कार इन्शुरन्स मराठी । Car Insurance in Marathi

2/5 - (3 votes)

नमस्कार मित्रांनो,

पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.

आपल्याला ऐकून भीती वाटेल कि भारतात दररोज १२१४ रस्ते अपघात होतात आणि रोज ३७७ लोकांचा मृत्यू होतो.

मित्रांनो, अपघात, मृत्यू या अचानक होणाऱ्या आणि अनेकदा आपले कोणतेही नियंत्रण नसणाऱ्या गोष्टी आहेत.

कल्पना करा तुम्ही कारमध्ये ऑफिसला जात आहेत आणि दुर्दैवाने आपल्या गाडीला अपघात झाला तर.

अपघातात आपल्या कारचे नुकसान होऊ शकते, दुसऱ्या कारचे नुकसान होऊ शकते, समोरच्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो किंवा आपला देखील मृत्यू होऊ शकतो.

अशा सर्व बऱ्यावाईट घटनांपासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतो तो कार इन्शुरन्स.

आजच्या लेखात आपण कार इन्शुरन्सची सखोल माहिती घेणार आहोत.

कार इन्शुरन्स म्हणजे काय ? | What is Car Insurance in Marathi?

कार इन्शुरन्स हा जनरल इन्शुरन्सचाच किंवा मोटार इन्शुरन्सचाच एक प्रकार आहे.

कार इन्शुरन्स म्हणजे असा इन्शुरन्स ज्यामध्ये आपण आपली कार सुरक्षित करत असतो.

कार इन्शुरन्स घेऊन आपण आपल्या गाडीला होणाऱ्या नुकसानापासून किंवा आपल्या गाडीमुळे इतरांना होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळवू शकतो.

कार इन्शुरन्स म्हणजे आपल्या गाडीसाठी आणि अर्थातच आपल्या तिजोरीसाठी एक सुरक्षा कवच होय.

उदा. दुर्दैवाने आपल्या गाडीला अपघात झाला आणि आपल्याकडे इन्शुरन्स असेल तर आपण इन्शुरन्स पॉलिसीच्या अंतर्गत आपल्या गाडीची दुरुस्ती करून घेऊ शकतो किंवा दुरुस्ती केलेल्या खर्चाची भरपाई मागू शकतो.

कार इन्शुरन्सची गरज का आहे ? | Need of Car Insurance in Marathi?

मित्रांनो, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांनी भरपूर मेहनत करून आपले स्वप्न साकार केलेले असते आणि आपली स्वप्नातील कार घेतलेली असते अशी कार आपल्याला खूप जास्त प्रिय असते.

आपल्या गाडीला अगदी स्क्रॅच पडला तरी आपल्याला किती वाईट वाटते तेव्हा कार इन्शुरन्स घेऊन आपल्या गाडीला सुरक्षित करणे आपली जबाबदारी आहे.

आपल्या गाडीला अपघात झाल्यास त्या अपघाताची तीव्रता किती असू शकेल

भारतात मोटार वाहन कायदा, १९८८ च्या सेक्शन ११(कलम १४५ ते १६४) अंतर्गत, भारतात किमान थर्ड पार्टी कार विमा पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे.

आपण या लेखात थर्ड पार्टी इन्शुरन्सची सविस्तर माहिती पुढे बघणार आहोत.

कार इन्शुरन्समध्ये समाविष्ट असणाऱ्या गोष्टी । Car Insurance Coverage

कार इन्शुरन्स घेतांना कार इन्शुरन्स विषयीच्या सर्व गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे तेव्हा आपण कार इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जाणाऱ्या गोष्टी आता समजून घेणार आहोत.

१. स्वतःचे नुकसान (OD) कव्हर । Own Damage Cover

या कव्हरमध्ये स्वतःच्या वाहनाचे नुकसान कव्हर केले जाते आणि अपघातात आपल्या वाहनाचे नुकसान झाले तर वाहनाच्या दुरुस्तीसाठी आपल्याला खर्च मिळू शकतो.

अनेक पॉलिसी आपल्याला कॅश-लेस सुविधा देखील देतात म्हणजे आपण डिरेक्ट ऑथोराइज्ड गॅरेजमध्ये जाऊन पैसे न देता आपल्या गाडीचे काम करून घेऊ शकतो.

याव्यतिरिक्त दंगल, नैसर्गिक आपत्ती, चोरी, दरोडा, आतंकवादी हल्ला इ कारणांमुळे देखील आपल्या वाहनाचे नुकसान झाल्यास आपण इन्शुरन्स पॉलिसीद्वारे आपली कार संरक्षित करू शकतो.

२. थर्ड पार्टी कव्हर । Third Party Cover

मित्रांनो, थर्ड पार्टी म्हणजे आपल्या व्यतिरिक्त इतर लोक होय.

या कव्हरमध्ये आपण आपल्या वाहनामुळे इतर लोकांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईची तजवीज करत असतो या प्रकारच्या कार विमा संरक्षण अंतर्गत, आपल्याला खालील फायदे मिळतील:

१. दुसऱ्या लोकांच्या नुकसान झालेल्या वाहनाच्या दुरुस्ती/बदलीचा खर्च

बऱ्याच इन्शुरन्स पॉलिसीमध्ये या भरपाईला एक मर्यादा घालून दिलेली असते आणि हि मर्यादा ७.५ लाख एवढी असते.

२. दुसऱ्या लोकांच्या हॉस्पिटलायझेशन आणि उपचारांचा खर्च

३. दुसऱ्या लोकांच्या मृत्यूमुळे उद्भवलेल्या दायित्वे

अपघातात समोरच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर हि केस कोर्टात सेटल होते आणि कोर्ट जी रक्कम भरपाई म्हणून ठरवते ती सर्व रक्कम इन्शुरन्स कंपनी आपल्यावतीने नुकसानग्रस्त कुटुंबाला देते.

उदा. आपल्या गाडीच्या अपघातात कोणाचा मृत्यू झाला आणि कोर्टाने भरपाई म्हणून अपघातग्रस्त कुटुंबाला ५० लाख रुपये भरपाई म्हणून देण्यास सांगितले तर इन्शुरन्स कंपनी हि रक्कम आपल्या वतीने अपघातग्रस्त कुटुंबाला देईल.

मोटार वाहन कायद्यानुसार, रस्त्यावर चालण्यासाठी थर्ड-पार्टी कार विमा संरक्षण आवश्यक आहे.

विम्याची रक्कम ड्रायव्हिंगच्या परिस्थितीनुसार आणि वाहनाच्या वापरानुसार बदलत असते.

कार इन्शुरन्सचे प्रकार । Types of Car Insurance

१. थर्ड पार्टी कार इन्शुरन्स । Third Party Insurance

नावातच सांगितल्याप्रमाणे या प्रकारच्या पॉलिसीसमध्ये आपल्याला फक्त इतर लोकांचे आपल्याकडून होणारे नुकसान कव्हर केले जाते.

उदा. अपघातात आपल्या कडून इतर कुणाच्या गाडीचे किंवा प्रॉपर्टीचे नुकसान झाले असल्यास ते नुकसान या पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाते.

२. सर्वसमावेशक इन्शुरन्स । Comprehensive Insurance

कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपण आपले स्वतःचे तसेच इतरांचे देखील नुकसान कव्हर करत असतो.

उदा. अपघातात आपल्या गाडीचे तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या गाडीचे झालेले नुकसान दोन्ही कव्हर केले जाईल.

३. फुल इन्शुरन्स । Full Insurance । Zero Dep Insurance

फुल इन्शुरन्स हा सर्वसमावेशक इन्शुरन्सचाच एक प्रकार आहे.

मित्रांनो, इन्शुरन्समध्ये नुकसान भरपाई देत असताना गाडीचे वय देखील विचारात घेतले जाते आणि गाडीचे वय जितके जास्त असेल तितकीच मिळणारी नुकसान भरपाई कमी असते.

आपण जर फुल इन्शुरन पॉलिसी घेतली तर नुकसान भरपाई देत असताना गाडीचे वय न बघता पूर्ण नुकसान भरपाई दिली जाते.

आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीमध्ये झिरो डिप्रिसिएशन ॲड-ऑन कव्हर घेऊन फुल इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतो.

कार इन्शुरन्स ॲड-ऑन । Car Insurance Add-on

मूळ इन्शुरन्स पॉलिसी सोबत आपण आपल्याला अधिकचे संरक्षण हवे असल्यास आपण ॲड-ऑन खरेदी करू शकतो.

आता आपण हे सर्व ॲड-ऑन कव्हर बघणार आहोत.

१. झिरो डिप्रिसिएशन ॲड-ऑन कव्हर । Zero Depreciation Add-on Cover

मित्रांनो, आपल्या गाडीचे वय जसे वाढत जाते तसे आपल्या गाडीची किंमत कमी होत जाते.

इन्शुरन्सच्या भाषेत वयानुसार कमी होणाऱ्या गाडीच्या किमतीला डिप्रिसिएशन असे म्हणतात.

गाडीची किंमत खालीलप्रमाणे कमी होत जाते.

गाडीचे वय गाडीचा घसारा
६ महिने ५%
६ महिने ते १ वर्ष १५%
१ वर्ष ते २ वर्ष २०%
२ वर्ष ते ३ वर्ष ३०%
३ वर्ष ते ४ वर्ष ४०%
४ वर्ष ते ५ वर्ष ५०%

सर्वसाधारण पॉलिसीमध्ये गाडीची नुकसान भरपाई देत असताना कंपनी आपल्याला गाडीच्या वयानुसार नुकसान भरपाई देते.

उदा. आपण असे समजूया कि अपघातात आपल्या गाडीचा समोरचा धातूचा काही भाग चेपला आहे आणि त्यामुळे आपल्याला तो भाग बदलवून घ्यावा लागणार आहे.

नुकसान झालेल्या भागाची किंमत १००० रुपये इतकी आहे असे आपण समजूया.

आपली गाडी अगदी नवी असेल म्हणजे ६ महिन्यापेक्षा कमी वयाची असेल तर आपल्याला ५% रक्कम म्हणजे ५० रुपये द्यावे लागतील याउलट आपली गाडी ४ वर्षे जुनी असेल तर आपल्याला ५०% रक्कम किंवा ५०० रुपये द्यावे लागतात.

मित्रांनो, गाडीच्या वयाशिवाय आपल्याला खालील गोष्टी देखील लक्षात घ्याव्या लागतात.

कारचा भाग कारचा घसारा
रबर पार्टस,एअर बॅग, नायलॉन पार्टस,टायर्स, बॅटरी इ ५०%
पेंट /रंग ५०%
फायबर ग्लास ३०%
ग्लास /काच Nill

मित्रांनो, इन्शुरन्स क्लेम करत असताना आपल्याला अशा सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

२. कन्झ्युमेबल कव्हर । Consumables Add-on Cover

गाडीच्या वापरात संपून जाणाऱ्या गोष्टींना कन्झ्युमेबल असे म्हणतात.

सर्वसाधारण पॉलिसीमध्ये आपल्याला कन्झ्युमेबलची भरपाई मिळत नाही.

कन्झ्युमेबल कव्हर या ॲड-ऑन कव्हरमध्ये आपल्याला ग्रीस, इंजिन ऑइल, नट, बोल्ट, स्क्रू, वॉशर्स, ब्रेक ऑइल इ गोष्टींची देखील भरपाई मुलू शकते.

३. रोडसाइड असिस्टन्स ॲड-ऑन कव्हर । Roadside Assistance Add-on Cover

हे ॲड-ऑन कव्हर विमा उतरवलेले वाहन खराब झाल्यास मदत पुरवते.

या सेवांमध्ये जवळच्या गॅरेजमध्ये टोइंग करणे, साइटवर दुरुस्तीकरून देणे, चाव्या हरवल्यास मदत, पंचर टायर बदलणे, इंधन वितरण इ.

४. इंजिन प्रोटेक्शन ॲड-ऑन कव्हर । Engine Protection Add-on Cover

हे कव्हर आपल्याला आपल्या इंजिनमध्ये तेल गळती किंवा पाणी घुसल्यामुळे इंजिनच्या यांत्रिक/विद्युत बिघाडासाठी झालेल्या खर्चाची भरपाई मिळू देते.

५. की लॉस ॲड-ऑन कव्हर । Key Loss Add-on Cover

हे ॲड-ऑन कव्हर विमा कंपनी पॉलिसीधारकाला चाव्या हरवल्याबद्दल भरपाई देते.

६. को-पॅसेन्जर ॲड-ऑन कव्हर | Co-Passenger Add-on Cover

हे असे कव्हर आहे ज्यामध्ये हॉस्पिटल खर्च, वैद्यकीय खर्च आणि अपघात झाल्यास पॉलिसीधारकाला वैद्यकीय वाहतूक करण्यास मदत यांचा समावेश आहे.

७. टायर डॅमेज ॲड-ऑन कव्हर । Tyre Damage Add-on Cover

हे ॲड-ऑन टायरमधील फुगवटा, पंक्चर किंवा टायर फुटणे, अपघातामुळे टायर कापून जाणे इत्यादी नुकसानांसाठी कव्हर प्रदान करते.

८. रिटर्न टू इन्व्हॉईस । Return To Invoice Add-on

हे ॲड-ऑन कव्हर आपल्याला आपल्या वाहनाचे संपूर्ण नुकसान झाल्यास आपल्या गाडीची एक्स शोरूम प्राईस मिळवून देते.

उदा. आपली गाडी चोरी झाली किंवा नैसर्गिक आपत्तीद्वारे पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली तर आपल्याला गाडीची एक्स शोरूम प्राईस मिळते.

९. प्रोटेक्शन एनसीबी । NCB Protection Add-on

१०. वैयक्तिक वस्तूंच्या ॲड-ऑनचे नुकसान । Loss of Personal Belongings Add-on

या ॲड-ऑनसह, विमा कंपनी पॉलिसीधारकाला वैयक्तिक वस्तू जसे की वस्तू किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या इतर वस्तूंच्या नुकसानीची भरपाई देते.

११. दैनिक भत्ता ॲड-ऑन । Daily Allowance Add-on

या ॲड-ऑनची निवड केल्याने आपल्याला कार हरवल्यावर किंवा दुरुस्तीसाठी बाहेर असताना विमा कंपनीकडून दररोज भत्ता मिळतो.

१२. वैयक्तिक लॅपटॉप आणि मोबाइल अॅड-ऑन कव्हर । Personal Laptop and Mobile Add-on Cover

हे ॲड-ऑन तुम्हाला वाहनात ठेवलेला वैयक्तिक लॅपटॉप आणि मोबाइल हरवल्यास भरपाई मिळवू देते.

१३. गॅप व्हॅल्यू ॲड-ऑन कव्हर । GAP Value Add-on Cover

हे ॲड-ऑन तुम्हाला चोरी, एकूण नुकसान किंवा रचनात्मक एकूण नुकसान झाल्यास वाहनाची संपूर्ण इनव्हॉइस किंमत मिळविण्यात मदत करते. यात अतिरिक्त प्रीमियमच्या विरोधात रोड टॅक्स आणि प्रथमच नोंदणी शुल्क देखील समाविष्ट आहे.

टॉप १० कार इन्शुरन्स कंपन्या । Top 10 Car Insurance Companies

  • इफको टोकियो जनरल इन्शुरन्स ( IFFCO Tokio General Insurance )
  • रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स ( Royal Sundaram General Insurance )
  • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी The ( Oriental Insurance Company )
  • एचडीएफसी जनरल इन्शुरन्स ( HDFC ERGO General Insurance)
  • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स ( Universal Sompo General Insurance )
  • टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स ( Tata AIG General Insurance )
  • न्यू इंडिया अॅश्युरन्स ( The New India Assurance )
  • एसबीआय जनरल इन्शुरन्स ( SBI General Insurance )
  • बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स ( Bajaj Allianz General Insurance )
  • फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स ( Future Generali India Insurance )

आर्थिक उन्नतीसाठी अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ची लिंक बुकमार्क करा, आणि ‘पैसा झाला मोठा’ ॲप डाउनलोड करा.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

याशिवाय पैसा झाला मोठा युट्युब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका.

आपण वेळातवेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment