पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Piercing Candlestick Pattern in Marathi

2.5/5 - (6 votes)

मित्रांनो, आपण या लेखात पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कसा होतो आणि आपण त्याचा ट्रेडिंगसाठी कसा वापर करू शकतो ते बघणार आहोत.

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक रिव्हर्सल पॅटर्न आहे.

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमधील डाउनट्रेन्ड संपून अपट्रेंड सुरु होतो म्हणजेच पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे .

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे म्हणजेच हा पॅटर्न लगतच्या दोन कॅण्डल्स पासून तयार होतो.

चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न | Piercing Candlestick Pattern

पियरसिंगचा अर्थ इथे विरोधी पक्षात आगेकूच करणे असा होतोपियरसिंग हा एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे.

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक तेजीचा पॅटर्न आहे, डाउनट्रेंड नंतर पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यास बाजारतील मंदी संपून बाजारात आता तेजी येणार असल्याचे समजले जाते

खालील चित्रात आपण पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न बघू शकतो.

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न | Piercing Candlestick Pattern

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न पूर्ण होण्यासाठी उजव्या बाजूची हिरवी कॅण्डल हि डाव्या बाजूच्या लाल कॅन्डलच्या मध्यापेक्षा (५०% पेक्षा) जास्त उंचीवर जाऊन क्लोझ होणे गरजेचे आहे.

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होण्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

  • पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होण्याअगोदरच ट्रेंड हा डाउनट्रेंन्ड असावा.
  • पहिल्या कॅन्डलचा रंग लाल तर दुसऱ्या कॅन्डलचा रंग हिरवा असावा
  • हिरवी कॅण्डल लाल कॅन्डलच्या बॉडीमध्ये जितकी जास्त उंचावर क्लोझ होते तितका पॅटर्न जास्त बुलिश समजला जातो
  • हिरव्या कॅन्डलचा व्हॉल्युम लाल कॅन्डलच्या व्हॉल्युमपेक्षा जास्त असल्यास पॅटर्न अधिक चांगले काम करतो.
  • पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न सपोर्ट लेव्हल जवळ तयार झाल्यास हा पॅटर्न अजून चांगल्याप्रकारे काम करतो.
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करावा? | How to Trade With Piercing Candlestick Pattern?

एन्ट्री

आपल्याला हिरव्या कॅन्डलच्या हाइ लेव्हलला लॉन्ग/ बाय एन्ट्री घ्यायची आहे

स्टॉप लॉस

स्टॉप लॉस आपल्याला हिरव्या कॅन्डलस्टिकच्या बॉटम लेव्हलला लावायचा आहे

आता आपण पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बघूया.

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न | Piercing Candlestick Pattern

आपल्यासोबत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा डेली कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हॉल्युम चार्ट आहे

आपण चार्टवर बघू शकतो कि ६-७ दिवसांपासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा स्टॉक डाउनट्रेंन्ड मध्ये होता.

चार्टवर पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे व्हॉल्युम चार्टवर व्हॉल्युम देखील वाढला आहे

आपण स्पष्टपणे बघू शकतो कि पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर स्टॉक मधील डाउनट्रेंन्ड संपला असून अपट्रेंन्ड सुरु झाला आहे आणि पुढचे बरेच ६-७ दिवस स्टॉक अपट्रेंन्डमध्येच आहे.

आपण चार्टवर बघू शकतो कि चार्टवर पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले आहेत

चार्टवर हिरव्या रंगाने मी बायिंगसाठी एन्ट्री लेव्हल मार्क केली आहे तर लाल रंगाने मी स्टॉप लॉस लेव्हल मार्क केली आहे.

हिरवी कॅण्डल लाल कॅण्डलमध्ये जास्त उंचीवर क्लोझ झालेली नसेल तर आणि अधिक सुरक्षित एन्ट्रीसाठी आपण ट्रेण्ड कन्फर्मेशनची वाट बघू शकतो.

मी जरी इथे डेली चार्ट वापरला असला तरी हा पॅटर्न ५ मी, १५ मी इ टाइमफ्रेम वर वापरला जाऊ शकतो.

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये तयार होणारी लाल आणि हिरवी कॅण्डल हि मारूबोझू कॅण्डल देखील असू शकते

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नचे लिमिटेशन | Limitations of Piercing Candlestick Pattern

  • हिरवी कॅण्डल मोठी असल्यास स्टॉप लॉस मोठा होतो आणि रिस्क जास्त होते
  • कॅण्डल मोठी नसल्यास आणि पुरेशी लाल कॅण्डलमध्ये खोलवर क्लोझ न झाल्यास कन्फर्मेशन साठी थांबावे लागते.

मित्रांनो अशाप्रकारे या लेखात आपण पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि त्याचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करायचा ते देखील बघितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते मला खालील कमेंटबॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा.

आपल्या प्रतिक्रियांचे मी स्वागत करतो

आपण सवडीने हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment