नमस्कार मित्रांनो,
पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.
प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट हा कंपनीच्या अभ्यासातील महत्वाचा घटक असून तीन मुख्य आर्थिक विवरणांपैकी एक आहे जे व्यवसायाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते.
या लेखात आपण प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट म्हणजे काय ? प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट कुठे उपलब्ध असते ? प्रॉफिट-लॉस स्टेटमेंटमधून आपल्याला काय माहिती मिळते ? अशी सर्व सविस्तर चर्चा करणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया.
प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट म्हणजे काय ? । What Is a Profit and Loss (P&L) Statement?
प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट म्हणजे कंपनीचा नफा आणि तोटा यांचा लेखाजोखा होय.
या स्टेटमेण्टमध्ये आपल्याला दिलेल्या काळासाठी कंपनीने कमावलेला महसूल (Income), कंपनीने केलेला खर्च (Expenses) आणि कंपनीला आपल्या उद्योगातून झालेला नफा-तोटा असे सर्व नमूद केलेले असते.
प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट कुठे मिळेल ?
आपल्याला कंपनीच्या वेबसाइटवर किंवा मनी कन्ट्रोल वेबसाइटवर प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट मिळू शकेल.
खाली मी कशाप्रकारे कंपनीची आर्थिक माहिती मनी कन्ट्रोल वेबसाईटवर मिळवता येईल ते दाखवले आहे.
कंपनीच्या नावावर क्लिक केल्यावर आपल्याला कंपनीची माहिती उपलब्ध असते त्यात आपल्याला खाली दाखवल्याप्रमाणे कंपनीचे फायनांशियल्स (Financials) बघायचे आहे.
आपल्याला पाहिजे असल्यास आपण सर्व माहिती मराठीत देखील बघू शकतो त्यासाठी आपल्याला पेजवर राइट क्लिक करून ट्रान्सलेट (Translate) पर्याय निवडायचा आहे.
आपल्याला प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट सविस्तर वाचायचे असल्याने आपण उजव्या बाजूच्या प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आपल्याला प्रॉफिट-लॉस स्टेटमेंटचे दोन प्रकार बघायला मिळतात.
१. स्टॅन्ड अलोन
स्टॅन्डअलोन म्हणजे फक्त त्या कंपनीपुरते किंवा इतर उपकंपन्या वगळून तयार झालेले प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट.
२. कन्सॉलिडिटेड
कन्सॉलिडिटेड म्हणजे ती कंपनी तसेच इतर उपकंपन्या यांची माहिती एकत्र करून तयार केलेले प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट.
प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट कालावधी
प्रत्येक कंपनी वर्षाच्या शेवटी आपला आर्थिक अहवाल जाहीर करत असते याशिवाय कंपनी प्रत्येक तिमाहीत देखील हंगामी अहवाल जाहीर करते.
आपल्याकडे आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिल रोजी होते तर अखेर ३१ मार्च रोजी होतो.
अशाप्रकारे आपल्याला एक वर्षात चार हंगामी अहवाल मिळतात आणि एक वार्षिक अहवाल मिळतो.
आपल्याला मनी कंट्रोलवर फक्त प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट वार्षिक अहवाल उपलब्ध आहे, तिमाही अहवाल उपलब्ध झाल्यास हि पोस्ट उपडेट केली जाईल.
आता आपण प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट | Profit-Loss Statement Example
खाली आपल्यासोबत टाटा मोटर्स कंपनीचे प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट आहे.
सोबतच्या चित्रात आपल्याला मागील ५ वर्षांचे प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट दाखवले आहे.
महसूल । Income
स्टेटमेंटच्या पहिल्या भागात आपल्याला कंपनीने प्रत्येक वर्षी जमा केलेल्या महसुलाविषयी माहिती दिली आहे.
कंपनीच्या मुख्य उद्योगातून जमा झालेला महसूल आपल्याला सुरवातीला बघायला मिळतो.
या इन्कमला ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल असे म्हटले जाते.
उदा. मी जर नोकरी करत असेल तर नोकरीतून मिळणारा पगार हा माझा मुख्य उत्पन्न स्त्रोत होय तर मला माझ्या बँक खात्यातील रक्कमेवर मिळणारे व्याज हा माझे दुय्यम उत्पन्न समजले जाऊ शकते.
अशाचप्रकारे गाडयांच्या विक्रीतून मिळणारा महसूल हे टाटा मोटर्स कंपनीचे उत्पन्नाचे प्राथमिक साधन होय.
तसेच इतर उत्पन्न या रकान्यात आपल्याला कंपनीने गुंतवणूक, बँक ठेवी, शेअर्स विक्री इ गोष्टींद्वारे मिळवलेल्या महसूलाची नोंद आढळते.
अशाप्रकारे आपल्याला पहिल्या टप्प्यात कंपनीच्या एकूण महसूल किंवा इन्कमची माहिती उपलब्ध असते.
कंपनीचा महसूल वाढणे अर्थातच चांगले लक्षण आहे मात्र कंपनीचा जमा होणारा जास्तीत जास्त महसूल हा कंपनीच्या मुख्य उद्योगातून येत असल्याचे तपासून बघणे गरजेचे आहे.
कंपनीचा महसूल मुख्य कामातून मिळत असल्यास कंपनीचे कामकाज सुव्यवस्थितपणे चालू असल्याचे आपण म्हणू शकतो.
वरील चार्टवर बघितल्यास आपल्या असे लक्षात येते कि टाटा मोटर्स कंपनीचा एकूण महसूल मागील ३ वर्षांपासून सातत्याने कमी होत आहे.
शेवटच्या वर्षात कंपनीचा महसूल ४७,८७४ दाखवला आहे.
आपल्या असेदेखील लक्षात येते कि कंपनीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीतजास्त इन्कम मुख्य उद्योगातूनच मिळालेला आहे.
खर्च । Expenses
खाली प्रॉफिट-लॉस स्टेटमेण्टचा दुसरा भाग दिला आहे.
सुरवातीला आपण खर्च समजून घेऊ.
या भागात आपल्याला कंपनीने आपला उद्योग चालवताना केलेल्या सर्व खर्चाचा तपशील आढळून येतो.
पहिल्या ओळीत आपल्याला उत्पादन करताना वापरलेल्या मालासाठी झालेला खर्च नमूद केलेला आढळतो.
या खर्चात सर्व कच्च्या मालाचा खर्च समाविष्ट केलेला असतो.
तिसऱ्या ओळीत मालावर प्रक्रिया करण्यासाठी आलेला खर्च जसे कि कामगारांचा पगार, वीजबिल, ऑइल, डिझेल इ खर्च दाखवलेला असतो.
याशिवाय या विभागात कामगार कल्याण, सोयीसुविधा इ गोष्टींसाठी केलेला खर्च दिलेला आहे.
फायनान्स कॉस्ट प्रकारात कंपनी कर्जावर देत असलेले व्याज तसेच इतर आर्थिक सुविधा घेत असल्यास त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा समावेश होतो.
खर्चाच्या विभागात आपल्याला मशीनचे डिप्रीसेशन म्हणजेच मशीनचा होणारा घसारा देखील लक्षात घेतला जातो आणि मशीनची कमी होणारी किंमत देखील खर्चाच्या स्वरूपात दाखवली जाते.
शेवटी वरील भागात न दाखवलेला खर्च इतर खर्च भागात दाखवतात.
तक्त्याच्या शेवटी कंपनीचा एकूण खर्च दाखवला आहे.
कंपनीचा महसूल वाढत असताना कंपनीच्या रेकॉर्डमध्ये कच्च्या मालावर होणारा आणि कामगार खर्च वाढणे अपेक्षित आहे.
याउलट कंपनीने व्याजावरील खर्च कमी करणे अपेक्षित आहे.
वरील चार्टवर टाटा मोटर्स कंपनीचा मागील वर्षीचा एकूण खर्च ५१,५७९ आहे.
टॅक्स आणि नफा । Tax & Profit
खाली मी प्रॉफिट-लॉस स्टेटमेण्टचा तिसरा भाग दाखवला आहे.
तिसऱ्या टप्यात आपल्याला कंपनीला झालेला प्रॉफिट आणि कंपनीने प्रॉफीटमधून भरलेला टॅक्स यांचे विवरण आढळून येते.
सर्वात शेवटी आपल्याला ठरलेल्या कालावधीसाठी कंपनीला झालेला नफा किंवा तोटा दिलेला आहे.
अर्थातच कंपनीचा प्रॉफिट वाढतोय हे सर्वात चांगले लक्षण होय हे वेगळे सांगायला नको.
वरील चार्टमधे टाटा मोटर्स कंपनीचा मागील वर्षीचा नफा -२३९५ आहे किंवा कंपनीचा तोटा २३९५ आहे.
अशाप्रकारे या लेखात आपण प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट अतिशय सविस्तरपणे बघितले.
शेअर मार्केट आणि फन्डामेन्टल ॲनालिसिस विषयी अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.
आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास, किंवा शंका असल्यास आपण मला जरूर कळवा.
मी यथाअवकाश, यथाशक्ती आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.
आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
- फन्डामेन्टल ॲनालिसिस मराठी | Fundamental Analysis of Stocks in Marathi
- गुंतवणुक म्हणजे काय? | What is Investment in Marathi
- बॅलन्स शीट मराठी । Balance Sheet in Marathi
- प्रॉफिट-लॉस स्टेटमेन्ट । Profit and Loss Statement
- कॅश फ्लो स्टेटमेंट । Cash Flow Statement
- इपीएस म्हणजे काय ? । What is EPS in Marathi? | EPS mhanje kay?
- शेअर मार्केटचा इतिहास मराठी |Share Market in Marathi
- भारतीय शेअर मार्केटचा इतिहास मराठी । History of Indian Share Market in Marathi
- सेन्सेक्स म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय? | What is Sensex in Marathi? What is Nifty in Marathi?
- आयपीओ म्हणजे काय? मराठी | What is IPO in Marathi ?
- डिमॅट अकाउन्ट म्हणजे काय ? मराठी | What is Demat Account in Marathi?
- मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | Muhurta Trading in Marathi
- शेअर्सचे विविध प्रकार | Types of Shares in Marathi
- अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi
- फेस व्हॅल्यू मराठी। दर्शनी किंमत मराठी। Face Value in Marathi
- ट्रेडींग अकाउंट मराठी | Trading Account in Marathi
- स्टॉक स्प्लिट मराठी | Stock Split in Marathi
- रिव्हर्स स्टॉक स्प्लिट मराठी | Reverse Stock Split in Marathi
- डिव्हिडंड मराठी । Dividend in Marathi
- बोनस शेअर मराठी । Bonus Share in Marathi
- गुंतवणुक म्हणजे काय? | What is Investment in Marathi