नायका आयपीओ मराठी | Nykaa IPO in Marathi

Rate this post

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ च्या नवीन लेखात आपले स्वागत आहे.

आजकाल नटायला कोणाला आवडत नाही, सुंदर दिसण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही, दिवसेंदिवस बाजारातील सौंदर्यप्रसाधनांची मागणी वाढतच आहे,

मित्रांनो, आज आपण अशा एका कंपनीच्या आयपीओची चर्चा करणार आहोत जी सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात काम करते.

आपल्याला जर या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची खात्री असेल तर हा लेख जरूर वाचा.

या लेखात आपण नायका या नावाने प्रसिद्ध असलेल्या एफएसएन इ-कॉमर्स व्हेंचर्स ली. (FSN E–Commerce Ventures Limited ) या कंपनीची माहिती बघणार आहोत.

नायका स्टॉक ११ नोव्हेंबर २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

नायका एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.

या आयपीओ मधून नायका जवळपास ५३५१.९२ कोटी रुपये उभे करणार आहे.

हा आयपीओ एक मोठा आयपीओ असल्याने आपल्याला सबस्क्राइब केल्यास लॉट मिळण्याची शक्यता देखील जास्त आहे.

चला तर मग सुरुवात करूया.

नायका आयपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Nykaa IPO Subscription Status

आइपीओ खुला झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ८१.७८ पट सबस्क्राइब झाला आहे.

सब्सक्रिप्शन स्टेटस
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)९१.१८ पट
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)११२.०२ पट
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)१२.२४ पट

नायका आयपीओ शेअर्सची उपलब्धता | Nykaa IPO Availability of Shares

नायका आयपीओची एकूण किंमत ५३५१.९२ कोटी रुपये असून पूर्ण ४७२१.९२ कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल) उपलब्ध केले गेले आहेत तर ६३० कोटी रुपयांचे शेअर्स हे नव्याने विक्रीस (फ्रेश इश्यू ) उपलब्ध आहेत.

नायका आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Nykaa IPO Share Price and Lot Size

नायका आयपीओ शेअरची दर्शनी किंमत हि १ रुपये आहे.

या आयपीओ मध्ये एका शेअरची किमान किंमत १०८५ रुपये आणि कमाल किंमत ११२५ रुपये असणार आहे.

एका लॉटमधील शेअरची संख्या हि १२ असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १२ * १०८५ = १३,०२० रुपये ते १२ * ११२५ = १३,५०० रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १३,०२० रुपये तर जास्तीत जास्त १४ लॉटची असणार आहे म्हणजेच १,८९,००० रुपये इतकी असणार आहे.

नायका आयपीओची तारीख | Nykaa IPO Date

नायका आयपीओ २८ ऑक्टोबर २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख १ नोव्हेंबर २०२१ असणार आहे, अशाप्रकारे दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे(आयपीओ खुला झाल्यानंतर मध्ये २ दिवस ३० ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर सुट्टी आहे).

नायका आयपीओ शेअर्सची अलॉटमेंट ८ नोव्हेंबर २०२१ रोजी चालू होणार असून १० नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर ११ नोव्हेंबर २०२१ ला नायका बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

नायका आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Nykaa IPO?

सध्या मार्केटमध्ये नायका आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम जवळपास ६५० रुपये असल्याचे समजते.

नायका आयपीओचा उद्देश | Objectives of Nykaa IPO

  • नवीन रिटेल स्टोअर्सच्या उभारणीसाठी, म्हणजे एफएसएन (FSN) ब्रँड आणि / किंवा नायका फॅशन (Nykaa Fashion) मध्ये ४२० दशलक्षांची गुंतवणूक.
  • १,५६० दशलक्ष इतकी कर्जाची परतफेड आणि आगाऊ रक्कम अदा करण्याची तजवीज करणे.
  • ब्रँडची दृश्यमानता आणि ब्रँडविषयी जागरूकता वाढवून ग्राहकांना मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी २,३४० दशलक्ष भांडवलाची तरतूद करणे.
  • दैनंदिन आर्थिक व्यवहार.

नायका ब्रॅण्डची माहिती | Information of Nykaa

प्रमोटर्स: फाल्गुनी नायर, संजय नायर, फाल्गुनी नायर फॅमिली ट्रस्ट आणि संजय नायर फॅमिली ट्रस्ट हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

नायका, एफएसएन इ-कॉमर्स व्हेंचर्स ली. (FSN E–Commerce Ventures Limited ) या कंपनीचा एक जगप्रसिद्ध ब्रॅण्ड आहे.

२०१२ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीकडे सौंदर्य प्रसाधने, पर्सनल केअर आणि फॅशन उत्पादनांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे, ज्यात त्यांच्या स्वतःच्या अनेक उत्पादनांचा देखील समावेश आहे.

कंपनी प्रामुख्याने २ क्षेत्रात काम करते :

१. नायका : सौंदर्य प्रसाधने ( Beauty and personal care)
२. नायका फॅशन: पोशाख आणि इतर प्रसाधने (Apparel and accessories)

ब्यूटी अँड पर्सनल केअर या प्रकारात, कंपनीकडे ३१ मार्च २०२१ पर्यंत प्रामुख्याने मेक-अप, स्किनकेअर, हेअर केअर, बाथ आणि बॉडी, सुगंध, ग्रूमिंग उपकरणे, पर्सनल केअर आणि आरोग्याच्या श्रेणींमध्ये २,४७६ ब्रँडमधील १,९७,१९५ एसकेयू आहेत.

नायका आपली अनेक सौंदर्य आणि पर्सनल केअर उत्पादने इतर कंपनीकडून बनवून घेते आणि नायका कॉस्मेटिक्स “Nykaa Cosmetics”,नायका नॅचरल्स “Nykaa Naturals” आणि काय ब्युटी “Kay Beauty” या त्यांच्या ब्रँड नावाने विकते.

पोशाख आणि ॲक्सेसरीज व्हर्टिकलमध्ये कंपनीचे १३५० ब्रँड आणि १.८ दशलक्ष एसकेयुचा समावेश आहे ज्यामध्ये चार ग्राहक विभागांमध्ये फॅशन उत्पादने आहेत: महिला, पुरुष, मुले आणि घर.

नायका फॅशनचे स्वतःचे ६ फॅशन ब्रॅण्ड्स आहेत.

नायका आपल्या ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारात शॉपिंगची सुविधा पुरवते.

ऑनलाइन चॅनेलमध्ये मोबाइल ॲप, वेबसाइट्स आणि मोबाइल साइट्सचा समावेश आहे.

ऑफलाइन चॅनेलमध्ये नायकाची भारतातील ३८ शहरांमध्ये ७३ शॉपिंग स्टोअर्स आहेत.

नायका कंपनीची आर्थिक माहिती

तपशीलदशलक्ष रुपयेप्रतिवार्षिक
३१ मार्च २०२१३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९
एकूण मालमत्ता(Total Assets)१३,०१९.९०११,२४४.८२७,७५६.५७
एकूण महसूल(Total Revenue)२४,५२६.३७१७,७७८.५०११,१६३.८२
एकूण नफा (कर वगळता)(Profit After Tax) ६१९.४५१६३.४०२४५.३९

नायका उजवी बाजू | Positives of Nykaa

  • भारतातील अग्रगण्य सौंदर्य आणि पर्सनल केअर कंपन्यांपैकी एक नाव.
  • अनेक मोठ्या ब्रॅण्ड सोबत असणारे व्यावसायिक संबंध आणि मोठ्या ब्रॅंड्सकडून नायकाच्या प्लॅटफॉर्मला आपले उत्पादन विक्रीसाठी पसंती.
  • भरपूर वाव आणि पुष्कळ नफा मिळवून देऊ शकेल असे क्षेत्र आणि बिझनेस मॉडेल.
  • प्रगत तंत्रज्ञान असणारा प्लॅटफॉर्म
  • संस्थापक स्वतः चालवत असलेली आणि भक्कम नेतृत्व असणारी कंपनी.

थोडक्यात महत्वाचे | All Important

नायका आयपीओ ५३५१.९२ कोटी रुपये
किमान किंमत १०८५ रुपये
कमाल किंमत११२५ रुपये
लॉट साईझ १२
एकूण गुंतवणूक १३,०२० रुपये ते १३,५०० रुपये
आईपिओ खुला होणार २८ ऑक्टोबर २०२१
आईपिओ बंद होणार १ नोव्हेंबर २०२१
शेअर्स इश्यू होणार ८ नोव्हेंबर २०२१
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार १० नोव्हेंबर २०२१
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार नोव्हेंबर २०२१

अधिक माहितीसाठी आपण कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

नायका

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment