ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी मराठी | Opening Range Breakout Strategy in Marathi

5/5 - (1 vote)

जय महाराष्ट्र मित्रांनो!

आपण या लेखात ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी बघणार आहोत.

या लेखातील सर्व माहिती हि इन्ट्राडे ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून लिहिली असून आपण जर इन्ट्राडे ट्रेडर असाल तर हा लेख जरूर वाचा.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी हि समजण्यास अतिशय सोपी स्ट्रॅटेजी असली तरी वापर करतांना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

आपण ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजीचा जास्तीत जास्त प्रभावीपणे वापर कसा करावा हे अगदी सविस्तर बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी काय आहे ?

स्टॉकमध्ये दिवसाच्या सुरवातीला खूप जास्त व्हॉल्यूम आणि व्होलॅटिलिटी असते आणि आपल्याला ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजीमध्ये याच गोष्टींचा फायदा करून घ्यायचा असतो.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी मध्ये स्टॉक प्राइस ओपन झाल्यानंतर ओपनिंग कॅन्डलच्या मदतीने एक रेन्ज ठरवली जाते.

नावातच सांगितल्याप्रमाणे स्टॉक जेव्हा आपली हि रेन्ज तोडून बाहेर पडतो तेव्हा ट्रेडमध्ये एन्ट्री केली जाते.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजीमध्ये स्टॉकमधील सुरवातीच्या प्राइस ॲक्शनला खूप जास्त महत्व आहे किंबहुना हि स्ट्रॅटेजी पूर्णतः स्टॉक ओपन झाल्यानंतर होणाऱ्या किमतीच्या हालचालींवरच अवलंबून आहे.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजीसाठी टाइम फ्रेम काय असावी ?

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजीसाठी स्टॉक निवडताना डेली टाइमफ्रेम वापरता येऊ शकते.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजीमध्ये एन्ट्रीसाठी १५ मी आणि ३० मी या टाइमफ्रेम सर्वात जास्त प्रभावी समजल्या जातात.

याशिवाय अनेक इन्ट्राडे ट्रेडर ५ मी टाइमफ्रेम देखील वापरतात.

असे असले तरी आपण आपल्या ट्रेडींग स्टाइल नुसार आणि सोयीनुसार इतर टाइमफ्रेम वापरू शकता.

आपल्या ट्रेडींगला योग्य टाइमफ्रेम निवडण्यासाठी गरज असते ती सरावाची, निरीक्षणांची आणि निरंतर सुधारणा करण्याच्या वृत्तीची.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी स्टॉक कसे निवडावे ?

एन आर ७ आणि एन आर ४ या स्टॉक सिलेक्टिनसाठीच्या अतिशय लोकप्रिय पद्धती ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजीमध्ये देखील खूप जास्त उपयोगी आहेत.

एन आर ७ द्वारे स्टॉक निवडण्यासाठी आपल्याला डेली चार्ट वापरायचा आहे.

एन आर ७ म्हणजे नॅरो रेंज ७ होय, नॅरो म्हणजे अरुंद.

हि पद्धत म्हणजे स्टॉक मधील व्होलॅटिलिटी कॉम्प्रेशन ओळखून स्टॉक निवडणे होय.

एन आर ७ म्हणजे ७ वी कॅण्डल मागील ६ दिवसांपेक्षा लहान कॅण्डल तयार होणे.

याप्रमाणेच एन आर ४ म्हणजे ४थी कॅण्डल मागील ३ दिवसांपेक्षा लहान कॅण्डल तयार होणे.

आपल्या सोयीसाठी खाली मी एन आर ७ आणि एन आर ४ स्कॅनरची लिंक देत आहे.

खाली चार्टवर एन आर ७ पद्धतीने स्टॉक कसा सिलेक्ट करतात ते दाखवले आहे.

एन आर ७ आणि एन आर ४ | NR7 AND NR4

असे असले तरी मी आपल्याला स्कॅनर ऐवजी चार्टवरच निरीक्षण करून स्टॉक निवडण्याचा सल्ला देऊ इच्छितो.

याशिवाय आपण शॉर्ट कॅन्डलचा देखील उपयोग स्टॉक निवडतांना करू शकतो.

याशिवाय स्टॉक निवडतांना आपण स्टॉक मधील व्हॉल्युमचे सुद्धा निरीक्षण करायचे आहे.

कुठल्याही स्टॉकमध्ये ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी वापरण्याआधी त्या स्टॉकमधील काही दिवस आधीचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा वाढलेला आढळून येतो.

चार्टवरील वाढलेला व्हॉल्युम म्हणजे स्टॉक मध्ये मोठे ट्रेडर ट्रेडींग करत असल्याचे चिन्ह होय त्यामुळे आपल्याला ब्रेकआऊट नंतर नक्कीच मोठा प्रॉफिट मिळू शकतो.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट आणि व्हॉल्युम

खालील चित्रात मी ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट कसे होते ते दाखवले आहे.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी | opening range breakout strategy

स्टॉकमध्ये रेझिस्टन्स आणि सपोर्ट लेव्हलच्या दरम्यान एक रेन्ज तयार झाली आहे.

काही काळानंतर स्टॉकने रेन्ज वरच्या बाजूला ब्रेक केली आहे म्हणजेच ब्रेकआऊट झाले आहे त्याचप्रमाणे ब्रेकआऊट कॅण्डलचा व्हॉल्युम सुद्धा सरासरीपेक्षा जास्त आहे.

खाली मी बेअरिश ब्रेकआऊट देखील दाखवले आहे.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी | opening range breakout strategy

ब्रेकआऊट होण्यासाठी कॅण्डल सपोर्ट-रेझिस्टन्स लेव्हलच्या पलीकडे जाऊन क्लोझ होणे गरजेचे आहे तसेच वाढलेला व्हॉल्युम हा ब्रेकआऊटच्या दिशेने बुल्स-बेअर्स यांनी लावलेल्या ताकदीचे प्रतीक आहे.

मित्रांनो, चार्टवर आपल्याला अशा प्रकारचा पॅटर्न आढळल्यास आपण नक्कीच ट्रेड घेण्याचा विचार करू शकतो.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी स्टॉकमध्ये एन्ट्री कशी घ्यावी आणि स्टॉप लॉस कुठे ठेवावा ?

आपल्याला सर्वात प्रथम लेखात सांगिल्याप्रमाणे ट्रेडींगसाठी स्टॉक निश्चित करायचा आहे.

त्यानंतर ठरलेल्या टाइमफ्रेमवर दिवसाची पहिली कॅण्डल तयार होऊ द्यायची आहे उदा. १५ मी, ५ मी.

यानंतर कॅन्डलच्या हाय प्राइस लेव्हल आणि लो प्राइस लेव्हल मार्क करायच्या आहेत.

आता आपल्याला शांतपणे सपोर्ट-रेझिस्टन्स ब्रेक होईपर्यंत वाट बघायची आहे.

ब्रेकआऊट नंतर आपल्याला स्टॉक मध्ये एन्ट्री घ्यायची आहे आणि सर्वात जवळच्या स्विंगचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे.

जर रेन्ज ठरवणारी पहिलीच कॅण्डल खूप लहान असेल तर आपण त्याच कॅन्डलचा वापर एन्ट्री आणि स्टॉप लॉस साठी करू शकतो.

हाय ब्रेक झाल्यास हाय प्राइस आपली लॉन्ग साईड एन्ट्री लेव्हल होईल तर लो प्राइस स्टॉप लॉस ठेवता येईल याउलट लो प्राइस ब्रेक झाल्यास लो प्राइस जवळ शॉर्ट साईड एन्ट्री घेता येईल तर हाय प्राइस म्हणजे स्टॉप लॉस होय.

ब्रेकआऊट कॅण्डल खूप जास्त मोठी कॅण्डल असल्यास आपण एन्ट्री घेण्यासाठी पुलबॅकची वाट बघू शकतो.

स्टॉप लॉस ठेवण्यासाठी काही ट्रेडर ब्रेकआऊट कॅन्डलचा लो किंवा हाय देखील वापरतात.

ट्रेड मधून एक्झिट कशी करावी ?

ट्रेडमध्ये टारगेट ठरवण्यासाठी आपण डेली चार्टवर मार्क केलेल्या महत्वाच्या लेव्हल, सपोर्ट-रेझिस्टन्स यांचा वापर करू शकतो.

त्याचप्रमाणे अगोदरच्या काही दिवसांचे निरीक्षण केल्यास आपल्याला योग्य टारगेट लेव्हल मार्क करता येऊ शकते.

याशिवाय स्टॉक मधील किमतीची हालचाल खूप जास्त म्हणजे २% -३% इतकी जास्त झाल्यास आपण काही अंशी प्रॉफिट बुक करणे फायदेशीर ठरते.

इन्ट्राडे ट्रेडींग म्हटलं कि आपल्याला नेहमी रिस्क-रिवॉर्डच गणित लक्षात घ्यावं लागत तेव्हा आपल्याला रिस्क-रिवॉर्ड १:३ च्या जवळपास भेटत असल्यास आपण आपली पोझिशन कमी करण्याचा विचार करू शकतो.

ट्रेडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आपल्याला कॅन्डलस्टिक आणि व्हॉल्युम च्या मदतीने पोझिशन एक्झिट करण्यास मदत होऊ शकते.

आपल्याला कोणताही मोठा ट्रेण्ड रिव्हर्सल सिग्नल मिळाल्यास आपण ट्रेड मधून बाहेर पडू शकतो.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी चार्टवर

आता आपण ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी चार्टवर बघणार आहोत.

खाली आपल्यासोबत भारती एअरटेल कंपनीचा १५ मी टाइमफ्रेमचा कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हॉल्युम चार्ट आहे.

चार्टवर मी पहिल्या १५ मी. ची कॅन्डल मार्क केली आहे.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी | opening range breakout strategy

कॅन्डलची हाय प्राइस म्हणजे रेझिस्टन्स लेव्हल लाल रंगाने दाखवली आहे तर कॅन्डलची लो प्राइस म्हणजे सपोर्ट लेव्हल हिरव्या रंगाने दाखवली आहे.

आपण बघू शकतो कि एका हिरव्या कॅन्डलने रेझिस्टन्स लेव्हलच्या वर क्लोझिंग दिली आहे म्हणजेच रेझिस्टन्स लेव्हल ब्रेक झाली आहे.

आता आपण एक शॉर्ट ट्रेड बघूया.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी | opening range breakout strategy

आपल्यासोबत हिंदाल्को कंपनीचा १५ मी. टाइमफ्रेमचा कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हॉल्युम चार्ट आहे.

चार्टवर मी पहिल्या १५ मी. ची कॅन्डल मार्क केली आहे.

कॅन्डलची हाय प्राइस म्हणजे रेझिस्टन्स लेव्हल लाल रंगाने दाखवली आहे तर कॅन्डलची लो प्राइस म्हणजे सपोर्ट लेव्हल हिरव्या रंगाने दाखवली आहे.

आपण बघू शकतो कि एका लाल कॅन्डलने सपोर्ट लेव्हलच्या खाली क्लोझिंग दिली आहे म्हणजेच सपोर्ट लेव्हल ब्रेक झाली आहे.

सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर स्टॉक मध्ये एक पुलबॅक आला आणि स्टॉकची किंमत सपोर्ट लेव्हल टेस्ट करून पुन्हा खाली कोसळली आहे.

मित्रांनो, अशाप्रकारे आपण या लेखात ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी, स्टॉक सिलेक्शन, एन्ट्री, स्टॉप लॉस इ. गोष्टी बघितल्या.

शेअर मार्केट विषयी अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाइक करा.

आपल्याला लेख आवडल्यास कमेंटबॉक्समध्ये ‘जय महाराष्ट्र’ लिहायला विसरू नका

आपण सवडीने हा लेख वाचला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment