इन्ट्राडे ट्रेडींग मराठी | Intraday Trading in Marathi

4.6/5 - (5 votes)

नमस्कार मित्रांनो,

इन्ट्राडे ट्रेडींग हा अनेक लोकांचा पूर्णवेळ व्यवसाय असून या लेखात आपण इन्ट्राडे ट्रेडींगची ओळख करून घेणार आहोत.

या लेखात आपण इन्ट्राडे ट्रेडींग म्हणजे काय? इन्ट्राडे ट्रेडींगचे फायदेतोटे, इन्ट्राडे ट्रेडींगसाठी लागणारी कौशल्ये आणि काही उपयुक्त पुस्तके अशी सविस्तर माहिती घेणार आहोत.

जर आपण इन्ट्राडे ट्रेडींग शिकत असाल, एखाद्या नवीन व्यावसायाच्या शोधात असाल किंवा तूम्हाला घरबसल्या पैसे कसे कमवायचे माहिती करून घ्यायचे असेल तर हा लेख जरूर वाचा.

या लेखातील सर्व गोष्टी भारतीय इक्विटी मार्केटच्या दृष्टीकोनातून लिहिला आहे तरी आपल्याला इतर स्टॉक मार्केटमध्ये देखील या लेखातील गोष्टींचा नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे.

चला तर मग सुरुवात करूया.

इन्ट्राडे ट्रेडींग म्हणजे काय ?

इन्ट्राडे म्हणजे एका दिवसापुरते आणि ट्रेडींग म्हणजे व्यापार होय.

याचाच अर्थ आपला मार्केटमधील मधील जो काही व्यवहार आहे तो एकाच दिवसापुरता मर्यादित असणार आहे.

भारतीय शेअर मार्केट भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.१५ वाजता सुरु होते तर संध्याकाळी ४.०० वाजता बंद होते.

वेळेनुसार एका दिवसात खालील प्रमाणे कामकाज चालते.

प्रारंभीचे मार्केट सेशन (Pre-open Session)९.०० ते ९.१५
साधारण मार्केट(Normal Session)९.१५ ते ३.३०
समाप्तीचे मार्केट सेशन (Closing Session)३.३० ते ४.००

समजा आपण अमुक एका तारखेला टाटा कंपनीचे १०० स्टॉक २०० रुपये किमतीला सकाळी १० वाजेला खरेदी केले आणि त्याच दिवशी २ वाजेला २१० रुपये किमतीला विकून टाकले तर अशा ट्रेडला आपण एक इन्ट्राडे ट्रेड म्हणू शकतो.

याउलट आपण खरेदी केलेले स्टॉक दुसऱ्या दिवशी किंवा अधिक काळानंतर विकले असते तर त्याला आपण डेलिव्हरी ट्रेड म्हणू शकतो.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

प्री-मार्केट सेशन

एनएसइ मार्केट मधील व्होलॅटिलिटी नियंत्रित करण्यासाठी रोज ९.०० ते ९.१५ दरम्यान प्री-मार्केट सेशन आयोजित करत असते.

प्री-मार्केट सेशन दरम्यान पहिल्या ८ मिनिटांसाठी (सकाळी ९.०० ते सकाळी ९.०८ दरम्यान) ऑर्डर घेणे, ऑर्डर बदलणे किंवा ऑर्डर रद्द करणे अशी सर्व कामे केली जातात.

आपण या काळात लिमिट ऑर्डर किंवा मार्केट ऑर्डर देऊ शकतो.

ऑर्डर कलेक्शन विंडो सकाळी ९.०७ ते सकाळी ९.०८ दरम्यान कधीही बंद होऊ शकते.

९.०८ ते ९.१५ या काळात आलेल्या ऑर्डरप्रमाणे सर्व व्यवहार पूर्ण केले जातात.

प्री-मार्केट आणि पोस्ट-मार्केट ऑर्डरला फक्त इक्विटी ट्रेडिंगसाठी परवानगी आहे.

पोस्ट-मार्केट सेशन

अधिक माहितीसाठी आपण खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता.

पोस्ट-मार्केट सेशन किंवा क्लोजिंग सेशन दुपारी ३.४० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत खुले असते.

पोस्ट-मार्केट सेशनमध्ये, आपण इक्विटीमध्ये खरेदी/विक्री ऑर्डर देऊ शकतो मात्र या ऑर्डर फक्त डिलिव्हरी ऑर्डर म्हणूनच स्वीकारल्या जातात कारण त्यादिवशीचं कामकाज थांबणार असते.

याशिवाय आपली ऑर्डर स्टॉकच्या क्लोझिंग प्राइसलाच मिळते म्हणजेच टाटा मोटर्सचा स्टॉक ३.४० ला २५० रुपयांना बंद झाला असेल तर ३.४० ते ४.०० पर्यंत मार्केटमधील खरेदी-विक्री च्या सर्व ऑर्डर या २५० रुपये या किंमतीलाच मिळतात.

मार्केटनंतरचे सत्र फारसे सक्रिय नसते आणि तुम्ही दुपारी ३.४० ते दुपारी ४.०० पर्यंत मार्केटवॉच विंडो उघडून स्टॉकची हालचाल पाहू शकता.

एनएसइ

इन्ट्राडे ट्रेडींगचे फायदे

मित्रांनो, इन्ट्राडे ट्रेडिंग हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो किंबहुना अनेक लोकांनी पूर्णवेळ इन्ट्राडे ट्रेडींगचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला आहे.

आपण इथे ट्रेडींग इतके आकर्षक असण्याच्या काही कारणांचा शोध घेणार आहोत.

लिव्हरेज/मार्जिन

भांडवलासाठी मिळणारे मार्जिन किंवा लिव्हरेज हे इन्ट्राडे ट्रेडींगची सर्वात आकर्षक बाजू आहे.

मार्जिन म्हणजेच त्या दिवसापुरते आपल्याला मिळणारे कर्ज किंवा उधारी असे आपण साध्या भाषेत म्हणूया.

उदा. आपल्या झेरोधा खात्यात जर १०,००० रुपये असतील तर आपण त्याच्या अगदी ५ पट किमतीच्या स्टॉकची खरेदी-विक्री करू शकतो.

म्हणजेच १०,००० रुपयांत १,००० किमतीचे फक्त १० स्टॉक घेण्याऐवजी आपण ५० स्टॉकपर्यंत स्टॉक घेऊ शकतो.

हि उधारी किती पट मिळू शकते ते आपले खाते कोणत्या ब्रोकरकडे आहे त्यावर अवलंबून असते.

अधिक माहितीसाठी मी झेरोधा मार्जिन कॅल्क्युलेटरची लिंक देत आहे

यात एक अट मात्र आहे कि आपल्याला खरेदी केलेले स्टॉक त्याच दिवशी विकावे लागतात किंवा विकलेले स्टॉक त्याच दिवशी खरेदी करावे लागतात.

हे काय नवीन आता चला पुढे बघूया

शॉर्ट सेलिंग

शॉर्ट सेलिंग म्हणजे अगोदर स्टॉकची विक्री करायची आणि नंतर खरेदी करायची.

पण असं कसं शक्य आहे ? जे स्टॉक मी खरेदीच केले नाही ते कसे विकणार बरं ?

आपण असं समजूया कि आज मला असं वाटत आहे कि रिलायन्स कंपनीचा स्टॉक २००० रुपयांहून कोसळणार आहे.

अशावेळी मी २००० रुपयांना १० स्टॉक विकले आणि मग १९५० रुपयांना हे १० स्टॉक खरेदी केले म्हणजे मला एका स्टॉकमागे ५० रुपयांचा फायदा झाला कारण माझी विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे.

आहे कि सोप्पं, एक अट मात्र आहे कि हि सोय फक्त इन्ट्राडे ट्रेडींगसाठीच उपलब्ध आहे.

भरपूर प्रॉफिटची शक्यता

इन्ट्राडे ट्रेडींगसाठी फक्त असेच स्टॉक निवडले जातात कि ज्या स्टॉकमध्ये भरपूर हालचाल होण्याची शक्यता आहे.

स्टॉक एक्सचेन्ज मध्ये असे भरपूर स्टॉक आहेत कि ज्या स्टॉकच्या किमतीमध्ये मध्ये रोज सरासरी ५% हालचाल होत असते आणि इन्ट्राडे ट्रेडर या हालचालींचाच फायदा घेत असतात आणि अलगद स्टॉकच्या किमतीच्या १% ते २% फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

मित्रांनो, बँक आपल्याला दिर्घ मुदतीत रक्कम गुंतवल्यास सरासरी वार्षिक ५% व्याज देते त्या तुलनेने इन्ट्राडे ट्रेडींग मधून मिळणारा नफा खूप जास्त असतो म्हणून इन्ट्राडे ट्रेडींग अधिक आकर्षक वाटते.

बातम्या आणि घडामोडींपासून संरक्षण

आपल्यापैकी अनेक जण रिटेल ट्रेडर आहोत त्यामुळे आपल्याला औद्योगिक जगतातील बातम्या आणि घडामोडींची फारशी माहिती नसते आणि माहिती असली तरी त्याचा बाजारावर काय परिणाम होईल तेदेखील सांगता येत नाही.

समजा, आपण सिप्ला कंपनीचे शेअर्स ५०० रुपये किमतीला आज विकत घेतले आणि रात्री कंपनीच्या व्यावसायाला प्रतिकूल काही घडले तर दुसऱ्या दिवशी आपण ते विक्री करेपर्यंत शेअरची किंमत अगदी ४५० रुपये झालेली असू शकते.

इन्ट्राडे ट्रेडींग मध्ये अशा आपण बेसावध असतांना घडणाऱ्या बातम्या आणि घडामोडींपासून संरक्षण असते.

कमी भांडवलाची गरज

इन्ट्राडे इक्विटी मध्ये जर आपल्याला काम सुरु करायचे असेल खूप मोठ्या भांडवलाची मुळीच गरज नाही बरं का.

आपण एखाद्या कंपनीचा अगदी १ स्टॉक देखील खरेदी किंवा विक्री करू शकतो शिवाय आपल्याला ब्रोकरकडून ५ पटीपर्यंत मार्जिन मिळू शकते.

आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडींगची सुरुवात करायची असेल तर आपल्याला फक्त एक चांगला कॉम्प्युटर,किंवा पुरेसा चांगला मोबाईल फोन किंवा टॅबलेट आणि इंटरनेट कनेक्शन एवढंच साहित्य पुरेसं आहे.

घरबसल्या काम

मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये काम करण्याची सर्वात भारी गोष्ट काय आहे माहित आहे ?

तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही अगदी घरात बसून काम करू शकता किंबहुना जगात जिथे जिथे इंटरनेट उपलब्ध आहे तिथून कुठूनही तुम्ही काम करू शकता.

तेव्हा ज्यांना कोणाला आपल्या फॅमिली पासून लांब रहाणे शक्य नाही, गृहिणींसाठी, अपंग बंधू-भगिनींसाठी, विद्यार्थ्यांसाठी, अगदी कोणासाठीही इन्ट्राडे ट्रेडींग हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो.

इन्ट्राडे ट्रेडींगचे तोटे

फायदे तर पुष्कळ बघितले पण इन्ट्राडे ट्रेडींग हि एक दुधारी तलवार आहे.

इन्ट्राडे ट्रेडींग जर एवढंच सोप्पं असतं तर प्रत्येकजण ट्रेडरचं असता नाही का ?

तेव्हा आपण आता इन्ट्राडे ट्रेडींगची दुसरी बाजू बघूया.

ट्रेडींग आणि व्होलॅटिलिटी

व्होलॅटिलिटी म्हणजे किमतीची अस्थिरता होय.

व्होलॅटिलिटी ट्रेड यशस्वी होण्यासाठी गरजेची असते मात्र अतिजास्त व्होलॅटिलिटी स्टॉकमध्ये अंदाज बांधण्यासाठी अडचण ठरू शकतो.

काहीवेळा स्टॉक मध्ये अचानक आलेली काही क्षणांची मोठी मूव्ह आपला स्टॉप लॉस खाऊन जाते.

याउलट स्टॉकची किंमत अगदीच स्थिर असेल तर अशा स्टॉक मध्ये स्टॉप लॉस जातो आणि वेळही वाया जातो.

इन्ट्राडे ट्रेडचं यश मोठ्या प्रमाणावर स्टॉक मधील ट्रेण्ड वरचं अवलंबून असते.

ट्रेडींग आणि वेळ

इन्ट्राडे ट्रेडींग मध्ये आपल्या विरुद्ध असणारी अजून एक गोष्ट म्हणजे वेळेची मर्यादा.

मित्रांनो, सकाळी ९ ते ३ म्हणजे आपल्याकडे अगदी ६ तास एवढाच वेळ उपलब्ध असतो.

आपण मार्जिन वापरले असल्यास आपल्याला व्यवहार थांबवणे बंधनकारक असते नाहीतर ब्रोकरच आपली पोझिशन एक्झिट करत असतात.

या उपलब्ध ६ तासात आपल्याला स्टॉक निवडून, ट्रेड शोधून, प्रॉफिट किंवा लॉस बुक करून बाहेर पडायचा आहे.

हे सर्व करत असताना आपल्याला नजर घड्याळाच्या काट्यावरच ठेवायची आहे कारण आपल्याला आपण ट्रेड घेतल्यानंतर स्टॉक मधील मोमेन्टमचा फायदा घ्यायचा आहे.

ट्रेडींग आणि ताण-तणाव

मित्रांनो, आपल्याला उपलब्ध ६ तासात स्टॉक निवडायचा असतो, स्टॉक मधील ट्रेण्ड शोधायचा असतो, योग्य ठिकाणी एन्ट्री करायची असते, सुरक्षित स्टॉप लॉस लावायचा असतो आणि आपण पत्करलेल्या रिस्कच्या बदल्यात आपल्याला पुरेसा प्रॉफिट होतोय कि नाही याचा देखील विचार करायचा असतो, स्टॉक किती वर-किवा खाली जाऊ शकतो याचा विचार करायचा असतो, त्यानुसार टारगेट ठरवायचं असतं, स्टॉकचं पूर्णवेळ निरीक्षण करायचं असतं आणि ट्रेडमधून बाहेर पडायचं असतं.

हुश्शह्ह !!!

अर्थातच एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे तारेवरची कसरतच असते तेव्हा इन्ट्राडे ट्रेडींग मध्ये प्रचंड ताण-तणाव असतो.

जेव्हा ट्रेड आपल्या विरुध्द दिशेने जातो तेव्हा आपल्याला होणारे आर्थिक नुकसान बघतांना अनेक लोकांना अक्षरशः घाम येतो.

हा तणाव इतका प्रचंड असू शकतो कि कमजोर मनाची माणसे स्वतःचे बरेवाईट देखील करून घेतात तर काही लोक शेअर मार्केट हा विषयच सोडून देतात.

ट्रेडिंग आणि ब्रोकरेज

शेअर मार्केट मधील प्रत्येक ट्रेड हा तोट्यातच सुरु होतो आणि त्याच कारण आहे ब्रोकरेज. आपल्याला फायदा होवो कि नुकसान आपल्याला ब्रोकरेज हे द्यावंच लागणार असल्याने शेअर बाजारातील प्रत्येक ट्रेड हा तोट्यातच सुरु होत असतो असे मी म्हटले आहे.

याशिवाय अनेक लोक आवेशात खूप जास्त ट्रेड करतात यातून एकतर खूप जास्त पैसा कमवण्यासाठी झगडत असतात किंवा अगोदर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यात खऱ्या अर्थाने फायदा होतो तो ब्रोकरचा.

झेरोधा मध्ये आपल्याला एका ट्रेडसाठी फक्त जास्तीत २० रुपये इतकेच ब्रोकरेज द्यावे लागते म्हणून मी झेरोधाचा वापर इन्ट्राडे ट्रेडींगसाठी करतो.

इन्ट्राडे ट्रेडींगसाठी आपल्याला लागणारी कौशल्ये

मित्रांनो, आता आपण इन्ट्राडे ट्रेडींगसाठी आपल्याला आत्मसात करावी लागणारी काही कौशल्ये बघूया

टेक्निकल अनॅलिसिसचे ज्ञान

इन्ट्राडे ट्रेडर हा शेअरच्या किमतीत होणाऱ्या हालचालींचा फायदा घेत असतो.

इन्ट्राडे ट्रेडर हा शेअरच्या किमतीत होणाऱ्या हालचालींचा फायदा घेत असतो आणि शेअरच्या किमतीत होणाऱ्या हालचालींचा अभ्यास करून बाजाराची दिशा ओळखण्याची कला आपल्याला अवगत करून घ्यावी लागते.

टेक्निकल अनालिसिसमध्ये कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, व्हॉल्युम आणि विविध इंडिकेटर यांची पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे.

संयम

आपल्याकडे ट्रेडमध्ये एन्ट्री आणि एक्झिट करण्यासाठी एक सिस्टम असावे आणि जो पर्यंत आपल्याला त्या सिस्टमप्रमाणे सिग्नल मिळत नाही तोपर्यंत आपण स्टॉक मध्ये एन्ट्री किंवा एक्झिट करता काम नये.

मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोक आपली संधी जाईल या भीतीपोटी अनेकदा ट्रेड घेतात आणि नुकसान करून घेतात.

याशिवाय अनेक लोक कमावलेला नफा जाईल या भीतीने लवकर ट्रेडमधून बाहेर पडतात आणि मोठा नफा सोडून देतात.

त्यामुळे ट्रेडींग करतांना आपल्याला खूप जास्त संयमी, शांत असण्याची गरज असते.

स्वयंशिस्त

कठोर स्वयंशिस्त हा एका यशस्वी ट्रेडरचा महत्वाचा गुण आहे.

जर आपल्याला चार्टवर आपला ट्रेड चुकल्याचं जाणवत असेल तर आपण लागलीच ट्रेडमधून बाहेर पडायला हवे.

अनेकदा आपल्याला एन्ट्री सिग्नल न मिळाल्यास किंवा मार्केट साइडवेज असल्यास आपण मार्केटपासून लांब राहिलेले जास्त चांगले असते.

ट्रेडींग करून आपण पैसे कमावू शकतो तर ट्रेडींग न करता आपण आपण कमावलेले पैसे सुरक्षित ठेवू शकतो.

पैशाचे व्यवस्थापन

पैशाचे व्यवस्थापन हा बहुधा सर्वात महत्वाचा मात्र सर्वात दुर्लक्षित असलेला मुद्दा असावा.

आपली एका ट्रेड मागे असणारी रिस्क हि आपल्या भांडवलाच्या २% पेक्षा जास्त नसावी असे अनेक जाणकार लोक सांगतात.

याशिवाय आपला एका दिवसाचा जास्तीत जास्त तोटा किती असावा हे देखील आपण निश्चित केलेले असावे.

प्रत्येक ट्रेड घेतांना स्टॉप लॉस १००% लावल्याची खात्री केलेली असावी कारण स्टॉप लॉस हि नुकसान नियंत्रित करण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे.

इन्ट्राडे ट्रेडींगची काही उपयुक्त पुस्तके

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण इन्ट्राडे ट्रेडींगची माहिती घेतली.

आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास आपण कमेन्टबॉक्स मध्ये जरूर कळवा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment