डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi

5/5 - (2 votes)

आपल्यापैकी बरेच लोक पूर्णवेळ शेअर मार्केटला वेळ देऊ शकत नाही.

स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग हा अशा लोकांसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग मध्ये स्टॉक घेतल्यानंतर ते काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत होल्ड केले जातात.

या पद्धतीत स्टॉक खरेदी केल्यानंतर स्टॉक मधील ट्रेण्ड संपेपर्यंत होल्ड केले जातात आणि ट्रेण्ड संपण्याचे संकेत मिळताच पोझिशन एक्झिट केली जाते.

असे म्हणतात कि हि एक अशी ट्रेडिंगची पद्धत आहे जिचा वापर करून निकोलस डरवास यांनी शेअर मार्केट मधून फक्त १८ महिन्यांत २० लाख डॉलर्स कमावले होते.

तुम्हाला निकोलस डरवास यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घ्यायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.

निकोलस डरवास

मित्रांनो, तुम्ही सुद्धा पार्ट टाइम ट्रेडर असाल तर हा लेख जरूर वाचा.

चला तर मग सुरुवात करूया.

डरवास बॉक्स थेअरी काय आहे?

डरवास बॉक्स थेअरी हि निकोलस डरवास यांनी शोधलेली एक जगप्रसिद्ध टेक्निकल ॲनालिसिसची पद्धत आहे.

डरवास यांच्या मते हि पद्धत कोणत्याही टाइम फ्रेमवर वापरता येऊ शकते असे असले तरी माझ्या मते स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी हि पद्धत सर्वात उपयुक्त पद्धत आहे.

निकोलस डरवास यांना स्टॉकच्या किमतींवरून चार्ट तयार करण्याची आणि स्टॉक मधील पॅटर्न ओळखण्याची कला अवगत होती.

डरवास यांची रिस्क मॅनेजमेंट अतिशय उत्तम होती आणि स्टॉक मधील ट्रेण्ड फॉलो करण्याच्या पद्धतीवर त्यांचा विश्वास होता.

या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे डरवास बॉक्स थेअरी होय.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

डरवास बॉक्स थेअरीचा आधार काय आहे?

डरवास बॉक्स थेअरी, टेक्निकल ॲनालिसिसच्या एका मुख्य नियमावर आधारित आहे तो नियम म्हणजे कोणत्याही स्टॉकची एक निश्चित दिशा असते आणि जोपर्यंत काही विपरीत घडत नाही तोपर्यंत तो स्टॉक त्याच दिशेने हालचाल करत असतो.

स्टॉकच्या या एकाच दिशेला होणाऱ्या हालचालीला स्टॉक मार्केटच्या भाषेत ट्रेण्ड असे म्हणतात.

‘ट्रेण्ड इझ युअर फ्रेण्ड’ हे प्रसिद्ध वाक्य आपण ऐकलंच असेल.

एका ओळीत सांगायचं झालं तर डरवास बॉक्स थेअरी म्हणजे “वाढणारे स्टॉक खरेदी करावे आणि घटनारे स्टॉक विकून टाकावे. “

डरवास म्हणतात कोणताही स्टॉक अपट्रेन्ड मध्ये असेल तर त्याची किंमत किती वाढू शकते याला कोणतीही मर्यादा नाही त्यामुळेच कोणताही स्टॉक खरेदी करण्यासाठी तो कधीही महाग नसतो.

डरवास बॉक्स थेअरी आपल्याला सांगते कि अपट्रेन्डमध्ये असणारा स्टॉक निवडा आणि स्टॉक अपट्रेन्ड मध्ये असेपर्यंत स्टॉक होल्ड करा.

डरवास बॉक्स पद्धत कशी वापरतात?

मित्रांनो, डरवास बॉक्स हि एक परीपूर्ण ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे.

सर्वात प्रथम मार्केटमधील सर्वात चांगले स्टॉक निवडले जातात.

स्टॉक निवडीचे निकष मी लेखात पुढे नमूद केले आहेत.

हि एक टेक्निकल ॲनालिसिस पद्धत असल्याने स्टॉकच्या किमतीचा चार्ट वापरला जातो.

आपण लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट इ. चार्ट वापरू शकतो.

डरवास बॉक्स पद्धतीत स्टॉक चार्टवर स्टॉकची एक ट्रेडिंग रेन्ज तयार केली जाते आणि त्या रेन्जभोवती एक बॉक्स तयार केला जातो.

स्टॉक जेव्हा हा बॉक्स तोडून बाहेर येतो त्यावेळी स्टॉकमध्ये खरेदी केली जाते.

एन्ट्री केल्यानंतर योग्य स्टॉप लॉस लावला जातो आणि स्टॉकची किंमत जसजशी वाढत जाईल तसतसा स्टॉप लॉस वरवर ट्रेल केला जातो.

ट्रेण्ड वीक झाल्याचा मोठा सिग्नल मिळाल्यास ट्रेड मधून बाहेर पडायचे असते किंवा स्टॉप लॉस मुळे पोझिशन एक्झिट होते.

तसेच स्टॉकची किंमत जशी वाढत जाते तशी स्टॉकमध्ये अजून जास्त खरेदी केली जाते आणि पोझिशन वाढवली जाते.

डरवास बॉक्स स्टॉक सिलेक्शन कसे करावे?

डरवास थेअरीमध्ये स्टॉक निवडण्यासाठी खालील निकष वापरतात

  • स्टॉक मजबूत उपट्रेंडमध्ये असावा.
  • आजपर्यंतची सर्वात जास्त किंमत असणारे (ऑल टाइम हाय) किंवा गेल्या ५२ आठवड्यांपासून सर्वात जास्त किंमत असणारे (५२ वीक हाय) स्टॉक.
  • ज्या सेक्टरची ग्रोथ काही दिवसांपासून चांगली दिसते आहे अशा सेक्टरचे स्टॉक.
  • फंडामेंटली स्ट्रॉंग असणारे स्टॉक.
  • चांगले व्यवस्थापन, लोकप्रिय उत्पादने आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्या.
  • स्टॉक मध्ये भरपूर व्हॉल्युम असावा किंवा लिक्विडीटी असावी.

डरवास बॉक्स कसा तयार करतात?

सर्वात प्रथम चार्टवर लगतच्या स्विंग पासून तयार होणारी रेंज किंवा पॅटर्न ओळखावा लागतो.

डरवास बॉक्स तयार करण्यासाठी आडव्या रेषा वापरून लगतचे स्विंग हाय आणि स्विंग लो जोडले जातात.

वरच्या लेव्हलला बॉक्सची सिलिंग म्हटले जाते आणि सिलिंग अगदी एखाद्या रेझिस्टन्स प्रमाणे काम करते याउलट खालच्या रेषेला फ्लोअर म्हणतात जी अगदी सपोर्ट लेव्हल प्रमाणे काम करते.

खाली मी डरवास बॉक्स तयार करून दाखवला आहे.

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi

आजकाल मार्केट खूप जास्त व्हॉलेटाईल झाल्याने कॅन्डलच्या हाय-लो ऐवजी मी कॅन्डलच्या क्लोझिंग विचारात घेऊन बॉक्स तयार करणे पसंत करतो.

डरवास बॉक्स पद्धतीत ट्रेडमध्ये एन्ट्री कशी करतात?

आता आपण ट्रेडमध्ये एन्ट्री कशी घ्यायची ते बघणार आहोत.

खाली मी डरवास बॉक्स आणि डरवास बॉक्स पद्धतीच्या सर्व महत्वाच्या गोष्टी दाखवल्या आहेत.

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi

आपल्याला चार्टवर बॉक्स तयार झाल्यानंतर बॉक्स वरच्या बाजूस ब्रेक होण्याची वाट बघायची आहे.

बॉक्स ब्रेक होतांना आपल्याला व्हॉल्युमकडे देखील लक्ष ठेवायचे आहे.

बॉक्स ब्रेकआऊट होण्यासाठी एक मोठी हिरवी कॅण्डल सिलिंग लेव्हलच्या वर जाऊन क्लोझ होणे गरजेचे आहे आणि त्या कॅन्डलचा व्हॉल्यूम सरासरीपेक्षा पुरेसा जास्त असला पाहिजे.

ब्रेकआऊट झाल्यानंतर आपण सिलिंग लेव्हल जवळ खरेदी करू शकतो.

डरवास बॉक्स पद्धतीत स्टॉप लॉस कसा लावतात?

स्टॉप लॉस लावण्यासाठी प्रत्येक ट्रेडरची आपली एक विशिष्ट पद्धत असते.

निकोलस बॉक्सची सिलिंग लेव्हल ब्रेक झाल्यानंतर खरेदी करण्याचा आणि सिलिंग लेव्हलचा स्टॉप लॉस लावण्याची पद्धत वापरत.

मी मात्र ब्रेकआऊट कॅन्डलच्या बॉटम लेव्हलला स्टॉप लॉस लावणे जास्त पसंत करतो.

अनेक ट्रेडर सर्वात जवळचा स्विंग लो स्टॉप लॉस म्हणून वापरतात.

डरवास बॉक्स थेअरी चार्टवर

मित्रांनो, आपण आता डरवास बॉक्स थेअरी चार्टवर बघणार आहोत.

आपल्यासोबत माइंड ट्री कंपनीचा डेली चार्ट आहे.

चार्टवर निळ्या रंगाने बॉक्स तयार केले आहेत.

एन्ट्री लेव्हल मी हिरव्या रंगाने दाखवली आहे तर स्टॉप लॉस लाल रंगाने मार्क केला आहे.

११९३ हि माइंड ट्री कंपनीच्या स्टॉकची ऑगस्ट २०२० महिण्यापर्यंत सर्वाधिक किंमत होती.

सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात स्टॉक नवीन उच्चाक गाठला मात्र स्टॉक मधील व्हॉल्युम मात्र किंमतीला सपोर्ट करताना दिसत नाही.

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi
(१)

१४ सप्टेंबर २०२० रोजी मात्र स्टॉकने बॉक्स वरच्या बाजूला ब्रेक केला आहे आणि स्टॉक मधील व्हॉल्युम देखील सरासरीपेक्षा जास्त आहे.

मित्रांनो, हे सर्व संकेत आहे स्टॉक अपट्रेन्डमध्ये असल्याचे, स्टॉक मध्ये मोठी हालचाल होणार असल्याचे म्हणजेच स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्याचे.

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi
(२)

खालील दिलेल्या चार्टवर मी स्टॉकमध्ये पुढे झालेली प्राइस ॲक्शन दाखविली आहे.

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi
(३)

हिरव्या रंगाने मी अशा लेव्हल दाखवल्या आहेत जिथे आपण स्टॉकमध्ये एन्ट्री घेऊ शकतो किंवा स्टॉकमध्ये पोझिशन वाढवू शकतो.

लाल रंगाने दाखवलेल्या लेव्हलला आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे.

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi
(४)

वरील चार्टवर आपण बघू शकतो कि स्टॉप लॉस लेव्हल हिट झाली आहे म्हणजेच आपली पोझिशन एक्झिट झाली आहे.

स्टॉप लॉस गेला तेव्हाची लेव्हल आहे १९९० आणि पहिली एन्ट्री लेव्हल आहे १२१४ तसेच एन्ट्री नंतरची पहिली स्टॉप लॉस लेव्हल आहे ११९३.

आता आपण रिस्क-रिवॉर्ड विचारात घेऊ.

रिस्क : रिवॉर्ड :: २१ : ७७६ म्हणजेच जवळपास १ : ३६

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi
(५)

इतर लेव्हल वर एन्ट्री घेतल्यास होणार फायदा-तोटा आणि रिस्क-रिवॉर्ड यांचं गणित मी आपल्यावर सोडतो.

डरवास बॉक्स पद्धतीच्या उणीवा काय आहेत?

अनेक लोक निकोलस डरवास यांनी जेव्हा डरवास बॉक्स थेअरी वापरून भरपूर पैसे कमावले तेव्हा शेअर मार्केटमध्ये बुलिश रन असल्याचे समजतात.

रेन्ज बाउंड किंवा चॉपी मार्केटमध्ये हि थेअरी खूप चांगले काम करत नाही असे समजले जाते.

मित्रांनो, अशाप्रकारे आपण आज डरवास बॉक्स थेअरी अतिशय सविस्तरपणे बघितली, या थेअरीचा वापर आपण ट्रेडींगसाठी कसा करू शकतो तेदेखील बघितले.

आपल्याला डरवास बॉक्स थेअरी विषयी काहीही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

मला आशा आहे कि या लेखातून आपल्याला ट्रेडींगसाठी उपयुक्त माहिती मिळाली असेल.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाइक करा.

आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment