थ्री व्हाइट सोल्जर्स मराठी | Three White Soldiers in Marathi

5/5 - (1 vote)

मित्रांनो, या लेखात आपण आणखी एक महत्वाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नची ओळख करून घेणार आहोत त्या पॅटर्नच नाव आहे थ्री व्हाइट सोल्जर्स.

थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तीन हिरव्या कॅन्डलस्टिक पासून तयार होतो म्हणजेच हा एक ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.

आपण थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तयार कसा होतो आणि त्याचा वापर आपण ट्रेडिंगसाठी कसा करू शकतो त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

खालील चित्रात मी थ्री व्हाइट सोल्जर्स कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.

थ्री व्हाइट सोल्जर्स | Three White Soldiers

आपण चित्रात बघू शकतो हा पॅटर्न लगतच्या तीन हिरव्या कॅण्डल पासून तयार झाला आहे.

आता आपण हा पॅटर्न तयार कसा होतो ते सविस्तरपणे बघूया

सोयीसाठी मी सर्व कॅण्डलला एक, दोन, तीन असे क्रमांक दिले आहेत.

पहिल्या क्रमांकाची कॅण्डल एक हिरवी कॅण्डल आहे आणि या कॅन्डलेपासूनच आपला पॅटर्न तयार होण्याची सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या कॅन्डलची सुरुवात हि पहिल्या कॅन्डलच्या वरच्या निम्या भागात झाली आहे.

दुसऱ्या कॅन्डलची सुरुवात निम्याहुन खालच्या भागात झाल्यास मार्केटमधील बेअर्सची बरीच ताकद शिल्लक असल्याचे आपण समजू शकतो म्हणून दुसऱ्या कॅन्डलची सुरुवात हि वरील ५०% भागात होणे गरजेचे आहे.

दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग हि गॅपअप किंवा गॅपडाउन असू शकते.

याशिवाय दुसऱ्या कॅन्डलची क्लोझिंग प्राइस हि पहिल्या कॅन्डलच्या हाय प्राइसपेक्षा जास्त असणे गरजेचे.

यालाच आपण हायरहाय तयार होणे असे देखील म्हणू शकतो.

वरील सर्व नियम तिसरी कॅण्डल तयार होतांना सुद्धा लागू होतात.

म्हणजेच तिसरी कॅण्डल दुसऱ्या कॅन्डलच्या वरच्या भागात ओपन व्हायला हवी आणि तिची क्लोझिंग प्राइस हि दुसऱ्या कॅन्डलच्या हाय प्राइसपेक्षा अधिक असायला हवी.

सर्वात महत्वाचं म्हणजे या तीनही कॅन्डलने आपल्या अगोदरच्या कॅन्डलचा लो ब्रेक करता कामा नये.

अशाप्रकारे थ्री व्हाइट सोल्जर्स कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

थ्री व्हाइट सोल्जर्स आणि व्हॉल्युम

मित्रांनो, आता आपण थ्री व्हाइट सोल्जर्स आणि व्हॉल्युम यांच्यातील संबंध बघूया.

थ्री व्हाइट सोल्जर्स आणि व्हॉल्युम

मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे कि व्हॉल्युम हा स्टॉकमधील ट्रेण्डची ताकद दाखवतो म्हणूनच इतर पॅटर्न प्रमाणे या पॅटर्नमध्ये देखील व्हॉल्युमला विशेष महत्व आहे.

या पॅटर्नमध्ये प्रत्येक कॅन्डलचा व्हॉल्युम देखील चढत्या क्रमाने असल्यास स्टॉकमध्ये तेजी येण्याची शक्यता अधिक दृढ होते.

याउलट व्हॉल्युम जर कमी होत असेल तर आपण खरेदीपूर्वी अजून जास्त वाट बघण्याची गरज आहे कारण कमी होणारा व्हॉल्युम स्टॉकमध्ये वाढलेल्या किंमतीवर खरेदी करण्याची मानसिकता कमी होत असल्याचे दर्शवतो तेव्हा आपण ट्रेड घेण्यापूर्वी काही काळ थांबलेलेच बरे नाही का ?

मित्रांनो, कधी कधी आपल्याला चार्टवर शेवटच्या कॅन्डलचा व्हॉल्युम इतर दोन्ही कॅन्डलपेक्षा जास्त मात्र दुसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्युम पहिल्या कॅन्डलपेक्षा कमी झालेला आढळतो मात्र हा देखील खरेदीसाठी एक चांगला संकेत समजला जाऊ शकतो.

व्हॉल्युम अजून चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी मी खाली व्हॉल्युमचे काही प्रकार देत आहे.

थ्री व्हाइट सोल्जर्स आणि व्हॉल्युम । Three white soldiers and Volume

मित्रांनो, व्हॉल्युम शिवाय कॅण्डल कशा तयार होत आहेत यावरून सुद्धा थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्नचे काही प्रकार पडतात ते खालील प्रमाणे.

थ्री व्हाइट सोल्जर्स  । Three white soldiers
थ्री व्हाइट सोल्जर्स  । Three white soldiers

स्टॉल्ड पॅटर्न

पहिल्या चित्रात मी स्टॉल्ड पॅटर्न दाखवला आहे.

आपण बघू शकतो कि थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तयार होत असताना सुरवातीच्या दोन कॅण्डल बुलिश मोमेन्टम दाखवत आहेत मात्र तिसरी कॅण्डल हि शॉर्ट कॅण्डल तयार झाली आहे.

शॉर्ट कॅण्डल तयार झाल्यामुळे आपण बुल्समध्ये आता स्टॉकची किंमत अजून वर ढकलण्याची ताकद राहिली नसल्याचे म्हणू शकतो.

म्हणूनच स्टॉल्ड कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर आपण अजून चांगला तेजीचा संकेत मिळण्याची वाट बघणे अधिक योग्य ठरते.

ॲडव्हानसिंग ब्लॉक

दुसऱ्या चित्रात मी ॲडव्हानसिंग ब्लॉक पॅटर्न दाखवला आहे.

ॲडव्हानसिंग ब्लॉकचा अर्थ सैनिकांची होणारी आगेकूच तात्पुरती थांबली आहे.

चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण बघू शकतो कि थ्री व्हाइट सोल्जर्स समोर एक रेझिस्टन्स लेव्हल तयार झाली आहे आणि बुल्सला स्टॉकची किंमत या रेझिस्टन्स लेव्हलच्या वर ढकलण्यासाठी अजून जास्त जोर लावण्याची गरज असल्याचे दिसते आहे.

त्यामुळेच आपण हि रेझिस्टन्स लेव्हल ब्रेक होण्याची वाट बघायची आहे आणि नंतरच ट्रेडमध्ये एन्ट्री घ्यायची आहे.

आपल्याला वरील पैकी कोणताही पॅटर्न आढळल्यास आपण ट्रेण्ड कन्फर्म होण्याची वाट बघायची आहे.

मित्रांनो, एका मोठ्या डाउनट्रेंड नंतर थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तयार झाल्यास स्टॉकमधील ट्रेण्ड बदलणार असल्याचा तो एक संकेत आहे.

याशिवाय जर स्टॉक रेन्जमध्येच ट्रेड होत असेल आणि जर थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तयार झाला तर ती एक नव्या अपट्रेन्डची सुरवात असू शकते.

आपण जर अगोदरच स्टॉकमध्ये खरेदी केली असेल तर चार्टवर थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तयार होणे आपल्यासाठी आनंदाची बातमी होय कारण हा एक ट्रेण्ड कॉन्टीनुएशनचा संकेत असून अजून जास्त प्रॉफिट होण्याची शक्यता असल्याचे आपण समजू शकतो.

याउलट स्टॉल्ड पॅटर्न आणि ॲडव्हानसिंग ब्लॉक पॅटर्न तयार झाल्यास आपण आपली लॉन्ग पोझिशन कमी करण्यासाठी किंवा प्रॉफिट बुक करण्यासाठी सावध रहाण्याचा तो एक संकेत आहे.

आता आपण थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न चार्टवर बघूया.

थ्री व्हाइट सोल्जर्स | Three White Soldiers
थ्री व्हाइट सोल्जर्स | Three White Soldiers

आपण बघू शकतो कि टाटा स्टील कंपनीचा स्टॉक बरेच दिवसांपासून एका रेंजमध्येच ट्रेड करत होता मात्र चार्टवर अतिशय सुरेख थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तयार झाला आहे.

आपण व्हॉल्युमकडे एक नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल कि स्टॉकच्या किमतीबरोबरच स्टॉक मधील व्हॉल्युम सुद्धा वाढला आहे, वाढलेला व्हॉल्युम वरच्या किमतीवर देखील स्टॉक मधील खरेदीची मानसिकता दर्शवतो.

स्टॉक मधील अपट्रेन्ड कन्फर्म होताच बुल्स नि मार्केटमध्ये भरपूर खरेदी करत स्टॉकची किंमत अजून जास्त उंचीवर नेऊन ठेवली.

चार्टवर थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न स्टॉकच्या सपोर्टजवळ तयार झाल्यास तो अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतो.

अशाप्रकारे आपल्याला थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न आढळल्यास आपण स्टॉक मध्ये खरेदी करू शकतो.

थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न हा एक अतिशय बुलिश पॅटर्न समजला जातो आणि त्यामुळेच कि काय हा एक अतिशय लोकप्रिय पॅटर्नदेखील आहे.

असे असले तरी कोणत्याही कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करताना आपण पॅटर्न तयार होण्यामागे असणारी बाजाराची मानसिकता लक्षात घेणे गरजेचे आहे.

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण थ्री व्हाइट सोल्जर्स कॅन्डलस्टिक पॅटर्न समजावून घेतला.

आपण आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाइक करा.

आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment