इन्शुरन्स (विमा)म्हणजे काय मराठी ? । What is Insurance in Marathi ? | Insurance Information in Marathi

2.8/5 - (5 votes)

नमस्कार मंडळी,

पैसे झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.

मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात आग, चोरी, अपघात, भूकंप, पूर, दुष्काळ, दंगल अशा विविध दुर्दैवी घटना घडत असतात किंवा अशा घटना घडण्याची शक्यता असते.

अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित दुर्दैवी घटनांपासून आपल्या संपत्तीचे रक्षण करणे हि आपली जबाबदारी आहे आणि यासाठी इन्शुरन्स किंवा विमा समजून घेणे गरजेचे आहे.

इन्शुरन्स किंवा विमा हा शब्द आपण रोजच्या व्यवहारांत अनेकदा ऐकतो, टिव्हीवर विमा कंपन्यांच्या जाहिराती बघतो मात्र खूप कमी लोकांना इन्शुरन्स विषयी पुरेशी माहिती असते तेव्हा आजच्या लेखात आपण इन्शुरन्स किंवा विमा म्हणजे काय ? इन्शुरन्सची सुरुवात कशी झाली? इन्शुरन्सचे प्रकार? इन्शुरन्सचे महत्व असे सर्व काही बघूया.

आर्थिक नियोजनात इन्शुरन्स हे देखील महत्वाचे साधन आहे तेव्हा हा लेख अतिशय महत्वाचा आहे शिवाय येत्या काळात आपण विविध प्रकारचे इन्शुरन्स अगदी सविस्तरपने बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

इन्शुरन्स म्हणजे काय ? । What is Insurance in Marathi?

मित्रांनो, इन्शुरन्स हि एक आपत्कालीन व्यवस्था आहे.

जीवन अप्रत्याशित आहे, आपल्यावर एखादे संकट आल्यास आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते किंवा आपल्याला अचानकपने मोठ्या आर्थिक मदतीची गरज भासू शकते.

आपण इन्शुरन्सच्या मदतीने संकटकालीन परिस्थितीसाठी पैशाची तरतूद करू शकतो.

इन्शुरन्स कंपनी आपल्याला प्रीमियमच्या बदल्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी आर्थिक संरक्षण देऊ करते.

उदा. आजारपणात आपल्याला वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज भासल्यास हेल्थ इन्शुरन्स आपल्याला अतिशय उपयोगी पडतो.

इन्शुरन्सचा इतिहास । History of Insurance

मित्रांनो, इन्शुरन्सचा इतिहास तसा फार जुना आहे बरं का.

पूर्वीच्या काळी होणारा व्यापार मोठ्या प्रमाणावर समुद्रीमार्गानेच होत असे.

समुद्री मार्गाने होणाऱ्या व्यापारात आणि व्यापारासाठी होणाऱ्या सफरींना वादळं, लुटेरे इ अनेक संकटांचा सामना करावा लागत असे.

व्यापारासाठी जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर सर्व माल एकाच जहाजात लादल्यास आणि जहाज बुडाल्यास व्यापाऱ्याचे संपूर्ण नुकसान होत असे.

मात्र व्यापारी माल अनेक जहाजांत वाटल्यास जर एखादे जहाज बुडाले, लुटले गेले तरी सर्वनाश होत नसे.

अशाप्रकारे अनेक व्यापारी एकत्र येऊन आपला माल आपापसांतील विविध जहाजांमध्ये वाटून घेत असत प्रवासातील जोखीम अनेकांमध्ये वाटून घेणे हि या खटाटोप करण्यामागील मुख्य कल्पना होय.  

उदा. माझा १ लाखाचा माल एकाच जहाजात लादल्यास आणि ते जहाज बुडाल्यास माझे पूर्ण नुकसान होईल याउलट मी माझा सर्व माल प्रत्येकी २५,००० अशाप्रकारे ४ जहाजांत लादल्यास आणि माझे एखादे जहाज बुडाल्यास माझा किमान ७५००० रुपयांचा माल शिल्लक राहील.

अशाप्रकारे माझी जोखीम मला काही प्रमाणात कमी करता येऊ शकते.

इसवीसन पूर्व २००० वर्षापूर्वी चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही जोखीम व्यवस्थापनाची पद्धत सुरू केली होती.

मित्रांनो, इसवीसन पूर्व १७५६ मध्ये बॅबिलोनियन व्यापाऱ्यांनी हमुरबी संहिता (कोड) नावाची पद्धत सुरू केली होती ज्यात जहाजातून माल नेण्याकरिता व्यापाऱ्यांना कर्ज मिळत असे.

हमुरबी कोडप्रमाणे जर या सफरीत ते जहाज लुटले गेले/बुडाले तर काढलेले कर्ज त्या व्यापाऱ्याला माफ करण्यात येई, परंतु व्यापार करून ते जहाज सुरक्षितपणे परत आले तर मात्र त्या व्यापाऱ्याला कर्ज देणाऱ्याला कर्जापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागे.

मित्रांनो, भारतात देखील विम्याची कल्पना खूप पूर्वीच्या लिखाणात वाचायला मिळते.

मनुस्मृती, याज्ञव्यल्क्य स्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये विम्याचा उल्लेख आढळतो.

योगक्षमं वहाम्यहम्’ हे भारतीय जीवन विमा निगमचे घोषवाक्य मनुस्मृतीमधूनच घेतले आहे.

सगळ्यांनी मिळून विम्याचे हप्ते भरायचे आणि ज्याचे नुकसान झाले असेल किंवा ज्याला गरज असेल त्याला या विम्याच्या रक्कमेतला थोडा वाटा द्यायचा अशी ही कल्पना होती.

साधारणतः इसवी सन पूर्व १७५० च्या सुमारास ऱ्होडच्या व्यापाऱ्यांनी एक अनोखी पद्धत अंमलात आणल्याचे आढळते.

अनेक व्यापारी वस्तूंची जहाजांतून वाहतूक करीत असतील तर सगळे थोडे थोडे पैसेजमा करत आणि यातून एक मोठा निधी (fund)तयार होत असे.

जर एखाद्याचे जहाज बुडाले/चोरीला गेले तर त्याला तो सर्व निधी दिला जाई.

इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास रोमन लोकांनी आयुर्विम्याची पद्धत सुरू केली असल्याचा दाखला इतिहासात आढळतो.

यात प्रत्येकाने काही हप्ता भरायचा आणि त्यातून हफ्ता भरणाऱ्यांपैकी जर कोणी व्यक्ती मृत झाली तर त्या निधीतून त्या व्यक्तीच्या दफनाचा खर्च केला जायचा, तसेच त्याच्या कुटुंबालाही काही पैसे दिले जायचे.

इसवी सन १६६६ मध्ये लंडनला एक मोठी आग लागली आगीत १३,२०० घरे जाळून खाक झाली त्यावरून बोध घेऊन इसवी सन १६८०मध्ये निकोलस बर्बोन यांनी इंग्लंड मध्ये दि फायर ऑफिस नावाची विम्याची पहिली आग विमा कंपनी सुरू केली होती.

अशाप्रकारे आपण इन्शुरन्सची ओळख करून घेतली आहे.

इन्शुरन्सचे प्रकार | Types of Insurance in Marathi

मित्रांनो, आता आपण इन्शुरन्सचे प्रकार बघणार आहोत.

इन्शुरन्सचे प्रामुख्याने पुढीलप्रमाणे दोन मुख्य प्रकार आहेत.

१. लाईफ इन्शुरन्स (जीवन विमा )

२. जनरल इन्शुरन्स (जीवनेतर विमा )

आता आपण दोन्ही प्रकार थोडक्यात समजून घेऊ.

१. लाईफ इन्शुरन्स (जीवन विमा )

जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याचा इन्शुरन्स काढतो तेव्हा त्याला आपण लाईफ इन्शुरन्स असे म्हणतो.

लाईफ इन्शुरन्सलाच जीवन आयुर्विमा किंवा जीवनविमा असे देखील म्हणतात.

लाईफ इन्शुरन्स घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना त्या व्यक्तीच्या मृत्य पश्चात एक ठराविक रक्कम मदत म्हणून उपलब्ध होत असते.

२. जनरल इन्शुरन्स (जीवनेतर विमा )

जीवनव्यतिरिक्त आपण ज्या गोष्टींचा विमा उतरवतो त्या सर्व विमा पॉलिसी या जनरल इन्शुरन्सच्या प्रकारात मोडतात.

उदा. मोटार इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, मोबाईल इन्शुरन्स इ

इन्शुरन्सचे महत्व | Importance of Insurance in Marathi

आपल्यापैकी अनेक लोकांना इन्शुरन्स हा एक अनावश्यक खर्च वाटतो मात्र आपण इन्शुरन्सची माहिती घेतल्यास आपल्याला नक्कीच इन्शुरन्स अनावश्यक खर्च वाटणार नाही.

  • मुळात इन्शुरन्स हि आपली एक आपत्कालीन व्यवस्था असल्याचे आपण म्हणू शकतो.
  • इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला आजारपण, वैद्यकीय आणीबाणी, हॉस्पिटलायझेशन, अशा संकट काळात उपचार घेण्यासाठी आणि भविष्यात आवश्यक वैद्यकीय सेवेसाठी पैसे उभे करण्यास मदत करते.
  • दुर्दैवाने घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे एखाद्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो अशावेळी अडचणीत सापडलेल्या कुटुंबला इन्शुरन्स पॉलिसी खूप मोठा आधार होऊ शकते.
  • आपल्यावर कोणतीही अनपेक्षित आपत्ती आल्यास किंवा आपले अनपेक्षित नुकसान झाल्यास विमा आपल्या घराचे संरक्षण करण्यास मदत करतो. आपली गृह विमा योजना आपल्याला आपल्या घराच्या नुकसानीचे कव्हरेज मिळविण्यात आणि दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीच्या खर्चासाठी, आवश्यक असणारे भांडवल उभे करण्यास मदत करते.
  • अनेक इन्शुरन्स पॉलिसी नियमित कव्हरेजसह बचत आणि गुंतवणूक करण्याचे देखील पर्याय देखील उपलब्ध करून देतात. नियमित गुंतवणुकीद्वारे आपण भविष्यासाठी संपत्ती निर्माण करू शकतो. अशा योजनांमध्ये आपण भरत असलेल्या प्रीमियमपैकी एक भाग लाइफ कव्हरेजसाठी जातो तर दुसरा भाग बचत योजना किंवा गुंतवणूक योजनेकडे जातो.

जनरल इन्शुरन्सचे खालील प्रमाणे आणखी उपप्रकार पडतात

१. हेल्थ इन्शुरन्स

हॉस्पिटलायझेशन, वैद्यकीय उपचार इत्यादींसह विविध आरोग्य समस्यांशी निगडित वैद्यकीय खर्च कव्हर करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसीला आपण हेल्थ इन्शुरन्स असे म्हणतो.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत या विमा योजना उपयोगी पडतात; आपण विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये अगदी कॅशलेस सुविधेचा देखील लाभ घेऊ शकता.

२. मोटर इन्शुरन्स

मोटर इन्शुरन्स या प्रकारात आपण कार आणि बाईक यासारखी वाहने सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. या योजनेत नैसर्गिक आपत्ती, इतरांचे नुकसान (पॉलिसीधारकाच्या वाहनाच्या अपघातात नुकसान झालेले किंवा दुखापत झालेले लोक) आणि अपघात आणि अपघातांसह वाहनाचे नुकसान यापासून संरक्षण दिले जाते.

३. होम इन्शुरन्स

होम इन्शुरन्स विमा योजना अपघात, अपघात आणि नैसर्गिक आपत्ती, अशा इतर घटनांमुळे घराचे होणारे कोणतेही नुकसान कव्हर करतात.

याशिवाय आपल्याला आता मोबाईल, घरातील इलेक्ट्रिक उपकरणे इ गोष्टींचा देखील इन्शुरन्स काढता येतो.

इन्शुरन्सची वैशिष्ट्य । Features of Insurance in Marathi

मित्रांनो, इन्शुरन्स किंवा विमा हा दोन पक्षांमधील एक करार असून या कराराद्वारे संरक्षित केल्या जाणाऱ्या पक्षाचे विविध संकटामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्याची तरतूद केली जात असते.

आपत्कालीन परिस्थितीत मिळणाऱ्या मदतीच्या बदल्यात संरक्षित व्यक्तीने किंवा पक्षाने इन्शुरन्सचा हफ्ता भरायचा असतो.

आता आपण इन्शुरन्सची काही वैशिष्ट्य बघूया

१. विमा एक करार

इन्शुरन्स हा पॉलिसी प्रोव्हाडर आणि पॉलिसी होल्डर या दोन्हीमधला एक कायदेशीर करार असतो ज्यात परस्पर सहमतीने ठरवलेल्या प्रिमिअमच्या बदल्यात पॉलिसी प्रोव्हाडर, पॉलिसी होल्डरला संकट काळासाठी आर्थिक संरक्षण किंवा आर्थिक मदत पुरवतो.

२. सामूहिक सहकार्याचा अविष्कार

मित्रांनो, अनिश्चित आणि अनियंत्रित संकटाच्या काळात एकट्यादुकट्या व्यक्तीची आर्थिक स्थिती अगदी मोडून पडू शकते.

इन्शुरन्स क्षेत्रात अनेक लोक मिळून भविष्यात येणाऱ्या बऱ्या-वाईट परिस्थितीसाठी एक मोठा निधी उभा करतात आणि प्रत्यक्षात ज्या व्यक्तीवर आपत्ती आली असेल त्या व्यक्तीला त्याच्या योगदानानुसार आर्थिक मदत म्हणून या निधीतील काही रक्कम संरक्षणच्या किंवा भरपाईच्या स्वरूपात दिली जाते.

इन्शुरन्स क्षेत्र अगदी सहकाराच्या ‘एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक’ या ब्रीद वाक्याला अनुसरून काम करत असल्याचे आपल्या लक्षात येते.

३.जोखमेचे विभाजन

एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल कि इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर आपण लोकांच्या अशा एका घोळक्यात सहभागी होतो कि या घोळक्यातील कोणत्याही व्यक्तीवर संकट आले तरी त्या संकटामुळे होणारे आर्थिक नुकसान सर्व लोकांमध्ये वाटले जाते.

अशाप्रकारे आपण आपल्या जोखमेचे यशस्वीरीत्या विभाजन करू शकतो.

यावरून आपण असे म्हणू शकतो कि इन्शुरन्स हे एक सामाजिक आणि आर्थिक जोखीम विभागून, वैयक्तिक जोखीम करण्याचे उत्कृष्ट साधन आहे.

४. घटनावलंबी करार

मित्रांनो, विमा फक्त अशाच घटना कव्हर करतो ज्यांचा अंदाज लावता येत नाही.

उदा. नैसर्गिक आपत्ती, चोरी, आग, अपघात, मृत्यू इ

ज्या दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता अधिक असते अशा घटना इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केल्या जात नाही.

असे असले तरी अनेक इन्शुरन्स कंपन्या जास्त प्रिमिअम घेऊन अशा पॉलिसी देऊ करतात किंवा पॉलिसी देताना पॉलिसी होल्डरला अधिक जास्त अटी घालून देतात.

उदा. अनेक हेल्थ पॉलिसीमध्ये सुरवातीचा काही काळ गरोदरपणात वैद्यकीय मदतीसाठी लागणार खर्च कव्हर केला जात नाही.

यावरून आपल्या असे लक्षात येते कि इन्शुरन्स हा एक घटनावलंबी करार आहे.

इन्शुरन्सचे फायदे | Benefits of Insurance in Marathi

मित्रांनो, इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे पॉलिसीच्या प्रकारानुसार बदलत जातात असे असले तरी आपण काही प्रमुख फायदे आता बघणार आहोत.

१. सुरक्षा

इन्शुरन्स असल्याने आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या संपत्तीला देखील एक सुरक्षा कवच मिळते.

उदा. लाईफ इन्शुरन्समुळे आपल्या नंतर देखील आपले कुटुंब आर्थिक स्तरावर स्थिर होऊ शकते, वैद्यकीय मदत भासल्यास आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीमधून खर्चाची तरतूद करता येऊ शकते, आपल्या गाडीचा अपघात झाल्यास दुरुस्तीसाठी आपल्याला खर्चाची तरतूद करता येते.

शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतातील पीक हिच त्यांची संपत्ती होय तेव्हा शेतातील पिकाचा पीकविमा काढून शेतकरी आपली मालमत्ता सुरक्षित करू शकतात यातून कृषी क्षेत्रास देखील मदत मिळते.

२. मनःशांती

इन्शुरन्स पासून मिळणाऱ्या सुरक्षेमुळे आपल्याला एक सुरक्षेची भावना असते याशिवाय आपण काही प्रमाणात आर्थिक स्तरावर देखील धोका पत्करण्यास सक्षम होतो.

विमा काढल्यानंतर आपली संपत्तीचे जसे कि घर, गाडी इ देखील नुकसान झाल्यास आर्थिक भरपाई मिळते तेव्हा आपण थोड्याफार प्रमाणात निवांत होऊ शकतो.

३. बचत करण्याची सवय

इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला दरवर्षी किंवा दरमाह इन्शुरन्ससाठी ठरवून दिलेला हफ्ता भरवा लागतो यातून आपल्याला बचत करण्याची सवय लागते.

४. रोजगार निर्मिती

मित्रांनो, विमा क्षेत्राची व्याप्ती खूप मोठी असून या क्षेत्रापासून अनेक लोकांना रोजगार मिळत असून या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत आहे.

विमा क्षेत्रात इन्शुरन्स एजंट, क्लेम सेटलमेंट, ग्राहकसेवा, प्रशाकीय अधिकारी अशाप्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाखो लोक या क्षेत्रात काम करत आहेत.

टॉप इन्शुरन्स कंपन्या | Top Insurance Companies in India

आता आपण भारतातील काही नावाजलेल्या इन्शुरन्स कंपन्यांची नावे बघूया

भारतातील टॉप १० कार इन्शुरन्स कंपन्या

  • इफको टोकियो जनरल इन्शुरन्स (IFFCO TOKYO GENERAL INSURANCE)
  • रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स (Royal Sundaram General Insurance)
  • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी (Oriental Insurance Company)
  • एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स (HDFC Argo General Insurance)
  • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स (Universal Sompo General Insurance)
  • टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स (Tata AIG General Insurance)
  • न्यू इंडिया अॅश्युरन्स (New India Assurance )
  • एसबीआय जनरल इन्शुरन्स (SBI General Insurance)
  • बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स (Bajaj Allianz General Insurance)
  • फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स (Future General India Insurance)
  • भारती एक्सा जनरल इन्शुरन्स (Bharti Axa General Insurance)

भारतातील टॉप १० जीवन विमा /लाईफ इन्शुरन्स कंपन्या

  • भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India)
  • मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी (Max Life Insurance Company)
  • एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी (HDFC Life Insurance Company)
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स (ICICI Prudential Life Insurance)
  • टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी (Tata AIA Life Insurance Company)
  • भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स कंपनी (Bharti Axa Life Insurance Company)
  • बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी (Bajaj Allianz Life Insurance Company)
  • एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी (SBI Life Insurance Company)
  • रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी (Reliance Nippon Life Insurance Company)
  • एगॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी (Aegon Life Insurance Company)

भारतातील टॉप १० हेल्थ इन्शुरन्स कंपन्या

  • इफको टोकियो जनरल इन्शुरन्स (IFFCO Tokio General Insurance)
  • केअर आरोग्य विमा (Care Health Insurance)
  • मॅग्मा एचडीआय आरोग्य विमा (Magma HDI Health Insurance)
  • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी (The Oriental Insurance Company)
  • न्यू इंडिया जनरल इन्शुरन्स (New India General Insurance)
  • बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स (Bajaj Allianz General Insurance)
  • निवा बुपा आरोग्य विमा (Niva Bupa Health Insurance)
  • नवी जनरल इन्शुरन्स (Navi General Insurance)
  • एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स (HDFC ERGO General Insurance)
  • मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स (Manipal Cigna Health Insurance)

आर्थिक उन्नतीसाठी अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ची लिंक बुकमार्क करा, आणि ‘पैसा झाला मोठा’ ॲप डाउनलोड करा.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

याशिवाय पैसा झाला मोठा युट्युब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका.

आपण वेळातवेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment