डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Dark Cloud Cover Candlestick Pattern in Marathi

4/5 - (6 votes)

डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक रिव्हर्सल पॅटर्न आहे

डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमधील अपट्रेन्ड संपून डाउनट्रेंड सुरु होतो म्हणजेच डार्क क्लाऊड कव्हर हा एक बेअरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे .

डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे म्हणजेच हा पॅटर्न लगतच्या दोन कॅण्डल्स पासून तयार होतो.

आपण या लेखात डार्क क्लाऊड कव्हर पॅटर्न तयार कसा होतो आणि आपण त्याचा ट्रेडिंगसाठी कसा वापर करू शकतो ते बघणार आहोत.

डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न | Dark Cloud Cover Candlestick Pattern

डार्क क्लाऊड कव्हर म्हणजे काळ्या ढगांचे सावट होय

नावाप्रमाणेच हा पॅटर्न चार्टवर तयार होणे म्हणजे बाजारावर मंदीचे सावट येणे होय.

बाजारातील तेजीनंतर अपट्रेंडच्या शेवटी डार्क क्लाउड कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो आणि बाजारात डाउनट्रेंड सुरु होण्याची शक्यता असते.

खालील चित्रात डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.

डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न |  Dark Cloud Cover Candlestick Pattern

डार्क क्लाउड कॅन्डलस्टिक पॅटर्न पूर्ण होण्यासाठी उजव्या बाजूची लाल कॅण्डल हि डाव्या बाजूच्या हिरव्या कॅन्डलच्या मध्यापेक्षा (५०% पेक्षा) कमी उंचीवर जाऊन क्लोज होणे गरजेचे आहे

डार्क क्लाउड कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होण्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत

  • डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होण्याअगोदरच ट्रेंड हा अपट्रेंन्ड असावा.
  • पहिल्या कॅन्डलचा रंग हिरवा तर दुसऱ्या कॅन्डलचा रंग लाल असावा
  • लाल कॅण्डल हिरव्या कॅन्डलच्या बॉडीमध्ये जितकी खोलवर क्लोझ होईल तितका पॅटर्न जास्त बेअरिश समजावा
  • लाल कॅन्डलचा व्हॉल्युम हिरव्या कॅन्डलच्या व्हॉल्युमपेक्षा जास्त असल्यास अधिक चांगले.
  • डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न रेझिस्टन्स लेव्हल जवळ तयार झाल्यास हा पॅटर्न अजून चांगल्याप्रकारे काम करतो.
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करावा? | How to Trade With Dark Cloud Cover Candlestick Pattern?

एन्ट्री

आपल्याला लाल कॅन्डलच्या लो लेव्हलला शॉर्ट एन्ट्री घ्यायची आहे

स्टॉप लॉस

स्टॉप लॉस आपल्याला लाल कॅन्डलस्टिकच्या टॉप लेव्हलला लावायचा आहे

आता आपण डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न कॅन्डलस्टिक चार्टवर बघूया.

डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न

आपल्यासोबत सिपलाचा डेली कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हॉल्युम चार्ट आहे

आपण चार्टवर बघू शकतो कि १०-१५ दिवसांपासून सिपलाचा स्टॉक अपट्रेंन्ड मध्ये होता.

चार्टवर डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे व्हॉल्युम चार्टवर व्हॉल्युम देखील वाढला आहे

आपण स्पष्टपणे बघू शकतो कि डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर स्टॉक मधील अपट्रेंन्ड संपला असून डाउनट्रेंन्ड सुरु झाला आहे आणि पुढचे बरेच दिवस स्टॉक डाउनट्रेंन्डमध्येच आहे.

चार्टवर हिरव्या रंगाने मी सेलिंगसाठी एन्ट्री लेव्हल मार्क केली आहे तर लाल रंगाने मी स्टॉप लॉस लेव्हल मार्क केली आहे.

लाल कॅण्डल हिरव्या कॅण्डलमध्ये जास्त खोलवर क्लोझ झालेली नसेल तर आणि अधिक सुरक्षित एन्ट्रीसाठी आपण ट्रेण्ड कन्फर्मेशनची वाट बघू शकतो.

मी जरी इथे डेली चार्ट वापरला असला तरी हा पॅटर्न ५ मी, १५ मी इ टाइमफ्रेम वर वापरला जाऊ शकतो

मित्रांनो कुठलाही पॅटर्न बुलेटप्रूफ नसतो त्यामुळे आपल्याला सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न सोबत गरज असते ती सरावाची.

डार्क क्लाऊड कव्हर पॅटर्नचे लिमिटेशन | Limitations of Dark Cloud Cover

  • लाल कॅण्डल मोठी असल्यास स्टॉप लॉस मोठा होतो आणि रिस्क जास्त होते
  • कॅण्डल मोठी नसल्यास आणि पुरेशी अगोदरच्या कॅण्डलमध्ये खोलवर क्लोझ न झाल्यास कन्फर्मेशन साठी थांबावे लागते.

मित्रांनो अशाप्रकारे या लेखात आपण डार्क क्लाऊड कव्हर पॅटर्न कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि त्याचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करायचा ते देखील बघितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते मला खालील कमेंटबॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा.

आपल्या प्रतिक्रियांचे मी स्वागत करतो

आपण सवडीने हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment