अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi

4/5 - (2 votes)

नमस्कार मित्रांनो!!!

‘पैसा झाला मोठा’च्या नवीन लेखात आपलं स्वागत आहे.

या लेखात आपण अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या शेअर मार्केटमधील महत्वाच्या दोन गोष्टी सविस्तर समजून घेणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

सर्किट लिमिट म्हणजे काय ?

इतिहासात अनेकदा स्टॉक मार्केट कोसळले आहे आणि स्टॉक मार्केटने अनेकदा उसळी देखील घेतली आहे.

मार्केट मधील अशी किंमतींची हालचाल मार्केटसाठी घातक असते म्हणून स्टॉक एक्स्चेंज आणि सेबी मार्केटच्या वर जाण्याला आणि खाली येण्याला एक मर्यादा ठरवून देत असतात.

लिमिट म्हणजे मर्यादा होय.

सर्किट लिमिट म्हणजे कोणत्याही स्टॉकची जास्तीतजास्त वर जाण्याची किंवा खाली येण्याची मर्यादा होय.

सर्किट लिमीटचा नियम प्रत्येक स्टॉक आणि इन्डेक्सला देखील लागू असतो.

म्हणजे स्टॉक आणि इन्डेक्स अचानक किती वर जाऊ शकतो किंवा अचानक किती खाली कोसळू शकतो याच्या मर्यादा ठरलेल्या असतात.

खाली मी झेरोधा प्लॅटफॉर्मवर आपण सर्किट लिमिट कसे बघू शकतो ते दाखवले आहे.

आपण टाटा मोटर्स शेअरचे २ नोव्हेंबर २०२१ रोजीचे सर्किट लिमिट बघू शकतो.

अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper  Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi

डाव्या बाजूला लोअर सर्किट लिमिट तर उजव्या बाजूला अप्पर सर्किट लिमिट दाखवले आहेत.

हे सर्किट लिमिट स्टॉकच्या अगोदरच्या दिवशीच्या क्लोझिंग प्राइसवर अवलंबून असते.

उदा. वरील चित्रात टाटा मोटर्सचे लोअर सर्किट ४३९.१० आणि अप्पर सर्किट ५३६.६० आहे.

या दोन्ही गोष्टी टाटा मोटर्सच्या अगोदरच्या क्लोझ प्राइस = ४८५.७० वरून ठरवल्या गेल्या आहेत.

अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper  Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi

वरील चित्रात स्टॉकची क्लोझिंग प्राइस, अप्पर सर्किट लिमिट, लोअर सर्किट लिमिट आणि शेअरची उपलब्ध करून दिलेली हालचाल दाखवली आहे.

आता आपण दोन्ही सर्किट लिमिट सविस्तरपणे बघणार आहोत.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

अप्पर सर्किट लिमिट म्हणजे काय ?

अप्पर सर्किट लिमिट म्हणजे वरच्या बाजूची सिमा होय.

स्टॉक एक्स्चेंज प्रत्येक शेअरची वर जाण्याची जी कमाल मर्यादा ठरवून देते त्या मर्यादेला अप्पर लिमिट असे म्हणतात.

उदा. अबक कंपनीच्या स्टॉकची किंमत जर १०० रुपये असेल आणि स्टॉकचे अप्पर लिमिट जर ११० रुपये असेल तर अबक स्टॉक ११० रुपया पर्यंतच ट्रेड करू शकतो.

स्टॉक १०० रुपयांच्या लेव्हल पर्यंत वाढल्यास स्टॉकमधील त्या दिवशीचे कामकाज थांबवले जाते.

स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागणे म्हणजे स्टॉकमध्ये फक्त बायर्स असल्याचे समजले जाते.

स्टॉकमध्ये सर्किट लागल्यावर सर्व नवीन ऑर्डर पेंडिंग ठेवल्या जातात.

लोअर सर्किट लिमिट म्हणजे काय ?

लोअर लिमिट म्हणजे खालच्या बाजूची सिमा होय.

स्टॉक एक्स्चेंज प्रत्येक शेअरची खाली जाण्याची जी किमान मर्यादा ठरवून देते त्या मर्यादेला लोअर सर्किट लिमिट असे म्हणतात.

उदा. अबक कंपनीच्या स्टॉकची किंमत जर १०० रुपये असेल आणि स्टॉकचे लोअर लिमिट जर ९० रुपये असेल तर अबक स्टॉक ९० रुपया पर्यंतच खाली घसरू शकतो.

स्टॉक ९० रुपयांच्या लेव्हल पर्यंत घसरल्यास स्टॉकमधील कामकाज थांबवले जाते.

स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागणे म्हणजे स्टॉकमध्ये फक्त सेलर्स असल्याचे समजले जाते.

सर्किट लिमिटचे महत्व आणि उद्देश

सर्किट लिमिटमुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडरचे मार्केटमधील अचानक आलेल्या मोठ्या हालचालींपासून संरक्षण होते.

या लिमिटचा मुख्य फायदा तुमच्या-आमच्या सारख्या रिटेल ट्रेडर्सला होतो.

उदा. समजा आपण एक शेअर १०० रुपयांना इन्ट्राडे ट्रेडींगसाठी घेतला आणि पुढच्या काही क्षणांत तो ५० रुपयांना खाली कोसळला तर ????

अशावेळी आपली गुंतवणूक काही क्षणांत अर्धी होईल.

शेअर मार्केटमध्ये काम करणारे बरेच रिटेल ट्रेडर मार्केटमधील महत्वाच्या घडामोडीपासून अनभिज्ञ असतात आणि त्यामुळेच मार्केटमधील अचानक येणाऱ्या हालचालींचा सर्वात जास्त धोका किरकोळ गुंतवणूकदारांना असतो.

सर्किट लिमिट मुळे मार्केटमधील मोमेन्टम थांबवण्यासाठी मदत होते आणि मार्केटमधील व्होलॅटिलिटी नियंत्रित केली जाते.

सर्किट लिमिटमुळे स्टॉकची एकाच दिशेने होणारी हालचाल नियंत्रित केली जाते.

अनेकवेळा स्टॉकमध्ये ऑपरेटर स्टॉकची किंमत अवाजवी वाढवतात आणि रिटेल ट्रेडर अशा हालचालींना बळी पडतात.

स्टॉकमधील ऑपरेटरचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी सर्किट लिमीटचा उपयोग होतो.

निर्देशांकासाठीचे (निफ्टी आणि सेन्सेक्स )सर्किट लिमिट प्रणाली राबवण्याचे सेबीचे नियम

भारतीय शेअर मार्केटमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन मुख्य निर्देशांक किंवा इंडेक्स आहेत.

या दोन्ही इंडेक्सचे सर्किट लिमिट सेबी ठरवते.

आधी सर्किट लिमिट हे प्रत्येक तिमाहीत ठरवले जात असत मात्र सेबीच्या निर्देशानुसार आता दररोज सर्किट लिमिट ठरवले जातात.

सर्किट लिमिटची हि पद्धत २ जुलै २००१ पासून राबवली जात असून ३ सप्टेंबर, २०१३ साली त्यात अजून काही सुधारणा करण्यात आल्या होत्या.

सर्किट लिमिटच्या या प्रणालीला सर्किट ब्रेकर असे नाव आहे.

सर्किट ब्रेकर प्रणाली निर्देशांक-आधारित असून निर्देशांक हालचालीच्या टप्प्यांवर लागू होते.

उदा. १०%, १५% आणि २०%.

हे सर्किट ब्रेकर्स जेव्हा ट्रिगर होतात तेव्हा देशव्यापी सर्व इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडींग थांबवले जाते.

उदा. समजा सेन्सेक्स ५००० पॉईंट्स वर काल बंद झाला होता आणि आज खुला होताच सेन्सेक्सने ५०० पॉईंटची उसळी घेतली आणि सेन्सेक्स ५५०० ला पोहोचला तर काही काळासाठी मार्केट बंद केले जाते.

सर्किट ब्रेकर्सचा हा नियम बीएसई सेन्सेक्स किंवा निफ्टी ५०, यापैकी कोणत्याही इंडेक्स मध्ये उल्लंघन झाल्यास लगेच लागू होतो.

सर्किट लिमिट सुरवातीला १०% नंतर १५% आणि शेवटी २०% अशा पद्धतीने लावले जाते.

मार्केट किती वेळ बंद ठेवावे याविषयी देखील खालील प्रमाणे नियमावली आखून दिली आहे.

लिमिट वेळ मार्केट स्थगित करण्याचा वेळ प्री-ओपन सेशन
दुपारी १:०० पूर्वी ४५ मिनिटे १५ मिनिटे
१०%दुपारी १:०० ते २:३०१५ मिनिटे १५ मिनिटे
दुपारी २:३० नंतर स्थगित नाही नाही
दुपारी १:०० पूर्वी १ तास ४५ मिनिटे १५ मिनिटे
१५% दुपारी १:०० ते २:०० ४५ मिनिटे १५ मिनिटे
दुपारी २:०० नंतर उर्वरित पूर्ण दिवस नाही
२०%मार्केटच्या वेळेत कधीही उर्वरित पूर्ण दिवस नाही

अधिक माहितीसाठी आपण एनएसइ च्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

या लिन्कवर रोजचे सर्किट लिमिट अपडेट केले जातात.

स्टॉकसाठीचे सर्किट लिमिट प्रणाली राबवण्याचे नियम

स्टॉकसाठी सर्किट लिमिट ठरवण्याची जबाबदारी एकचेन्जवर असते.

स्टॉकमध्ये लोअर सर्किट किंवा अप्पर सर्किट लागलेले असताना आपल्याला ट्रेड करता येत नाही किंबहुना ऑर्डर प्लेस करता येत नाही.

स्टॉक आपल्या ट्रेडींग रेन्जमध्ये आल्यावर आपण ऑर्डर टाकू शकतो.

स्टॉक सर्किटच्या मर्यादा एका दिवसासाठी २%, ५%, १०%, २०% अशाप्रकारे असतात.

सर्किट लिमीटचा नियम स्टॉक एक्स्चेंन्ज मधील सर्व स्टॉकला लागू असतो.

सर्किट लिमिट अगोदरच्या दिवसाच्या क्लोझिंग प्राइसवर अवलंबून असते.

स्टॉकमध्ये कोणत्या लेव्हलचे सर्किट लिमिट लागू शकते हे मार्केट कॅपिटल, लिक्विडीटी, व्हॉल्युम, व्होलॅटिलिटी या गोष्टींवर अवलंबून असते.

मोठा व्हॉल्युम, जास्त मार्केट कॅपिटल, भरपूर लिक्विडीटी असलेल्या स्टॉकमध्ये २०% सर्किट लिमिट असतात.

उदा. निफ्टी अ आणि ब वर्गातील स्टॉक.

मित्रांनो, सर्किट लिमिट फक्त एका दिवसासाठीच नसून, आठवड्यसाठी, महिण्यासाठी आणि वर्षासाठी देखील असतात.

सर्किटची वार्षिक मर्यादा १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर असते, म्हणजे १ ऑक्टोबर रोजी वार्षिक सर्किट लिमिट बदलतात.

जास्त काळासाठीचे सर्किट लिमिट त्या त्या स्टॉकच्या डेली सर्किट लिमिटवर आधारित असते.

२०% सर्किट लिमिट

कालावधी सर्किट लिमिट
साप्ताहिक ६०%
मासिक १००%
तिमाही २००%
वार्षिक ४००%

१०% सर्किट लिमिट

कालावधी सर्किट लिमिट
साप्ताहिक ३०%
मासिक ६०%
तिमाही १००%
वार्षिक २००%

५% सर्किट लिमिट

कालावधी सर्किट लिमिट
विकली२०%
मंथली ३०%
क्वॉटरली ६०%
इअरली १००%

२% सर्किट लिमिट

कालावधी सर्किट लिमिट
विकली १०%
मंथली २०%
क्वॉटरली ३०%
इअरली ५०%

आता आपण हि सर्किटची पद्धत काम कशी करते ते बघूया.

जर एखाद्या कंपनीची सर्किट लिमिट २०% असेल आणि त्या कंपनीच्या स्टॉकला सलग ३ दिवस अप्पर सर्किट लागले तर चौथ्या दिवशी सर्किट लिमिट १०% केले जाते.

म्हणजे आधी जो स्टॉक आपल्या क्लोझिंग प्राइसपासून २०% वर आणि खाली जाऊ शकत होता तो आता १०% पर्यंतच वर-खाली जाऊ शकेल.

त्यानंतर देखील सलग ३ दिवस अप्पर सर्किट लागले तर सर्किट लिमिट ५% केले जाते आणि शेवटी २% होते.

हाच नियम लोअर सर्किट लिमिटसाठी देखील जशास तसा लागू होतो.

सर्किट लिमिट पूर्ववत करण्याचा अधिकार स्टॉक एक्स्चेंज राखून ठेवते आणि स्टॉक मधील व्होलॅटिलिटी कमी झाल्याची खात्री झाल्यावरच स्टॉकचे सर्किट लिमिट वाढवले जाते.

सर्किट लिमिट एकाच दिशेने तीनपेक्षा कमी दिवस लागल्यास मात्र सर्किट लिमिटची सायकल पुन्हा पहिल्या पासून चालू होते म्हणजे सर्किट लिमिट बदलण्यासाठी एकाच दिशेने सलग ३ दिवस सर्किट लिमिट लागणे गरजेचे आहे.

टिप :

  • ज्या दिवशी कंपनीचा आयपीओ बाजारात लिस्ट होतो त्यादिवशी त्या स्टॉकला कोणतेही सर्किट लिमिट नसतात.
  • फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉकसाठी सर्किट लिमिट नसतात.

अशाप्रकारे आपण शेअर मार्केटमधील सर्किट लिमिट विषयी अतिशय खोलवर चर्चा केली.

आपल्या ज्ञानात हा लेख वाचून भर पडली असेल अशी अपेक्षा करतो आणि मी थांबतो.

शेअर मार्केटची अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी पैसा झाला मोठा फेसबुक पेजला लाइक करा, टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा.

आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद !!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment