ट्रेडींग अकाउंट मराठी | Trading Account in Marathi

5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’च्या नवीन लेखात आपले स्वागत आहे.

या लेखात आपण ट्रेडींग अकाउंट म्हणजे काय ते बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

ट्रेडींग अकाउंट म्हणजे काय ? । What is a Trading Account ?

ट्रेडिंग अकाउंट सिक्युरिटीज, रोख किंवा इतर होल्डिंग्स असलेले कोणतेही गुंतवणूक खाते असू शकते.

इन्ट्राडे ट्रेडरसाठी ट्रेडींग अकाउंट म्हणजे एक महत्वाचे अकाउंट असते आणि या अकाउंटला लागू असणारे नियम आणि या अकाउंटसोबत उपलब्ध असणाऱ्या सुविधा देखील वेगळ्या असतात.

इन्ट्राडे ट्रेडर एकाच सेशनमध्ये शेअरची वारंवार खरेदी-विक्री करत असतात.

ट्रेडिंग अकाउंट मधील शेअर्स आपल्या होल्डिंग मधील शेअर्सपेक्षा वेगळे ठेवलेले असतात कारण हे शेअर्स ट्रेडींगसाठी वापरले जातात.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

ट्रेडींग अकाउंट काम कसे करते ? । How does a Trading Account work?

ट्रेडिंग अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि गुंतवणूकदाराचे बँक अकाउंट यांच्यातील दुव्यासारखे काम करते.

जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराला शेअर्स खरेदी करायचे असतात, तेव्हा तो त्याच्या ट्रेडिंग खात्याद्वारे ऑर्डर देतो.

नंतर हि ऑर्डर स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रक्रियेसाठी जाते.

ऑर्डर प्रोसेस झाल्यावर गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात ऑर्डरप्रमाणे शेअर्स जमा होतात आणि गुंतवणूकदाराच्या बँक अकाउंटमधून ऑर्डरप्रमाणे पैसे कापले जातात.

इक्विटी शेअर्स विकण्यासाठी देखील अशाच प्रकारची प्रक्रिया अवलंबली जाते.

उदा. मी माझ्या झेरोधा ट्रेडींग अकाउंटमध्ये १०० रुपयांच्या १०० शेअर्सची ऑर्डर दिली तर माझी ऑर्डर प्रोसेस झाल्यानंतर माझ्या डिमॅट अकाउंटमध्ये १०० शेअर्स जमा होतील तसेच माझ्या ट्रेडींग अकाउंटशी जोडलेल्या बँक अकाउंटमधून १००*१००=१०,००० रुपये कापले जातील.

मित्रांनो, आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी डिमॅट अकाउंट आणि ट्रेडींग अकाउंट अशा दोन्ही अकाउंटची गरज असते.

आपण इंट्राडे ट्रेडर असाल आणि होल्डिंगसाठी स्टॉक घेत नसाल तरी ट्रेडींग अकाउंट सोबत डिमॅट अकाउंट असणे सेबीच्या (SEBI) नियमानुसार गरजेचे असते.

हा नियम २ ठिकाणी अपवाद आहे तो खालीलप्रमाणे

१. आपले शेअर्स जर सर्टिफिकेटच्या स्वरूपात असतील तर आपल्याकडे डिमॅट अकाउंट असण्याची आवश्यकता नाही.

२. आपण जर फक्त फ्युचर्स, ऑप्शन्स आणि करन्सीमध्येच ट्रेडींग करणार असाल तर आपल्याजवळ फक्त ट्रेडींग अकाउंट असले तरी पुरेसे आहे.

फ्युचर्स आणि ऑप्शन्स केवळ करार असल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क देत नसल्याने डिमॅट अकाउंटचा नियम याला अपवाद ठरतो.

आपल्याला इक्विटीमध्ये काम करतांना मात्र डिमॅट अकाउंट असणे अगदी गरजेचे आहे.

ट्रेडींग अकाउंट आणि डिमॅट अकाउंट मधील फरक

ट्रेडींग अकाउंट

  • ट्रेडींग अकाउंट मुख्यत्वे शेअरची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरतात
  • ट्रेडींग अकाउंट आपल्या डिमॅट अकाउंट आणि बँक अकाउंट दरम्यान काम करते.
  • ट्रेडींग अकाउंटसाठी कोणतेही चार्जेस किंवा किंमत नसते.

डिमॅट अकाउंट

  • डिमॅट अकाउंट आपले खरेदी केलेले शेअर्स डिजिटल स्वरूपात साठवण्यासाठी वापरले जाते.
  • डिमॅट अकाउंट एक स्वतंत्र अकाउंट असते.
  • डिमॅट अकाउंटची वार्षिक फी असते.

अशाप्रकारे आपण या लेखात ट्रेडींग अकाउंटची माहिती घेतली.

हा लेख वाचून आपल्या माहितीत वाढ झाली असेल अशी मी अपेक्षा करतो.

आपल्या सूचनां-सुधारणांचे देखील मी स्वागत करतो.

शेअर मार्केटची अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी पैसा झाला मोठा फेसबुक पेजला लाइक करा, टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा.

आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद !!!

प्रश्नावली

प्रश्न :आपण अनेक ट्रेडींग अकाउंट ठेवू शकतो का?

उत्तर : हो

आपण एकापेक्षा जास्त ट्रेडींग अकाउंट ओपन करू शकतो मात्र प्रत्येक ट्रेडींग अकाउंट वेगवेगळ्या ब्रोकरकडे असणे गरजेचे आहे.

एकाच ब्रोकरकडे आपण अनेक ट्रेडींग अकाउंट उघडू शकत नाही.

उदा. एक ट्रेडींग अकाउंट झिरोधाकडे आणि दुसरे एंजल ब्रोकिंगकडे.

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment