स्टॉक स्प्लिट मराठी | Stock Split in Marathi

3/5 - (2 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

काही दिवसांपूर्वीच आयआरसीटीसी कंपनीने स्टॉक स्प्लिट जाहीर केले होते आणि त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांची नजर या स्टॉककडेच होती.

स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर आयआरसीटीसी स्टॉकमध्ये मोठी उलथा-पालथ बघायला मिळाली.

यावरून स्टॉक स्प्लिट हि नक्कीच एक महत्वाची गोष्ट असल्याचे आपल्या लक्षात येते.

स्टॉक स्प्लिट म्हणजे आहे तरी काय ?

आजच्या लेखात आपण स्टॉक स्प्लिट हि संकल्पना अभ्यासणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ? । What is Stock Split ?

स्प्लिट म्हणजे विभाजन होय.

स्टॉक स्प्लिट करतात म्हणजेच साध्या भाषेत शेअरचे तुकडे करतात.

उदा. माझ्याकडे टाटा मोटर्स कंपनीचे १० शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत १०० रुपये आहे.

आता टाटा मोटर्स कंपनीने आपल्या शेअरचे निम्यात विभाजन करायचे ठरवले तर काय होईल ?

१०० चे भाग होतील म्हणजे ५० आणि ५० म्हणजेच एका शेअरचे २ शेअर्स तयार होतील आणि प्रत्येक शेअरची किंमत असेल ५० रुपये.

अशाप्रकारे आता माझ्याकडे टाटा मोटर्स कंपनीचे एकूण २० शेअर्स होतील आणि प्रत्येक शेअरची किंमत असेल ५० रुपये.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

स्टॉक स्प्लिट प्रमाण

स्टॉक स्प्लिट जाहीर करताना कंपनी २:१,३:१, ५:१ अशा काहीश्या प्रमाणात जाहीर करते.

२:१ चा अर्थ होतो १ स्टॉक २ स्टॉक होणार तर ५:१ चा अर्थ होतो १ स्टॉकचे ५ स्टॉक होणार.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे १२ ऑगस्ट २०२१ रोजी आयआरसीटीसी स्टॉकमध्ये ५:१ स्टॉक स्प्लिटला व्यवस्थापनाकडून मंजुरी मिळाली होती.

स्टॉक स्प्लिट आणि फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डिव्हिडंड

स्टॉक स्प्लिट होत असतांना मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही सारख्याच प्रमाणात विभागल्या जातात.

उदा. टाटा मोटर्स कंपनीने २:१ स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहे असे आपण समजूया

टाटा मोटर्स शेअरची मार्केट व्हॅल्यू १०० रुपये तर फेस व्हॅल्यू, १० रुपये आपण गृहीत धरू.

२:१ स्टॉक स्प्लिट नंतर टाटा मोटर्स शेअरची मार्केट व्हॅल्यू ५० रुपये तर फेस व्हॅल्यू होईल ५ रुपये.

आयआरसीटीसी स्टॉक २८ ऑक्टोबर २०२१ रोजी, ५:१ अशा प्रमाणात विभागला गेला.

आयआरसीटीसी स्टॉकची आधीची फेस व्हॅल्यू होती १० रुपये तर स्प्लिट नंतरची फेस व्हॅल्यू आहे २ रुपये.

स्टॉक स्प्लिट आणि गुंतवणूक

मित्रांनो, स्टॉक स्प्लिटमध्ये आपण केलेली गुंतवणूक मात्र तेवढीच रहाते बरं का तेव्हा आपले शेअर्स स्टॉक स्प्लिट नंतर दुप्पट किंवा तिप्पट होणार म्हणून आपल्याला खूप जास्त उड्या मारण्याची गरज नाही.

आपण आता अगोदर बघितलेलेच टाटा मोटर्स कंपनीचे उदाहरण बघूया.

उदा. माझी स्टॉक स्प्लिट पूर्वी टाटा मोटर्स कंपनीत असणारी गुंतवणूक

शेअर्स =१०, शेअरची किंमत=१०० रुपये, एकूण गुंतवणूक =१०० * १० =१००० रुपये

१:२ स्टॉक स्प्लिट नंतर,

शेअर्स =२०, शेअरची किंमत = ५० रुपये, एकूण गुंतवणूक = ५० * २० =१००० रुपये

यावरून आपल्या असे लक्षात येते कि स्टॉक स्प्लिट केल्यामुळे आपल्या गुंतवणुकीत काहीही बदल होत नाही.

गुंतवणुकीत काहीही बदल होत नसला तरी कंपन्या स्टॉक स्प्लिट का करतात चला जाणून घेउया.

स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड

स्टॉक स्प्लिट होत असतांना आपली गुंतवणूक तेवढीच रहाते हे तर आपण बघितले याशिवाय आपल्याला मिळणारा एकूण डिव्हिडंड किंवा लाभांश देखील तेवढाच रहातो.

म्हणजेच मला जर टाटा मोटर्सच्या १० शेअर्सवर १०० रुपये डिव्हिडंड मिळत असेल तर स्टॉक स्प्लिटनंतर देखील मला मिळणारी डिव्हिडंडची रक्कम हि १०० रुपये इतकीच असेल.

डिव्हिडंडचा विषय प्रेफरन्स शेअर्स होल्डर्ससाठी महत्वाचा असतो हे आपल्याला माहीतच असेल.

स्टॉक स्प्लिट का करतात ?

स्टॉक स्प्लिट करण्याचे उद्देश :

१. मार्केटमधील स्टॉकची लिक्विडीटी वाढवणे म्हणजेच मार्केटमधील उपलब्ध स्टॉकची संख्या वाढवणे.

२. अधिकाधिक गुंतवणूकदारांना गुंतवणुकीत समाविष्ट करून घेणे किंवा गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देणे.

३. स्टॉकची देवाण-घेवाण अधिक सुलभ करणे.

आता या सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे बघूया.

एमआरएफ या प्रसिद्ध टायर्स ब्रॅन्डचं नाव आपण ऐकलेच असेल किंवा सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीच्या बॅटवर एमआरएफ ब्रॅन्डचं नाव नक्कीच बघितलं असेल. असो

मित्रांनो, एमआरएफ स्टॉकची किंमत आहे ७८,०००+ रुपये.

आता तुमच्या-माझ्यासारख्या लहान गुंतवणूकदारांना एवढा महाग स्टॉक घेणे अनेकदा शक्य होत नाही मात्र हाच एमआरएफ ७८ रुपयांना किंवा ७८० रुपयांना किंवा ७,८०० रुपयांना जरी भेटत असेल तरी लहानमोठे गुंतवणूकदार एमआरएफ मध्ये गुंतवणूक करू शकतील.

अशाप्रकारे शेअर्सची संख्या वाढवून आणि किंमत कमी करून कंपनी आपल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ करू शकते.

शेअर मार्केटमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणूकदाराव्यतिरिक्त अनेक लहान मोठे ट्रेडर्स देखील काम करतात या ट्रेडर्सला आकर्षित केल्यास कंपनीतील गुंतवणूक अजून जास्त वाढवता येते शिवाय कंपनीची प्रतिमा देखील सुधारते.

आपण ५०० ते १००० किंमत असणारे मोठ्या कंपन्यांच्या स्टॉकमधील रोजची शेअर्सची हालचाल आणि देवाण -घेवाण बघितल्यास आपल्या असे लक्षात येते कि एका ठराविक रेन्जमधील स्टॉकमध्ये मोठ्या व्हॉल्युममध्ये ट्रेडींग होत असते.

उदा. मी एमआरएफ कंपनीचे २ स्टॉक घेतल्यास मला जवळपास १,५०,००० गुंतवणूक करावी लागेल आणि विकतांना मला हि गुंतवणूक कमी करतांना एक तर पूर्ण स्टॉक विकावे लागतील किंवा अर्धे विकावे लागतील.

याउलट मी हे १,५०,००० रुपये १०० रुपये किंमत असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये अडकवले तर मी पाहिजे त्या प्रमाणात २०%, ३०%,५०% माझी गुंतवणूक कमी जास्त करू शकेल.

मित्रांनो स्टॉक स्प्लिटचा निर्णय हा सर्वस्वी कंपनीच्या व्यवस्थापनाचा असतो

स्टॉक स्प्लिट कधी करावा, कसा करावा यासाठी कुठल्याही प्रकारचे ठराविक नियम नाहीत.

स्टॉक स्प्लिट केल्यामुळे कंपनीच्या कारभारावर किंवा कंपनीच्या व्यवसाय किंवा तत्वांवर कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे स्टॉक स्प्लिट झाले म्हणून आपण कंपनीत गुंतवणूक करणे किंवा गुंतवणूक कमी करणे दोन्ही गोष्टी अयोग्य होय.

अशाप्रकारे आपण या लेखात स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ते अगदी व्यवस्थितपणे समजावून घेतले.

हा लेख वाचून आपल्या माहितीत वाढ झाली असेल अशी मी अपेक्षा करतो.

आपल्या सूचनां-सुधारणांचे देखील मी स्वागत करतो.

शेअर मार्केटची अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी पैसा झाला मोठा फेसबुक पेजला लाइक करा, टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा.

आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद !!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment