शेअर मार्केटचा इतिहास मराठी | Share Market in Marathi | Stock Market History in Marathi

3.9/5 - (10 votes)

शेअर मार्केट म्हणजे जुगार.

शेअर मार्केटचं काही खरं आहे का?

नाहीतर

अमुक कंपनीचा शेअर आज खूप कोसळला, तमुक कंपनीचा स्टॉक आज खूप वाढला.

मित्रांनो, शेअर मार्केटविषयी आपण अनेकदा असं काही-बाही ऐकत असतो.

या लेखात आपण शेअर मार्केटची ओळख करून घेणार आहोत.

इंटरनेट आता जवळपास सर्वांना स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे गुंतवणुकीविषयी माहिती तसेच गुंतवणूक करणेही सोपे झाले, बँकेचे लहान-मोठे व्यवहार एवढंच काय किरकोळ खरेदी-विक्री देखील ऑनलाइन झाली आहे.

गुंतवणूक करायची म्हटली कि पूर्वीचे लोक जमीन घेत किंवा सोने घेतले जात असे.

नंतरच्या काळात बँकेत बचत खाते सुरु करणे किंवा बँक-पोस्टात, आरडीएफडी खाते सुरु करणे अधिक सुरक्षित समजले जाऊ लागले.

पुढे जाऊन एलआईसीनी बचत क्षेत्रात जणू क्रांतीच आणली आणि सामन्यांना बचतीच्या अनेक योजना उपलब्ध करून दिल्या

गुंवणूकीसाठी बँक, जमीन-जुमला(रिअल-इस्टेट), सोने, एलआईसी पॉलिसी आता मागे पडत चालले असून शेअर मार्केट सध्याच्या काळातील गुंतवणुकीचा एक आघाडीचा पर्याय म्हणून समोर येत आहे.

सुखी जीवनासाठी आपल्याला अर्थसाक्षर होणे गरजेचे आहे आणि त्यामुळेच आपल्याला शेअर मार्केटची ओळख असायलाच हवी.

आजच्या काळात शेअर मार्केट हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो.

चला तर मग आज आपण बघूया हे शेअर मार्केट म्हणजे आहे तरी काय आणि या शेअर मार्केटची सुरवात कशी ? कुठे ? का झाली ?

शेअर म्हणजे काय? | What is Share in Marathi?

शेअर म्हणजे हिस्सा किंवा हिस्सेदारी होय.

शेअर बाजाराच्या भाषेत शेअरला समभाग असे म्हणतात.

समभागाला इंग्रजीत इक्विटी किंवा स्टॉक असे पर्यायी शब्द आहेत.

आपण एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करतो म्हणजे आपण त्या कंपनीचा एक हिस्सा विकत घेतो किंवा आपण त्या कंपनीचे हिस्सेदार होतो.

साध्या भाषेत सांगायचं म्हणजे शेअर खरेदी करणे म्हणजे एखाद्या कंपनीच्या व्यवसायात आपण काही अंशी सहभागी होत असतो

अशाप्रकारे कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपण त्या कंपनीत किंवा कंपनीच्या व्यवसायात गुंतवणूक करत असतो.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

शेअर मार्केट म्हणजे काय? | What is Share Market in Marathi?

मार्केट किंवा बाजार म्हणजे व्यापार करण्याची जागा होय.

शेअर बाजार हि अशी एक जागा किंवा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री करू शकतो.

आहे कि नाही सोप्पं ?

शेअर मार्केटवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक देशात एक स्वतंत्र व्यवस्था असते.

भारतात सेबी (SEBI) हि संस्था शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवते

आजचे शेअर मार्केटचे श्रीमंत जग | Rich World of Share Market in Marathi

द न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हे जगातील सर्वात मोठे शेअर मार्केट असून फक्त द न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच बाजार भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) २५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.

एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय ७,४२,१०,५०,००,००,००० रुपये.

आता द न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे बाजार भांडवल भारतीय रुपयात किती याची गोळाबेरीज मी तुमच्यावर सोडतो.

सध्या जगात १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पेक्षा जास्त बाजार भांडवल असणाऱ्या १६ स्टॉक एक्सचेंज आहेत

यावरून आपल्याला शेअर मार्केटच जग किती श्रीमंत आहे याचा अंदाज आलाच असेल

मित्रांनो, अशा या शेअर मार्केटचा इतिहास देखील खूप रंजक आहे, चला तर मग या लेखात उलगडूया शेअर मार्केटचा इतिहास

शेअर मार्केटची सुरुवात कशी झाली? | How Share Market Begun in Marathi

शेअर मार्केट सुरु होण्यापूर्वी अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये अगदी आजच्या शेअर मार्केटप्रमाणे असणारी व्यवस्था अस्तित्वात होती.

तसे पाहता शेअर मार्केट अगदी अलीकडे १५ व्या शतकात सुरु झालं असलं तरी जाणकारांच्या मते शेअर मार्केटसारख्या बाजारपेठा अगदी ११व्या शतकात देखील अस्तित्वात होत्या.

११ व्या शतकात फ्रान्समध्ये कॉटियर्स नावाने ओळखले जाणारी व्यावसायिक माणसे होती जी बँकांच्या पीककर्जांचे व्यवस्थापन करण्यास मदत करत असत.

हे कॉटियर्स म्हणजे सर्वात पहिले ब्रोकर्स होय कारण हे कॉटियर्स या कर्जांची देवाण-घेवाण करण्याचे काम बघत असत.

आपण जसे शेअर्सची खरेदी-विक्री करतो त्याप्रमाणे सरकारी सिक्युरिटीझचा व्यापार होत असे आणि या व्यापार करण्याचे श्रेय जाते ते इटलीतील, व्हेनिसच्या व्यापाऱ्यांना.

१३ व्या शतकात इटालियन शहर पिसा, वेरोना, जेनोआ आणि फ्लोरेन्समधील बँकर्सनीही सरकारी सिक्युरिटीजचा व्यापार सुरू केला होता.

सुरवातीच्या शेअर्स मार्केटमध्ये शेअर्स नव्हतेच मुळी.

हा व्यापार शेअर्स सर्टिफिकेटप्रमाणे होत असे आणि सर्व माहिती पाट्यांवर कोरली जात असे.

जगातील पहिला स्टॉक मार्केट | First Share Market in the World in Marathi

अगदी १४व्या -१५व्या शतकात जगातील सर्वात पहिली शेअर मार्केटची व्यवस्था बेल्जीयममध्ये ब्रुग्स, फ्लॅंडर्स, गेन्ट आणि रॉटरडॅम अशा विविध शहरांमध्ये अस्तित्वात होती असे मानले जाते

तथापि बेल्जीयमच्या अँटवर्प या व्यापारी केंद्राला जगातील पहिल्या शेअर मार्केटचा मान दिला आहे.

बेल्जीयमच्या अँटवर्प मार्केटची सुरुवात १५३१ मध्ये झाली असे म्हणतात.

त्याकाळी स्टॉक नसून करारनामे आणि बॉण्ड्सच्या मदतीने ट्रेडींग होत असे.

जगातील ट्रेड झालेला पहिला स्टॉक | First Ever Traded Stock in Marathi

डच ईस्ट इंडिया कंपनीचा स्टॉक हा जगातील पहिला सार्वजनिकरित्या खरेदी-विक्री (ट्रेड) केलेला स्टॉक समजला जातो

पूर्वीच्या काळी व्यापारासाठी पाश्चिमात्य देशांत अनेक व्यापारी समुद्रीसफरीवर जात असत.

अशा समुद्रीसफरीवर गेलेल्या जहाजांना वादळ, समुद्री लुटेरे, अशा अनेक संकटाचा सामना करावा लागत असे म्हणून व्यापाऱ्यांनी शक्कल लढवली व स्वतः संपूर्ण धोका पत्करण्याऐवजी आपल्या व्यापारात लोकांना हिस्सेदारी द्यायला सुरुवात केली.

लोक आता अशा समुद्री व्यापार करणाऱ्या जहाजांवर गुंतवणूक करत.

आपला धोका कमी करण्यासाठी गुंतवणूकदार एकाच कंपनीत गुंतवणूक ना करता विविध जहाजांवर किंवा व्यापाऱ्यांकडे गुंतवणूक करत.

अशाप्रकारे पुष्कळ व्यापारी एकत्रितपणे व्यापार करू लागले.

तेव्हाच्या काळी ईस्ट इंडिजची ओळख श्रीमंती आणि समृद्धीचं माहेरघर अशी होती त्यामुळे अनेक व्यापारी तिथे व्यापारासाठी जात-येत असत

परिणामी, १६०० मध्ये “गव्हर्नर आणि कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग द ईस्ट इंडीज” या नावाने एक कॉर्पोरेशन तयार करण्यात आले.

“गव्हर्नर आणि कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग द ईस्ट इंडीज” ही प्रसिद्ध ईस्ट इंडिया कंपनी होती आणि पहिली लिमिटेड लायबिलिटी कंपनी होती.

१६०२ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी अधिकृतपणे जगातील पहिली सार्वजनिक व्यापारी कंपनी बनली आणि कंपनीचे शेअर्स ॲमस्टरडॅम स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध झाले.

गुंतवणूकदारांना स्टॉक आणि बॉण्ड उपलब्ध करून देण्यात आले आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीच्या नफ्यातील ठराविक हिस्सा देण्याचे निश्चित करण्यात आले.

विविध ठिकाणी गुंतवणूक ना करता कंपनीत गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांचा धोका कमी झाला आणि आता त्यांना कंपनीच्या स्टॉकवर लाभांश मिळू लागला.

त्याचप्रमाणे हे स्टॉक किंवा बॉण्ड्स एकमेकांना विकता देखील येत असत.

याशिवाय धोका कमी झाल्याने कंपनीला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या स्वरुपात भांडवल मिळू लागले आणि कंपनीचा व्यापार मोठा झाला.

जगातील पहिला स्टॉक एक्सचेंज | First Stock Exchange of The World in Marathi

अशाप्रकारे डच ईस्ट इंडिया कंपनीचे गुंतवणूकदार कंपनीच्या नफ्यात सहभागी झाले.

आजचे स्टॉक एक्सचेंज खूप भव्यदिव्य असले तरी सर्वात पहिले स्टॉक एक्सचेंज हे काही लहान-मोठे कॉफीशॉप होते

शेअर मार्केटची सुरुवात झाली तेव्हा स्टॉक कागदावर अगदी एखाद्या कराराप्रमाणे लिहिले जात आणि हा सर्व स्टॉकचा कारभार स्थानिक कॉफीशॉप मध्ये चालत असत.

त्या सुरुवातीच्या काळात शेअर बाजाराचे महत्त्व कोणालाही खरंतर समजलेच नाही. थोडयाफार लोकांना ते समजलेही असेल पण स्टॉक मार्केट हि जगातील सर्वात श्रीमंत बाजारपेठ होईल याचा कोणालाही अंदाज नसावा

त्या काळी स्टॉक मार्केटवर देखरेख करणारी कुठलीही व्यवस्था अस्तित्वात नव्हती म्हणून मग अनेक बेकायदेशीर कंपन्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला.

काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना परतावा देणे बंद केले, अनेक लोकांची फसवणूक होऊ लागली, स्टॉक मार्केटमध्ये खूप गोंधळ सुरु झाला.

अशाच प्रकारे अनेक कंपन्या बाजारात दाखल झाल्या.

साऊथ सी नावाची अशीच एक कंपनी आपले सर्व शेअर्स आपली पहिली व्यापारी सफर करण्यापूर्वीच विकण्यात यशस्वी झाली होती.

गुंतवणूकदार कसलाही विचार न करता येणाऱ्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सवर अक्षरशः तुटून पडत होते.

काही काळातच अनेक कंपन्या बुडाल्या आणि सोबतच गुंतवणूकदारांची गुंतवणूक देखील.

शेवटी इंग्लंड सरकारने १८२५ पर्यंत शेअर्स देण्यास बंदी घातली.

द न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मराठी | The New York Stock Exchange in Marathi

शेअर्स इश्यू करण्यावर बंदी असली तरी लंडन स्टॉक एक्सचेंजची १८०१ मध्येच अधिकृतपणे स्थापना झाली होती.

१८२५ पर्यंत शेअर्स इश्यू करण्यावर बंदी कायम असल्याने लंडन स्टॉक एक्सचेंजचे कामकाज अतिशय मर्यादित होते

लंडन स्टॉक एक्सचेंजला पर्याय म्हणून मग १८१७ मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची निर्मिती झाली आणि हाच शेअर मार्केटच्या जगातील एक सुवर्णक्षण ठरला

लंडन स्टॉक एक्सचेंज हे युरोपसाठी मुख्य शेअर बाजार होते, तर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हे अमेरिका आणि साऱ्या जगासाठी मुख्य शेअर बाजार झाले होते.

काहीं तज्ञांच्या मतानुसार, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हे अमेरिकेतील (युनायटेड स्टेट्स) पहिले स्टॉक एक्सचेंज नसून हा मान फिलाडेल्फिया स्टॉक एक्सचेंजला द्यायला हवा.

तथापि, कोणत्याही प्रकारच्या देशांतर्गत स्पर्धेच्या अभावामुळे आणि न्यूयॉर्क अमेरिकेच्या व्यापार आणि अर्थकारणाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज लवकरच देशातील आणि जगातील सर्वात शक्तिशाली स्टॉक एक्सचेंज बनले.

जगातील सर्वात मोठे शेअर बाजार मराठी | Biggest Stock Markets in The World in Marathi

आज, जगातील प्रत्येक देशाचे स्वतःचे शेअर मार्केट आहे.

स्वित्झर्लंडपासून जपान पर्यंत, जगातील सर्व प्रमुख आर्थिकराष्ट्रांकडे अत्यंत विकसित स्टॉक मार्केट आहेत जे आजही सक्रिय आहेत.

आता एक नजर टाकूया जगातील सर्वात मोठ्या १० शेअर मार्केट्स वर

  • न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज
  • न्यासडॅक
  • टोकियो स्टॉक एक्सचेंज
  • लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप
  • युरोनेक्स्ट
  • हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज
  • शांघाय स्टॉक एक्सचेंज
  • टोरंटो स्टॉक एक्सचेंज
  • फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंज
  • ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज एक्सचेंज

मित्रांनो, अशाप्रकारे या लेखात आपण शेअर मार्केटची ओळख करून घेतली आणि शेअर मार्केटचा इतिहास जाणून घेतला.

येत्या लेखात आपण भारतीय शेअर बाजाराची ओळख करून घेणार आहोत तेव्हा ‘पैसा झाला मोठा’ च्या लिंकला बुकमार्क करायला विसरू नका

पैसा झाला मोठा चे सर्व लेख तुम्ही अँड्रॉइड ॲप डाउनलोड करून थेट वाचू शकता आणि तुम्हाला नोटिफिकेशनही मिळू शकेल पैसा झाला मोठाचे ॲप आत्ताच मोबाईलमध्ये डाउनलोड करा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण वेळात-वेळ काढून हा लेख वाचलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

इतर माहितीपूर्ण लेख

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment