बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi

4/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’च्या नवीन लेखात आपलं स्वागत आहे.

या लेखात आपल्या कॅन्डलस्टिकच्या ताफ्यात आणखी एका पॅटर्नची भर घालणार आहोत.

आपण आज बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत.

हा पॅटर्न दोन कॅण्डल पासून तयार होत असल्याने हा एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.

बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमधील अपट्रेन्ड संपून स्टॉकमध्ये डाउनट्रेंन्ड चालू होतो.

बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक प्रभावी पॅटर्न असल्याने आपल्याला या पॅटर्नचा नक्की फायदा होईल असा मला विश्वास वाटतो.

चला तर मग सुरुवात करूया.

बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कसा होतो ?

खालील चित्रात मी बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न कसा तयार होतो ते दाखवले आहे.

बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi

या पॅटर्नचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी हा पॅटर्न उपट्रेन्ड नंतर तयार होणे गरजेचे आहे.

चित्रात मी दाखवलेली पहिली कॅण्डल हि अपट्रेन्ड मधील कॅण्डल असल्याचे आपण समजूया.

पहिली कॅण्डल हि एक मोठी हिरवी कॅण्डल असून त्यानंतर तयार झालेली दुसरी कॅण्डल हि एक मोठी लाल कॅण्डल आहे.

आपण बारकाईने बघितल्यास आपल्या खालील प्रमाणे दोन गोष्टी लक्षात येतील.

१. दुसरी कॅण्डल म्हणजेच लाल कॅण्डल गॅप-डाउन ओपन झाली आहे.

२. दुसऱ्या कॅन्डलची क्लोझिंग हि पहिल्या कॅन्डलच्या लो प्राइसच्या खाली झाली आहे.

वरील दोन गोष्टी याच या पॅटर्नची वैशिष्ट्य आहेत.

मित्रांनो, आपल्याला या कॅन्डलच्या तयार होण्यावरून किंवा पॅटर्नवरून मार्केट मध्ये होऊ घातलेल्या गोष्टींचा अंदाज करता यायला हवा.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मागील मानसिकता

हिरव्या कॅण्डल नंतर गॅप-डाउन ओपन होणारी लाल कॅण्डल म्हणजे एक मंदीचा संकेत आहे.

त्यानंतर लाल कॅण्डल हिरव्या कॅन्डलच्या खाली जाऊन क्लोझ होते आहे याचा अर्थ असा होतो कि बाजरात स्टॉकची जी मागणी होती ती पुरवण्यासाठी आता सेलर्स सक्षम आहेत किंबहुना बाजारात आता सेलर्स येत आहेत.

शेअर मार्केट म्हणजे बुल्स आणि बेअर्सची लढाई असल्याचे आपल्याला माहीतच आहे.

बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे बेअर्स, बुल्सच्या आघाडीला तोडीसतोड उत्तर देत आहेत असे आपण म्हणू शकतो.

बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर

खाली आपल्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया कंपनीचा स्टॉक आहे

चार्टवर मी बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मार्क करून दाखवला आहे.

बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern व chart

चार्टवर तयार होणाऱ्या कॅण्डल मारूबोझू, शेव्हन हेड किंवा शेव्हन बॉटम अशा प्रकारच्या देखील असू शकतात.

बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi

वरील चार्ट हे १५ मी टाइमफ्रेम असणारे चार्ट आहेत.

हा पॅटर्न ५मी, १५मी, डेली अशा सर्व टाइमफ्रेमवर सारख्याच प्रकारे आढळतो.

आपण बघू शकतो कि स्टेट बँक ऑफ इंडिया कंपनीचा स्टॉक बऱ्याच काळापासून अपट्रेन्डमध्ये होता आणि नंतर चार्टवर बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड चालू झाली आहे.

आता आपण हा पॅटर्न तयार झाल्यावर एन्ट्री कशी घ्यायची आणि स्टॉपलॉस कसा लावायचा ते बघूया.
एन्ट्री लेव्हल स्टॉपलॉस लेव्हल

बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा.

चार्टवर मी खालील प्रमाणे लेव्हल मार्क केल्या आहेत.

१. हिरव्या रंगाने एन्ट्री लेव्हल मार्क केली आहे.

२. लाल रंगाने स्टॉपलॉस लेव्हल मार्क केली आहे

बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi

एन्ट्री लेव्हल जवळ आपण स्टॉकचे निरीक्षण करायचे आहे आणि आपल्याला स्टॉकमध्ये कमजोरी आढळून आल्यास आपण शॉर्ट साइड ट्रेड घ्यायचा आहे.

एन्ट्री घेण्यापूर्वी आपण व्हॉलूमचा वापर कन्फर्मेशनसाठी करायचा आहे.

स्टॉप लॉस आपण पॅटर्नच्या टॉप लेव्हलजवळ ठेवणार आहोत.

बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न एखाद्या रेझिस्टन्स लेव्हल जवळ तयार झाल्यास आपण जास्त आक्रमकता दाखवू शकतो आणि लवकर एन्ट्री घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला जास्त फायदा घेता येईल.

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्नची सविस्तर माहिती घेतली.

लेखात दिलेल्या माहितीविषयी कोणतीही शंका असल्यास मला कमेन्टबॉक्स मध्ये जरूर कळवा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला लाइक करा, इन्स्ट्राग्राम वर फॉलो करा.

मला आशा आहे या लेखातून आपल्या माहितीत भर पडली असेल, आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment