नमस्कार मित्रांनो,
‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.
स्टार हेल्थ हे नाव आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतांना नक्कीच ऐकलं किंवा वाचलं असेल.
‘स्टार हेल्थ’ हे खाजगी विमा उद्योगातील एक अग्रगण्य नाव आहे.
आज ३० नोव्हेंबर २०२१ रोजी स्टार हेल्थ आयपीओ (७,२४९.१८ कोटी रुपये) शेअर बाजारात दाखल झाला आहे.
स्टार हेल्थ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.
चला तर मग माहिती घेऊया या आयपीओची
स्टार हेल्थ आयपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Star Health IPO Subscription Status
आइपीओ खुला झाल्यानंतर पहिल्या दिवशी ०.२० पट सबस्क्राइब झाला आहे.
सब्सक्रिप्शन स्टेटस | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | ०.०७ पट |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | ०.०२ पट |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | ०.८९ पट |
स्टार हेल्थ आयपीओची एकूण किंमत ७२४९.१८ कोटी रुपये असून ५२४९.१८ कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल) उपलब्ध केले गेले आहेत तर २००० कोटी रुपयांचे शेअर्स हे नव्याने विक्रीस (फ्रेश इश्यू ) उपलब्ध आहेत.
स्टार हेल्थ आयपीओ शेअरची दर्शनी किंमत (फेस प्राइस )हि १० रुपये आहे.
या आयपीओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ८७० रुपये आणि कमाल किंमत ९०० रुपये असणार आहे.
एका लॉटमधील शेअरची संख्या हि १६ असणार आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १६ * ८७० = १३,९२० रुपये ते १६ * ९०० = १४,४०० रुपये इतकी असू शकेल.
रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १३,९२० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,८७,२०० रुपये इतकी असणार आहे.
स्टार हेल्थ आयपीओची तारीख | Star Health IPO Date
स्टार हेल्थ आयपीओ ३० नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख २ डिसेंबर २०२१ असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे
स्टार हेल्थ आयपीओ शेअर्सची अलॉटमेंट ७ डिसेंबर २०२१ रोजी चालू होणार असून ९ डिसेंबर २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर १० डिसेंबर २०२१ ला स्टार हेल्थ बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
स्टार हेल्थ आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Star Health IPO?
सध्या मार्केटमध्ये स्टार हेल्थ आयपीओचे ग्रे मार्केट प्रीमियम जवळपास १० रुपये असल्याचे समजते.
स्टार हेल्थ माहिती | Information of Star Health
प्रमोटर्स :
- सेफ़क्रॉप्स इन्व्हेस्टमेंट्स इंडिया (Safecrop Investments India LLP)
- वेस्टब्रिज (Westbridge AIF)
- राकेश झुनझुनवाला
२००६ मध्ये स्थापन केलेली, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक आहे.
कंपनीचा आर्थिक वर्ष २०२१ मध्ये विमा बाजारातील हिस्सा (Market Share )१५.८% आहे.
स्टार हेल्थ कंपनी प्रामुख्याने वैयक्तिक आरोग्य विमा आणि ग्रुप आरोग्य विमा विभागांवर काम करते.
हि कंपनी मुख्यत्वे वैयक्तिक एजंटद्वारे पॉलिसी वितरीत करते आणि त्यात कॉर्पोरेट एजंट बँका आणि इतर कॉर्पोरेट एजंट देखील समाविष्ट आहेत.
३१ सप्टेंबर २०२१ पर्यंत, कंपनीच्या नेटवर्क मध्ये भारतातील २५ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमधील ७७९ आरोग्य विमा शाखांचा समावेश आहे.
स्टार हेल्थने १२,००० हून अधिक रुग्णालयांसह भागीदारी करत भारतातील सर्वात मोठे आरोग्य विमा नेटवर्क तयार केले आहे.
या कंपनीत प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे १४.८% हिस्सा असल्याचे समजते.
स्टार हेल्थ उजवी बाजू | Positives of Star Health
- किरकोळ आरोग्य विभागातील अग्रगण्य आणि भारतातील सर्वात मोठी खाजगी आरोग्य विमा कंपनी.
- आरोग्य विमा उद्योगातील सर्वात मोठे वितरण नेटवर्क.
- नावीन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण सुविधा.
- चांगला क्लेम सेटलमेंट रेशियो आणि दर्जेदार ग्राहक सेवा.
स्टार हेल्थ कंपनीची आर्थिक माहिती
थोडक्यात महत्वाचे | All Important
स्टार हेल्थ आयपीओ | ७२४९.१८ कोटी रुपये |
किमान किंमत | ८७० रुपये |
कमाल किंमत | ९०० रुपये |
लॉट साईझ | १६ |
एकूण गुंतवणूक | १३,९२० रुपये ते १४,४०० रुपये |
आईपिओ खुला होणार | ३० नोव्हेंबर २०२१ |
आईपिओ बंद होणार | २ डिसेंबर २०२१ |
शेअर्स इश्यू होणार | ७ डिसेंबर २०२१ |
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार | ९ डिसेंबर २०२१ |
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार | १० डिसेंबर २०२१ |
अधिक माहितीसाठी आपण खालील लिन्कवर क्लिक करु शकतात.
अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.
आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!