अदानी विल्मार आयपीओ । Adani Wilmar IPO

4/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

अदानी विल्मार ही एक एफएमसीजी (FMCG) फूड कंपनी आहे जी भारतीय ग्राहकांसाठी खाद्यतेल, गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यासारख्या स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू पुरवते.

आपण “फॉर्च्युन” या ब्रॅण्डचे नाव नक्कीच ऐकले असेल, “फॉर्च्युन” हा अदानी विल्मार कंपनीचाच ब्रँड आहे.

हा आयपीओ २७ जानेवारी २०२२ रोजी शेअर बाजारात दाखल झाला असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी ३६०० कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अदानी विल्मार एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.

चला तर मग माहिती घेऊया आयपीओची.

अदानी विल्मार आयपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Adani Wilmar IPO Subscription Status

अदानी विल्मार आयपीओ दुसऱ्या दिवशी १.१३ पट सबस्क्राइब झाला.

सब्सक्रिप्शन
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)०.३९%
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)०.८८%
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)१.८५%

अदानी विल्मार आयपीओ शेअर्सची उपलब्धता | Adani Wilmar IPO Availability of Shares

अदानी विल्मार आयपीओची एकूण किंमत ३६०० कोटी रुपये असून पूर्ण शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल) उपलब्ध केले गेले आहेत.

शेअरची उपलब्धता पुढीलप्रमाणे असल्याचे समजते.

शेअर उपलब्धता
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)५०%>
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)१५%<
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)३५%<

अदानी विल्मार आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Adani Wilmar IPO Share Price and Lot Size

अदानी विल्मार आयपीओ शेअरची दर्शनी किंमत (फेस प्राइस )हि १ रुपये आहे.

या आयपीओ मध्ये एका शेअरची किमान किंमत २१८ रुपये आणि कमाल किंमत २३० रुपये असणार आहे.

एका लॉटमधील शेअरची संख्या हि ६५ असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २१८ * ६५ = १४,१७० रुपये ते २३० * ६५ = १४,९५० रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १४,१७० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९४,३५० रुपये इतकी असणार आहे.

अदानी विल्मार आयपीओची तारीख | Adani Wilmar IPO Date

अदानी विल्मार आयपीओ २७ जानेवारी २०२२ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ३१ जानेवारी २०२२ असणार आहे, अशाप्रकारे दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे

अदानी विल्मार आयपीओ शेअर्सची अलॉटमेंट ३ फेब्रुवारी २०२२ रोजी चालू होणार असून ७ फेब्रुवारी २०२२ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर ८ फेब्रुवारी २०२२ ला अदानी विल्मार बाजारात लिस्ट होईल.

अदानी विल्मार आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Adani Wilmar IPO?

सध्या मार्केटमध्ये अदानी विल्मार आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम जवळपास ४० रुपये असल्याचे समजते.

अदानी विल्मार माहिती | Information of Adani Wilmar

१९९९ मध्ये अदानी समूह आणि विल्मार समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून अदानी विल्मार हि कंपनी स्थापित केली गेली आहे.

अदानी विल्मार ही एक FMCG फूड कंपनी आहे जी भारतीय ग्राहकांसाठी खाद्यतेल, गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यासह अनेक स्वयंपाकघरातील आवश्यक खाद्यपदार्थ पुरवते.

“फॉर्च्यून”, हा या कंपनीचा प्रमुख ब्रँड असून हा भारतात सर्वाधिक विकला जाणारा खाद्यतेल ब्रँड आहे.

अलीकडेच कंपनीने व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्टसवर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्याच अनुषंगाने कंपनीने खाद्यतेल उत्पादने, तांदूळ कोंडा हेल्थ ऑइल, फोर्टिफाइड फूड्स, रेडी-टू-कूक सोया चंक्स, खिचडी इत्यादी उत्पादने बाजारात आणली आहेत.

हि कंपनी भारतातील १० राज्यांमध्ये २२ प्लांट चालवते, या प्लॅन्टमध्ये १० क्रशिंग युनिट्स आणि १९ रिफायनरीज आहेत.

कंपनीची मुंद्रा येथील रिफायनरी ही भारतातील सर्वात मोठ्या सिंगल-लोकेशन रिफायनरीपैकी एक असून या रिफायनरीची क्षमता प्रतिदिन ५००० मेट्रिक टन (MT) आहे.

अदानी विल्मारचे स्वतःच्या २२ प्लांट्स व्यतिरिक्त, अतिरिक्त ३६ भाडेतत्त्वावरील युनिट्सदेखील आहे.

कंपनीचे वितरक संपूर्ण भारतातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरले आहे, हे वितरक जवळपास १.८ दशलक्ष पेक्षा जास्त किरकोळ दुकानांना माल पुरवतात.

अदानी विल्मार उजवी बाजू | Positives of Adani Wilmar

  • वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ.
  • अग्रगण्य आणि लोकप्रिय ब्रँड
  • कच्चा मालाचा भक्कम पुरवठा असणाऱ्या सोयी.
  • सुस्थापित ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मोठी उत्पादन क्षमता.
  • मोठे देशव्यापी नेटवर्क.
  • उत्तम आणि अनुभवी व्यवस्थापन

अदानी विल्मार कंपनीची आर्थिक माहिती । Company Financials

तपशीलदशलक्ष रुपयेप्रतिवार्षिक
३१ ऑगस्ट २०२१३१ मार्च २०२१३१ मार्च २०२०
एकूण मालमत्ता(Total Assets)१,७९,२३७१,३३,२६६१,१७,८५९
एकूण महसूल(Total Revenue)२,४९,५७२३,७१,२५६२,९७,६६९
एकूण नफा (कर वगळता)(Profit After Tax)३५७१७२७६४६०८

थोडक्यात महत्वाचे | All Important

अदानी विल्मार आयपीओ३६०० कोटी रुपये
किमान किंमत २१८ रुपये
कमाल किंमत २३० रुपये
लॉट साईझ ६५
एकूण गुंतवणूक १४,१७० रुपये ते १४,९५० रुपये
आईपिओ खुला होणार २७ जानेवारी २०२२
आईपिओ बंद होणार ३१ जानेवारी २०२२
शेअर्स इश्यू होणार ३ फेब्रुवारी २०२२
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार ७ फेब्रुवारी २०२२
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार ८ फेब्रूवारी २०२२

अधिक माहितीसाठी आपण खालील लिन्कवर क्लिक करु शकतात.

अदानी विल्मार

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment