Aditya Birla Sun Life AMC IPO in Marathi
मित्रांनो, येत्या आठवड्यात आदित्य बिर्ला सन लाइफ कंपनीचा आईपिओ येत आहे.
आईपिओ च्या माध्यमातून आदित्य बिर्ला सन लाइफ जवळपास २७६८.२६ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने हा एक मोठा आईपिओ आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ एक आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी असून आर्थिक सेवा क्षेत्रात आपल्याला गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे
आदित्य बिर्ला सन लाइफ स्टॉक ११ऑक्टोबर २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ आईपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Aditya Birla Sun Life IPO Subscription Status
आइपीओ खुला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ५.२५पट सबस्क्राइब झाला आहे.
सब्सक्रिप्शन स्टेटस | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | १०.३६ पट |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | ४.३९ पट |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | ३.२३ पट |
आदित्य बिर्ला सन लाइफ आईपिओची एकूण किंमत २७६८.२६ कोटी रुपये असून पूर्ण २७६८.२६ कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल) उपलब्ध केले गेले आहेत.
आदित्य बिर्ला सन लाइफचे एकूण ३८,८८०,००० शेअर्स उपलब्ध केले जाणार आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल (ABCL) भागधारकांसाठी आदित्य बिर्ला सन लाईफ आयपीओमध्ये १९,४४,००० इक्विटी शेअर्सचे आरक्षण आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ शेअरची दर्शनी किंमत हि ५ रुपये आहे.
या आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ६९५ रुपये आणि कमाल किंमत ७१२ रुपये असणार आहे
एका लॉटमधील शेअरची संख्या हि २० असणार आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २० * ६९५ = १३,९०० रुपये ते २० * ७१२ = १४,२४० रुपये इतकी असू शकेल.
रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १३,९०० रुपये तर जास्तीत जास्त १४ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९९,३६० रुपये इतकी असणार आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ आईपिओ ची तारीख | Aditya Birla Sun Life IPO Date
आदित्य बिर्ला सन लाइफ आईपिओ २९ सप्टेंबर २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख १ ऑक्टोबर २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आईपिओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ शेअर्सची अलॉटमेंट ६ ऑक्टोबर २०२१ रोजी चालू होणार असून ८ ऑक्टोबर २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर ११ ऑक्टोबर २०२१ ला आदित्य बिर्ला सन लाइफ बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Aditya Birla Sun Life IPO?
सध्या मार्केटमध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम ७० रुपये ते ७५ रुपये असल्याचे समजते.
आदित्य बिर्ला सन लाइफ आईपिओचा उद्देश | Objectives of Aditya Birla Sun Life IPO
- स्टॉक एक्सचेंजवर स्टॉक लिस्ट झाल्यावर मिळणाऱ्या सुविधांचा लाभ मिळवणे
- दैनंदिन आर्थिक व्यवहार.
आदित्य बिर्ला सन लाइफ कंपनीची माहिती | Information of Aditya Birla Sun Life
आदित्य बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेन्ट हि १९९४ मध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल ली आणि सन लाइफ असेट मॅनेजमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने उभी राहिलेली कंपनी आहे.
कंपनीने आपल्या ऑपरेशन्सचे अनेक गोष्टी स्वयंचलित आणि डिजीटल केल्या आहेत ज्यात ग्राहक ऑनबोर्डिंग, ऑनलाइन पेमेंट आणि इतर व्यवहार, निधी व्यवस्थापन, व्यवहार, लेखा, ग्राहक सेवा, डेटा विश्लेषण आणि इतर कार्ये यांचा समावेश आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेन्ट कंपनी प्रामुख्याने आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, भारतीय ट्रस्ट अॅक्ट, 1१८८२ अंतर्गत नोंदणीकृत ट्रस्टचे गुंतवणूक व्यवस्थापक आहे.
याव्यतिरिक्त,आदित्य बिर्ला सन लाइफ पोर्टफोलिओमध्ये मॅनेजमेंट सर्व्हिसेस, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स सारख्या इतर विविध व्यवसाय आहेत.
या कंपनीने पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस ही एक अत्यंत उत्तम सेवा विकसित केली आहे आहे जी गुंतवणुकीसाठी संशोधनावर आधारित सेवा पुरवते.
याशिवाय आदित्य बिर्ला सन लाइफ जीवन विमा, मालमत्ता व्यवस्थापन, खाजगी इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज, संरचित वित्त, प्रकल्प वित्त, सामान्य विमा ब्रोकिंग, संपत्ती व्यवस्थापन, इक्विटी, चलन आणि कमोडिटी ब्रोकिंग, ऑनलाइन वैयक्तिक वित्त व्यवस्थापन, गृहनिर्माण वित्त, पेन्शन फंड व्यवस्थापन, आणि आरोग्य विमा व्यवसाय, एबीसीएल त्याच्या किरकोळ आणि कॉर्पोरेट ग्राहकांच्या एंड-टू-एंड वित्तीय सेवा गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ कंपनीकडे १७,००० हुन जास्त कर्मचारी, भारतभर विस्तीर्ण जाळे आणि २,००,००० पेक्षा जास्त एजंट / चॅनेल भागीदार आहेत.
आदित्य बिर्ला सन लाइफची उजवी बाजू | Positives of Aditya Birla Sun Life
- भारतातील सर्वात मोठी बँकशी संलग्न नसणारी आर्थिक व्यवस्थापन करणारी कंपनी.
- अनुभवी व्यवस्थापन असणारी कंपनी.
- भारतातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह अशी ओळख असणारा ब्रँड.
- झपाट्याने वाढणारा ग्राहक वर्ग.
- ग्राहकांना अनेक, उत्तम आणि वैविध्यपूर्ण सुविधांनी परिपूर्ण पोर्टफोलिओ.
थोडक्यात महत्वाचे | All Important
आदित्य बिर्ला सन लाइफ | २७६८.२६ कोटी रुपये |
किमान किंमत | ६९५ रुपये |
कमाल किंमत | ७१२ रुपये |
लॉट साईझ | २० |
एकूण गुंतवणूक | १३,९०० रुपये ते १४,२४० रुपये |
आईपिओ खुला होणार | २९ सप्टेंबर २०२१ |
आईपिओ बंद होणार | १ ऑक्टोबर २०२१ |
शेअर्स इश्यू होणार | ६ ऑक्टोबर २०२१ |
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार | ८ ऑक्टोबर २०२१ |
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार | ११ ऑक्टोबर २०२१ |
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात