इपीएस म्हणजे काय ? । What is EPS in Marathi? | EPS mhanje kay?

Rate this post

नमस्कार मित्रांनो,

पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

शेअर बाजारात काम करत असताना आपल्याला अनेकदा इपीएस हा शब्द ऐकायला मिळतो.

गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करत असताना कंपनीचा अभ्यास करण्यासाठी किंवा विविध कंपन्यांची तुलना करण्यासाठी काही प्रमाणांची मदत घेतात, इपीएस रेशिओ हे असेच एक साधन आहे.

या लेखात आपण इपीएस म्हणजे काय ? इपीएस रेशिओ कसा काढला जातो ? इपीएस रेशिओ वापरून आपल्याला काय माहिती मिळते ? अशी सर्व सविस्तर चर्चा करणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

इपीएस म्हणजे काय? । What is EPS?

सर्वात आधी आपण इपीएस शब्दाचा फुल फॉर्म बघूया.

इ/E = Earning, अर्निंग म्हणजे कमाई होय.

पी/P =per, प्रति

एस/S = Share, शेअर म्हणजे समभाग, इक्विटी, स्टॉक इ

इपीएस म्हणजे प्रति शेअर असणारी कंपनीची कमाई होय.

इपीएस कसा काढतात ? | How to Calculate EPS?

इपीएस काढण्यासाठी खालील सूत्र वापरतात.

EPS

आता आपण इपीएस उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया.

आपण असे समजूया कि अबक कंपनीचा २०२२ वर्षीचा एकूण निव्वळ नफा १,००,००० रुपये इतका आहे.

अबक कंपनीचे एकूण १०,००० शेअर्स आहेत.

EPS1

अबक कंपनीचा इपीएस आहे १०, याचा अर्थ अबक कंपनी आपल्या प्रत्येक शेअरमागे १० रुपये नफा कमावते.

इपीएस काढत असताना आपल्याला कंपनीचा निव्वळ नफा लक्षात घेताना प्रिफर्ड शेअर्सचा डिव्हिडंड देखील लक्षात घ्यावा लागतो.

आता आपण मार्केटमधील काही कंपन्यांचे इपीएस बघूया.

खाली मी टाटा मोटर्स कंपनीचे मनी कन्ट्रोल वरील आर्थिक विवरण देत आहे.

EPS2

खाली मी महिंद्रा कंपनीचा आर्थिक अहवाल देखील देत आहे.

EPS3

आपल्याला हे रेशिओ आणखी खोलात जाऊन बघायचे असल्यास आपण उजव्या बाजूच्या पर्यायावर क्लिक करून विस्ताराने बघू शकतो.

टाटा मोटर्सच्या अहवालाकडे बघितल्यास टाटा मोटर्सचा इपीएस -३६.९९ असल्याचे आपण बघू शकतो.

यावरून टाटा मोटर्स तोट्यात काम करत असल्याचे लक्षात येते.

महिंद्रा कंपनीचा इपीएस +१६.३३ असल्याचे आपण बघू शकतो म्हणजेच महिंद्रा मोटर्स नफ्यात काम करत असल्याचे आपण म्हणू शकतो.

कंपनीचा इपीएस हा त्या त्या वर्षापुरता मर्यादित असतो.

इपीएस वापरून स्टॉक कसा निवडावा ।

आपल्याला सर्वात प्रथम ज्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची आहे त्या सेक्टरचा इपीएस शोधायचा आहे.

आपण गुगलवर सर्च करून कोणत्याही सेक्टरचा इपीएस शोधू शकतो.

खाली मी सेक्टरचा इपीएस कसा दिलेला असतो ते दाखवले आहे.

eps4

आपण खालील लिंक वर क्लिक करून सेक्टरचा इन्डेक्स चेक करू शकतात.

https://trendlyne.com/

आपल्याला सुरवातीला स्टॉक आणि सेक्टरचा इपीएस तपासून बघायचा आहे आणि ज्या स्टॉकचा इपीएस इंडेक्सच्या जवळ आहे अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची आहे.

त्याचबरोबर आपण दोन स्टॉकमध्ये देखील इपीएस विचारात घेऊन तुलना करू शकतो.

ज्या स्टॉकचा इपीएस चांगला असेल तो स्टॉक उजवा हे वेगळे सांगायला नको.

टाटा मोटर्स आणि महिंद्रा या दोन्ही स्टॉकची तुलना केल्यास महिंद्रा कंपनीचा इपीएस चांगला असल्याचे आपल्या लक्षात येते म्हणून आपण महिंद्रा कंपनीला जास्त गुण देऊ शकतो.

शेअर मार्केट आणि फन्डामेन्टल ॲनालिसिस विषयी अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास, किंवा शंका असल्यास आपण मला जरूर कळवा.

मी यथाअवकाश, यथाशक्ती आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment