick Pattern
- बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bearish Harami Candlestick Pattern in Marathi
- कॅण्डल (लॉन्ग)ॲनालिसिस मराठी | Long Candle Analysis in Marathi
- शॉर्ट कॅण्डल ॲनालिसिस मराठी | Short Candle Analysis in Marathi
- थ्री व्हाइट सोल्जर्स मराठी | Three White Soldiers in Marathi
- थ्री ब्लॅक क्रोझ मराठी | Three Black Crows in Marathi
- डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Doji Candlestick Pattern in Marathi
- मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Morning Star Candlestick Pattern in Marathi
- इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Evening Star Candlestick Pattern in Marathi
- बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi