टेक्निकल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिसचे [३] आधार मराठीत । Technical Analysis in Marathi and [3] Principles of Technical Analysis of Stocks

4.4/5 - (11 votes)

नमस्कार मित्रांनो,

पैसे झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे.

शेअर मार्केट मध्ये कोणत्याही शेअर मध्येन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडींग करण्यापुर्वी त्या शेअरचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.

शेअर बाजारात माहितीशिवाय गुंतवणुक केल्यास आपल्याला खुप मोठे नुकसान होऊ शकते.

शेअर बाजार हा जुगार नसून पैशापासुन पैसे कमावण्याचा एक व्यवसाय आहे.

शेअर मार्केट मध्ये कोणत्याही कंपनीच्या शेअर्सचा अभ्यास करण्याच्या मुख्य २ पध्दती आहेत.
१. फंडामेंटल ॲनालिसिस
२. टेक्निकल ॲनालिसिस

या लेखात आपण टेक्निकल ॲनालिसिस या पध्दतीची सविस्तर माहिती बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

अनुक्रमणिका hide

टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय? | What is Technical Analysis?

टेक्निकल ॲनालिसिसमध्ये शेअर्सच्या किंमतीचा आणि किमतीत होणाऱ्या चढ-उतारांचा (प्राईस ॲक्शन/Price Action), शेअर्समध्ये होणाऱ्या खरेदी-विक्रीच्या प्रमाणाचा (व्हॉल्युम/volume ) संख्यात्मक तुलनात्मक अभ्यास केला जातो.

संख्यात्मक म्हणजे उपलब्ध आकडेवारीचा अभ्यास तर तुलनात्मक म्हणजे आज घडलेल्या घडामोडींचा संबंध आणि यापूर्वी घडलेल्या घडामोडींच्या उपलब्ध नोंदी यांचा अभ्यास करणे होय.

या अभ्यासाच्या आधारावर शेअर्सच्या किमतींविषयी अंदाज बांधला जातो आणि शेअर्सची खरेदी अथवा विक्री केली जाते.

भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा अभ्यास आणि निरीक्षण करुन नजीकच्या काळातील घटनांविषयी अंदाज वर्तविता येतो आणि यालाच आपण शेअर बाजाराच्या भाषेत टेक्निकल ॲनालिसिस म्हणू शकतो.

किमतींचा आणि उपलब्ध माहितीचा अभ्यास करण्यासाठी आपण चार्ट्सचा वापर करतो तेव्हा टेक्निकल ॲनालिसिस समजून सांगण्यासाठी मी पुढे चार्टचा वापर केला असून इतर लेखात आपल्याला चार्ट्स विषयी अगदी सविस्तर माहिती मिळू शकेल.

चला तर मग आपण या टेक्निकल ॲनालिसिस विषयीची काही रहस्ये उलगडूया आणि हे टेक्निकल ॲनालिसिस कसे काम करते ते बघुया.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

टेक्निकल ॲनालिसिसचा आधार काय आहे? | What are the Principles of Technical Analysis?

१. इतिहासाची पुनरावृत्ती

इतिहास पुन्हा पुन्हा घडत असतो हे आपण अनेकदा ऐकतो आणि अनुभवतो.

इतिहासाची पुनरावृत्ती हा टेक्निकल ॲनालिसिसचा पाया आहे.

खरंतर टेक्निकल ॲनालिसिसचा हा आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे.

आपण सर्व कॉलेजला असताना परीक्षेच्या काही दिवस आधी जुन्या प्रश्नपत्रिका पाहून ज्याप्रमाणे काही महत्वाचे प्रश्न अगदी पाठ करून ठेवत असायचो कारण आपला अंदाज असायचा कि ज्याअर्थी हे प्रश्न मागील वर्षात वारंवार विचारले आहेत त्याअर्थी ते येणाऱ्या परीक्षेत देखील विचारले जातीलच.

अनेकदा आपला अंदाज खरा ठरतो आणि आपण अगदी सहज परीक्षा पास होतो.

भारताचा क्रिकेट सामना असताना सामन्यापुर्वी अनेकदा त्या मैदानावरील उभय संघातील मागील सामन्यांच्या नोंदी दाखवतात.

उभय संघातील जो संघ इतिहासात त्या मैदानावर अधिक सामने जिंकला असेल तोच संघ या सामन्यात देखील सरस ठरेल असे भाकीत वर्तविले जात असते.

मित्रांनो अशाच प्रकारे आपण शेअर मार्केट मध्ये टेक्निकल ॲनालिसिस करायचे असते.

आपल्याला शेअरच्या किमतीच्या होणाऱ्या हालचालींचा अभ्यास करायचा आहे आणि ट्रेडींग करायचं आहे.

टेक्निकल ॲनालिसिस । Technical Analysis
इतिहासाची पुनरावृत्ती
(Technical Analysis History Repeats)

आपल्या सोबत इथे टाटा मोटर्स या कंपनीचा डेली चार्ट आहे यात आपण बघू शकतो शेअरची किंमत घसरल्यानंतर एका विशिष्ट (२८५ ) किमतीपासून पुन्हा सावरायला सुरवात होते आहे.

ज्या लेव्हलपासून शेअरची किंमत वाढायला सुरुवात होते किंवा घसरायची थांबते त्या लेव्हलला शेअर बाजाराच्या भाषेत सपोर्ट असे म्हणतात.

अशाप्रकारे आपण बघू शकतो कि चार्ट्सच्या निरीक्षणातून आपण शेअरच्या किमतीतील हालचालींविषयी भाकीत करू शकतो.

वरील उदाहरणांवरून आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसची ओळख होण्यास मदत झाली असेल अशी मी आशा करतो

२. शेअर्सची किंमत हि कंपनीचे आणि संबंधित घडामोडींचे प्रतिबिंब होय.

टेक्निकल ॲनालिस्ट असे गृहीत धरत असतो कि कोणत्याही कंपनीच्या शेअर्सची किंमत हि त्या कंपनीच्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी लक्षात घेऊनच निश्चित झाली आहे.

जर कोणतीही कंपनी किंवा व्यवसाय जर चांगलं काम करत असेल, कंपनीला भरपूर फायदा होणार असेल किंवा त्या क्षेत्राला अनुकूल काही घडणार असेल तर ते त्या कंपनीच्या चार्टवर तुम्हाला दिसुन येईलच, म्हणजेच कंपनीच्या शेअरची किंमत वाढायला सुरुवात होईल.

याउलट कंपनीला तोटा होणार असेल, प्रतिकूल परिस्थिती उद्भवणार असेल, कंपनीत काही गैर घडणार असेल तर त्याचे सुद्धा पडसाद कंपनीच्या शेअर्स चार्टवर दिसून येतीलच, म्हणजेच कंपनीच्या शेअरची किंमत कमी व्हायला सुरुवात होईल.

News and Technical Analysis of Share
शेअर्सची किंमत हि कंपनीचे आणि संबंधित घडामोडींचे प्रतिबिंब होय
(News and Technical Analysis of Share)

१ फेब्रुवारी २०२१ रोजी भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला होता त्यात स्वास्थ्य आणि कल्याण (फार्मा / Pharma) क्षेत्रासाठी भक्कम २,८३,८४६ लाख करोड रक्कमेची तरतूद करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशीपासून आपण त्याचे परिणाम औषध क्षेत्रातील कंपन्यांवर बघू शकतो

दुसऱ्या दिवशीपासून जवळपास सर्व औषधनिर्मिती आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले.

अशाप्रकारे चार्ट आपल्याला सर्व गोष्टींविषयी सूचना देत असतो. अनेक टेक्निकल ॲनालिस्ट फक्त आणि फक्त चार्ट्सच्या विश्लेषणातून आपले अंतिम निर्णय घेणे पसंत करतात.

एवढच नाहीतर परिस्थिती किती चांगली किंवा गंभीर आहे हेसुद्धा शेअर्सच्या किमतीतील चढ-उतारावरून दिसुन येते.

३. बाजाराची एक निश्चित दिशा असते

शेअर्स मार्केटची किंवा एखाद्या शेअरची एक निश्चित दिशा असते आणि जोपर्यंत काही विपरीत घडत नाही तोपर्यंत मार्केट किंवा तो शेअर त्याच दिशेने हालचाल करत असतो.

टेक्निकल ॲनालिस्ट मार्केटची दिशा ओळखुन त्यानुसार आपले निर्णय घेत असतात आणि यासाठी ते चार्ट्सचा वापर करतात.

शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी आपल्याला बाजाराची दिशा ओळखून त्या दिशेला अनुसरून निर्णय घेण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.

बाजाराची दिशा ओळखण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत, आणि विविध लेखांमधून या सर्व साधनांची ओळख आपण करून घेणारच आहोत.

म्हणजेच बाजारात तेजी असल्यास आपण जास्तीत जास्त खरेदीचे/बाय ट्रेड घ्यायला हवे याउलट बाजारात मंदीची लक्षणे दिसत असल्यास आपण देखील बाजारात विक्रीचे/सेल ट्रेड केले पाहिजे.

आहे कि नाही टेक्निकल ॲनालिसिस मनोरंजक??? अजून माहितीसाठी पुढे वाचत रहा

आता आपण बघणार आहोत कि टेक्निकल ॲनालिसिस या अनोख्या पद्धतीची सुरवात कोणी केली.

टेक्निकल ॲनालिसिसचे जनक कोण आहेत ?| Who is the Father of Technical Analysis?

चार्ल्स डाऊ (Charles Dow ) यांना टेक्निकल ॲनालिसिसचे जनक मानले जाते.

चार्ल्स डाऊ हे एक अमेरिकन पत्रकार होते व त्यांनी ‘द वॉलस्ट्रीट जर्नल’ या जगप्रसिध्द आर्थिक प्रकाशनाची स्थापना केली.

चार्ल्स डाऊ यांनी अनेक दिवस शेअर्स बाजारातील किंमतीच्या नोंदी ठेवल्या आणि त्यावरून त्याच्या असे लक्षात आले कि बाजारातील किमती या काही विशिष्ट प्रकारे कमी-जास्त होत असतात.

आपल्या निरीक्षणांवरून त्यांनी चार्ट्स बनवायला सुरुवात केली आणि टेक्निकल ॲनालिसिसचा पाया रोवला.

चार्ल्स डाऊ (Charles Dow)
चार्ल्स डाऊ (Charles Dow)

चार्ल्स डाऊ यांचे शेअर बाजाराचा अभ्यास आणि विश्लेषण करण्याचे सिद्धांत ‘द डाऊ थेअरी’ या नावाने प्रसिद्ध आहेत.

आपण जे टेक्निकल ॲनालिसिस आज वापरतो त्या टेक्निकल ॲनालिसिसच्या क्षेत्रात जगभरातील अनेक लोकांचे योगदान आहे त्यापैकी काही प्रमुख नावांचा पुढे उल्लेख करणे आम्हाला महत्वाचे वाटते

प्रसिध्द टेक्निकल ॲनालिस्ट | Famous Technical Analysts

१. चार्ल्स डाऊ (Charles Dow)
२. मूनहीसा होनमा ( Munehisa Honma)
३. विल्यम हॅमिल्टन (William Hamilton)
४. रॉबर्ट ऱ्हे (Robert Rhea)
५. एड्सन गॉड (Edson Gould)
६. जॉन मॅगे (John Magee)

टेक्निकल ॲनालिसिस लोकप्रिय का आहे? | Why Technical Analysis is Popular?

टेक्निकल ॲनालिसिस लोकप्रिय असण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही कारणांची आपण आता चर्चा करूया.

या चर्चेतून आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसचे महत्व व उपयोगिता लक्षात येईल.

माहितीची सहज उपलब्धता:
टेक्निकल ॲनालिसिससाठी लागणारी माहिती आजच्या काळात अगदी सहजरीत्या मिळवता येते.

आजकाल ज्या ब्रोकरकडे आपले अकाउंट आहे त्या ब्रोकर्सचे वेब ॲप्लिकेशन्स आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स उपलब्ध असतातच.

ॲप्लिकेशन्स मध्ये टेक्निकल ॲनालिसिससाठी लागणारे चार्ट्स अगदीच सुलभरित्या उपलब्ध असतात.

उपलब्ध माहितीची विश्वसनीयता:
डिजिटायझेशन मुळे मिळालेली माहिती हि रिअल टाइम असते म्हणूनच आपण तिच्यावर अवलंबून राहू शकतो.

सुलभ उपयोग:
टेक्निकल ॲनालिसिस समजण्यास आणि वापरण्यास अधिक सोपे समजले जाते.

टेक्निकल ॲनालिसिसची व त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची पुरेशी माहिती घेऊन आणि सराव करून अगदी कोणीही उत्तम टेक्निकल ॲनालिस्ट होऊ शकते.

सार्वत्रिक वापर:
टेक्निकल ॲनालिसिस हे जगातील कुठल्याही मार्केटसाठी वापरता येऊ शकते उदा. इक्विटी, कमोडिटी, करन्सी इ.

हे अगदी एखादी कार शिकण्यासारखे आहे एकदा का तुम्ही कार चालवायला शिकले कि तुम्ही कोणतिही कार चालवू शकता अगदी तसंच एकदा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला अनुकूल टेक्निकल ॲनालिसिसचे तंत्र आत्मसात केलं कि तुम्ही जगातील कोणत्याही शेअर बाजारात काम करू शकतात.

टेक्निकल ॲनालिसिसचा वापर कोण करतात? | Who Uses Technical Analysis?

एका सर्वेक्षणानुसार शेअर्स बाजारात काम करणाऱ्या लोकांपैकी ७०% पेक्षा जास्त लोक हे टेक्निकल ॲनालिसिस वापरून खरेदी-विक्री करण्यास पसंती देतात.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस करण्याचा सल्ला दिला जातो याउलट शेअर्स मध्ये अल्प-लघु-मध्यम मुदतीसाठी खरेदी-विक्री करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस उत्तम समजले जाते.

यावरून आपल्या असे लक्षात येईल कि गुंतवणूकदार फंडामेंटल ॲनालिसिस तर व्यापारी (ट्रेडर्स /Traders) टेक्निकल ॲनालिसिस वापरतात.

टेक्निकल ॲनालिसिससाठी लागणार वेळही कमी असतो आणि कंपनीची किचकट कागदपत्रे, रिपोर्ट्स तपासण्याची गरज नसते त्यामुळे पार्ट टाइम ट्रेडर्स देखील टेक्निकल ॲनालिसिसलाच पसंत करतात.

टेक्निकल ॲनालिसिसचे फायदे | Pros of Technical Analysis

१. माहितीची मुबलक उपलब्धता
२. उपलब्ध माहितीची विश्वसनीयता
३. सुलभ विश्लेषण पद्धती
४. वेळेत आणि सहज उपलब्ध होणारी माहिती
५. नुकसान नियंत्रितकरण्यासाठी प्रभावीउपयोगी
६. कमी वेळेची आवश्यकता आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता

टेक्निकल ॲनालिसिसच्या उणिवा | Cons of Technical Analysis

१. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो म्हणून इतिहासातील घटना जशीच्या तशी पुन्हा होईलच असे नाही.
२. शिस्तबद्ध पद्धतीचा वापर आणि भरपूर संयम असण्याची गरज
.

सोबतच्या चार्टमध्ये आपण बघू शकतो कि शेअरची किंमत ज्या लेव्हल पासून खाली घसरली होती येत्या काळात शेअरची किंमत त्या लेव्हलपासून पुन्हा न घसरता वर गेली आणि पुन्हा खाली आलीच नाही.

शेअरची किंमत पुन्हा पुन्हा ज्या लेव्हल पासून खाली घसरते त्या लेव्हलला बाजाराच्या भाषेत ‘ रेझिस्टन्स ‘ म्हटले जाते.

ज्या लोकांनी शेअरची किंमत रेझिस्टन्सपासून पुन्हा खाली येईल असा अंदाज बांधला असेल त्या लोकांना मात्र तोटा सहन करावा लागला असेल.

अशाप्रकारे आपल्याला कळू शकते कि टेक्निकल ॲनालिसिस हि काही जादूची कांडी नसून टेक्निकल ॲनालिसिसच्या देखील काही कमतरता आहे.

टेक्निकल ॲनालिसिस शिकण्यासाठी काही उपयुक्त पुस्तके | Books to Learn Technical Analysis

१. जॅपनीज कॅन्डलस्टिक्स चार्टींग टेकनिक्स (Japanese Candlesticks Charting Techniques)
२. मार्केट विझर्ड्स (Market Wizards)
३. टेक्निकल ॲनालिसिस ऑफ फायनान्शिअल मार्केट्स (Technical Analysis of Financial Markets)
४. एनसायक्लोपेडिया ऑफ चार्ट पॅटर्नस (Encyclopedia of Chart Patterns )
५. इलियट वेव्ह प्रिंसिपल (Elliott Wave Principle
)

टेक्निकल ॲनालिसिसची काही लोकप्रिय साधने ।

१. कँडलस्टिक चार्ट्स (Candlestick Charts)
२. वोल्युम इंडिकेटर (Volume Indicator)
३. मूव्हिग अवरेज (Moving Averages)
४. व्ही डब्लू ए प (VWAP)

मित्रांनो, अशाप्रकारे या लेखात आपण टेक्निकल ॲनालिसिस या शेअर बाजारातील एका अतिशय महत्वपूर्ण विश्लेषण पद्धतीची सविस्तर माहिती घेतली.

टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय ते समजून घेतले, टेक्निकल ॲनालिसिसची पार्श्वभूमी समजून घेतली, टेक्निकल ॲनालिसिसचे जनक व यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींची माहिती घेतली.

कोणतीही पद्धत वापरण्यापूर्वी त्या पद्धतीची संपूर्णपणे माहिती करून घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे कोणतीही पद्धत शिकण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी माहिती असणे महत्वाचे ठरते.

या लेखात आपल्याला काही शंका असल्यास आपण खाली कमेंट करून विचारू शकतात.

आपल्याला काही उणिवा आढळल्यास आम्हाला जरूर कळवा आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.

अधिक माहितीसाठी आमचे इतर लेख वाचायला विसरू नका

धन्यवाद !!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

प्रश्नमंजुषा

प्रश्न: स्टॉकचे टेक्निकल ॲनालिसिस कसे करतात ?

उत्तर: स्टॉकचे टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला स्टॉकच्या किमतीच्या नोंदी मिळणे गरजेचे आहे. किमतीच्या मदतीने आपण स्टॉकच्या किमतीतील चढ-उतारांचा अभ्यास करतो. किमतीच्या हालचालीवरून आपण भविष्यात होऊ शकणाऱ्या किमतीच्या हालचालींचा अंदाज करतो आणि त्यानुसार स्टॉकमध्ये खरेदी विक्री करू शकतो.

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment