वायकॉफ थेअरी: व्हॉल्युम अनॅलिसिसचे [३] मूलभूत नियम मराठी | Wyckoff Theory: [3] Principles of Volume Analysis in Marathi

5/5 - (1 vote)

मित्रांनो या लेखात आपण व्हॉल्युम अनॅलिसिसचे अतिशय महत्वाचे नियम बघणार आहोत.

जर आपल्याला प्राइस ऍक्शन ट्रेडिंग, व्हॉल्युम स्प्रिएड अनॅलिसिस आणि व्हॉल्युम अनॅलिसिस शिकायचे असेल तर हा लेख या अभ्यासाचा पाया आहे असे समजावे.

जर तुम्हाला व्हॉल्युम म्हणजे काय? आणि व्हॉल्युम चा वापर ट्रेडिंग मध्ये का करावा? हे समजून घ्यायचे असेल तर हा खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा

व्हॉल्युम आणि व्हॉल्युम अनॅलिसिस म्हणजे काय?

या लेखात आपण खालील ३ नियम अतिशय सविस्तरपणे बघणार आहोत

  • द लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड
  • द लॉ ऑफ कॉझ अँड इफेक्ट
  • द लॉ ऑफ एफर्ट अँड रिझल्ट

मित्रानो, व्हॉल्युम अनॅलिसिसचे हे ३ नियम आपल्याला श्री रिचर्ड वायकॉफ या महान ट्रेडरने दिले असून.

श्री रिचर्ड वायकॉफ यांनी केलेले शेअर मार्केटमधील काम ‘वायकॉफ थेअरी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

हा लेख म्हणजे या थेअरीचा काही भाग आपल्यासमोर उलगडण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे

चला तर मग सुरवात करूया

१. द लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड मराठी | 1. The Law of Supply and Demand in Marathi

सप्लाय म्हणजे पुरवठा आणि डिमांड म्हणजे मागणी होय.

१ला नियम हा मागणी आणि पुरवठा यांच्याशी संबंधित असून, बाजारात होणारी किमतीची हालचाल हि मागणी आणि पुरवठा यांच्या दरम्यान असणाऱ्या फरकामुळेच होत असते अशा अर्थाचा हा सिद्धांत आहे.

लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड हा शेअर बाजारातच नाही तर जगातील सर्वच बाजारात लागू होतो

बाजारातील मागणी हि बाजारातील पुरवठयापेक्षा जास्त असल्यास बाजारातील मालाची किंमत वाढते
आणि
बाजारातील पुरवठा हा बाजारातील मागणीपेक्षा जास्त असल्यास बाजारातील मालाची किंमत कमी होत असते

उदा.

१. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास शेतीचे उत्पन्न कमी होते, म्हणजेच बाजारातील अन्नधान्याचा पुरवठा कमी होतो अशावेळी बाजारातील अन्नधान्याची मागणी तेवढीच असेल तर बाजारातील अन्नधाण्याच्या किमती वाढतात.

२. याउलट एखाद्या वर्षी पाऊस पुरेसा पडल्यास शेतीचे उत्पन्न भरपूर होते आणि बाजारातील अन्नधान्याचा पुरवठ्यातदेखील वाढ होते. अशावेळी बाजारातील मागणी स्थिर असली तरी पुरवठा जास्त प्रमाणात असल्याने बाजारातील अन्नधाण्याच्या बाजारातील किमती कमी होतात.

३. एखाद्या वर्षी एखाद्या पिकावर काही रोग आल्यास लोकांची त्या पिकाच्या उत्पादनांची बाजारातील मागणी कमी होते आणि बाजारातील मालाचा पुरवठा मात्र पुरेश्या प्रमाणात असल्यास, बाजारातील मालाचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक झाल्याने मालाची किंमत कमी होते.

४ एखाद्या वर्षी एखाद्या शेती मालाला बाजारात, देशात-परदेशात प्रचंड मागणी असते आणि शेती मालाचा पुरवठा मात्र असा अचानक वाढवता येत नाही. अशावेळी बाजारातील मालाची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत निर्माण होते व मालाच्या किमती वाढत जातात.

खालील २ आलेखांच्या मदतीने मागणी, पुरवठा आणि किंमत यांच्यातील संबंध आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास नक्की मदत होईल

सप्लाय अँड डिमांड | Supply and Demand
सप्लाय अँड डिमांड | Supply and Demand
सप्लाय अँड डिमांड | Supply and Demand
सप्लाय अँड डिमांड | Supply and Demand

मित्रानो, हेच सर्व नियम शेअर बाजारालाही लागू होतात.

एखाद्या स्टॉकमध्ये डिमांड जास्त असेल आणि स्टॉक मधील सप्लाय त्या तुलनेने कमी असेल तर बाजारातील स्टॉकची किंमत वाढत जाते.

यालाच आपण शेअर मार्केटच्या भाषेत स्टॉक बुलिश असल्याचे किंवा स्टॉक अपट्रेन्ड मध्ये असल्याचे म्हणतो.

उलटपक्षी एखाद्या स्टॉकमध्ये सप्लाय जास्त असेल आणि स्टॉक मधील डिमांड त्या तुलनेने कमी असेल, तर बाजारातील स्टॉकची किंमत कमी होत जाते.

यालाच आपण शेअर मार्केटच्या भाषेत स्टॉक बियरीश असल्याचे किंवा स्टॉक डाउनट्रेन्ड मध्ये असल्याचे म्हणतो.

स्टॉकमध्ये सेलर्स जास्त असतील किंवा सेलिंग व्हॉल्युम जास्त असेल तर स्टॉकची किंमत घसरायला सुरवात होते किंवा स्टॉक बियरीश होतो किंवा स्टॉक मध्ये डाउनट्रेंड सुरु होतो

याउलट

स्टॉकमध्ये बायर्स जास्त असतील किंवा बाइंग व्हॉल्युम जास्त असेल तर स्टॉकची किंमत वाढायला सुरवात होते किंवा स्टॉक बुलिश होतो किंवा स्टॉक मध्ये अपट्रेंड सुरु होतो.

मला आशा आहे मागणी आणि पुरवठ्याच गणित आपल्यासमोर मांडण्यात मी यशस्वी झालो असेल.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

२. द लॉ ऑफ कॉझ अँड इफेक्ट मराठी | 2. The Law of Cause and Effect in Marathi

कॉझ म्हणजे कारण आणि इफेक्ट म्हणजे प्रभाव होय

वायकॉफ च्या थेअरी नुसार प्रभाव होण्याला कारण हेच कारणीभूत असते.

उदा. नदीला खूप मोठा पूर आला कारण खूप जास्त पाऊस झाला.

यात नदीला आलेला पूर हा प्रभाव आहे तर खूप जास्त झालेला पाऊस हे कारण झाले.

वायकॉफ च्या म्हणण्यानुसार जर स्टॉक मध्ये मूव्ह आली असेल तर त्या मुव्हमागे कारणही असलेच पाहिजे.

आता मार्केटमध्ये होणाऱ्या लहान-मोठया किमतीच्या हालचालींची अनेक कारणे असू शकतात

उदा. एखाद्या कंपनीला अनुकूल सरकारी धोरण जाहीर झाल्यास त्या कंपनीच्या स्टॉक मध्ये लगेच बुलिश मूव्ह येऊ शकते

एखाद्या स्टॉक चार्टवर तयार झालेला चार्ट पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न ब्रेकडाउन झाल्यावर येणारी बियरीश मुव्ह, म्हणजेच व्होलॅटिलिटी कॉम्प्रेशनमुळे स्टॉक मध्ये येणारी मुव्ह होय.

आता या नियमाचा ट्रेडिंग मध्ये उपयोग कसा होतो ते समजून घेऊ

जर तुम्हाला स्टॉक मध्ये एक मोठी मूव्ह अपेक्षित असेल तर त्यासाठी कारणही तितकच मोठं असलं पाहिजे

उदा. जर तुम्हाला आपल्याला वाटत असेल कि नदीला भरपूर पूर यावा तर त्यासाठी खूप जास्त पाऊस झाला पाहिजे किंवा धरणातून खूप मोठा पाण्याचा विसर्ग झाला पाहिजे.

कारण काहीही असू शकेल पण त्या कारणाच्या प्रमाणातच त्याचे प्रभाव दिसून येतात

स्टॉक मार्केटचं अगदी तसंच आहे कारण लहान असेल स्टॉक मधील मूव्ह देखील लहानच असणार याउलट कारण मोठं असेल तर स्टॉक मधील मूव्ह सुद्धा नक्कीच मोठी येईल.

आता आपण व्हॉल्युम अनॅलिसिसचा ३ रा नियम बघूया

३. द लॉ ऑफ एफर्ट Vs रिझल्ट मराठी | 3. The Law of Effort vs Result in Marathi

‘एफोर्ट’चा अर्थ होतो प्रयत्न आणि ‘रिझल्ट’चा अर्थ होतो परिणाम.

वायकॉफच्या थेअरी नुसार प्रयत्न आणि परिणाम नेहमी सुसंगत असले पाहिजे

व्हॉल्युम अनॅलिसिस चा ३ रा नियम हा स्टॉक मधील मोमेन्टमशी संबंधित आहे.

जर स्टॉक मधील किमतीची हालचाल व्हॉल्युमशी सुसंगत असेल तर स्टॉक मध्ये सर्व काही ठीक आहे आणि आपण स्टॉक मधील आपला अभ्यास चालू ठेवू शकतो.

स्टॉक मधील किमतीची हालचाल व्हॉल्युमशी सुसंगत नसेल तर मात्र आपल्याला स्टॉक मध्ये खोलात जाऊन या विसंगतीचे कारण शोधण्याची गरज असते.

जर स्टॉकची किंमत वाढत असेल आणि स्टॉक मधील व्हॉल्युम देखील वाढत असेल तर अपट्रेन्ड मजबूत/स्ट्रॉंग असल्याचे समजावे याउलट स्टॉक ची किंमत वाढत असेल आणि स्टॉक मधील व्हॉल्युम कमी होत असेल तर अपट्रेन्ड वीक/कमजोर असल्याचे समजावे

हाच नियम बियरीश ट्रेंड ला देखील लागू होतो.

जर स्टॉक ची किंमत कमी होत असेल आणि स्टॉक मधील व्हॉल्युम वाढत असेल तर डाउनट्रेन्ड मजबूत/स्ट्रॉंग असल्याचे समजावे याउलट स्टॉकची किंमत कमी होत असेल आणि स्टॉक मधील व्हॉल्युम देखील कमी होत असेल तर डाउनट्रेन्ड वीक/कमजोर असल्याचे समजावे.

मित्रानो हा नियम आपल्याला ट्रेड मध्ये एन्ट्री घेताना देखील खूप उपयोगी पडतो.

जर चार्टवर कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला असेल आणि व्हॉल्युम देखील कॅन्डलस्टिक पॅटर्नशी सुसंगत असेल तरच आपण ट्रेड घ्यावा व्हॉल्युम जर कॅन्डलस्टिक पॅटर्नशी सुसंगत नसेल तर आपण ट्रेड घेऊ नये.

खालील चित्रांमध्ये स्टॉक मधील ट्रेंड आणि व्हॉल्युम चा परस्पर संबंध दाखवला आहे.

एफर्ट अँड रिझल्ट | Effort vs Result
एफर्ट अँड रिझल्ट | Effort vs Result
एफर्ट अँड रिझल्ट | Effort vs Result
विसंगत व्हॉल्युम आणि प्राइस

अशाप्रकारे या लेखात आपण व्हॉल्युम अनॅलिसिसशी संबंधित महत्वाचे नियम बघितले.

मला आशा आहे हा लेख वाचल्यानंतर आपल्या ट्रेडिंग नॉलेज मध्ये भर पडली असेल

आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा

आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे

धन्यवाद !!!

व्हॉल्युम अनॅलिसिस विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील लेख जरूर वाचा.

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment