हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न मराठी । Head and Shoulder Chart Pattern in Marathi

4.7/5 - (3 votes)

नमस्कार मित्रांनो,

पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.

इंट्राडे ट्रेडर्स, स्विंग ट्रेडर्स आणि पोझिशनल ट्रेडर्स हे चार्ट पॅटर्नचा अभ्यास करून यशस्वीरित्या ट्रेड करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावत आहेत.

तुम्हालाही चार्ट पॅटर्न वापरून शेअर बाजारात पैसे कमवायचे असल्यास चार्ट पॅटर्न कसे तयार होतात आणि आपण त्यांचा ट्रेडिंगसाठी कसा वापर करू शकतो हे समजून घ्या.

कॅन्डलस्टिक आणि चार्ट पॅटर्नची माहिती तुम्हाला शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी नक्की उपयोगी पडेल.

या लेखात आपण चार्ट पॅटर्न ची ओळख करून घेणार आहोत आणि हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असे रिव्हर्सल चार्ट पॅटर्न बघणार आहोत.

चला तर मग, सुरवात करूया

चार्ट पॅटर्न म्हणजे काय ? | What is Chart Pattern in Marathi?

शेअर बाजारातील किमतीची हालचाल हि नेहमी काही विशिष्ट प्रकारे होत असते.

या किमतीच्या हालचालींचा चार्ट (ग्राफ /Graph) तयार केला असता त्याच्या अभ्यासातून असे लक्षात येते कि चार्टवर काही विशिष्ट आकार पुन्हा पुन्हा तयार होत असतात.

या चार्टवर तयार होणाऱ्या आकारांनाच शेअर मार्केटच्या भाषेत चार्ट पॅटर्न असे म्हणतात.

हे विविध आणि खास चार्ट पॅटर्न तयार होण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील मानसिकता होय. शेअर बाजारातील हि मानसिकता सुरवातीपासूनच जशी होती तशीच आहे आणि पुढेही तशीच राहील.

यामुळेच शेअर बाजारात चार्ट पॅटर्न चा वापर १०० वर्षांपूर्वी जितका प्रभावी होता तितकाच आज देखील आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. यामुळेच चार्ट पॅटर्नची माहिती करून घेणे फायद्याचे ठरते.

शेअर बाजारात बुल्स नेहमी किमती वर ढकलण्याचा प्रयत्न करत असतात तर बेअर्स किमती खाली ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. बाजारातील बुल्स आणि बेअर्सच्या या स्पर्धेतूनच चार्टवर उमटतात ते चार्ट पॅटर्न.

चार्ट पॅटर्न म्हणजे मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब होय.

मित्रांनो, माणसाच्या लोभ, भीती, अशा भावना बदलेल्या नाही आणि बदलणार देखील नाही त्यामुळे चार्ट पॅटर्न कायमस्वरूपी आहे तेवढेच प्रभावी राहणार आहे.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

चार्ट पॅटर्न ट्रेडिंगचा इतिहास | History of Chart Pattern Trading

चार्ट पॅटर्न चा वापर सर्वात प्रथम जपानी तांदळाचे व्यापारी आणि जपानी कॅन्डलस्टिकचे जनक श्री होनमा मूनहीसा यांनीच केला.

श्री होनमा मूनहीसा हे इतिहासातील सर्वोत्तम ट्रेडर्स पैकी एक होय.

होनमा मूनहीसा । Honma Munhisa
होनमा मूनहीसा
Honma Munhisa

त्याकाळात श्री होनमा मूनहीसा यांची मार्केटचा देव ( God of Markets )अशी ओळख होती आणि त्यांच्या कॅन्डलस्टिकचार्ट पॅटर्नच्या शोधांनी त्यांना त्याकाळात अब्जाधीश केले होते.

यावरून आपल्याला कॅन्डलस्टिक आणि चार्ट पॅटर्न ट्रेडिंगसाठी किती उपयोगी आहेत हे लक्षात येते.

चार्ट पॅटर्नचे प्रकार | Types of Chart Pattern

चार्ट पॅटर्नचे पुढीलप्रमाणे प्रकार करता येऊ शकतात
१. रिव्हर्सल चार्ट पॅटर्न
२. कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न
३. न्यूट्रल चार्ट पॅटर्न

आता आपण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न हा शेअर बाजारातील सर्वात जास्त लोकप्रिय पॅटर्न पैकी एक असलेला चार्ट पॅटर्न बघूया

हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न । Head and Shoulder Chart Pattern in Marathi

हेड अँड शोल्डर हा बेअरिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न.

अपट्रेन्ड नंतर चार्टवर बेअरिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाल्यास बुलिश ट्रेंड (तेजी ) संपून बेअरिश ट्रेंडची (मंदीची )सुरवात होण्याची शक्यता असते.

खालील चित्रात आपण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न बघू शकतो.

हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न | Head and Shoulder Chart Pattern
हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न | Head and Shoulder Chart Pattern

हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नची तुलना माणसाशी केली आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल.

आता आपण त्याची रचना बघूया.

  • लेफ्ट शोल्डर : लेफ्ट शोल्डर म्हणजे डावा खांदा होय.
  • राइट शोल्डर : राइट शोल्डर म्हणजे उजवा खांदा होय आणि
  • हेड : हेड म्हणजे डोके
  • नेकलाइन : हा पॅटर्न ज्या सपोर्ट-रेझिस्टन्स लाइनच्या अवतीभोवती तयार होतो त्या लाइनला नेकलाइन म्हणतात.

हा पॅटर्न तयार होताना स्टॉक (शेअर) रेझिस्टन्स लाइन ब्रेक करून एक हाइ तयार करतो व स्टॉकची रिट्रेस्मेण्ट त्या रेझिस्टन्स लेव्हलच्या जवळ होते.

आता हि रेझिस्टन्स लेव्हलच स्टॉकच्या सपोर्टची लेव्हल होते आणि तयार होतो लेफ्ट शोल्डर.

पुढच्या मुव्हमध्ये (मुव्ह = हालचाल ) स्टॉक आधिचा हाय मोडीत काढून पुन्हा नवीन उंच हाई तयार होतो.

पुन्हा स्टॉकची रिट्रेस्मेण्ट सपोर्ट लेव्हल पर्यंत होते आणि पुन्हा स्टॉकची किंमत वर जाण्याचा प्रयत्न करत असते, अशाप्रकारे तयार होते हेड.

दुसऱ्या वेळी जेव्हा स्टॉकची किंमत वर जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव /Selling Pressure तयार झाल्याचे जाणवते आणि स्टॉक आधीच्या हाइपेक्षा कमी उंचीवरून खाली येतो. अशाप्रकारे तयार होतो राइट शोल्डर.

यावेळी मात्र स्टॉकची किंमत सपोर्ट लाइनच्या खाली घसरते आणि अशाप्रकारे तयार होतो तो हेड अँड शोल्डर रिव्हर्सल चार्ट पॅटर्न.

आता आपण बघूया हेड अँड शोल्डर रिव्हर्सल चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग साठी कसा करतात

हेड अँड शोल्डर रिव्हर्सल चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा? ।

हेड अँड शोल्डर हा एक बियरीश रिव्हर्सल पॅटर्न असल्याने हा पॅटर्न वापरून आपण सेलिंगच करणार आहोत हे आलेच.

मित्रानो, कोणत्याही ट्रेडरचं सर्वात मोठं कौशल्य म्हणजे संयम (पेशन्स ) होय.

डाउनट्रेंड सुरु झाला हे नक्की होण्यासाठी नेकलाइन ब्रेक होणे किंवा किंमत नेकलाइन च्या खाली घसरणे गरजेचे आहे एकदा नेकलाइन ब्रेक झाली कि समजायचं डाउनट्रेंड सुरु झाला. नेकलाइन हिच या पॅटर्न मध्ये सपोर्टच काम करत असल्याने नेकलाइन ब्रेक होईपर्यंत आपण वाट बघायला हवी

नेकलाइन अगदी आडवीच असली पाहिजे असे काही बंधन नाही, नेकलाइन तिरपीसुद्धा असू शकते

आपल्याला ट्रेड घेण्यासाठी नेकलाइन पर्यंत रिट्रेस्मेण्ट होण्याची वाट बघायची आहे आणि नेकलाइन जवळ बेयरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताच एन्ट्री घ्यायची आहे

कॅन्डलस्टिक पॅटर्न

जर तुम्ही अनुभवी आणि आक्रमक (अग्रेसिव्ह) ट्रेडर असाल तर तुम्ही नेकलाइनच्या ब्रेकआऊटलाच एंट्री घेऊ शकतात

हे झालं एन्ट्रीच, आता आपण बघूया स्टॉप लॉस कुठे लावायचा

इंट्राडे ट्रेडिंग साठी सर्वात जवळचा स्विंग हाई पॉईंट म्हणजेच राइट शोल्डरचा टॉप हा योग्य स्टॉप लॉस ठरू शकतो तर स्विंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण हेड पॉईंटचा स्टॉप लॉस लावणे योग्य ठरेल

वरील चित्रात हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नचे महत्वाचे सर्व पॉईंट्स दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.

इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न | Inverted Head and Shoulder Chart Pattern

हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नच्या विरुद्ध पॅटर्न म्हणजे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न होय

इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असून बाजारातील मंदी संपून आता बाजारात तेजी येणार असल्याचा संकेत आहे

डाउनट्रेंड च्या शेवटी हा पॅटर्न तयार झाल्यास अपट्रेन्ड सुरु होण्याची शक्यता असते. या पॅटर्नच्या मदतीने आपण बाजारात खरेदी करून इंट्राडे ट्रेडींग स्विंग ट्रेडींग करून नफा कमवू शकतो

खालील चित्रात इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न दाखवला आहे

इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न | Inverted Head and Shoulder Chart Pattern
इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न | Inverted Head and Shoulder Chart Pattern

हा पॅटर्न तयार होताना स्टॉक (शेअर) सपोर्ट लाइन ब्रेक करून एक लो तयार करतो व स्टॉकची रिट्रेस्मेण्ट त्या सपोर्ट लेव्हलच्या जवळ होते.

आता हि सपोर्ट लेव्हलच स्टॉकच्या रेझिस्टन्सची लेव्हल होते आणि तयार होतो लेफ्ट शोल्डर.

पुढच्या मुव्हमध्ये(मुव्ह = हालचाल )स्टॉकची किंमत आणखीनच खाली घसरते आणि जेव्हा पुन्हा स्टॉकची रिट्रेस्मेण्ट रेझिस्टन्स लेव्हल पर्यंत होते तेव्हा तयार होते हेड

दुसऱ्या वेळी जेव्हा स्टॉकची किंमत खाली जात असते तेव्हा मात्र स्टॉकमध्ये खरेदीचा दबाव /Buying Pressure तयार झाल्याचे जाणवते आणि स्टॉकची किंमत आधीच्या लोपेक्षा जास्त उंचीवर थांबते.

अशाप्रकारे तयार होतो राइट शोल्डर

यावेळी मात्र स्टॉकची किंमत रेझिस्टन्स लाइनच्या किंवा नेकलाइन ओलांडून जाते आणिआपला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर रिव्हर्सल चार्ट पॅटर्न पूर्ण होतो.

इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करतात ?। Trading Inverted Head and Shoulder Chart Pattern

इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असल्याने हा पॅटर्न वापरून आपण खरेदी /बायिंगच करणार आहोत.

अपट्रेंड सुरु झाला हे नक्की होण्यासाठी नेकलाइन ब्रेक होणे किंवा किंमत नेकलाइनच्या वर जाऊन क्लोज होणे गरजेचे आहे.

एकदा नेकलाइन ब्रेक झाली कि समजायचं अपट्रेन्ड ट्रेंड सुरु झाला.

नेकलाइन हिच या पॅटर्नमध्ये रेझिस्टन्सच काम करत असल्याने नेकलाइन ब्रेक होईपर्यंत आपण वाट बघणे गरजेचे आहे

आपल्याला ट्रेड घेण्यासाठी नेकलाइन पर्यंत रिट्रेस्मेण्ट होण्याची वाट बघायची आहे आणि नेकलाइन जवळ बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताच एन्ट्री घ्यायची आहे

जर तुम्ही अनुभवी आणि आक्रमक (अग्रेसिव्ह) ट्रेडर असाल तर तुम्ही नेकलाइनच्या ब्रेकआऊटलाच एंट्री घेऊ शकतात

इंट्राडे ट्रेडिंग साठी सर्वात जवळचा स्विंग लो पॉईंट म्हणजेच राइट शोल्डरचा बॉटम हा योग्य स्टॉप लॉस ठरू शकतो तर स्विंग ट्रेडिंगआणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण हेड चा बॉटमपॉईंट, स्टॉप लॉस लावणे योग्य ठरेल

वरील चित्रात इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नचे महत्वाचे सर्व पॉईंट्स दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.

मित्रानो, स्टॉक रिव्हर्सल झाल्यानंतर स्टॉक मध्ये बरीच मोठी मूव्ह येत असते आणि जर आपल्याला स्टॉक रिव्हर्सल व्यवस्थित ट्रेड करता आले तर आपल्याला ट्रेडिंग करून खूप मोठा नफा कमावता येऊ शकतो.

अशाप्रकारे या लेखात आपण चार्ट पॅटर्न म्हणजे काय आणि चार्ट पॅटर्नचा शोध कोणी लावला ते पाहिले.

याशिवाय आपण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न या लोकप्रिय रिव्हर्सल चार्ट पॅटर्नची देखील ओळख करून घेतली.

लेख आपल्याला कसा वाटला याविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा

धन्यवाद !!!

आणखी चार्ट पॅटर्न बघण्यासाठी खालील लेख जरूर वाचा

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment