मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | Muhurta Trading in Marathi

3/5 - (1 vote)

नमस्कार बंधू-भगिनींनो,

‘पैसा झाला मोठा’ च्या नव्या कोऱ्या लेखात आपले सहर्ष स्वागत आहे.

“दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा”

मित्रांनो दिवाळी जवळ येते आहे आणि दिवाळी म्हटलं कि दिव्यांची आरास, घराची सजावट, आतषबाजी, मिठाई आणि बरंच काही.

आपल्या संस्कृतीप्रमाणे दिवाळी म्हणजे आपल्या घरी सोनपावलांनी येणारी लक्ष्मी आणि धनलाभ होय.

उद्योग आणि व्यापारी वर्गासाठी तर लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय उत्साहाचा आणि चैतन्याचा दिवस होय.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला दिवसभर सुट्टी असते मात्र या खास दिवशी खास ट्रेडींग सेशन आयोजित केलेले असते.

आपण या लेखात याच ट्रेडींग सेशनची माहिती घेणार आहोत.

चला तर मग करूया श्रीगणेशा

मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | What is Muhurt Trading?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला दिवसभर सुट्टी असते मात्र या खास दिवशी एनएसइ आणि बीएसइ द्वारे खास ट्रेडींग सेशन आयोजित केलेले असते आयोजनाला मुहूर्त ट्रेडींग असे म्हणतात.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

मुहूर्त ट्रेडींगचा इतिहास | History of Muhurt Trading

मुहूर्त ट्रेडींग म्हणजे शेअर मार्केटमधील ५० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे.

मुहूर्त ट्रेडींगची हि पद्धत गुजराथी संस्कृतीतून शेअर बाजारात रुजली आहे असे समजते.

पूर्वीच्या काळी जेव्हा स्क्रीनसमोर बसून ट्रेडींग करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा गुंतवणूकदार स्टॉक एक्सचेन्ज जवळ जमा होत आणि गुंतवणूक करत नवीन वर्षाचे स्वागत करत.

मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९५७ पासून बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जमध्ये झाली असे म्हणतात.

गेल्या १५ मुहूर्त ट्रेडींग सेशनपैकी ११ वेळा मार्केट वर तर फक्त वेळा खाली जाऊन क्लोझ झाले आहे.

मुहूर्त ट्रेडींगचे महत्व

अनेक व्यापार्‍यांचा असा विश्वास आहे की मुहूर्ताच्या वेळी, ग्रह-तारे अशा प्रकारे एकत्र येतात की या काळात होणारे व्यापार किंवा इतर कोणतेही कार्य वाईट शक्तींच्या प्रभावापासून मुक्त असते आणि या काळात जो कोणी बाजारात गुंतवणूक करतो त्याची भरभराट होण्याची शक्यता जास्त असते.

असे मानले जाते की मुहूर्त ट्रेडींग आपल्यासाठी वर्षभराच्या समृद्धी आणि संपत्तीचा ठेवा देऊन जाते.

या दिवशी टोकन ट्रेडींग केल्याने संपत्तीची देवता माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली भरभराट होते अशी शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांची श्रद्धा आहे.

मुहूर्त ट्रेडींग दरम्यान व्हॉल्यूम कमी असतांना देखील मार्केट एका चांगल्या स्तरावर क्लोझ झाल्याचा आजवरचा इतिहास आहे.

मुहूर्त ट्रेडींगमुळे बाजारात एक नवचैतन्य येण्याला मदत होते.

मुहूर्त ट्रेडींगची वेळ

आपल्या माहितीप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सकाळी ९:०० ते दुपारी ३:३० या काळातच ट्रेडींग करता येत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मात्र मुहूर्त ट्रेडींग हिन्दू पंचांगाप्रमाणे काढलेल्या मुहूर्त काळात पार पडते.

सर्वसाधारणपणे एक तास शेअर मार्केट ट्रेडींगसाठी खुले असते आणि हा एक तास संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तानुसार असतो.

सुरवातीची १५ मिनिटे ब्लॉक डील सेशन असते त्यानंतरची ७-८ मिनिटे मार्केट प्री-ओपन सेशन असते.

मुहूर्त ट्रेडींगची वेळ २०२१ | Muhurt Trading Timings 2021

या वर्षीच्या दिवाळीपासून हिंदू कॅलेंडर वर्षानुसार संवत २०७८ चे आगमन होणार आहे.

या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग ४ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६:१५ ते ७:१५ दरम्यान पार पडणार आहे.

ब्लॉक डील सेशन संध्याकाळी ५: ४५ ते संध्याकाळी ६:०० पर्यंत चालणार आहे.

मार्केट प्री-ओपन सेशन संध्याकाळी ६:०० ते ६:०८ दरम्यान पार पडणार आहे.

त्यानंतर संध्याकाळी ७:१५ पर्यंत ट्रेडींग चालू राहील.

मार्केट क्लोझिंग सेशन संध्या ७:२५ ते संध्या ७:३५ दरम्यान पार पडेल.

अधिक माहितीसाठी आपण एनएसइ च्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

मुहूर्त ट्रेडींगसाठी स्टॉक कसे निवडावे ? | How to Select Stocks for Muhurt Trading

मुहूर्त ट्रेडींगसाठी फंडामेंटल चांगले असणारे स्टॉक निवडले जातात.

या कालावधीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेलच असे नाही.

जरी दिवाळीच्या दिवशी एखाद्या स्टॉकने चांगली कामगिरी केली तरी भविष्यात त्याची कामगिरी त्याच्या मूलभूत आणि व्यापक आर्थिक घटकांवर अवलंबून असेल हे लक्षात असू द्या आणि हुशारीने गुंतवणूक करा.

या काळात आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असल्याने आपण स्टॉक नाहीतर एक उद्योग विकत घेत असल्याचा विचार करून स्टॉक निवडावा असे मला वाटते.

स्टॉक निवडण्यासाठी आपण स्टॉकच्या खालील काही गोष्टींचा विचार जरूर करा.

  • कंपनीचे व्यवस्थापन
  • कंपनीचे बिझनेस मॉडेल
  • कंपनीचे इतर स्पर्धक
  • कंपनी काम करत असलेल्या क्षेत्राला असणारा वाव
  • कंपनीचे मागील काही वर्षातील आर्थिक कामकाज, नफा, तोटा, महसूल इ.

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण मुहूर्त ट्रेडींग विषयी माहिती घेतली.

या लेखात अजून जास्त माहिती वाढवण्याचा मी प्रयत्न करेल.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

पैसा झाला मोठा’ कडून आपल्याला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment