व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस मराठी | Volume Spread Analysis in Marathi

Rate this post

नमस्कार मित्रांनो!!!

पैसा झाला मोठाच्या नवीन लेखात आपलं स्वागत आहे.

या अगोदरच्या लेखात आपण व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिसची माहिती घेतली या लेखात मी व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस वर प्रकाश टाकणार आहे.

व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिसमध्ये आपण ट्रेण्ड किंवा स्विंग आणि व्हॉल्युम यांचा अभ्यास केला तर या लेखात आपण एकच कॅण्डल आणि त्या कॅन्डलचा व्हॉल्युम यांचा अभ्यास करणार आहोत.

व्हॉल्युम ॲनालिसिस समजण्यासाठी आपल्याला कॅन्डलस्टिकची पुरेशी ओळख असणे गरजेचे आहे.

आपण पैसा झाला मोठा वरील कॅन्डलस्टिक आणि व्हॉल्युम यांच्या विषयीचे लेख वाचले असल्याचे मी गृहीत धरून या लेखाला सुरुवात करणार आहे.

आपण या आधीचे लेख वाचले नसल्यास आपण ते लेख वाचावे असे मी आपल्याला सुचवतो.

सोयीसाठी मी लिन्क देत आहे.

चला तर मग सुरुवात करूया.

व्हॉल्युम म्हणजे काय ?

व्हॉल्युम म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये झालेली खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये झालेली शेअरची देवाण-घेवाण होय.

व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस मराठी | Volume Spread Analysis in Marathi

आपल्याला जवळपास सर्व डिस्काऊन्ट ब्रोकर्स जसे कि झेरोधा यांच्या प्लॅटफॉर्म आणि ॲप वर व्हॉल्युम इंडिकेटर नावाने हा चार्ट उपलब्ध असतो.

व्हॉल्युम म्हणजे स्टॉकची वरच्या किंवा खालच्या दिशेला जाण्याची ताकद होय किंवा स्टॉकमध्ये बुल्स किंवा बेअर्सने लावलेला जोर असेही आपण म्हणू शकतो.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

स्प्रेड म्हणजे काय ?

उजळणीसाठी म्हणून खालच्या चित्रात मी कॅन्डलस्टिकचे सर्व घटक पुन्हा दाखवले आहे.

स्प्रेड म्हणजे कॅन्डलची रेन्ज असे आपण म्हणू शकतो.

व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस मराठी | Volume Spread Analysis in Marathi

स्प्रेड म्हणजे कॅन्डलच्या हाय प्राइस आणि लो प्राइस यांच्यामधील फरक होय.

spread 2

मित्रांनो, आपल्याला व्हॉल्युम आणि कॅन्डलच्या स्प्रेड मधील बदलांचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यावरून स्टॉक मागील मार्केटची मानसिकता ओळखायची आहे.

आपल्याला स्प्रेड आणि व्हॉल्युमच्या अभ्यासातून स्टॉकमध्ये बुल्स आणि बेअर्स यांच्या नियंत्रणाचा किंवा प्रभावाचा अंदाज बांधता येतो आणि आपले निर्णय ठरवता येतात.

व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिसचे मुख्य घटक कोणते ?

व्हॉल्युम-स्प्रेडचा अभ्यास आपण व्हॉल्युम-स्प्रेडच्या घटकांच्या ओळखीपासून करूया.

  • कॅन्डलचा स्प्रेड
  • कॅन्डलची क्लोझिंग
  • कॅन्डलचा व्हॉल्युम

स्प्रेड आणि व्हॉल्युम

कॅण्डल स्प्रेड आणि व्हॉल्युमच्या अभ्यासात रंगाला फारसे महत्व नसल्याने मी इथे वापरलेल्या चित्रामध्ये रंग दाखवलेले नाही.

व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस | Volume Spread Analysis

हिरवा रंग स्टॉकची किंमत वाढण्याचा तर लाल रंग स्टॉकची किंमत कमी झाल्याचे निर्देशक असल्याचे आपल्याला अगोदरच माहित आहे.

आता आपण वरील चित्राच्या मदतीने स्प्रेड आणि व्हॉल्युम समजावून घेणार आहोत.

सोयीसाठी मी कॅण्डल आणि व्हॉल्युमचे तीन प्रकार दाखवले असून त्यांना क्रमांक देखील दिले आहेत.

आपण असे समजूया कि चित्रात दाखवलेली कॅण्डल हि एकच कॅण्डल असून तिचा तीन प्रकारचा व्हॉल्युम आहे.

अशाप्रकारे अभ्यास केल्यास सारखाच स्प्रेड असणाऱ्या कॅन्डलचा व्हॉल्युम वेगळा असल्यास त्याचा काय अर्थ होतो हे देखील अधिक स्पष्ट होईल.

आपण असे समजूया कि कॅन्डलची हाय प्राइस १०० आहे तर लो प्राइस हि ८० आहे आणि कॅन्डलचा सरासरी व्हॉल्युम १००० आहे.

सुरवात आपण सरासरी व्हॉल्युम असणारी दुसऱ्या क्रमांकाच्या कॅण्डल पासून करणार आहोत.

याचाच अर्थ स्प्रेड २० असतांना कॅन्डलचा सुसंगत व्हॉल्युम १००० आहे असे आपण समजूया.

आता आपण पहिल्या कॅन्डलकडे बघितल्यास आपल्या असे लक्षात येते कि कॅन्डलचा स्प्रेड आहे तेवढाच म्हणजे २० दिसतो आहे.

मात्र पहिल्या कॅन्डलच्या व्हॉल्युमकडे नजर टाकल्यास आपल्या असे लक्षात येते कि व्हॉल्युम मात्र कमी झाला आहे.

याचा अर्थ काय होत असेल बरं ?

याचा अर्थ स्टॉक मधील खरेदी किंवा विक्री व्हॉल्युम सपोर्टेड नाही.

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्टॉक मध्ये अजून मोठे ट्रेडर सहभागी झालेले नाहीत.

मोठ्या ट्रेडर्स ला आपण शेअर मार्केटच्या भाषेत आपण स्मार्ट मनी असे म्हणतो.

मित्रांनो, आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सच्या खरेदी-विक्री मुळे स्टॉक मध्ये मोठी मूव्ह येण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळेच आपल्याला स्टॉक मध्ये स्मार्ट मनी सहभागी होण्याची वाट बघायची असते.

थोडक्यात सांगायचे तर स्टॉकची दिशा हि मार्केट मधील स्मार्ट मनीच्या सहभागावर अवलंबून असते.

आता आपण तिसऱ्या क्रमांकाची कॅण्डल आणि तिचा व्हॉल्युम बघूया.

कॅन्डलचा स्प्रेड २० च आहे व्हॉल्युम मात्र १००० पेक्षा जास्त दिसतो आहे आता आपण या पॅटर्न मागच्या गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न करूया.

वाढलेला व्हॉल्युम स्टॉक मध्ये कोणीतरी मोठा ट्रेडर किंवा स्मार्ट मनी सहभागी असल्याचे स्पष्ट करतो आहे.

मात्र स्टॉक मध्ये स्मार्ट मनी सहभागी असतांना देखील किंमत मात्र त्या तुलनेने वाढलेली दिसत नाही.

आपण असे समजूया कि तिसरी कॅण्डल हि एक हिरवी कॅण्डल आहे.

आता तिसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्युम जर सरासरीपेक्षा जास्त वाढला आहे तर स्प्रेड देखील त्याच तुलनेत वाढलेला दिसायला हवा होता मात्र असे होतांना दिसत नाही.

याचा अर्थ काय बरे?

याचा अर्थ असा कि खरेदी करणाऱ्या मोठ्या ट्रेडरला त्याच्याच तुलनेचा विक्रेता देखील भेटला आहे आणि त्यामुळेच कॅन्डलचा स्प्रेड वाढण्यापासून रोखला गेला आहे.

हे सर्व समजून घेणे आणि त्याचा वापर चार्टवर प्रत्यक्ष ट्रेडींगसाठी करणे थोडे अवघड आहे मात्र सराव केल्यास हे सर्व शक्य आहे.

आपण हे सर्व चार्टवर समजून घेऊ तेव्हा आपल्याला चित्र अधिक स्पष्ट होईल तेव्हा लेख पुढे वाचत राहा.

आपल्या सोयीसाठी मी थोडक्यात व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिसचा सारांश देतो.

१. कॅन्डलचा स्प्रेड आणि व्हॉल्युम दोन्ही वाढत असल्यास आपण त्याला सुसंगती (हारमोनि )म्हणू शकतो
२. कॅन्डलचा स्प्रेड वाढत असेल मात्र व्हॉल्युम कमी होत असले तर ती विसंगती (डायव्हर्जन्स)होय.
३. कॅन्डलचा स्प्रेड कमी झाला असेल मात्र व्हॉल्युम वाढला असेल तर ती विसंगती (डायव्हर्जन्स) होय.

व्हॉल्युम आणि कॅण्डल क्लोझिंग ॲनालिसिस

मित्रांनो, आता आपण कॅन्डलची क्लोझिंग आणि व्हॉल्युम यांचा अभ्यास करूया.

व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस मराठी | Volume Spread Analysis in Marathi

वरील चित्रात मी सारख्याच व्हॉल्युम असणाऱ्या कॅण्डल दाखवल्या आहेत मात्र कॅन्डलच्या क्लोझिंग बघताक्षणी वेगळ्या असल्याचे आपल्या लक्षात येते.

मी चित्रात पॅटर्न घेतले आहेत.

१ ला पॅटर्न बेअरिश पॅटर्न असून २ रा पॅटर्न बुलिश पॅटर्न असल्याचे आपल्या लक्षात येते.

सुरुवात आपण ल्या पॅटर्न पासून करूया.

आपण बघू शकतो सारखाच व्हॉल्युम असणाऱ्या दोन कॅण्डल चित्रात दाखवल्या आहेत.

आपण असे समजूया कि दोन्ही कॅन्डलचा स्प्रेड २० अंकांचा आहे तर व्हॉल्युम १००० आहे.

फक्त पहिली कॅण्डल बघितल्यास मार्केटमध्ये बेअर्सचे पूर्ण नियंत्रण असल्याचे दिसते कारण पहिल्या कॅन्डलची क्लोझिंग अगदी लो प्राइस लेव्हल जवळ झाली आहे.

दुसऱ्या कॅन्डलचा विचार केल्यास बेअर्स स्टॉकची प्राइस खाली ढकलण्यात यशस्वी झालेले दिसतात मात्र स्टॉक प्राइस खाली दाबून ठेवण्यात बेअर्सला यश आलेले दिसत नाही.

यावरून आपण असे म्हणू शकतो स्टॉक मध्ये बुल्सची एन्ट्री होते आहे.

अशाच प्रकारचा पॅटर्न आपल्याला स्टॉक अपट्रेन्डमध्ये असतांना देखील बघायला मिळतो.

२ऱ्या चित्रात आपण बघू शकतो कि पहिली कॅण्डल तयार होतांना स्टॉकमध्ये बुल्सचे वर्चस्व आहे मात्र दुसरी कॅण्डल तयार होतांना बुल्स आपले वर्चस्व गमावतांना दिसताय.

स्टॉकमध्ये जो काही व्हॉल्युम दुसऱ्या कॅण्डलमध्ये आला आहे त्यात स्टॉकची प्राइस वर गेलेली दिसते आहे मात्र वरच्या किमतीवर स्टॉक खरेदी करण्याची बुल्सची तयारी दिसत नाही.

कोणत्याही बाजारात लागू होणारा मागणी आणि पुरवठ्याचा नियम शेअर बाजारात देखींल लागू होतो.

जर वरच्या किमतीवर स्टॉकची मागणी नसेल तर स्टॉकची प्राइस घसरायला सुरुवात होते आणि असेच आपल्याला दुसऱ्या हिरव्या कॅन्डलकडे बघून लक्षात येते.

गोष्टी सोप्या करण्यासाठी मी पहिल्या प्रकारात स्प्रेड सारखा घेतला आहे आणि व्हॉल्युम वेगळा घेतला आहे तर दुसऱ्या प्रकारात व्हॉल्युम सारखाच घेतला असून क्लोझिंग वेगळी घेतली आहे.

प्रत्यक्षात मात्र आपल्याला व्हॉल्युम, स्प्रेड आणि क्लोझिंग सर्व गोष्टींचा तुलनात्मक विचार करून पडद्यामागील गोष्टींचा अंदाज करायचा असतो.

व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस चार्टवर

आता आपण व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस चार्टवर बघूया.

अभ्यासासाठी मी टाटा मोटर्स कंपनीच्या चार्टवरील ७ कॅण्डल आणि व्हॉल्युम बार घेतले आहेत.

व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस मराठी | Volume Spread Analysis in Marathi

समजण्यासाठी म्हणून आपण प्रत्येक कॅण्डल तिचा व्हॉल्युम, स्प्रेड आणि क्लोझिंग यांची चर्चा करणार आहोत.

१. पहिली कॅण्डल बघितल्यास आपल्याला कॅन्डलच्या दोन्ही बाजूला शॅडो दिसताय म्हणजे स्टॉकमध्ये सध्या कोणताही ट्रेण्ड असल्याचे आपण म्हणू शकत नाही. आपण यापुढच्या कॅन्डलचे ॲनालिसिस पहिल्या कॅन्डलच्या तुलनेत बघणार आहोत.

२. दुसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्युम जवळजवळ पहिल्या कॅन्डलच्या व्हॉल्युम एवढाच असल्याचे आपल्या लक्षात येते. कॅन्डलचा स्प्रेड मात्र वाढलेला दिसतो. कॅण्डलची वाढलेली टेल खालच्या प्राइसला स्टॉकची डिमांड दर्शवते आहे. दुसऱ्या कॅन्डलने अगोदरच्या कॅन्डलची हाय प्राइस मात्र ओलांडलेली दिसत नाही.

३. तिसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्युम देखील पहिल्या कॅण्डल इतकाच आहे. या कॅन्डलने मागील दोन्ही कॅन्डलची हाय प्राइस ओलांडली असल्याने स्टॉकमध्ये बुलिश मोमेन्टम असल्याचे आपण म्हणू शकतो. कॅन्डलच्या क्लोझिंगचा विचार करता बुल्स स्टॉकची प्राइस वर ठेवण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. यावरून स्टॉकमध्ये सहभागी होणारे ट्रेडर खरेदी करत असल्याचे आपण म्हणू शकतो.

४. चौथ्या कॅन्डलचा व्हॉल्युम मागील तीनही कॅन्डलपेक्षा वाढलेला दिसतो आहे आणि स्प्रेड देखील वरच्या बाजूला वाढलेला दिसतो आहे. क्लोझिंगचा विचार करतांना कॅण्डलला तयार झालेली वीक, स्टॉकमध्ये अजूनही काही बेअर्स शिल्लक असल्याचे दिसते म्हणजेच वाढलेल्या व्हॉल्युम मध्ये बेअर्स देखील सहभागी असल्याचे आपण म्हणू शकतो.

५. पाचव्या कॅन्डलने ४ थ्या कॅन्डलचा लो ब्रेक केला आहे आणि ४ थ्या कॅन्डलच्या वीकवरून आपण स्टॉकमध्ये बेअर्स असल्याचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. पाचव्या कॅण्डलचा स्प्रेड आणि क्लोझिंगकडे बघता मागील ४ कॅन्डलच्या तुलनेत हि कॅण्डल बरीच मजबूत असल्याचे आपण म्हणू शकतो. मुख्य मुद्दा हा आहे कि पाचव्या कॅन्डलचा व्हॉल्युम हा मागील ४ कॅन्डलपेक्षा कमी आहे. व्हॉल्युम बेअर्सच्या बाजूने नसल्याने स्टॉक डाउनट्रेंन्ड मध्ये जाणार असल्याचे आपण म्हणू शकत नाही.

६. सहाव्या कॅन्डलकडे बघताक्षणी ती एक भक्कम बुलिश कॅण्डल असल्याचे लक्षात येते. कॅन्डलचा व्हॉल्युम देखील मागील बऱ्याच दिवसाच्या व्हॉल्युमपेक्षा जास्त आहे शिवाय कॅन्डलची क्लोझिंग, हायप्राइस लेव्हलच्या जवळ झाली आहे. या सर्व गोष्टींच्या अभ्यासातून आपल्याला स्टॉक मध्ये मोठे ट्रेडर्स बुल्सच्या बाजूने सहभागी झाल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो.

७. सातव्या कॅन्डलचे निरीक्षण करून आपल्याला काय वाटते ते आपण कमेंटबॉक्समध्ये लिहून कळवायचे आहे. पुढे स्टॉकमध्ये काय होईल याचा उलगडा येणारा काळ करणारच आहे तेव्हा आपण थोडी वाट बघूया.

या मुद्यावर मी इथेच थांबतो.

व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस समजून सांगण्यास क्लिष्ट असल्याने या लेखात उणीव राहिल्या असतील याची मला कल्पना आहे.

मी हा लेख अजून जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करत राहील.

आपण आपल्या सूचना-सुधारणा मला जरूर कळवा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण सवडीने हा लेख वाचला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो.

धन्यवाद !!!

अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment