पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आइपीओ मराठी

Rate this post

Paras Defence and Space Technologies IPO in Marathi

मित्रांनो, येत्या आठवड्यात पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ कंपनीचा आईपिओ येत आहे.

आईपिओ च्या माध्यमातून पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ जवळपास १७०.७८ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे..

आपल्याला डिफेन्स आणि स्पेस क्षेत्रात रुची असल्यास आपण या आईपिओला सबस्क्राइब करू शकतात.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओ २१ सप्टेंबर २०२१ ला शेअर बाजारात दाखल होत आहे.

अनुक्रमणिका hide
Paras Defence and Space Technologies IPO in Marathi

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ सब्सक्रिप्शन स्टेटस | Paras Defence And Space Technologies IPO Subscription Status

आइपीओ खुला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३०४ पट सबस्क्राइब झाला.

सब्सक्रिप्शन स्टेटस
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)१६९.६५ पट
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)९२७.७० पट
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)११२.८१ पट

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ शेअर्सची उपलब्धता | Paras Defence And Space Technologies IPO Availability of Shares

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओची किंमत १७०.७८ कोटी रुपये असून एकूण किमतीपैकी १४०.६० कोटी रुपयांचे शेअर्स हे नव्याने विक्रीस उपलब्ध केले गेले आहेत तर ३०.१८ कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस उपलब्ध आहेत.

उपलब्ध शेअर्सचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असणार आहे.

शेअर्सची उपलब्धता
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)५० %
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)१५ %
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)३५ %

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओची किंमत आणि लॉट साईझ | Paras Defence And Space Technologies IPO Share Price

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ शेअरची दर्शनी किंमत हि १० रुपये आहे.

या आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत १६५ रुपये आणि कमाल किंमत १७५ रुपये असणार आहे.

एका लॉटमधील शेअरची संख्या हि ८५ असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ८५ * १६५ =१४,०२५ रुपये ते ८५ * १७५ = १४,८७५ रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १४,०२५ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,८२,३२५रुपये इतकी असणार आहे.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओची तारीख | Paras Defence And Space Technologies IPO Date

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओ २१ सप्टेंबर २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख २३ सप्टेंबर २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आईपिओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ शेअर्सची अलॉटमेंट २८ सप्टेंबर २०२१ रोजी चालू होणार असून ३० सप्टेंबर २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर १ ऑक्टोबर २०२१ ला पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Paras Defence And Space Technologies IPO?

सध्या मार्केटमध्ये पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम भक्कम २१० रुपये ते २१५ रुपये असल्याचे समजते.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओचा उद्देश | Objectives of Paras Defence and Space Technologies IPO

 • भांडवलाची उभारणी करणे.
 • कर्जाची परतफेड करणे आणि आगाऊ रक्कम अदा करणे.
 • दैनंदिन आर्थिक व्यवहार.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ कंपनीची माहिती | Information of Paras Defence And Space Technologies

प्रमोटर्स:

 • श्री शरद वीरजी शाह
 • श्री मुंजल शरद शाह

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ विविध संरक्षण आणि अंतराळ संबंधीच्या उत्पादनांचे निर्माण करते.

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने खालील प्रॉडक्टसचा समावेश आहे.

 • डिफेन्स आणि स्पेस ऑप्टिक्स
 • डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स
 • अवजड यंत्रे
 • इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्लस प्रोटेक्शन सिस्टम

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज ही भारतातील एकमेव कंपनी आहे जी स्पेस-ऑप्टिक्स आणि ऑप्टो-मेकॅनिकल सिस्टम क्षेत्रात काम करण्यास सक्षम आहे.

भारतीय बाजारपेठेसाठी संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्यासाठी कंपनीने जगातील काही आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी केली आहे.

कंपनीचे महाराष्ट्रात दोन उत्पादन प्रकल्प असून कंपनी नवी मुंबईतील नेरुळ येथे सध्याचा उत्पादन प्रकल्प वाढवण्याच्या विचारात आहे.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ उजवी बाजू | Positives of Paras Defence and Space Technologies

 • संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील उत्पादने आणि सोल्यूशन्सची विस्तृत श्रेणी.
 • भारतातील अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या ऑप्टिक्स उत्पादनांच्या खूप कमी असणाऱ्या उत्पादकांपैकी एक उत्पादक असल्याने कमी स्पर्धा.
 • मजबूत संशोधन क्षमता.
 • सरकारी संरक्षण संस्थांशी असणारे चांगले ग्राहक संबंध हि कंपनीची जमेची बाजू.
 • भक्कम आणि अनुभवी व्यवस्थापन.

थोडक्यात महत्वाचे | Important

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओ १७०.७८ कोटी रुपये
किमान किंमत १६५ रुपये
कमाल किंमत १७५ रुपये
लॉट साईझ ८५
एकूण गुंतवणूक १४,०२५ रुपये ते १४,८७५ रुपये
आईपिओ खुला होणार २१ सप्टेंबर २०२१
आईपिओ बंद होणार २३ सप्टेंबर २०२१
शेअर्स इश्यू होणार २८ सप्टेंबर २०२१
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार ३० सप्टेंबर २०२१
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार १ ऑक्टोबर २०२१

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करून पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ च्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment