पोर्टफोलिओ म्हणजे काय ?। What is Portfolio in Marathi ?

2.5/5 - (2 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’च्या नवीन लेखात आपले सहर्ष स्वागत आहे.

या लेखात आपण शेअर मार्केटमध्ये आपला पोर्टफोलिओ कशाप्रकारे तयार करू शकतो त्याविषयी माहिती घेणार आहोत.

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपण आतापर्यंत टेक्निकल ॲनालिसिस विषयी माहिती घेतली असल्याने आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या दृष्टिकोनातून आपला पोर्टफोलिओ कशाप्रकारे तयार करू शकतो याविषयी चर्चा करणार आहोत.

हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे शेअर बाजार हा एक व्यावसाय असून आपण आपला पैसा कसा वापरणार आहोत याविषयीची योजना आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

पोर्टफोलिओ तयार करणे म्हणजे ट्रेडिंगसाठी आपण आपले भांडवल कसे वापरणार आहोत याविषयी योजना किंवा ब्लूप्रिंट तयार करण्यासारखेच आहे.

हा लेख वाचल्यानंतर ट्रेडिंगसाठी आपले भांडवल वापरण्यासाठी आपली एक चांगली मानसिकता तयार होण्यास नक्कीच मदत होईल तेव्हा हा लेख पूर्ण वाचा आणि आपला ट्रेडिंग प्लॅन तयार करा.

चला तर मग सुरुवात करूया

पोर्टफोलिओ म्हणजे काय ?। What is Portfolio ?

पोर्टफोलिओ म्हणजे आर्थिक गुंतवणुकीच्या साधनांचा संग्रह होय.

उदा. फिक्स्ड डिपॉझिस्ट, सेव्हिंग अकाउंट, शेअर्स इ.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी विचारात घेतलेल्या महत्वाच्या गोष्टी

या लेखात आपण इक्विटी मार्केटमध्ये आपला पोर्टफोलिओ कसा तयार करू शकतो ते बघणार आहोत म्हणजेच आपण फक्त विविध कंपन्यांचे स्टॉक खरेदी-विक्री करण्यासाठी भांडवल वापरण्याविषयी योजना तयार करणार आहोत.

आपल्या पोर्टफोलिओमध्ये फ्यूचर अँड ऑप्शन्स किंवा कमोडिटी सेक्टर विचारात घेतले जाणार नाही.

आपण आपला पोर्टफोलिओ ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून तयार करणार आहोत.

आपण पोर्टफोलिओ तयार करत असताना स्विंग ट्रेडिंग आणि डे ट्रेडिंग दोन्ही गोष्टींसाठी तरतूद करणार आहोत.

आपला पोर्टफोलिओ म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये काम करणाऱ्या एखाद्या टेक्निकल ॲनालिस्टचा पोर्टफोलिओ असणार आहे.

पोर्टफोलिओ आणि भांडवलाची वर्गवारी । Portfolio and Capital Distribution

आपल्याला ट्रेडिंगसाठी १,००,००० रुपये एवढे भांडवल उपलब्ध आहे असे आपण समजूया.

खाली मी आपण आपली ट्रेडिंग कॅपिटल कशाप्रकारे ट्रेडिंगसाठी मॅनेज करू शकतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

trading capital

वरील चार्ट तयार करत असताना मी आपली रिस्क कमीतकमी करत जास्तीतजास्त रिटर्न्स मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केला आहे.

अकाउंट मॅनेज करताना रिस्क आणि रिवॉर्ड या दोन्ही गोष्टींचा समतोल साधने खूप गरजेचे आहे आणि पोर्टफोलिओ तयार करताना आपल्याला या गोष्टीला विशेष महत्व द्यायचे आहे.

आता आपण चार्टवरील प्रत्येक भागाची सविस्तर चर्चा करूया.

१. इन्ट्राडे ट्रेडिंग

इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी आपण २०% कॅपिटल राखून ठेवणार आहोत म्हणजेच आपण १,००,००० रुपयांपैकी २०,००० रुपये इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी वापरू शकतो.

आपल्यापैकी अनेक लोक कामात व्यस्त असल्याने पूर्णवेळ इन्ट्राडे ट्रेडिंग करू शकत नाही पण इन्ट्राडे ट्रेडिंगमुळे आपली कौशल्ये (स्किल्स) टिकून रहातात म्हणून मी इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी काही रक्कम राखून ठेवण्याचा आपल्याला सल्ला देईल.

आपण हि रक्कम एखाद्या दिवशी खूप जास्त चांगली संधी मिळाल्यास त्या संधीचा भरपूर फायदा घेण्यासाठी देखील वापरू शकतो आपल्याकडे अशी विशेष रक्कम नसल्यास आपण मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ शकणार नाही.

उदा. चार्ट बघत असताना एखाद्या स्टॉकने आपला खूप दिवसाचा किंवा मोठ्या टाइमफ्रेमवरचा रेझिस्टन्स ब्रेक केल्यास आपण तात्काळ पोझिशन घेऊन प्रॉफिट करू शकतो.

आपल्याला इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी अगदीच वेळ मिळत नसल्यास आपण हि रक्कम १०,००० रुपयापर्यंत मर्यादित करू शकता.

या तरतुदीचा एक फायदा म्हणजे इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी आपल्याला ब्रोकर्सकडून पाच पटीपर्यंत लिव्हरेज मिळत असल्याने आपण २०,००० रक्कम जरी राखून ठेवली तरी आपण १,००,००० रुपयांपर्यंत ट्रेडिंग करू शकतो.

इन्ट्राडे ट्रेडिंगमध्ये मिळणारा परतावा जास्त असला तरी इन्ट्राडे ट्रेडिंग तुलनेने स्विंग ट्रेडिंगपेक्षा जास्त अवघड असल्याने मी पोर्टफोलिओमधील रिस्क कमी करण्यासाठी फक्त २०% कॅपिटल यासाठी दिली आहे.

याशिवाय इन्ट्राडे ट्रेडिंगचा आणखी एक फायदा म्हणजे आपण बेअरिश मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन घेऊन आपण प्रॉफिट कमावू शकतो, इक्विटी मार्केटमध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये शॉर्ट पोझिशन घेण्याची उपलब्धता नाही.

अशाप्रकारे आपण इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी राखून ठेवलेल्या रक्कमेचे आपल्याला ३ फायदे होऊ शकतात ते म्हणजे १. आपले स्किल्स सुधारतात आणि मानसिकता भक्कम होते.

२. लिव्हरेज वापरायला मिळते.

३. बेअरिश मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन घेऊन प्रॉफिट कमावता येतो.

आपण चांगल्याप्रकारे ट्रेडिंग करत असाल तर आपण हि इन्ट्राडे कॅपिटल वाढवू शकतात.

इन्ट्राडे ट्रेडिंगचे प्रात्यक्षिक बघायचे असल्यास खाली मी व्हिडीओ उपलब्ध करून देत आहे.

२. स्विंग ट्रेडिंग

स्विंग ट्रेडिंग म्हणजे आपण खरेदी केलेले स्टॉक एका दिवसापेक्षा जास्त दिवस होल्ड करतो आणि किंमत वाढल्यावर ते स्टॉक वाढीव किमतीला विकून नफा कमावतो.

स्विंग ट्रेडिंगला होल्डिंग, पोझिशनल, डिलिव्हरी इ नवे आहेत.

स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण पाहिजे तेवढे दिवस स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतो म्हणून आपल्याला वेळेचे बंधन नसते आणि त्यामुळे धोका कमी असतो.

धोका कमी असल्याने मी ८०% रक्कम स्विंग ट्रेडिंगसाठी राखीव ठेवली आहे म्हणेजच ८०,००० रुपये आपण स्विंग ट्रेडिंगसाठी वापरणार आहोत.

स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला स्टॉकचा, चार्टचा अभ्यास करण्यासाठी देखील पुष्कळ वेळ उपलब्ध असतो आणि आपण आपले निर्णय सावकाश आणि जाणकार लोकांच्या सल्ल्याने देखील घेऊ शकतो.

स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्याला ब्रोकर कडून कुठलीही सवलत किंवा लिव्हरेज मिळत नाही त्यामुळे स्विंग ट्रेडिंगसाठी जास्तीचे भांडवल असणे गरजेचे आहे.

स्विंग ट्रेडिंगचा एकूण कॅपिटलचे देखील आपण रिस्कनुसार विविध गट करणार आहोत.

स्विंग ट्रेडिंगच्या ८०,००० रक्कमेपैकी ५०,००० रुपये आपण निफ्टी मधील पहिल्या १०० स्टॉकमध्येच वापरायचे आहे.

पहिल्या १०० स्टॉकमध्ये भरपूर लिक्विडीटी आणि व्हॉल्युम असतो त्यामुळे किमतीची हालचाल चांगली होते.

पहिल्या १०० कंपन्या या आपापल्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असून त्यांचे मार्केट कॅपिटल देखील भरपूर असते.

आपण आपला धोका अजून कमी करण्यासाठी आपला पोर्टफोलिओ निफ्टी ५० कंपन्यांपर्यंत देखील मर्यादित करू शकतात.

खाली मी निफ्टी ५० आणि निफ्टी १०० कंपनीच्या लिस्ट उपलब्ध असणारी लिंक देत आहे.

निफ्टी ५०

निफ्टी १००

अशाप्रकारे आपण २०,००० (इन्ट्राडे) + ५०,००० (स्विंग ट्रेडिंग)= ७०,००० रुपयांची ट्रेडिंगची योजना तयार केली आता आपण उर्वरित ३०,००० रुपये कसे कामाला लावता येतील ते बघूया.

आपल्याला उरलेल्या ३०,००० रुपयांपैकी २०,००० रुपये वापरताना मध्यम धोका पत्करायचा आहे तर १०,००० वापरताना जास्त धोका घ्यायचा आहे.

२०,००० रुपये आपण निफ्टीच्या पहिल्या ५०० कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी वापरणार आहोत तर उर्वरित १०,००० आपण कोणत्याही कंपनीत गुंतवू शकतो.

२०,००० रुपये आपण पहिल्या ५०,००० रुपयाप्रमाणेच मात्र निफ्टीच्या पहिल्या ५०० कंपन्यांमध्ये ट्रेडिंगसाठी वापरू शकतो.

खाली मी निफ्टी ५०० कंपनीच्या लिस्ट उपलब्ध असणारी लिंक देत आहे.

निफ्टी ५००

अनेक लहान मात्र चांगल्या कंपन्या दुर्लक्षित असतात आणि अशा कंपन्या ऑर्डर मिळवल्यावर किंवा सरकारी धोरण जाहीर झाल्यास किंवा विविध गोष्टींमुळे भरपूर चांगला परतावा मिळवून देण्यात सक्षम असतात.

या कंपन्या अनेकवेळा बातम्या किंवा मीडियापासून देखील दूर असतात, असे असले तरी आपल्याला या कंपन्यांचे चार्ट उपलब्ध असतात आणि त्यावरून आपण या कंपन्याविषयी चांगला अंदाज बांधू शकतो.

अनेकदा आपल्याला मनातून एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये भक्कम वाढ होणार असल्याची भावना असते अशावेळी आपण आपले शेवटचे १०,००० रुपये या कंपन्यांमध्ये ट्रेडिंगसाठी वापरू शकतो.

आपल्याला अनेकदा टिप मिळतात, बातम्या समजतात, मित्राकडून सल्ला मिळतो तर अशावेळी आपण आपले हे १०,००० रुपये वापरून ट्रेडिंग करू शकतो.

अनेकवेळा पेनी स्टॉक खूप चांगला परतावा मिळवून देतात मात्र पेनी स्टॉकमध्ये काम करणे खूप जास्त धोक्याचे असते.

आपण आपले शेवटचे १०,००० अशा पेनी स्टॉकमध्ये ट्रेडिंगसाठी वापरू शकतात.

आपण आपला ट्रेडिंग पोर्टफोलिओ अशाप्रकारे तयार केल्यास आपण आपला धोका आणि परतावा यांचा चांगला समतोल साधू शकतो.

मित्रांनो, आपण आपला पोर्टफोलिओ आपल्या गरजेनुसार, नुकसान पचवण्याच्या ताकदीनुसार, उपलब्ध वेळ आणि ज्ञानानुसार तयार करू शकतात.

खाली आपल्यासोबत महिंद्रा कंपनीचा डेली चार्ट आहे.

स्विंग ट्रेडिंग । swing trading

चार्टवर आपण बघू शकतो कि महिंद्रा कंपनीमध्ये ७२५ पासून ९५० पर्यंत एक मोठी रॅली आली आहे.

म्हणजे जवळपास ३०% एवढी मोठी रॅली २० ते २५ दिवसात आली आहे.

आपल्याला या रॅलीचा निम्मा भाग म्हणजे १५% किंवा अगदी १०% भाग जर चांगली एन्ट्री करून मिळवता आला तरी आपण आपल्या कॅपिटलवर खूप चांगले रिटर्न्स मिळवले असे होईल.

पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक असावे ? । How many shares should I have in my portfolio?

आपण आपले पैसे विविध स्टॉकमध्ये गुंतवणे शहाणपणाचे ठरते.

असे असले तरी आपल्याला त्या स्टॉकवर नजर ठेवणे देखील शक्य होणे आवश्यक आहे.

आपण सर्वसाधारणपणे मध्यम आकाराच्या पोर्टफोलिओमध्ये ८-१० स्टॉक समाविष्ट करावे असे मला वाटते.

आपला पोर्टफोलिओ ५०,००० रकमेचा असेल तर आपण ५ ते ६ स्टॉकमध्ये ट्रेडिंग करावे आणि पोर्टफोलिओ खूप मोठा असला तरी १५ स्टॉकपेक्षा जास्त स्टॉकवर नजर ठेवणे आपल्याला अवघड जाऊ शकते तेव्हा १५ पेक्षा जास्त स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावे असे मला वाटत नाही.

आता आपण स्टॉक कशाप्रकारे घेऊ शकतो याचा अभ्यास करूया.

खाली मी आपल्या पोर्टफोलिओमध्ये १० स्टॉक कशाप्रकारे समाविष्ट करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

trading stocks

इन्ट्राडे ट्रेडिंगमध्ये साधारण आपण १ किंवा २ स्टॉकमध्ये ट्रेडिंग केल्यास आपल्याला व्यवस्थित ट्रेड मॅनेज करता येऊ शकतात.

स्विंग ट्रेडिंगसाठी आपण विविध ६ ते ८ स्टॉक आपल्या होल्डिंगमध्ये घेऊ शकतो.

यातील २ ते ३ स्टॉक विश्वासार्ह कंपन्यांचे स्टॉक म्हणून निफ्टी १०० कंपन्यांपैकी असणे गरजेचे आहे.

उर्वरित स्टॉक आपण इतर उपलब्ध पर्यायांपैकी निवडू शकतो.

आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये एखादा तरी पेनी स्टॉक जरूर असू द्यावा कारण पेनी स्टॉक खूप जास्त रिटर्न्स देऊ शकतात किंबहुना पेनी स्टॉकमध्ये आपल्याला चांगला ट्रेंड मिळाल्यास या स्टॉकमध्ये अडकवलेले ५-१० हजार रुपये आपल्याला उर्वरित सर्व पोर्टफोलिओ एवढे रिटर्न्स देऊ शकतात.

*पेनी स्टॉक = अतिशय कमी किमतीच्या स्टॉकला पेनी स्टॉक असे म्हणतात. उदा. १ रुपया , ५ रुपये, ५० पैसे.

उदाहरणासाठी खाली मी एमएफएल इंडिया स्टॉकचा चार्ट देत आहे.

mfl
चार्टचे निरीक्षण केल्यास आपल्या असे लक्षात येते कि हा स्टॉक २ महिन्यापेक्षा कमी कालावधीत जवळपास ४० पैशाहून २.२० रुपये एवढा म्हणजे ५ पट वाढला आहे.

मित्रांनो, अशाप्रकारे आपण या लेखात पोर्टफोलिओ तयार करण्याविषयी भरपूर माहिती घेतली.

शेअर मार्केटविषयी अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ची लिंक बुकमार्क करा, आणि ‘पैसा झाला मोठा’ ॲप डाउनलोड करा.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

याशिवाय पैसा झाला मोठा युट्युब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका.

आपण वेळातवेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment