लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय मराठी? । What is life insurance in Marathi? । टर्म लाईफ इन्शुरन्स

5/5 - (3 votes)

नमस्कार मित्रांनो,

पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

“घडीचा भरवसा नाही, आज आहे उद्या नाही”

माणसाच्या जीवनाविषयी वयस्कर माणसांकडून अनेकदा असे बोलणे आपण ऐकले असेल.

कटू असले तरी हे जीवनाचे सत्य आहे कारण मृत्यू हाच विश्वातील सर्वात मोठा आविष्कार आहे.

आपल्यापैकी अनेक लोकांवर आपल्या बायको-मुलांची, आई-वडिलांची, भावंडाची जबाबदारी असते.

दुर्दैवाने आपला अकस्मात मृत्यू झाल्यास आपल्या कुटुंबीयांची भयंकर वाताहत होऊ शकते तेव्हा आपल्या पाठीमागे आपले आप्त-स्वकीय व्यवस्थित जीवन जगू शकतील अशी तजवीज करणे आपली जबाबदारी आहे.

आपल्यामागे आपल्या कुटुंबाला सुरक्षित करण्यास आपल्याला मदत होते लाईफ इन्शुरन्सची.

लाईफ इन्शुरन्सलाच आपण जीवन विमा असेदेखील म्हणतो.

चला तर मग या लेखात माहिती घेऊया लाईफ इन्शुरन्सची.

लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय ? | What is Life Insurance ?

लाईफ इन्शुरन्स (जीवन विमा) हा पॉलिसीधारक आणि इन्शुरर (विमाकर्ता) यांच्यातील एक करार आहे, जो पॉलिसी होल्डर (विमाधारक) व्यक्तीच्या मृत्यूनंतर नियुक्त लाभार्थीला निर्धारित रक्कम देण्याचे वचन देतो.

उदा. आपण असे समजूया कि मी मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचा लाईफ इन्शुरन्स घेतला आहे असे आपण समजूया.

पॉलिसी होल्डर किंवा इन्शुअर्ड : सुरज पठाडे

इन्शुरर किंवा विमाकर्ता : मॅक्स लाईफ इन्शुरन्स

प्रति वर्ष प्रीमियम : १०,००० रुपये

इन्शुर्ड सम किंवा विमा रक्कम : १० लाख रुपये

आता दुर्दैवाने माझा इन्शुरन्सने सुरक्षित केलेल्या काळात मृत्यू झाला तर माझ्यामागे माझ्या कुटुंबाला १० लाख रुपये रक्कम मदत म्हणून मिळेल.

मला आशा आहे इन्शुरन्स आता थोडयाफार प्रमाणात तुम्हाला कळाला असेल.

लाईफ इन्शुरन्सचे प्रकार । Types of Insurance

मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स विषयी आपल्यापैकी काही लोकांना माहिती देखील असेल मात्र लाईफ इन्शुरन्सचे देखील विविध प्रकार असतात हे अनेक लोकांना माहित नसेल तेव्हा आता आपण लाईफ इन्शुरन्सचे काही प्रकार बघूया.

१. टर्म इन्शुरन्स । Term Insurance

टर्म इन्शुरन्स प्लॅन पॉलिसी होल्डरच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतात.

अशाप्रकारे टर्म इन्शुरन्स आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे भविष्य सुरक्षित करतो.

टर्म इन्शुरन्स हा पूर्णपणे सुरक्षा पुरवण्याच्या हेतूने तयार केला गेलेला प्लॅन आहे.

टर्म इन्शुरन्सचा हफ्ता देखील इतर इन्शुरन्सच्या तुलनेत कमी असतो.

टर्म इन्शुरन्स आपल्या वयावर अवलंबून असल्याने आपण जितक्या लवकर लाईफ इन्शुरन्स घेऊ तितका इन्शुरन्सचा प्रिमिअम कमी असतो.

अनेक तद्द आपण स्वतःच्या पायावर उभे राहिल्यास किंवा कमावते झाल्यास लगेचच लाईफ इन्शुरन्स घेण्याचा सल्ला देतात.

टर्म इन्शुरन्स आपल्या कुटुंबाला आपल्या मागे होमलोन, कारलोन, शैक्षणिक खर्च, लग्न असे विविध खर्च भागवण्यासाठी मदत करतात.

अनेक इन्शुरन्स प्लॅन जास्तीची रक्कम घेऊन अपघातासाठी तसेच दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी देखील आपल्याला पैसे देऊ करतात.

२. एंडोमेंट प्लॅन । Endowment Plan

या प्लॅनमध्ये टर्म इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध असतेच याशिवाय बचतीचा समावेश असतो.

या पॉलिसीमध्ये आपल्याला पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर मोठी रक्कम बचतीच्या स्वरूपात उपलब्ध होते.

या पॉलिसीमुळे आपल्याला आपण भरलेल्या प्रीमियमची रक्कम बचतीच्या स्वरूपात परत मिळते मात्र या सुविधेमुळे टर्म प्लॅनपेक्षा या पॉलिसीचा प्रिमिअम दोन ते तीन पट अधिक जास्त असतो.

एंडोमेंट प्लॅनच्या मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम इन्कम टॅक्स ऍक्ट १९६१ च्या अंतर्गत करमुक्त किंवा टॅक्स फ्री असते.

म्हणजेच पॉलिसीच्या काळात आपला मृत्यू झाल्यास आपल्या वारसाला ठरलेली रक्कम मिळते तर सुदैवाने आपण पॉलिसीची मुदत पूर्ण करू शकलो तर आपल्याला मोठी रक्कम मिळते.

३. युलिप्स (ULIP) – युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन

युलिप्स योजना थोडयाफार प्रमाणात एंडोमेंट प्लॅन सारखीच आहे.

एन्डोमेन्टमध्ये आपल्याला सुरक्षा आणि बचत या दोन्ही गोष्टींचा संगम आढळतो तर युलिप्स योजनेत आपल्याला सुरक्षा आणि गुंतवणूक या दोन गोष्टींचे मिश्रण आढळते.

युलिप्स योजनेद्वारे आपण आपल्या जोखीम स्विकारण्याच्या तयारी अनुसार शेअर मार्केट, बॉण्ड्स, हायब्रीड फंडस् इ अशा ठिकाणी गुंतवू शकतो.

४. मनीबॅक इन्शुरन्स प्लॅन

मनीबॅक इन्शुरन्स प्लॅन हा एंडोमेंट प्लॅन सारखाच एक प्लॅन आहे किंवा एन्डोमेन्ट प्लॅनचाच एक प्रकार आहे असे आपण म्हणू शकतात.

“जिंदगी के साथभी जिंदगी के बाद भी”

हि ओळ या प्लॅनला अगदी योग्य असल्याचे आपण म्हणू शकतो.

या प्लॅनमध्ये आपण इन्शुरन्स प्रिमिअमच्या स्वरूपात जी काही बचत करतो त्या बचतीचा काही हिस्सा आपल्याला बक्षिसाच्या स्वरूपात परत मिळत असतो.

मनीबॅक प्लॅनमधून आपल्याला मासिक किंवा वार्षिक परतावा मिळू शकतो आणि म्हणून मग आपल्या उत्पनात थोडीफार वाढ होऊ शकते.

मनी बॅक प्लॅन ही जीवन विमा हि अशी एक पॉलिसी आहे ज्या पॉलिसीत विमाधारक व्यक्तीला ठराविक अंतराने विमा रकमेची टक्केवारी मिळते.

पॉलिसीद्वारे मिळणारे पैसे हे करमुक्त असतात हा या पॉलिसीचा आणखी एक फायदा होय.

५. होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन । Whole Life Insurance Plans

होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन म्हणजे संपूर्ण जीवनासाठी घेतलेली विमा पॉलिसी.

संपूर्ण जीवन म्हटले असले तरी हे इन्शुरन्स आपल्याला वयाच्या फक्त ९९ वर्षेच संरक्षण पुरवत असतात.

हा प्लॅन अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना असे वाटते कि आपल्यावर उतार वयात देखील म्हणजे ६० वर्षानंतर देखील कुटुंबाची जबाबदारी असणार आहे.

याशिवाय या पॉलिसीमुळे आपण जाताना आपल्या वारसांसाठी एक मोठी संपत्ती मागे सोडून जाऊ शकतो.

६. चाईल्ड इन्शुरन्स प्लॅन्सChild Insurance Plans

चाईल्ड इन्शुरन्स प्लॅन आपल्याला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी मदत करतात.

आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मोठ्या रक्कमेची गरज पडू शकते अशावेळी या योजना आपल्याला उपयोगी पडतात.

मुलांना संरक्षण हा या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे या योजनेचा प्रिमिअम पालकांनी भरला असल्याने पॉलिसीच्या मुदतीदरम्यान दुर्दैवी घटना घडल्यास आणि विमाधारक पालकांचे निधन झाल्यास, मुलाच्या संगोपन खर्चाची पूर्तता करण्यासाठी चाइल्ड प्लॅन त्वरित पैसे देऊ शकतात.

लाईफ इन्शुरन्स कोणी घ्यावा ? | Who Should Buy Insurance ?

मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स असणे महत्वाचे आहे हे आपल्या एव्हाना लक्षात आलेच असेल म्हणून मग प्रत्येकाने इन्शुरन्स घ्यायचा का ? नाही.

आपल्या सारख्या मध्यमवर्गीय लोकांना घरातील सर्वांचा विमा काढणे परवडणारे नाही शिवाय सर्वांचा विमा काढण्यात काही फायदा देखील दिसत नाही.

सर्वसाधारणपणे कुटुंबातील कर्त्या किंवा कमावत्या माणसाचा लाईफ इन्शुरन्स काढलेला असावा असा सल्ला अर्थ तद्द देतात.

कुटुंबाची जबाबदारी मुख्यतः कमावत्या पुरुषावर किंवा स्त्रीवर अवलंबून असते हे आपण समजू शकतो.

अशावेळी घरातील किमान अशा व्यक्तीचा तरी इन्शुरन्स असल्यास, घरातील कमवता माणूस गेला तरी इन्शुरन्स पॉलिसीमुळे मिळणाऱ्या रक्कमेवर कुटुंब जीवनयापन करू शकेल.

लाईफ इन्शुरन्स किती घ्यावा ? | What Should be the Sum Assured ?

मित्रांनो, आपल्यामागे कुटुंबाला पुरेशी रक्कम मिळणे गरजेचे आहे तेव्हा पॉलिसी खरेदी करताना किती रक्कमेची खरेदी करावी हा महत्वाचा प्रश्न आहे.

उगाचच इन्शुरन्स एजंट सांगतात म्हणून मोठमोठ्या रक्कमेच्या पॉलिसी घेण्यात काहीही फायदा नसतो.

आपण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २० पट ते ३० पट एवढ्या रक्कमेचाच इन्शुरन्स घेणे शहाणपणाचे ठरते जेणेकरून आपले कुटुंब येत्या २०-२५ वर्षांकरिता लागणाऱ्या आर्थिक गरजा सहज भागवू शकेल.

उदा. माझे वार्षिक उत्पन्न जर ३ लाख रुपये म्हणजे २५,००० / महिना असेल तर मी साधारणपणे किमान ३० लाख , उत्तम ६० लाख किंवा कमाल ९० लाख रुपये

लाईफ इन्शुरन्स कालावधी । Period of Life Insurance

मित्रांनो, अनेक कंपन्या अगदी वयाच्या ९९ वर्षापर्यंतचे संरक्षण देऊ करतात पण व्यवस्थितपणे विचार केल्यास आपल्या असे लक्षात येते कि एवढ्या मोठ्या कालावधीचा इन्शुरन्स घेण्याची खरंच गरज असते का ?

साधारणपणे वयाच्या ६० वर्षापर्यंत आपल्यावर आपल्या कुटुंबियांची जबाबदारी असते असे मला वाटते.

उदा. राजू नावाचा आपला एक मित्र आहे ज्याचे वय ३० वर्षे आहे.

राजूचा बायको आणि एक मुलगी असा तीन लोकांचा आनंदी संसार आहे.

राजुची मुलगी आजरोजी १ वर्षाची आहे म्हणजे राजू ६० वर्षाचा होईपर्यंत ती समजदार होऊन नक्कीच स्वतःच्या पायावर उभी असेल किंवा राजू आपल्या मुलीच्या जबाबदारीतून मुक्त झाला असेल.

आपण जितक्या जास्त वयापर्यंत पॉलिसीचा कालावधी घेतो तितकाच आपला हफ्ता जास्त वाढतो कारण वयानुसार कोणत्याही व्यक्तीला आजार होण्याची आणि व्यक्ती दगावण्याची शक्यता अधिक असते.

६० वर्षानंतर इन्शुरन्स घेऊन त्यात पैसे घालवण्यापेक्षा आपण हेच जास्तीचे पैसे रिटायरमेंट फंड किंवा गुंतवणुकीसाठी वापरलेले अधिक चांगले नाही का.

लाईफ इन्शुरन्स कधी घ्यावा ? । When Should You Buy A Life Insurance ?

मित्रांनो, जसजसे आपले वय वाढते तसतसे शरीर कमजोर होत जाते आणि आपण मृत्यू पावण्याची शक्यता वाढत जाते.

अगोदरच सांगितल्याप्रमाणे लाईफ इन्शुरन्सचा प्रिमिअम वयानुसार वाढत जातो तेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभे राहिल्याबरोबर किंवा कमावते झाल्याबरोबर सर्वात प्रथम लाईफ इन्शुरन्स घ्यावा असा सल्ला दिला जातो.

लाईफ इन्शुरन्सचा प्रिमिअम हा पॉलिसी घेतेवेळीच निश्चित केला जातो आणि संपूर्ण पॉलिसीच्या काळात तो स्थिर असतो.

सर्वसाधारणपणे वयवर्षे ३० होईपर्यंत आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेऊन टाकावी असे माझे मत आहे जेणेकरून आपल्याला जास्त प्रिमिअम भरवा लागत नाही.

लाईफ इन्शुरन्स आणि टॅक्स । Life Insurance and TAX

लाईफ इन्शुरन्स कर नियोजनात महत्वाची भूमिका बजावतात कारण इन्कम टॅक्स ऍक्ट १९६१ मधील तरतुदीनुसार आपण लाईफ इन्शुरन्ससाठी भरलेली रक्कम कर भरताना करमुक्त करून घेऊ शकतो.

याशिवाय लाईफ इन्शुरन्स योजनांपासून मुदत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जी बचतीची किंवा गुंतवणुकीची किंवा आर्थिक मदत म्हणून जी रक्कम मिळते तीदेखील करमुक्त असते.

आता आपण इन्शुरन्सशी निगडित काही महत्वाच्या तरतुदी बघूया.

कलम ८०सी : सेक्शन ८० सी च्या अंतर्गत असणाऱ्या तरतूदींनुसार आपण लाईफ इन्शुरन्ससाठी भरलेल्या प्रिमिअमचा समावेश करमुक्त उत्पनात करू शकतो. सेक्शन ८० सी अंतर्गत आपल्याला १,५०,००० उत्पन्नावर करसवलत मिळवता येते.

कलम ८० सीसीसी : आपण आपल्या करपात्र उत्पन्नातून `१,५०,०००/- च्या मर्यादेपर्यंत पेन्शन पॉलिसींसाठी भरलेल्या प्रीमियममध्ये वजावट मिळवू शकता. प्लॅनचे सरेंडर किंवा मिळालेले पेन्शन/ अॅन्युइटी मात्र प्रचलित कर कायद्यानुसार करपात्र आहेत.

कलम ८०सीसीइ : या कलमांतर्गत, कलम ८०सी, ८० सीसीसीआणि ८० सीसीडी (१) अंतर्गत वजावटीची एकूण मर्यादा `१,५०,०००/- आहे.

कलम १०(१०डी): लाइफ इन्शुरन्स पॉलिसींमधून मिळणारे पैसे कलम १०(१०डी) च्या अटींच्या अधीन राहून करमुक्त आहेत.

कलम १०(१०अ ): पेन्शन पॉलिसीच्या कम्युटेशनवर प्राप्त झालेले उत्पन्न करातून मुक्त केले गेले आहे.

टॉप १० जीवन विमा /लाईफ इन्शुरन्स कंपन्या | Top 10 Life Insurance Companies

  • भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India)
  • मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी (Max Life Insurance Company)
  • एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी (HDFC Life Insurance Company)
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स (ICICI Prudential Life Insurance)
  • टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी (Tata AIA Life Insurance Company)
  • भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स कंपनी (Bharti Axa Life Insurance Company)
  • बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी (Bajaj Allianz Life Insurance Company)
  • एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी (SBI Life Insurance Company)
  • रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी (Reliance Nippon Life Insurance Company)
  • एगॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी (Aegon Life Insurance Company)

आर्थिक उन्नतीसाठी अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ची लिंक बुकमार्क करा, आणि ‘पैसा झाला मोठा’ ॲप डाउनलोड करा.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

याशिवाय पैसा झाला मोठा युट्युब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका.

आपण वेळातवेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment