पॉलिसी बझार आयपीओ (पी बी फिनटेक ली आयपीओ ) मराठीत | PB Fintech Limited IPO (Policy Bazaar IPO) in Marathi

Rate this post

नमस्कार मित्रांनो,

पैसा तयार ठेवा कारण मी घेऊन आलोय माहिती एका नव्या कोऱ्या आयपीओची माहिती ज्याच नाव आहे पॉलिसी बझार आणि पैसा बझार.

पॉलिसी बझार आणि पैसा बझार हा पी बी फिनटेक ली कंपनीचा एक अतिशय नावाजलेला ब्रॅण्ड आहे.

पॉलिसी बझार आर्थिक सेवा क्षेत्रात काम करणारी कंपनी असून येत्या आठवड्यात पॉलिसी बझार आपला ५,६२५ कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात घेऊन येत आहे.

या लेखात आपण पॉलिसी बझार आयपीओची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

पॉलिसी बझार आयपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Policy Bazaar IPO Subscription Status

आइपीओ खुला झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ०.६९ पट सबस्क्राइब झाला आहे.

सब्सक्रिप्शन स्टेटस
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)९१.१८ पट
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)११२.०२ पट
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)१२.२४ पट

पॉलिसी बझार आयपीओ शेअर्सची उपलब्धता | Policy Bazaar IPO Availability of Shares

पॉलिसी बझार आयपीओची एकूण किंमत ५,६२५.०० कोटी रुपये असून पूर्ण १८७५ कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल) उपलब्ध केले गेले आहेत तर ३७५० कोटी रुपयांचे शेअर्स हे नव्याने विक्रीस (फ्रेश इश्यू ) उपलब्ध आहेत.

उपलब्धता
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)७५ %
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)१५ %
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)१० %

पॉलिसी बझार आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Policy Bazaar IPO Share Price and Lot Size

पॉलिसी बझार आयपीओ शेअरची दर्शनी किंमत हि २ रुपये आहे.

या आयपीओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ९४० रुपये आणि कमाल किंमत ९८० रुपये असणार आहे.

एका लॉटमधील शेअरची संख्या हि १५ असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १५ * ९४० = १४,१०० रुपये ते १५ * ९८० = १४,७०० रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १४,१०० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९१,१०० रुपये इतकी असणार आहे.

पॉलिसी बझार आयपीओची तारीख | Policy Bazaar IPO Date

पॉलिसी बझार आयपीओ १ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ३ नोव्हेंबर २०२१ असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे

पॉलिसी बझार आयपीओ शेअर्सची अलॉटमेंट १० नोव्हेंबर २०२१ रोजी चालू होणार असून १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर १५ नोव्हेंबर २०२१ ला पी बी फिनटेक ली बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

पॉलिसी बझार आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Policy Bazaar IPO?

सध्या मार्केटमध्ये पॉलिसी बझार आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम जवळपास *** रुपये असल्याचे समजते.

पॉलिसी बझार आयपीओचा उद्देश | Objectives of Policy Bazaar IPO

  • “पॉलिसीबाजार” आणि “पैसाबाजार” ब्रॅण्डविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवणे.
  • ऑफलाइन ग्राहकवर्गात वाढ करणे.
  • धोरणात्मक गुंतवणुकी आणि अधिग्रहणांसाठी निधी देणे.
  • कंपनीचा आंतरराष्ट्रीय व्यावसाय वाढवणे.
  • दैनंदिन आर्थिक व्यवहार.

पी बी फिनटेक ली कंपनीची माहिती | Information of PB Fintech Limited

पॉलिसी बझार आणि पैसा बझार हे पी बी फिनटेक ली कंपनीचे अतिशय प्रसिद्ध ब्रॅण्ड आहेत.

पॉलिसी बझार हा पी बी फिनटेक ली कंपनीचा विमा आणि कर्ज देणाऱ्या सुविधांचा एक आघाडीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे.

याशिवाय हि कंपनी विमा, क्रेडिट आणि इतर आर्थिक सुविधा सुलभरीत्या पुरवण्याबरोबरच लोकांमध्ये आर्थिक सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे देखील काम करते.

पॉलिसी बझारची सुरुवात २००८ मध्ये ग्राहकांना विमा पॉलिसीची जास्तीत जास्त आणि पारदर्शक माहिती पुरवणे आणि विमा पॉलिसी निवडणे अधिक सोपे करणे या उद्देशाने झाली होती.

पॉलिसी बझार हा एक ग्राहक आणि विमा कंपन्यांना जोडणारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे.

मार्च २०२१ अखेर पॉलिसी बझार वर ५१ विविध कंपन्यांचे जवळपास ३४० विमा प्लॅन उपलब्ध होते. यात हेल्थ, मोटार, हाऊस इ विविध प्लॅनचा समावेश होतो.

आपल्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी कंपनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरते ज्यात मानवी हस्तक्षेप खूप कमी असतो.

फ्रॉस्ट अँन्ड स्लीव्हनच्या सर्वे रिपोर्ट अनुसार पॉलिसीबाजार हे भारतातील सर्वात मोठे डिजिटल विमा मार्केटप्लेस आहे ज्याचा बाजार हिस्सा ९३% आहे हा निष्कर्ष २०२० साली विकल्या गेलेल्या पॉलिसीच्या आधारवर होता.

२०२० साली विक्री झालेल्या डिजिटल विमा पॉलिसींपैकी ६५% पॉलिसी पॉलिसीबझारद्वारे विकल्या गेल्या होत्या.

पी बी फिनटेक ली कंपनीच्याच पैसा बझार या आणखी एका डिजिटल प्लॅटफॉर्मदवारे आपल्याला वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यात वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, क्रेडिट कार्ड, गृह कर्ज आणि मालमत्तेवरील कर्ज यासह वैयक्तिक क्रेडिट श्रेणींमध्ये ग्राहकांना उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फ्रॉस्ट अँड सुलिव्हनच्या मते, पैसाबाजार हे ५१% मार्केट शेअरसह भारतातील सर्वात मोठे डिजिटल ग्राहक क्रेडिट मार्केटप्लेस होते, हा निष्कर्ष आर्थिक वर्ष २०२० मधील कर्ज वितरणावर आधारित होता.


पॉलिसी बझार कंपनीची आर्थिक माहिती ।

तपशीलदशलक्ष रुपयेप्रतिवार्षिक
३१ मार्च २०२१३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९
एकूण मालमत्ता(Total Assets)२३,३०७१५,७५९७,५१४
एकूण महसूल(Total Revenue)९,५७४८,५५५५,२८८
एकूण नफा (कर वगळता)(Profit After Tax)१,५०२३,०४०३,४६८

पॉलिसी बझार उजवी बाजू | Positives of Policy Bazaar

  • विमा आणि वैयक्तिक क्रेडिट उत्पादनांचे संशोधन आणि निवड करण्यासाठी ग्राहकांना विस्तृत निवड आणि पारदर्शकता प्रदान करणे.
  • विमा आणि कर्ज देणाऱ्या विविध कंपन्यांशी सहयोगात्मक भागीदारी.
  • पॉलिसीबझार आणि पैसाबाजार प्लॅटफॉर्मचा असणारा भक्कम नेटवर्क प्रभाव हि जमेची बाजू.
  • कमी ऑपरेटिंग खर्चासह भांडवली कार्यक्षम मॉडेल.
  • अनुभवी संस्थापक आणि व्यवस्थापन.

थोडक्यात महत्वाचे | All Important

पॉलिसी बझार आयपीओ ५,६२५.०० कोटी रुपये
किमान किंमत ९४० रुपये
कमाल किंमत ९८० रुपये
लॉट साईझ १५
एकूण गुंतवणूक १४,१०० रुपये ते १४,७०० रुपये
आईपिओ खुला होणार २८ ऑक्टोबर २०२१
आईपिओ बंद होणार १ नोव्हेंबर २०२१
शेअर्स इश्यू होणार ८ नोव्हेंबर २०२१
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार १० नोव्हेंबर २०२१
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार नोव्हेंबर २०२१

अधिक माहितीसाठी आपण खालील लिन्कवर क्लिक करु शकतात.

पॉलिसी बझार

पी बी फिनटेक ली

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment