फन्डामेन्टल ॲनालिसिस मराठी | Fundamental Analysis of Stocks in Marathi

3.3/5 - (3 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’च्या नवीन लेखात आपले स्वागत आहे.

या लेखापासून आपण नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करणार आहोत जो आहे ‘फन्डामेन्टल ॲनालिसिस’

टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला ट्रेडींगसाठी उपयोगी पडते तर गुंतवणुकीसाठी किंवा इन्व्हेस्टिंगसाठी आपल्याला फन्डामेन्टल ॲनालिसिसची गरज असते.

या लेखात आपण फन्डामेन्टल ॲनालिसिस या स्टॉकचा अभ्यास किंवा विश्लेषण करण्याच्या महत्वपूर्ण पद्धतीची माहिती घेणार आहोत.

वॉरन बफे, जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक, फन्डामेन्टल ॲनालिसिस पुरस्कर्ते आहेत.

चला तर मग सुरुवात करूया

फन्डामेन्टल ॲनालिसिस म्हणजे काय ? ।

फन्डामेन्टल ॲनालिसिस हि स्टॉकपेक्षा कंपनीचा किंवा एखाद्या उद्योगव्यवसायाचा अभ्यास करण्याची पद्धत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

एखाद्या स्टॉकचे किंवा कंपनीचे फन्डामेन्टल ॲनालिसिस करणे म्हणजे त्या कंपनीच्या स्टॉकची योग्य किंमत ठरवणे होय.

उदा. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत ठरवणे.

फन्डामेन्टल ॲनालिस्ट कंपनीचा सविस्तर अभ्यास करतो आणि शेअरची किंमत काय असावी याचा अंदाज करतो.

फन्डामेन्टल ॲनालिसिस मध्ये देशाची अर्थव्यवस्था, कंपनी काम करत असलेले क्षेत्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो.

याशिवाय कंपनीशी निगडित घटना आणि गोष्टी यांचा देखील विचार करून कंपनीच्या भवितव्याबाबत अंदाज बांधला जातो.

उदा. टाटा मोटर्स कंपनी भारतात मोठ्या प्रमाणावर काम करते असे आपण समजू.

मग भारतातील सध्याची आर्थिक, राजकीय परिस्थिती तसेच वाहन क्षेत्रातील उद्योगांची सध्याची वाटचाल. वाहन क्षेत्रातील इतर कंपन्या कसे काम करत आहेत अशा सर्व गोष्टींचा विचार केला जातो.

यानंतर मग टाटा कंपनीचा अभ्यास केला जातो जसे कि टाटा मोटर्स कंपनीचा कारभार कोण बघत आहे, कंपनीने घेतलेली कर्जे, कंपनीचा मागील काही काळातील नफा, कंपनीची विक्री इ गोष्टींचा अभ्यास केला जातो.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

फन्डामेन्टल ॲनालिसिसचा उद्देश | Objectives of Fundamental Analysis

१. शेअरची किंमत ठरवणे

फन्डामेन्टल ॲनालिसिसद्वारे आपण कंपनीच्या शेअरची वाजवी किंमत ठरवण्याचा प्रयत्न करत असतो.

शेअर मार्केटच्या भाषेत यालाच रियल व्हॅल्यू (Real Value ) किंवा इन्ट्रींझिक व्हॅल्यू (Intrinsic Value) असे म्हणतात.

फन्डामेन्टल ॲनालिस्ट शेअरची वाजवी किंमत काढण्यासाठी कंपनीची आर्थिक स्थिती, क्षेत्रातील वाढ, कंपनीचे व्यवस्थापन, भविष्यातील प्रयोजन इ अनेक गोष्टींचा आढावा घेतो आणि स्टॉकची जी किंमत बाजारात असायला हवी ती शोधून काढतो.

२. करंट मार्केट प्राइस योग्य असल्याचे ठरवणे

शेअरची वाजवी किंमत आणि शेअरची सध्याची किंमत वेगवेगळ्या असू शकतात.

करंट मार्केट प्राइस कमी कि जास्त ते ठरवून कंपनीतील गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो.

फन्डामेन्टल ॲनालिसिसचा उपयोग | Use of Fundamental Analysis

फन्डामेन्टल ॲनालिसिसद्वारे शेअरची किंमत ठरवली जाते आणि ठरवलेल्या किमतीची तुलना सध्याच्या किमतीशी केली जाते.

सध्याची किंमत म्हणजे करंट मार्केट प्राइस (Current Market Price) होय.

जर सध्याची मार्केट प्राइस फन्डामेन्टल ॲनालिसिसद्वारे मिळवलेल्या किमतीपेक्षा कमी असेल तर त्यात खरेदी करणे योग्य ठरते.

थोडक्यात काय तर करंट मार्केट प्राइस जर रियल प्राइस पेक्षा कमी असेल तर आपल्याला जास्त किंमत असणारा शेअर कमी किमतीत मिळतोय असे गृहीत धरून गुंतवणूक केली जाते.

स्टॉकची करंट मार्केट प्राइस कमी आढळून आल्यास स्टॉक अंडरव्हॅल्यूड (Under Valued )असल्याचे म्हणतात तर करंट मार्केट प्राइस जास्त असल्यास स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड (Over Valued ) असल्याचे म्हणतात.

मग मार्केट प्राइस जास्त असल्यास आपण गुंतवणूक करायचीच नाही का ?

फन्डामेन्टल ॲनालिसिस करतांना आपण कंपनीच्या भविष्यातील योजनांचा देखील विचार करत असतो तेव्हा आपल्याला जर स्टॉकचे फन्डामेन्टल भक्कम वाटत असतील आणि स्टॉकची किंमत भविष्यात आणखी वाढणार असल्याची खात्री वाटत असेल तर आपण स्टॉकमध्ये खरेदी करू शकतो.

उदा . १. माझ्या अभ्यासानुसार जर टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकची किंमत १०० रुपये असायला हवी पण सध्याची टाटा मोटर्स स्टॉकची किंमत ८० रुपये असेल तर मी टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देईल.

२. फन्डामेन्टल ॲनालिसिसनुसार कंपनीच्या स्टॉकची किंमत भविष्यात २०० रुपये होईल असे वाटत असेल आणि आज स्टॉकची किंमत १२० रुपये असेल तर अशावेळी देखील आपण स्टॉक खरेदी करू शकतो.

फन्डामेन्टल ॲनालिसिसचा उपयोग कोण करतात | Who Uses Fundamental Analysis?

फन्डामेन्टल ॲनालिसिसचा वापर मोठ्या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी करतात जसे कि ५ वर्षे, १० वर्षे, २५ वर्षे इ.

मोठे गुंतवणूकदार किंवा मोठ्या संस्था, फंड मॅनेजर्स फन्डामेन्टल ॲनालिसिसचा वापर करतात.

फन्डामेन्टल ॲनालिसिसचे प्रकार | Types of Fundamental Analysis

संख्यात्मक फन्डामेन्टल ॲनालिसिस (Quantitative Fundamental Analysis )

संख्यात्मक फन्डामेन्टल ॲनालिसिसमध्ये कंपनीची अशी माहिती जी संख्या, प्रमाण, आकडेवारी, नोंदी या प्रकारात उपलब्ध आहे त्या माहितीचा अभ्यास करणे येते.

गुणात्मक फन्डामेन्टल ॲनालिसिस ( Qualitative Fundamental Analysis )

गुणात्मक फन्डामेन्टल ॲनालिसिसमध्ये कंपनीची इतर माहिती जसे कि कंपनीचे व्यवस्थापन, अनुभव, स्पर्धा, भविष्यातील योजना, इ अनेक गोष्टींचा समावेश होतो.

फन्डामेन्टल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस मधील फरक । Fundamental Analysis and Technical Analysis Difference

१. फन्डामेन्टल ॲनालिसिस गुंतवणूकदारांमध्ये आणि टेक्निकल ॲनालिसिस ट्रेडरमध्ये लोकप्रिय आहे.

२. फन्डामेन्टल ॲनालिसिस जास्त कालावधीच्या गुंतवणुकीसाठी जसे कि ५ वर्षे, १० वर्षे वापरतात आणि टेक्निकल ॲनालिसिस कमी कालावधीच्या अगदी ५ मी ते २-३ महिने इतक्या काळाच्या खरेदी-विक्रीसाठी वापरतात.

३. फन्डामेन्टल ॲनालिसिस करतांना कंपनीच्या व्यावसायाचा विचार केला जातो आणि टेक्निकल ॲनालिसिस स्टॉकमध्ये होणाऱ्या किमतीच्या हालचालींचा, चार्टवर तयार होणाऱ्या पॅटर्नचा वापर केला जातो.

४. फन्डामेन्टल ॲनालिसिस करण्याची साधने

  • बॅलन्स शीट
  • प्रॉफिट-लॉस स्टेटमेन्ट
  • कंपनीशी निगडित घडामोडी.
  • कंपनीशी निगडित नोंदी आणि आकडेवारी

५. टेक्निकल ॲनालिसिस करण्याची साधने

  • कॅन्डलस्टिक चार्ट
  • व्हॉल्युम बार
  • चार्ट पॅटर्न
  • टेक्निकल इंडिकेटर्स

अशाप्रकारे आपण या लेखात फन्डामेन्टल ॲनालिसिस या अनोख्या विश्लेषण पद्धतीची ओळख करून घेतली.

आपल्या ज्ञानात हा लेख वाचून भर पडली असेल अशी अपेक्षा करतो आणि मी इथे थांबतो.

शेअर मार्केटची अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी पैसा झाला मोठा फेसबुक पेजला लाइक करा, टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा.

आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद !!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment