[४] ट्रायंगल चार्ट पॅटर्न मराठी | [4] Triangle Chart Pattern in Marathi

3.3/5 - (3 votes)

या लेखात आपण सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न या न्यूट्रल चार्ट पॅटर्नची सविस्तर माहिती बघणार आहोत

न्यूट्रल चा अर्थ इथे अनिश्चित असा आहे.

नावातच सुचवल्याप्रमाणे न्यूट्रल चार्ट पॅटर्न चार्टवर तयार झाल्यावर स्टॉकमध्ये बुलिश मुव्ह किंवा बियरीश मुव्ह येण्याची शक्यता सारखीच असते

न्यूट्रल चार्ट पॅटर्न हे कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न आणि रिव्हर्सल चार्ट पॅटर्न अशा दोन्ही प्रकारात सारख्याच प्रमाणात उपयोगी आहेत

न्यूट्रल चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग मध्ये करण्यासाठी आपल्याला ब्रेकआऊटचे आणि ब्रेकडाऊनचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे लागते.

या लेखात आपण सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न तयार कसा होतो आणि त्याचा आपण ट्रेडिंगसाठी कसा वापर करू शकतो हे बघणार आहोत

चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया

अनुक्रमणिका hide

सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न म्हणजे काय?| What is Symmetrical Triangle Chart Pattern

सर्वात प्रथम आपण सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्नची ओळख करून घेऊ

सिमेट्रिकल चा अर्थ होतो आकाराने, प्रमाणामध्ये अगदी समान दोन भाग असलेले, समप्रमाणातील, समतोल, सममित, समात्र, समाकार इ.

ट्रायंगल म्हणजे त्रिकोण होय

सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न हा एखाद्या समान दोन भाग होतील अशा त्रिकोणाप्रमाणे दिसत असल्याने या चार्ट पॅटर्नला सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न असे म्हणतात.

सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न | Symmetrical Triangle Chart Pattern

वरील चित्रात सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न दाखवला आहे

स्टॉक मध्ये कुठलाही ट्रेंड राहिला नसून स्टॉक मध्ये अनिश्चितता वाढत आहे.

चित्रात काळ्या रंगाच्या रेषांनी तयार होणारे सपोर्ट आणि रेझिस्टन्स दाखवले आहेत

सपोर्ट लाइन हि लगतच्या स्विंग लोझ मधून तर रेझिस्टन्स लाइन लगतच्या स्विंग हाइझ मधून जाते आहे.

अनेक जण या तिरप्या सपोर्ट आणि रेझिस्टन्स लाइन्सला ट्रेंड लाइन्स असेही म्हणतात

अशाप्रकारे या तिरप्या सपोर्ट आणि रेझिस्टन्स लाइन्स पासून तयार होतो तो त्रिकोण आणि ट्रायंगल चार्ट पॅटर्न

हा चार्ट पॅटर्न समभुज त्रिकोणाप्रमाणे दिसत असल्याचे तुमच्या लक्षात आलेच असेल म्हणूनच या चार्ट पॅटर्नला सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न असे म्हणतात

या चार्ट पॅटर्न मध्ये हायर लोझलोअर हाईझ तयार होत जातात आणि मोठ्या प्रमाणात वोलॅटिलिटी कॉम्प्रेशन होते.

शेअर बाजारात वोलॅटिलिटी कॉम्प्रेशन नंतर बऱ्याचदा एक मोठी मूव्ह येते आणि हीच मूव्ह आपल्याला मोठा प्रॉफिट मिळवून देऊ शकते.

सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्नचे बुलिश कॉन्टीनुएशन, बियरीश कॉन्टीनुएशन, बुलिश रिव्हर्सल,आणि बियरीश रिव्हर्सल असे चारही प्रकार आपण आता बघणार आहोत.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

सिमेट्रिकल ट्रायंगल बुलिश कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न | Symmetrical Triangle Bullish Continuation Chart Pattern

सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न | Symmetrical Triangle Chart Pattern
सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न
Symmetrical Triangle Chart Pattern

सोबतच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टॉकचा अगोदरचा ट्रेंड हा अपट्रेन्ड आहे पण स्टॉकची किंमत रेझिस्टन्स लाइनच्या वर जाऊ शकत नाही आणि वारंवार खाली घसरते आहे

याउलट स्टॉकची किंमत थोडया अंतरावरील सपोर्टलाइन पासून पुन्हा पुन्हा सावरायला सुरुवात होते आहे.

बुल्स स्टॉकची किंमत रेझिस्टन्स लाइनच्या वर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत तर बियर्स स्टॉकची किंमत सपोर्ट लाइनच्या खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत

काही काळानंतर मात्र बुल्सची पुन्हा सरशी होते आणि प्राइस रेझिस्टन्स लाइनच्या पलीकडे जाऊन क्लोझ होते यालाच शेअर मार्केटच्या भाषेत आपण ब्रेकआऊट असे म्हणतो.

स्टॉक मध्ये अगोदरचा ट्रेंड अपट्रेन्ड आहे आणि पॅटर्न तयार झाल्यानंतरचा ट्रेंड देखील अपट्रेन्डच असल्याने मी इथे उल्लेख बुलिश कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न असा केला आहे

सिमेट्रिकल ट्रायंगल बुलिश कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा?

एंट्री :

  • जर तुम्ही आक्रमक (अग्रेसिव्ह) आणि अनुभवी ट्रेडर असाल तर तुम्ही ब्रेकआऊट झाल्या बरोबर लगेच एन्ट्री घेऊ शकतात
  • बरेच ट्रेडर्स एंट्रीसाठी रिट्रेस्मेण्टची वाट बघतात आणि स्टॉक रेझिस्टन्स लेव्हल पर्यंत रिट्रेस झाल्यानंतर बुलिश सिग्नल भेटताच बाइंग साईड ट्रेड घेतात

हे झालं एन्ट्रीच, आता आपण बघूया स्टॉप लॉस कुठे लावायचा

स्टॉप लॉस :

  • इंट्राडे ट्रेडिंग साठी सर्वात जवळचा स्विंग लोव पॉईंट हा सर्वसाधारणपणे स्टॉप लॉस म्हणून वापरला जातो.
  • स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण थोडा मोठा स्टॉप लॉस लावणे अधिक योग्य ठरते

आता आपण सिमेट्रिकल ट्रायंगल बियरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न बघूया.

सिमेट्रिकल ट्रायंगल बियरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न | Symmetrical Triangle Bearish Riversal Chart Pattern

सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न हा एक न्युट्रल पॅटर्न असल्याने हा पॅटर्न चार्टवर तयार झाल्यानंतर ट्रेंड बदलू सुद्धा शकतो म्हणजेच ट्रेंड रिव्हर्स देखील होऊ शकतो.

खालील चित्रात बियरीश ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न दाखवला आहे

Symmetrical Triangle Bearish Riversal Pattern Chart Pattern min

चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टॉक मध्ये अगोदर अपट्रेन्ड आहे आणि त्यानंतर स्टॉक मध्ये सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार झाला आहे.

आपण चित्रात बघू शकतो कि स्टॉक मध्ये हायर लोझ आणि लोअर हाईझ तयार होत आहेत.

स्टॉक मध्ये ट्रायंगल पॅटर्न तयार होत असताना अपट्रेन्ड किंवा डाउनट्रेण्ड असा कुठलाही ट्रेण्ड निश्चित असल्याचे दिसत नाही.

स्टॉक कुठल्या दिशेला जाइल याबाबतची अनिश्चितता आहे.

स्टॉक ची हालचाल कमी होत चालली असून व्होलॅटिलिटी कॉम्प्रेशन होत आहे

बुल्स स्टॉकची किंमत रेझिस्टन्स लाइनच्या वर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत तर बियर्स स्टॉकची किंमत सपोर्ट लाइनच्या खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.

बुल्स आणि बियर्सच्या या स्पर्धेत बियर्स ची सरशी झालेली दिसते आहे आणि स्टॉक ची किंमत सपोर्ट लाइनच्या खाली घसरली आहे.

स्टॉक ची किंमत सपोर्ट लाइनच्या खाली कोसळण्याला शेअर मार्केटच्या भाषेत आपण ब्रेकडाउन असे म्हणतो अशाप्रकारे ब्रेक डाउन नंतर आपण स्टॉक मध्ये सेल साइड एन्ट्री घेऊन नफा कमावू शकतो.

स्टॉक मध्ये अगोदरचा ट्रेन्ड अपट्रेन्ड आहे आणि पॅटर्न तयार झाल्यानंतरचा ट्रेन्ड हा डाऊनट्रेन्ड असल्याने मी इथे या पॅटर्नचा उल्लेख बियरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न असा केला आहे.

सिमेट्रिकल ट्रायंगल बियरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा?

एंट्री :

  • जर तुम्ही आक्रमक (अग्रेसिव्ह) आणि अनुभवी ट्रेडर असाल तर तुम्ही ब्रेकडाउन झाल्या बरोबर लगेच एन्ट्री घेऊ शकतात
  • बरेच ट्रेडर्स एंट्रीसाठी रिट्रेस्मेण्टची वाट बघतात आणि स्टॉक सपोर्ट लेव्हल पर्यंत रिट्रेस झाल्यानंतर बियरीश सिग्नल भेटताच सेल साईड ट्रेड घेतात

हे झालं एन्ट्रीच, आता आपण बघूया स्टॉप लॉस कुठे लावायचा

स्टॉप लॉस :

  • इंट्राडे ट्रेडिंग साठी सर्वात जवळचा स्विंग हाई पॉईंट हा सर्वसाधारणपणे स्टॉप लॉस म्हणून वापरला जातो.
  • स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण थोडा मोठा स्टॉप लॉस लावणे अधिक योग्य ठरते

सोबतच्या चित्रात मी चार्ट पॅटर्नचे सर्व महत्वाचे पॉईंट्स दाखवले आहेत.

हे झालं स्टॉक अपट्रेन्ड मध्ये असेल तर सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न कसा वापरायचा ते, आता आपण स्टॉक डाउनट्रेण्ड मध्ये असल्यावर चार्ट पॅटर्न कसा तयार होतो आणि पॅटर्न तयार झाल्यावर ट्रेड कसं करायचं ते बघूया

सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न डाउनट्रेण्ड | Symmetrical Triangle Chart Pattern in Downtrend

सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न डाउनट्रेण्ड | Symmetrical Triangle Chart Pattern in Downtrend

वरील चित्रात डाउनट्रेण्ड मधील सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न दाखवला आहे

आपण चित्रात बघू शकतो कि स्टॉक मध्ये अगोदरचा ट्रेण्ड हा डाउनट्रेंड आहे.

काही अंतरावर मात्र स्टॉक मध्ये एक सपोर्ट तयार झाल्यासारखा दिसतोय आणि स्टॉकचे स्विंगलोझ हळूहळू अधिक उंच होत आहेत म्हणजेच स्टॉक मध्ये हायर लोझ तयार होत आहेत.

यावरून स्टॉकमध्ये खरेदीला सुरवात झाली आहे किंवा बुल्स ऍक्टिव्ह झाले आहेत असे दिसते.

याउलट सपोर्ट लाईन पासून काही उंचीवर स्टॉक च्या किमतीला अधिक वर जाण्यास अडचण येत असल्याचे दिसते आहे आणि स्टॉक मध्ये लोअर हाईझ तयार होत आहे..

यावरून स्टॉक मध्ये बियर्स पूर्ण ताकदीनिशी सक्रिय असल्याचे जाणवते आहे.

बुल्स आणि बियर्स च्या या स्पर्धेत स्टॉक मध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स लाइन तसेच सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार झाला आहे.

चित्रात दाखवल्याप्रमाणे बियर्सचा विजय झाला असून स्टॉकची किंमत सपोर्ट लाइन ब्रेक करून जोरदार खाली कोसळली आहे.

स्टॉक मध्ये अगोदरचा ट्रेन्ड डाऊनट्रेन्ड आहे आणि पॅटर्न तयार झाल्यानंतरचा ट्रेन्ड हासुद्धा डाऊनट्रेन्ड असल्याने मी इथे या चार्ट पॅटर्नचा उल्लेख बियरीश कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्न असा केला आहे.

सिमेट्रिकल ट्रायंगल बियरीश कॉन्टीनुएशन चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा?

एंट्री :

  • जर तुम्ही आक्रमक (अग्रेसिव्ह) आणि अनुभवी ट्रेडर असाल तर तुम्ही ब्रेकडाउन झाल्या बरोबर लगेच एन्ट्री घेऊ शकतात
  • अधिक सुरक्षित एन्ट्रीसाठी तुम्ही रिट्रेस्मेण्टची वाट बघायची आहे आणि बियरीश सिग्नल मिळताच सेल साइड एन्ट्री घ्यायची आहे

आता आपण बघूया स्टॉप लॉस कुठे लावायचा

स्टॉप लॉस :

  • इंट्राडे ट्रेडिंग साठी सर्वात जवळचा स्विंग हाई पॉईंट हा सर्वसाधारणपणे स्टॉप लॉस म्हणून वापरता येऊ शकतो.
  • स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण थोडा मोठा स्टॉप लॉस लावणे अधिक योग्य ठरते

वरील चित्रात मी चार्ट पॅटर्नचे सर्व महत्वाचे पॉईंट्स दाखवले आहेत.

हे झालं स्टॉक डाउनट्रेण्ड मध्ये असेल, ट्रायंगल पॅटर्न तयार झालं असेल आणि स्टॉक मध्ये ब्रेकडाउन झालं तर ट्रेड कसं करायचं आता आपण बघूया स्टॉक मध्ये डाउनट्रेंड असेल आणि स्टॉक मध्ये ब्रेकआऊट झाल्यावर ट्रेड कसं करायचं.

सिमेट्रिकल ट्रायंगल बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न | Symmetrical Triangle Bullish Reversal Chart Pattern

चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टॉक मध्ये अगोदर डाऊनट्रेण्ड आहे आणि त्यानंतर स्टॉक मध्ये सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार झाला आहे.

   सिमेट्रिकल ट्रायंगल बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न | Symmetrical Triangle Reversal Chart Pattern in Downtrend

आपण चित्रात बघू शकतो कि स्टॉक मध्ये हायर लोझ आणि लोअर हाईझ तयार होत आहेत.

स्टॉक मध्ये ट्रायंगल पॅटर्न तयार होत असताना अपट्रेन्ड किंवा डाउनट्रेण्ड असा कुठलाही ट्रेण्ड निश्चित असल्याचे दिसत नाही.

स्टॉक ची हालचाल कमी होत चालली असून व्होलॅटिलिटी कॉम्प्रेशन होत आहे

बुल्स स्टॉकची किंमत रेझिस्टन्स लाइनच्या वर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत तर बियर्स स्टॉकची किंमत सपोर्ट लाइनच्या खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.

चित्रात काळ्या रंगाच्या रेषांनी सपोर्ट लाइन आणि रेझिस्टन्स लाइन दाखवल्या आहेत

बुलिश रिव्हर्सल पॅटर्न मध्ये बुल्स बियर्सचा पराभव करण्यात यशस्वी झाले आहेत आणि स्टॉक ची किंमत रेझिस्टन्स लाइनच्या पलीकडे जाऊन क्लोझ झाली आहे यालाच आपण शेअर मार्केटच्या भाषेत ब्रेकआऊट असे म्हटले आहे

स्टॉक मध्ये अगोदरचा ट्रेंड डाउनट्रेन्ड आहे आणि पॅटर्न तयार झाल्यानंतरचा ट्रेंड अपट्रेन्ड असल्याने मी इथे उल्लेख बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न असा केला आहे.

सिमेट्रिकल ट्रायंगल बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंग साठी कसा करावा?

एंट्री :

  • जर तुम्ही आक्रमक (अग्रेसिव्ह) आणि अनुभवी ट्रेडर असाल तर तुम्ही ब्रेकआऊट झाल्या बरोबर लगेच एन्ट्री घेऊ शकतात
  • तुम्ही रिट्रेस्मेण्ट झाल्यावर अधिक सुरक्षित एन्ट्री सुद्धा घेऊ शकता

स्टॉप लॉस :

  • इंट्राडे ट्रेडिंग साठी सर्वात जवळचा स्विंग लोव पॉईंट हा स्टॉप लॉस म्हणून वापरला जातो.
  • स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण थोडा मोठा स्टॉप लॉस लावणे अधिक योग्य ठरते

अशाप्रकारे या लेखात आपण सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न तसेच सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्नचे बुलिश कॉन्टीनुएशन, बुलिश रिव्हर्सल, बियरीश कॉन्टीनुएशन आणि बियरीश रिव्हर्सल असे चारही प्रकार बघितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा

आपण वेळात वेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत

धन्यवाद!!!

चार्ट पॅटर्न विषयी अधिक माहितीसाठी आपण खालील लेख जरूर वाचा.

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment