शेअर्सचे विविध प्रकार | Types of Shares in Marathi

4/5 - (5 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ या आपल्या मराठी प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे.

इंटरनेटवर माहिती धुंडाळत असतांना मला ‘कवोऱा’ वेबसाइटवर एक प्रश्न आढळून आला – सामान्य शेअर आणि डीव्हीआर शेअर यातील फरक काय ?

मी त्या प्रश्नाचं उत्तर दिले आणि लागलीच माझ्या मनात आलं कि एक लेख आपल्या मित्रांसाठी शेअर्सचे प्रकार या मुद्यावर लिहून टाकावा.

आपण या लेखात शेअर्सचे विविध प्रकार बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

मित्रांनो शेअर्सचे विविध प्रकार असतात आणि एकाच कंपनीचे विविध प्रकारचे शेअर्स असू शकतात.

शेअर्सचे मुख्य ६ प्रकार खाली दिले आहे.

शेअर्सचे विविध प्रकार

  • ऑर्डीनरी शेअर्स (Ordinary shares)
  • नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स (Non-voting ordinary shares)
  • प्रेफरन्स शेअर्स (Preference shares)
  • कुमुलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स (Cumulative preference shares)
  • रिडिमेबल शेअर्स (Redeemable shares)

बहुतेक कंपन्या सामान्य शेअर्स वापरतात, तथापि, शेअरहोल्डरचे मतदान, लाभांश आणि भांडवली हक्क बदलण्याचा मार्ग म्हणून एकापेक्षा जास्त प्रकारचे शेअर्स उपलब्ध ठेवणे शक्य आहे.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

ऑर्डीनरी शेअर्स | Ordinary shares)

ऑर्डीनरी म्हणजे सामान्य होय.

ऑर्डीनरी शेअर्स हा सर्वात जास्त आढळणारा शेअर्सचा प्रकार आहे.

ऑर्डीनरी शेअर्स होल्डर्सला कोणतेही विशेष अधिकार किंवा निर्बंध नसतात.

ऑर्डीनरी शेअर्सद्वारे गुंतवणूक करण्यात सर्वात जास्त धोका असतो त्याचबरोबर सर्वाधिक आर्थिक नफा देण्याची क्षमता देखील ऑर्डीनरी शेअर्समध्येच असते.

ऑर्डीनरी शेअर्स होल्डर्सला मतदानाचा हक्क असतो.

जर कंपनी बंद झाली तर ऑर्डीनरी शेअर्स होल्डर्सला सर्वात शेवटी पैसे दिले जातात.

ऑर्डीनरी शेअर्स धारकांना लाभांशाची हमी नसते.

हे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमध्ये खरेदी-विक्री केले जातात आणि दर्शनी मूल्यावर जारी केले जातात.

नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स | Non-voting ordinary shares

नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स म्हणजे असे ऑर्डीनरी शेअर्स ज्यात गुंतवणूकदारांना मतदानाचा अधिकार नाही.

नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स म्हणजे असे ऑर्डीनरी शेअर्स ज्यात गुंतवणूकदारांना मतदानाचा अधिकार नाही.

मतदानाच्या अधिकारांशिवाय नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्समध्ये सर्व गोष्टी समान असतात.

काही विशिष्ट परिस्थितीत नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स होल्डर्सला कंपनीच्या जनरल मीटिंगमध्ये मतदानाचा अधिकार असू शकतो किंवा त्यांना मतदानाचा अधिकार पूर्णपणे नसतोच.

प्रेफरन्स शेअर्स | Preference shares)

प्रेफरन्स शेअर्सना मतदानाचा हक्क नसतो.

प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य होय, प्रेफरन्स शेअर्स म्हणजे प्राधान्य असणारे गुंतवणूकदार.

प्रेफरन्स शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या अधिकारानुसार वार्षिक लाभांश वाटप करतांना प्राथमिकता दिली जाते.

या प्रकारातील शेअर्सला एक निश्चित लाभांश किंवा डिव्हिडंड दिला जातो शिवाय व्यवसाय अडचणीत असेल तर ऑर्डीनरी शेअर्स धारकाअगोदर लाभांश दिला जातो.

कंपनी बंद पडल्यास कर्जाची परतफेड केल्यानंतर प्रेफरन्स शेअर्स धारकांना सर्वप्रथम पैसे दिले जातात.

प्रेफरन्स शेअर्स धारकांना लाभांशाचा दर निश्चित असतो.

कुमुलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स | Cumulative preference shares

कुमुलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स प्रकारात होल्डरला एखाद्या वर्षी लाभांश न मिळाल्यास तो येत्या वर्षी जुना लाभांश घेता येतो.

कंपनी नफ्यात असल्यास कुमुलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्सवर लाभांश द्यावाच लागतो.

उदा. आपल्याकडे अबक कंपनीचे १०० रुपये किमतीचे १० शेअर्स आहेत आणि आपल्याला ५% प्रमाणे लाभांश मिळणे आहे म्हणजे ५० रुपये. आपल्याला या वर्षी कंपनीकडून लाभांश न मिळाल्यास आपल्याला येत्या वर्षी या वर्षीचा ५० रुपये आणि येणाऱ्या वर्षाचा ५० रुपये असा १०० रुपये लाभांश मिळायला हवा.

रिडिमेबल शेअर्स | Redeemable shares

रिडीम करणे म्हणजे सामान्यतः पैसे देऊन परत खरेदी करणे होय.

रिडिमेबल प्रकारात शेअर्स एका करारासह येतात की कंपनी त्यांना भविष्यातील अमुक तारखेला परत खरेदी करू शकते – हे एका निश्चित तारखेला किंवा व्यवसायाच्या निवडीनुसार असू शकते.

कंपनी केवळ रिडीम करण्यायोग्य शेअर्स जारी करू शकत नाही, त्यामुळे कंपनीला नॉन-रिडीम करण्यायोग्य शेअर्स देखील जारी करावे लागतात.

डीव्हीआर शेअर्स | DVR Shares

डीव्हीआर शेअर्स ऑर्डीनरी शेअर्ससारखे असतात, परंतु होल्डर्सला कमी मतदान अधिकार असतात.

आपल्यापैकी बहुतेकांना स्टॉकमधून फक्त एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे परतावा.

म्हणूनच आजकाल अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना स्टॉकमधून थोडे अधिक कमाई करण्याचा पर्याय देतात ज्याच्या बदल्यात ते होल्डर्स क्वचितच वापरत असलेल्या काही अधिकारांना कमी करतात.

डीव्हीआर शेअर्स लहान भागधारकांसाठी उत्तम पर्याय आहेत कारण आपण क्वचितच आपल्या मतदानाचा हक्क वापरतो याचे कारण म्हणजे आपण फक्त पैसे कमावण्यासाठी शेअर्स खरेदी करतो.

जारी करताना डीव्हीआर शेअर्सची किंमत कमी असते आणि जास्त लाभांश किंवा डिव्हिडंड असतो, त्या बदल्यात, आपले मतदानाचे अधिकार मर्यादित असतात.

उदा. टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डीव्हीआर

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण शेअर्सचे विविध प्रकार माहित करून घेतले.

या लेखात अजून जास्त माहिती वाढवण्याचा मी प्रयत्न करेल.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment