व्हॉल्युम आणि व्हॉल्युम ॲनालिसिस मराठी | Volume and Volume Analysis in Marathi

4/5 - (6 votes)

मित्रांनो, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत असाल किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

व्हॉल्युमला टेकनिकल अनॅलिसिस मध्ये आणि प्राइस ऍक्शन ट्रेडिंगमध्ये खूप महत्व आहे.

जर तुम्ही शेअर मार्कट टेकनिकल अनॅलिसिस किंवा प्राइस ऍक्शन ट्रेडिंग शिकत असाल तर हा लेख जरूर वाचा.

ट्रेडिंगमध्ये व्हॉल्युम इंडिकेटर अतिशय लोकप्रिय असून आपण या लेखात ‘व्हॉल्युम’ आणि ‘व्हॉल्युम अनॅलिसिस‘ची ओळख करून घेणार आहोत

व्हॉल्युमचा वापर ट्रेडिंग मध्ये करण्यासाठी कॅन्डलस्टिक अनॅलिसिस ची ओळख असणे गरजेचे आहे.

व्हॉल्युम आणि व्हॉल्युम अनॅलिसिसची माहिती घेण्यापूर्वी आपण खालील लेख वाचावे असे मी सुचवू इच्छितो

हे लेख अगोदरच वाचले आहेत आणि तुम्हाला कॅन्डलस्टिकची पुरेशी ओळख आहे. असे असेल तर चला तर मग सुरवात करूया

व्हॉल्युम म्हणजे काय? | What is Volume?

व्हॉल्युम म्हणजे कोणत्याही शेअरमध्ये झालेली देवाण-घेवाण, खरेदी-विक्री होय.

जवळपास सर्वच ब्रोकर्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला व्हॉल्युम चार्ट उपलब्ध असतो खालील चित्रात व्हॉल्युम चार्ट दाखविला आहे.

व्हॉल्युम म्हणजे काय? | What is Volume?
व्हॉल्युम म्हणजे काय? | What is Volume?

व्हॉल्युम इंडिकेटर समजून घेताना एक गोष्ट समजून घेतांना एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे ते म्हणजे व्हॉल्युम म्हणजे खरेदी किंवा विक्री झालेल्या शेअर्सची संख्या होय.

उदा. मी अबक कंपनीचे ५०० शेअर्स विकले आणि तुम्ही ते ५०० शेअर्स खरेदी केले तर अबक कंपनीचा आपल्या व्यवहारातील व्हॉल्युम झाला ५००.

व्हॉल्युमचा अभ्यास का करावा? | Why Study Volume?

मित्रानो, व्हॉल्युमचे टेकनिकल अनॅलिसिस मध्ये खूप जास्त महत्व आहे.

  • कॅन्डलस्टिक चार्टवरून आपल्याला शेअर बाजाराचा ट्रेंड समजतो तर व्हॉल्युमचार्टवरून आपल्याला बाजारातील ट्रेंड किती प्रखर(Strong) आहे ते समजते.
  • शेअर बाजारातील व्हॉल्युम कोणीही लपवू शकत. शेअर बाजाराच्याच भाषेत बोलायचं तर व्हॉल्युम मॅनिप्युलेट करता येणे शक्य नाही.
  • व्हॉल्युम चार्टवरून आपल्याला त्या त्या शेअर्समधील ट्रेडर्सचा इंटरेस्ट समजून घेण्यास मदत होते.
  • व्हॉल्युम चार्टवरून आपल्याला बाजारातील मानसिकतेविषयी (सेंटीमेंट/Sentiment)अंदाज बांधता येतो
  • यावरून आपल्याला असे लक्षात येते कि आपण व्हॉल्युम चार्टवर विश्वास ठेवू शकतो, व्हॉल्युम चार्टवर अवलंबून राहू शकतो आणि व्हॉल्युम चार्टच्या मदतीने आपले निर्णय घेऊ शकतो

व्हॉल्युमचा वापर ट्रेडिंगमध्ये कसा करतात? | How to use Volume in Trading?

व्हॉल्युमचा वापर ट्रेडिंगमध्ये कसा करावा हे समजून घेण्याआधी आपल्याला शेअर बाजारातील ट्रेंड आणि व्हॉल्युम यांचा परस्पर संबंध समजून घेणे गरजेचे आहे.

खालील तक्त्यात व्हॉल्युम आणि ट्रेंड यांचा परस्पर संबंध दाखवला आहे

व्हॉल्युम आणि ट्रेंड | Volume and Trend
व्हॉल्युम आणि ट्रेंड
Volume and Trend

आता आपण हा तक्ता समजून घेऊ

१ल्या ओळीत असे दाखवले आहे कि शेअरची किंमत वाढते आहे आणि शेअरमधील व्हॉल्युम देखील वाढतो आहे.

याचाच अर्थ शेअरच्या वाढलेल्या किमतीवर देखील लोक शेअरमध्ये ट्रेडिंग करत आहेत.

वाढणारी किंमत असे दर्शवते कि स्टॉक बुलिश ट्रेंडमध्ये आहे तर वाढणारा व्हॉल्युम दाखवतो कि ट्रेडर्स स्टॉक मध्ये खरेदी करण्यास उत्सुक आहेत.

यालाच शेअर मार्केटच्या भाषेत व्हॉल्युम सपोर्टेड बाइंग असे म्हणतात म्हणून आपण असे म्हणू शकतो कि स्टॉक हा जास्त बुलिश ट्रेंड मध्ये आहे.

२ऱ्या ओळीत असे दाखवले आहे कि शेअरची किंमत वाढते आहे पण शेअरमधील व्हॉल्युम कमी होतो आहे.

याचाच अर्थ शेअरच्या वाढलेल्या किमतीवर लोक शेअरमध्ये ट्रेडिंग करण्यास उत्सुक नाही.

शेअर मध्ये येणार लो व्हॉल्युम हा रिटेल ट्रेडर्स च्या ट्रेडिंगमुळे येतो आहे आणि स्मार्ट मनी शेअरच्या ट्रेडिंगमध्ये सहभागी नाही.

यावरून आपण असे म्हणू शकतो कि स्टॉक पुरेसा बुलिश नाही किंवा कमी बुलिश आहे.

३ऱ्या ओळीत असे दाखवले आहे कि शेअरची किंमत कमी होते आहे तसेच शेअरमधील व्हॉल्युमसुद्धा कमी होतो आहे.

याचाच अर्थ शेअरच्या कमी होणाऱया किमतीबरोबर लोकांचा शेअरमध्ये ट्रेडिंगचा सहभाग कमी होत आहे.

शेअर मध्ये येणार लो व्हॉल्युम हा रिटेल ट्रेडर्स च्या ट्रेडिंगमुळे येतो आहे आणि स्मार्ट मनी शेअरच्या ट्रेडिंगमध्ये सहभागी नाही.

यावरून आपण म्हणू शकतो कि स्टॉक पुरेसा बियरीश नाही किंवा बियरीश ट्रेंड अजून सुरु झालेला नाही

४थ्या ओळीत असे दाखवले आहे कि शेअरची किंमत कमी होते आहे आणि शेअरमधील व्हॉल्युम वाढतो आहे.

याचाच अर्थ शेअरच्या कमी होणाऱया किमतीबरोबर लोकांचा शेअरमध्ये ट्रेडिंगचा सहभाग देखील वाढतो आहे

शेअर मध्ये येणार हाई व्हॉल्युम हा मोठे ट्रेडर्स च्या ट्रेडिंगमुळे येतो आणि स्मार्ट मनी शेअरच्या ट्रेडिंगमध्ये सहभागी असल्याचे आपण म्हणू शकतो.

आता आपण असे म्हणू शकतो कि स्टॉक हा जास्त बियरीश ट्रेंड मध्ये आहे

ट्रेडिंगमधील व्हॉल्युमचे महत्व | Importance of Volume in Trading

अबक कंपनीच्या शेअरमधील जास्तीचा व्हॉल्युम असे दाखवतो कि लोक अबक कंपनीच्या शेअरमध्ये ट्रेड करण्यासाठी उत्सुक आहेत.

याशिवाय व्हॉल्युम चार्टवर तयार होणारे मोठे व्हॉल्युम बार मोठे इन्व्हेस्टर्स कम्पनीच्या शेअरमध्ये होणाऱया ट्रेडिंगमध्ये सहभागी असल्याचे दाखवतात. यालाच शेअर मार्केटच्या भाषेत स्मार्ट मनी असे म्हणतात

मित्रांनो, जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही भरपूर ट्रेडिंग व्हॉल्युम असणाऱ्या स्टॉकमध्ये काम करण्याचा मी आपल्याला सल्ला देईल.

लिक्विडीटी म्हणजे काय? What is Liquidity?

ट्रेडिंगसाठी शेअर्स मध्ये मुबलक व्हॉल्युम असणे गरजेचे आहे शेअर मार्केटच्या भाषेत यालाच आपण लिक्विडीटी असे म्हणतो.

जर आपण एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असू तर त्यात लिक्विडीटी असणे खूप गरजेचे आहे.

स्टॉकमध्ये जर पुरेशी लिक्विडीटी नसेल तर आपल्या बाइंग आणि सेलिंग ऑर्डर्स पूर्ण कशा होणार? म्हणून स्टॉकमध्ये अधिक व्हॉल्युम असण्याचे वेगेळे महत्व आहे

व्हॉल्युम बारचा रंग काय सांगतो? | How to Interpret Color of Volume Bar?

व्हॉल्युम इंडिकेटर मध्ये रंगाला खूप जास्त महत्व नाही तरी आपण व्हॉल्युम बारचे रंग कसे तयार होतात ते माहिती करून घेऊ.

व्हॉल्युम बारचा रंग | Color of Volume Bar
व्हॉल्युम बारचा रंग

काही चार्टवर व्हॉल्युम बारचा रंग एकच असतो तर काही चार्टवर आपण लाल आणि हिरव्या अशा रंगाचे व्हॉल्युम बार बघितले असतील.

मित्रांनो, जर तुम्ही कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हॉल्युम चार्ट वापरत असाल तर व्हॉल्युम बारचा रंग २ प्रकारे दाखवला जातो.


काही ब्रोकर्सच्या प्लॅटफॉर्मवर कॅण्डल्सचा जो रंग असतो तोच रंग व्हॉल्युम बारचा देखील असतो तर काही प्लॅटफॉर्मवर कॅन्डलच्या क्लोझिंग प्रमाणे व्हॉल्युम बारचा रंग दाखवला जातो.

कॅन्डलची क्लोझिंग अगोदरच्या कॅन्डलपेक्षा खालच्या किमतीवर झाली असेल तर लाल रंगाचा व्हॉल्युम बार तर कॅन्डलची क्लोझिंग अगोदरच्या कॅन्डलपेक्षा वरच्या किमतीवर झाली असेल तर हिरवा व्हॉल्युम बार तयार होतो.

व्हॉल्युम बारचे प्रकार | Types of Volume Bar

व्हॉल्युम बारचे प्रकार | Types of Volume Bar
व्हॉल्युम बारचे प्रकार | Types of Volume Bar

स्टॉक मधील व्हॉल्युम कमी कि जास्त हे ठरवण्यासाठी व्हॉल्युम चार्टवर आपल्याला ऍव्हरेज इंडिकेटर प्लॉट करता येतो.

ऍव्हरेज लाइनपेक्षा व्हॉल्युम बार उंच असल्यास व्हॉल्युम जास्त समजावा तर व्हॉल्युम ऍव्हरेज लाइनपेक्षा कमी असल्यास कमी समजावा.

ऍव्हरेज लाइन साठीची संख्या प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार ठेवत असतो पण १००ची ऍव्हरेज लाइन मला योग्य वाटते

तुम्हाला काय वाटते ते कंमेन्ट बॉक्समध्ये जरूर कळवा

या लेखात आपण व्हॉल्युमची ओळख करून घेतली, व्हॉल्युम म्हणजे नेमकं काय आणि व्हॉल्युमचे ट्रेडिंगमध्ये असणारे महत्व समजून घेतले,व्हॉल्युमचा वापर ट्रेडिंगमध्ये कसा करतात ते बघितले.

टेकनिकल ऍनालिसिसची अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा च्या लिंक ला बुकमार्क करायला विसरू नका

धन्यवाद !!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment