रिव्हर्स स्टॉक स्प्लिट मराठी | Reverse Stock Split in Marathi

5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

या लेखात आपण रिव्हर्स स्टॉक स्प्लिट या महत्वपूर्ण कॉर्पोरेट ॲक्शनची माहिती घेणार आहोत.

मागील लेखात आपण स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ते बघितले असून आपल्या सोयीसाठी मी त्या लेखाची लिंक खाली देत आहे.

स्टॉक स्प्लिट

चला तर मग सुरुवात करूया.

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ?

रिव्हर्स म्हणजे विरुद्ध किंवा उलट किंवा पूर्ववत करणे होय.

नावातच सांगितल्याप्रमाणे रिव्हर्स स्टॉक स्प्लिट म्हणजे अनेक शेअर्स एकत्र करून एक शेअर तयार करणे होय.

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट होत असताना ज्या प्रमाणात शेअरची संख्या कमी होते त्याच्या विरुद्ध प्रमाणात शेअरची किंमत वाढत असते.

आपल्याला स्टॉक स्प्लिट म्हणजे काय समजले असल्यास रिव्हर्स स्टॉक स्प्लिट समजून घेणे खूप सोपे जाईल शिवाय आपण उदाहरण देखील बघणार आहोतच.

उदा. माझ्याकडे टाटा मोटर्स कंपनीचे २० शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत ५० रुपये आहे.

आता कंपनीने १:२ रिव्हर्स स्टॉक स्प्लिट जाहीर केल्यास माझ्याकडील २० शेअर्सचे १० शेअर्स होतील आणि प्रत्येक शेअरची किंमत १०० होईल.

म्हणजेच शेअरची संख्या निमपट झाली तर त्याच्या विरुद्ध शेअरची किंमत दुप्पट झाली.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट आणि गुंतवणूक

मित्रांनो, रिव्हर्स स्टॉक स्प्लिट नंतर देखील आपली एखाद्या कंपनीतील गुंतवणूक आहे तेवढीच राहते.

याआधी घेतलेलेच उदाहरण आपण बघूया

माझ्याकडे टाटा मोटर्स कंपनीचे २० शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत ५० रुपये आहे.

आता कंपनीने १:२ अशी स्टॉक स्प्लिटची घोषणा केल्यास माझ्या जवळील प्रत्येक शेअरचा मिळून एक शेअर तयार होईल मात्र माझी टाटा मोटर्स मधील गुंतवणूक आहे तेवढीच राहील.

याअगोदर माझ्याकडे टाटा मोटर्स कंपनीचे ५० रुपये किमतीचे २० शेअर्स होते म्हणजे एकूण गुंतवणूक ५०*२०=१००० रुपये.

रिव्हर्स स्प्लिट नंतर माझ्याकडे टाटा मोटर्स कंपनीचे १० शेअर्स होतील आणि प्रत्येक शेअरची किंमत १०० रुपये असेल.

माझी गुंतवणूक मात्र १० *१०० = १००० रुपये आहे तेवढीच राहील.

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट का करतात ?

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट करण्याची काही मुख्य कारणे मी खाली देत आहे.

१. कंपनी स्टॉक मार्केट मधून बाद (डीलीस्ट) होण्यापासून रोखने.

स्टॉक एक्स्चेंजच्या नियमानुसार खूप कमी किंमत असलेले स्टॉक एक्स्चेंजमधून डीलीस्ट केले जातात अशावेळी स्टॉकची किंमत खूप जास्त घसरल्यास कंपनी रिव्हर्स स्टॉक स्प्लिट जाहीर करते जेणेकरून कंपनीला डीलीस्ट होण्यापासून वाचवता येते.

२. कंपनीच्या स्टॉकची किंमत भरीव वाटत असल्यास कंपनीची प्रतिमा सुधारण्यास मदत होते.

उदा. ५ रुपयांच्या स्टॉकपेक्षा ५०० रुपयांच्या स्टॉकमध्ये सामान्य गुंतवणूकदार जेव्हा गुंतवणूक करतात तेव्हा त्यांच्या मनात चांगल्या ठिकाणी आणि सुरक्षित गुंतवणूक करत असल्याची भावना तयार होते.

३. किंमत एका ठरविक मर्यादेपेक्षा कमी झाल्यास ट्रेडर्स आणि अनॅलिस्ट अशा स्टॉकमध्ये जास्त रस घेत नाही.

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट प्रमाण

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट जाहीर होतांना ते १:२,१:३, १:५ अशाप्रमाणे जाहीर होते यातून आपल्याला किती स्टॉक मिळून एक स्टॉक तयार होणार आहे याची कल्पना येते.

१:२, म्हणजे २ स्टॉक मिळून होणार १ स्टॉक, १:३ म्हणजे ३ स्टॉक मिळून होणार १ स्टॉक, १:५ म्हणजे ५ स्टॉक मिळून होणार १ स्टॉक.

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट आणि फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट नंतर स्टॉकची फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू बदलतात आणि ज्या प्रमाणात शेअरची संख्या

कमी होते त्याच्या विरुद्ध प्रमाणात या दोन्ही व्हॅल्यू वाढतात.

उदा. टाटा मोटर्स कंपनीचा शेअर रिव्हर्स स्टॉक स्प्लिटपूर्वी पुढीलप्रमाणे आहे असे आपण समजूया

फेस व्हॅल्यू – २ रुपये

मार्केट व्हॅल्यू – १०० रुपये

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट १:२ नंतर टाटा मोटर्स शेअर

टाटा मोटर्स फेस व्हॅल्यू – ४ रुपये

मार्केट व्हॅल्यू- २०० रुपये

अशाप्रकारे आपण या लेखात रिव्हर्स स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ते अगदी व्यवस्थितपणे समजावून घेतले.

हा लेख वाचून आपल्या माहितीत वाढ झाली असेल अशी मी अपेक्षा करतो.

आपल्या सूचनां-सुधारणांचे देखील मी स्वागत करतो.

शेअर मार्केटची अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी पैसा झाला मोठा फेसबुक पेजला लाइक करा, टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा.

आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद !!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment