शॉर्ट कॅण्डल ॲनालिसिस मराठी | Short Candle Analysis in Marathi

5/5 - (2 votes)

मागील लेखात आपण लॉन्ग कॅण्डल म्हणजे काय ते बघितले. लॉन्ग कॅण्डल म्हणजे ज्या कॅन्डलची रियल बॉडी हि कॅन्डलच्या शॅडोपेक्षा भरपूर मोठी असते.

लॉन्ग कॅण्डलविषयी सविस्तर माहितीसाठी खालील लेख वाचा.

हे झालं बॉडी मोठी असेल तर पण बॉडी शॅडोपेक्षा खूप जास्त लहान असेल तर ?

शॅडोपेक्षा रियल बॉडी लहान असणाऱ्या कॅण्डलला शॉर्ट कॅण्डल असे म्हणतात. अनेक जण शॉर्ट कॅण्डलला स्पिनिंग टॉप असेही म्हणतात.

या लेखात आपण विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.

हा लेख वाचल्या नंतर आपल्याला शॉर्ट कॅण्डल म्हणजे काय? शॉर्ट कॅण्डल कशी तयार होते? शॉर्ट कॅण्डल का तयार होते? शॉर्ट कॅण्डल कशी मार्क करायची आणि शॉर्ट कॅण्डलचा वापर ट्रेडींगसाठी कसा करायचा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तेव्हा हा लेख जरूर वाचा.

चला तर मग सुरुवात करूया.

शॉर्ट कॅण्डल म्हणजे काय? । What is Short Candle ?

ज्या कॅन्डलच्या टेल आणि विक बॉडीच्या तुलनेने खूप जास्त मोठ्या असतात अशा कॅण्डलला आपण शॉर्ट कॅण्डल असे म्हणतो.

खालील चित्रात मी शॉर्ट कॅण्डल दाखवली आहे.

शॉर्ट कॅण्डल | Short Candle | Spinning Top

शॉर्ट कॅण्डल ॲनालिसिसमध्ये कॅन्डलच्या रंगाला फारसे महत्व नाही म्हणून मी चित्रात कॅन्डलचा रंग दाखवलेला नाही.

Short Candle price action min

वरील चित्रात मी शॉर्ट कॅण्डल आणि प्राइस ॲक्शन दाखवले आहे.

चित्रात आपण बघू शकतो कि स्टॉकची प्राइस ओपन झाली आहे नंतर स्टॉकने आपल्या हाय प्राइस लेव्हल आणि लो प्राइस लेव्हल पर्यंत गेला आहे आणि स्टॉकची प्राइस क्लोझ होतांना स्टॉकच्या ओपन प्राइस जवळच येऊन क्लोझ झाली आहे.

मित्रांनो शॉर्ट कॅण्डल म्हणजे बुल्स आणि बेअर्स यांची रस्सीखेच होय.

चार्टवर शॉर्ट कॅण्डल तयार झाल्यास त्याचे अनेक अर्थ होतात जसे कि स्टॉक मधील सध्याचा ट्रेण्ड काही काळ थंडावला आहे, स्टॉक मधील मोमेन्टम कमी झाला आहे, स्टॉक मध्ये व्होलॅटिलिटी कॉम्प्रेशन होत आहे, स्टॉक कोणत्या दिशेला जाईल याबाबत अनिश्चितता आहे.

चार्टवर तयार होणारी शॉर्ट कॅण्डल म्हणजे स्टॉकमध्ये बुल्स आणि बेअर्स कोणीही प्रभावी नाही.

शॉर्ट कॅन्डलची मोठी वीक दर्शविते कि बुल्स स्टॉकची किंमत वर ढकलण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत तर बेअर्स स्टॉकची किंमत खाली खेचण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.

अशाप्रकारे बुल्स आणि बेअर्सच्या या युद्धात अजून पर्यंत कोणीही वरचढ ठरलेले नाही.

मला अशा आहे कि शॉर्ट कॅन्डलची संकल्पना आपल्याला समजावून सांगण्यात काही प्रमाणात मी यशस्वी झालो असेल.

आपण जसे हा लेख पुढे वाचत जाल तसतसे गोष्टी अधिक स्पष्ट होत जातील.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

शॉर्ट कॅण्डल आणि व्हॉल्युम

मित्रांनो, ॲनालिसिस करताना चार्टवर आपल्याला अनेक शॉर्ट कॅण्डल दिसून येतील पण ज्या शॉर्ट कॅन्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा किंवा मागील ५-६ सेशनपेक्षा जास्त असेल अशी शॉर्ट कॅन्डल आपल्याला चार्टवर मार्क करायची आहे.

शॉर्ट कॅण्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा जास्त असल्यास त्याचा अर्थ असा होतो कि स्टॉक मधील ट्रेडर्सचा इंटरेस्ट वाढतो आहे आणि स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर व्होलॅटिलिटी कॉम्प्रेशन होते आहे.

वाढलेला व्हॉल्युम बुल्स आणि बेअर्सची स्टॉकची किंमत वर-खाली ढकलण्यासाठी चाललेला अथक प्रयास दाखवतात.

कॅण्डल स्प्रिएड आणि व्हॉल्युम यांच्या आपापसातील हालचालीवरून आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो.

कॅण्डल स्प्रिएड आणि व्हॉल्युमच्या अभ्यासाला व्हॉल्युम स्प्रिएड ॲनालिसिस म्हणतात.

मित्रांनो, चार्टवर तयार होणाऱ्या शॉर्ट कॅण्डल म्हणजे व्हॉल्युम ॲनालिसिसमधील ॲक्क्युम्युलेशन आणि डिस्ट्रिब्युशन या गोष्टींचे उत्तम उदाहरण होय.

आपण व्हॉल्युम ॲनालिसिस मध्ये या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करणारच आहोत तेव्हा या गोष्टींची उजळणी होईलच.

सध्या आपण ज्या चार्टवर शॉर्ट कॅन्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा जास्त आहे अशा कॅण्डलला मार्क करायचं आहे.

चार्टवर शॉर्ट कॅण्डल तयार झाल्यावर ट्रेंड कन्टीन्यु होणार कि रिव्हर्स होणार आणि शॉर्ट कॅण्डलचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा हे आता आपण बघूया.

शॉर्ट कॅण्डल मार्क कशा कराव्या?

१. शॉर्ट कॅण्डल बघताक्षणी मार्क करता येण्याजोगी असावी.
२. कॅन्डलच्या शॅडो कॅन्डलच्या रियल बॉडीपेक्षा पुष्कळ मोठ्या असाव्या.
३. मार्क केलेल्या शॉर्ट कॅण्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा जास्त असावा.
४. शॉर्ट कॅण्डल पॅटर्नमध्ये कॅण्डलच्या रंगाला फारसे महत्व नसल्याने शॉर्ट कॅण्डल कोणत्याही रंगाची असली तरी चालेल.
५. शॉर्ट कॅण्डल पूर्वीच्या सपोर्ट किंवा रेझिस्टन्स जवळ तयार झाल्यास ट्रेण्ड रिव्हर्स होण्याची शक्यता अधिक वाढते.
६. शॉर्ट कॅण्डल मार्क करतांना कॅन्डलच्या वीक आणि टेल एकाच लांबीच्या असण्याची गरज नाही.

शॉर्ट कॅण्डल आणि बुलिश रिव्हर्सल

खाली आपल्या सोबत हिंदुस्थान युनिव्हर्सल कंपनीचा डेली चार्ट आहे.

Bullish Spinning Top min 1

चार्टवर आपण बघू शकतो कि २०-२५ सेशन पासून हिंदुस्थान युनिव्हर्सल कंपनीचा स्टॉक डाउनट्रेन्डमध्ये आहे.

डाउनट्रेन्डमध्ये शॉर्ट कॅण्डल तयार झाली आहे आणि शॉर्ट कॅण्डलचा व्हॉल्युम देखील सरासरीपेक्षा जास्त आहे.

चार्टवर तयार होणारी शॉर्ट कॅण्डल आपल्याला बेअर्सचं वर्चस्व आता संपत असल्याचे सुचवते आहे.

स्टॉकमधील व्हॉल्युम वाढतो आहे पण किंमत मात्र त्या प्रमाणात कमी होतांना दिसत नाही.

स्टॉक मधील बुलिश लॉन्ग कॅन्डलने ट्रेण्ड रिव्हर्सल कन्फर्म केले आहे आणि शॉर्ट कॅण्डलची हाय प्राइस लेव्हल देखील ब्रेक केली आहे.

स्टॉकमध्ये तेव्हापासून अपट्रेन्ड सुरु झाला आहे आणि पुढचे बरेच दिवस अपट्रेन्ड कायम आहे.

अशा प्रकारे शॉर्ट कॅण्डल डाउनट्रेन्डमध्ये बुलिश रिव्हर्सल सिग्नल असू शकतो.

असे असले तरी चार्टवर शॉर्ट कॅण्डल तयार झाली म्हणजे ट्रेण्ड रिव्हर्स होईलच असे नाही तेव्हा आपण ट्रेण्ड रिव्हर्सल कन्फर्म झाल्यानंतरच स्टॉकमध्ये एन्ट्री घ्यावी असे मी सुचवतो.

शॉर्ट कॅण्डल आणि बेअरिश रिव्हर्सल

खाली आपल्या सोबत युपीएल कंपनीचा डेली चार्ट आहे.

Bearish Spinning Candle min 1

चार्टवर आपल्याला दोन वेळा शॉर्ट कॅण्डल किंवा स्पिनिंग टॉप तयार होऊन ट्रेण्ड रिव्हर्स झाल्याचे लक्षात येते.

चार्टवर मी शॉर्ट कॅन्डलच्या मदतीने सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल मार्क केल्या आहेत.

लाल रंगाने रेझिस्टन्स लेव्हल मार्क केली असून हिरव्या रंगाने सपोर्ट लेव्हल मार्क केली आहे.

मित्रांनो, आपल्याला लेव्हल मार्क केल्यानंतर सपोर्ट लेव्हल किंवा रेझिस्टन्स लेव्हल ब्रेक होईपर्यंत वाट बघायची आहे.

सपोर्ट लेव्हल ब्रेक झाल्यास आपल्याला सेल साइड एन्ट्री घ्यायची आहे तर रेझिस्टन्स लेव्हल ब्रेक झाल्यास आपल्याला बाय साइड एन्ट्री घ्यायची आहे.

म्हणजेच शॉर्ट कॅण्डल तयार झाल्यानंतर ट्रेण्ड पूर्ववत चालू राहण्याची शक्यता देखील असते हे मी अधोरेखित करू इच्छितो.

एका चांगल्या ट्रेण्डमध्ये तयार होणारी शॉर्ट कॅण्डल म्हणजे ट्रेण्डमध्ये एन्ट्री करण्याची उत्तम संधी असू शकते.

चार्टवर शॉर्ट कॅण्डल तयार झाल्यावर आपण कॅण्डलच्या हाय प्राइस लेव्हल आणि लो प्राइस लेव्हल मार्क करायच्या आहे.

यानंतर आपण कन्फर्मेशनसाठी पुढच्या एक किंवा दोन कॅण्डल तयार होण्याची वाट बघायची आहे आणि कन्फर्मेशन भेटल्यानंतर ट्रेड घ्यायचा आहे.

खाली दिलेल्या चार्टवरून या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल.

Short Candle 2 min

चार्टवर आपण बघू शकतो कि चार्टवर शॉर्ट कॅण्डल तयार झाल्यानंतर सुद्धा स्टॉक मधील ट्रेण्ड तसाच चालू राहिला आहे.

यावरून आपल्या असे लक्षात येते कि शॉर्ट कॅण्डल तयार झाल्यानंतर आपण कन्फर्मेशनसाठी वाट बघणे गरजेचे आहे.

आता आपण शॉर्ट कॅण्डल आणि डोजी कॅण्डल मधील फरक बघणार आहोत.

डोजी कॅन्डलची ओपन प्राइस आणि क्लोझ प्राइस एकच असते म्हणजेच ओपन प्राइस आणि क्लोझ प्राइस यातील फरक शून्य असतो तर शॉर्ट कॅण्डलमध्ये ओपन प्राइस आणि क्लोझ प्राइस यातील फरक शून्य नसतो.

मी डोजी कॅन्डलविषयीची माहिती दुसऱ्या लेखात आपल्याला सांगणार आहे.

अशाच उपयुक्त माहितीसाठी पैसा झाला मोठा च्या लिंकला बुकमार्क करायला विसरू नका.

मित्रांनो, अशाप्रकारे आपण या लेखात शॉर्ट कॅन्डलची सविस्तर माहिती बघितली, शॉर्ट कॅन्डलचा वापर आपण कसा करू शकतो हे देखील बघितले.

आपल्याला शॉर्ट कॅन्डल विषयी काहीही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

मला आशा आहे कि या लेखातून आपल्याला नक्की उपयुक्त माहिती मिळाली असेल.

आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment