फ्लॅग चार्ट पॅटर्न मराठी । Flag Chart Pattern in Marathi

4.3/5 - (3 votes)

मित्रांनो, या लेखात आपण काही अतिशय लोकप्रिय चार्ट पॅटर्नची माहिती बघणार आहोत आणि त्या चार्ट पॅटर्नची नावे आहे बुलिश फ्लॅग पॅटर्न आणि बेअरिश फ्लॅग पॅटर्न.

हे दोन्ही पॅटर्न हे ट्रेंड कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न असून, आपल्याला पुलबॅक ट्रेडिंग करताना स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्यासाठी खूप उपयोगी आहेत.

ट्रेण्ड कॉन्टीनुएशन म्हणजे पूर्वीचाच ट्रेण्ड तसाच पुढे चालू राहणे होय.

कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्नच्या मदतीने आपण एखाद्या ट्रेंडींग स्टॉकमध्ये पुलबॅक होताच एन्ट्री घ्यायची असते.

चार्ट पॅटर्न वापरून ट्रेडींग करणे हि एक यशस्वी आणि लोकप्रिय पद्धत असल्याने आज आपण आपल्या भात्यात आणखी एक तीर वाढवणार असल्याचे आपण समजू शकतात.

चला तर मग सुरुवात करूया.

फ्लॅग पॅटर्न म्हणजे काय ?

फ्लॅग म्हणजे झेंडा होय.

हा चार्ट पॅटर्न एखाद्या झेंड्याप्रमाणे दिसत असल्याने या पॅटर्नला त्याच्या झेंड्यासारख्या दिसण्यामुळे फ्लॅग पॅटर्न असे नाव दिले गेले आहे.

Flag

फ्लॅग पॅटर्नचे ट्रेण्डनुसार बुलिश फ्लॅग पॅटर्न आणि बेअरिश फ्लॅग पॅटर्न असे २ प्रकार पडतात.

सुरुवात आपण बुलिश फ्लॅग पॅटर्न पासून करणार आहोत.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

बुलिश फ्लॅग पॅटर्न

खालील चित्रात मी बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्न दाखवला आहे.

Bullish Flag Chart Pattern min

आपल्या लक्षात आलंच असेल कि हा पॅटर्न अगदी झेंड्याप्रमाणे दिसतो.

चित्रात आपण बघू शकतो कि पॅटर्नमध्ये अगोदरचा ट्रेण्ड हा अपट्रेन्ड आहे.

मित्रांनो, अगोदरचा ट्रेण्ड हा फक्त अपट्रेन्ड असून चालणार नाही तर त्याची तिव्रता देखील खूप जास्त असली पाहिजे ज्याला आपण शेअर मार्केटच्या भाषेत स्ट्रॉंग अपट्रेन्ड असे म्हणतो.

एका मोठ्या मूव्ह नंतर स्टॉक मध्ये काही काळ किमतीची हालचाल खूप कमी झाली आहे यालाच आपण कन्सॉलिडेशन असे सुद्धा म्हणतो.

अनेक लोक याला साइडवेझ मार्केट किंवा रेन्ज बाउन्ड मार्केट असे देखील म्हणतात.

फ्लॅग पॅटर्न तयार झाल्यावर आपल्याला ब्रेकआऊटची वाट बघायची आहे आणि ब्रेकआऊट होताच ट्रेडमध्ये एन्ट्री घ्यायची आहे.

फ्लॅग पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमधील अपट्रेन्ड पूर्ववत होणे अपेक्षित असून कन्फर्मेशन नंतर आपण अगोदरच्या ट्रेण्ड अनुसार स्टॉकमध्ये एन्ट्री घ्यायची असते.

फ्लॅग पॅटर्न अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हॉल्युम बारची मदत घेणार आहोत तसेच आपण या पॅटर्नच्या मदतीने ट्रेड कसे करतात हे आपण प्रत्यक्ष चार्टवरच बघणार आहोत.

बुलिश फ्लॅग पॅटर्न आणि व्हॉल्युम

या पॅटर्नमध्ये व्हॉल्युमचे देखील खूप जास्त महत्व आहे तेव्हा आपण आता व्हॉल्युम आणि फ्लॅग पॅटर्न यांच्यातील परस्पर संबंध समजून घेऊ.

ट्रेण्ड मजबूत आहे कि कमजोर याचा अंदाज बांधण्यासाठी आपल्याला व्हॉल्युमची मदत होत असते.

फ्लॅग पॅटर्नमध्ये अगोदरच्या ट्रेण्डचा म्हणजेच इथे अपट्रेन्डचा व्हॉल्युम हा सरासरीपेक्षा जास्त असतो म्हणजेच किंमत वाढत असतांना व्हॉल्युम देखील वाढत असतो.

यालाच शेअर मार्केटच्या भाषेत व्हॉल्युम सपोर्टेड बायिंग असे म्हणतात.

याउलट जेव्हा फ्लॅग तयार होत असतो त्यावेळी स्टॉकची किंमत स्थिर होते किंवा काही प्रमाणात कमी होते आणि व्हॉल्युम मात्र पोलच्या व्हॉल्युमच्या तुलनेत कमी होतो.

फ्लॅग तयार होत असताना कमी होणारा व्हॉल्युम हा मार्केटमध्ये बेअर्स अजूनही सामील न झाल्याचे दर्शवितो, काही लोक यालाच बुल्सची प्रॉफिट बुकींग देखील म्हणतात.

या सर्व गोष्टी आता आपण चार्टवर समजून घेऊ.

खाली आपल्यासोबत भारतीएअरटेल कंपनीचा डेली चार्ट आहे

Bullish flag pattern on chart min

चार्टवर तीन हिरव्या कॅण्डल तयार झाल्या आहेत आणि तीनही कॅन्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा जास्त आणि वाढता आहे.

यानंतर स्टॉकमध्ये चार लाल कॅन्डलच्या स्वरूपात पुलबॅक आला आहे आणि या पुलबॅकलाच आपण फ्लॅग समजू शकतो.

सोयीसाठी मी ट्रेण्डलाइन दाखवल्या आहेत जेणेकरून पॅटर्न ओळखण्यास आपल्याला मदत होईल.

जेव्हा फ्लॅग तयार झाला तेव्हाचा व्हॉल्युम तुलनेने कमी असल्याचे बघताक्षणी आपल्या लक्षात येईल.

अशाप्रकारे फ्लॅग पॅटर्न आपण समजून घेतला आता आपण फ्लॅग पॅटर्नचा वापर करून ट्रेडींग कसे करावे ते बघूया.

बुलिश फ्लॅग पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा ?

वरच्या ट्रेण्डलाइनला आपण रेझिस्टन्स म्हणूया आणि खालच्या ट्रेण्डलाइनला आपण सपोर्ट म्हणूया.

आता आपल्याला रेझिस्टन्स ब्रेक होईपर्यंत वाट बघायची आहे आणि रेझिस्टन्स ब्रेक होताच लॉन्ग साइड एन्ट्री घ्यायची आहे.

वरील चार्टवर मी ब्रेकआऊट दाखवले आहे, म्हणजेच एक लॉन्ग हिरवी कॅण्डल रेझिस्टन्स लेव्हलच्या वर जाऊन क्लोझ झाली आहे.

याशिवाय ब्रेकआऊट कॅन्डलचा व्हॉल्युम, सरासरीपेक्षा जास्त आहे.

आपल्याला ब्रेकआऊट होताच स्टॉकमध्ये एन्ट्री घ्यायची आहे आणि ब्रेकआऊट कॅन्डलच्या लो प्राइसचा स्टॉप लॉस लावायचा आहे.

आपल्याला अधिक सुरक्षित स्टॉप लॉस हवा असल्यास किंवा पोझिशनल एन्ट्री घ्यायची असल्यास आपण शेवटच्या स्विंग लो चा स्टॉप लॉस ठेवू शकतो.

चार्टवर मी हिरव्या रंगाने एन्ट्री लेव्हल आणि लाल रंगाने स्टॉप लॉस लेव्हल दाखवल्या आहेत.

आता आपण या पॅटर्नची दुसरी बाजू बेअरिश फ्लॅग पॅटर्न बघणार आहोत.

बेअरिश फ्लॅग पॅटर्न

खालील चित्रात मी बेअरिश फ्लॅग पॅटर्न दाखवला आहे.

Bearish Flag Chart Pattern min

जे नियम बुलिश फ्लॅग पॅटर्न ला लागू होतात तेच सर्व नियम बेअरिश फ्लॅग चार्ट पॅटर्नला लागू होतात.

आपण बघू शकतो कि स्टॉक मध्ये एक मजबूत डाउनट्रेंन्ड सुरु आहे.

काही काळानंतर स्टॉकमधील पडझड थांबली आहे आणि स्टॉकची किंमत थोडी सावरल्यासारखी दिसते आहे.

रेषांची मदतीने मी चार्टवर तयार झालेला बेअरिश फ्लॅग चार्ट पॅटर्न दाखवला आहे.

चार्टवर मी पॅटर्नचे सर्व महत्वाचे भाग दाखवले आहेत.

बेअरिश फ्लॅग पॅटर्न आणि व्हॉल्युम

आता आपण व्हॉल्युमचे निरीक्षण करूया.

चार्टवर आपण बघू शकतो पोल तयार झालेल्या भागात व्हॉल्युम सरासरीपेक्षा जास्त आहे तर फ्लॅगच्या भागातील व्हॉल्युम सरासरीपेक्षा कमी झाला आहे.

मित्रांनो, व्हॉल्युमच्या निरीक्षणातून आपल्याला पॅटर्न ओळखण्यास आणि ट्रेड करण्यास खूप जास्त मदत होईल तेव्हा व्हॉल्युमकडे जरूर लक्ष द्या.

खाली चार्टवर आपल्यासोबत बंधन बँकेचा १५ मी. चा कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हॉल्युम बार आहेत.

Bearish Flag on Chart min

बेअरिश फ्लॅग पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा ?

ट्रेडींगसाठी बेअरिश फ्लॅग चार्ट पॅटर्नचा वापर करण्यासाठी आपल्याला ब्रेकडाउन होण्याची वाट बघायची आहे.

स्टॉकमध्ये फ्लॅग तयार करण्यासाठी आपण कॅन्डलचे लोझ आणि हाइझ एका सरळ रेषेत जोडायचे आहेत.

अशाप्रकारे आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स तयार करणार आहोत.

आता अगोदरचा ट्रेण्ड हा डाउनट्रेण्ड आहे आणि प्राइस जेव्हा वर जाण्याचा प्रयत्न करते आहे तेव्हा व्हॉल्युम कमी होतो आहे.

असे सर्व बघता आपल्याला शॉर्ट साइड ट्रेड घ्यायचा आहे हे नक्की होते आहे आणि सपोर्ट ब्रेक होताच आपल्याला शॉर्ट करायचा आहे आणि ब्रेकडाउन केलेल्या कॅन्डलच्या हाय प्राइस लेव्हलचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे.

ब्रेकडाउन होत असतांना आपल्याला ब्रेकडाउन झालेल्या कॅन्डलचा व्हॉल्युम देखील लक्षात घ्यायचा आहे.

जर ब्रेकडाउन कॅन्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा जास्त असेल तर आपला ट्रेड यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.

आपल्याला जेव्हा जास्त मोठ्या काळासाठी ट्रेड घ्यायचा आहे तेव्हा स्टॉकमधील व्होलॅटिलिटीपासून स्टॉप लॉस सुरक्षित असणे गरजेचे आहे तेव्हा ट्रेडर्स शेवटच्या स्विंग हाय पॉइण्टचा स्टॉप लॉस ठेवणे पसंत करतात.

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण फ्लॅग चार्ट पॅटर्न समजावून घेतला.

आपल्याला याविषयी अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही सूचना करायची असल्यास आपण जरूर कमेंट करा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment