वॉरन बफे मराठी । Warren Buffet in Marathi

3/5 - (6 votes)

मित्रानो या लेखात आपण ओहामाचा जादूगार या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या सुप्रसिद्ध गुंतवणूकदार (इन्व्हेस्टर/Investor) आणि अब्जाधीश वॉरन बफे यांची माहिती बघणार आहोत.

फोर्ब्स अनुसार २००८ मध्ये वॉरन बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर होते.

वॉरन बफे यांचे पूर्ण नाव वॉरन हॉवर्ड बफे असे आहे.

वॉरन बफे सध्या बर्कशायर हॅथावे या प्रसिद्ध इन्व्हेस्टर कंपनीचे अध्यक्ष (चेअरमन) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) आहेत.

वॉरन बफे हे जगातील सर्वकालीन यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असून एप्रिल २०२१ अखेर त्यांची एकूण संपत्ती १००. ६ अब्ज अमेरिकन डॉलर्स ($१००.६ Bn USD ) एवढी म्हणजेच भारतीय ७४,००,००,००,००,००० रुपये इतकी होती.

जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत वॉरन बफे यांचा सध्या वा क्रमांक आहे

अबब केवढी हि संपत्ती !!!

आपण इथे अशा श्रीमंत वॉरन बफे यांची ओळख करून घेऊ आणि त्यांनी इतकी संपत्ती कशी जमा केली तेही बघू

लेखाच्या शेवटी वॉरन बफे यांनी गुंतवणुकीविषयी आपल्याला दिलेले काही सल्लेही बघू

चला तर मग सुरवात करूया

वॉरन बफे यांचा जन्म ।

वॉरन बफे यांचा जन्म ओमाहा येथे ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला आहे.

वॉरन बफे यांच्या वडिलांचे नाव हॉवर्ड बफे असून, आईचे नाव लिला बफे आहे.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

वॉरन बफे यांचं शिक्षण | Education of Warren Buffet in Marathi

वॉरन बफे यांनी आपले शालेय शिक्षण रोझ हिल एलेमेंटरी स्कुल आणि एलिस डेल जुनिअर हायस्कुल मधून पूर्ण केले आहे

वॉरन बफे यांनी वयाच्या १९ व्या वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का, लिंकन इथून, बॅचलर ऑफ सायन्स इन बिझनेस एडमिनिस्ट्रेशन हि पदवी तर कोलंबिया युनिव्हर्सिटी ,कोलंबिया इथून मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स पदवी घेतली आहे

तसेच वॉरन बफे यांनी न्यूयॉर्क इन्स्टीट्युट ऑफ फायनान्स मधून इकॉनॉमिक्सचे धडे घेतले आहेत

वॉरन बफे यांचं वैयक्तिक जीवन | Personal Life of Warren Buffet in Marathi

एवढी संपत्ती असूनही वॉरन बफे हे वैयक्तित आयुष्यात अतिशय साधे जीवन जगतात.

वॉरन बफे हे खूप काटकसरी व्यक्ती म्हणून ओळखले जातात आणि आजही १९५८ साली खरेदी केलेल्या आपल्या त्याच घरात राहतात

वॉरन बफे यांनी आपली ९९% संपत्ती सामाजिक कार्यासाठी बिल गेट्स यांच्या बिल अँड मिलिंडा फाऊंडेशन ला देऊ केलेली आहे

वॉरन बफे यांचं व्यावसायिक जीवन | Professional Life of Warren Buffet in Marathi

वॉरन बफे यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात खूप लवकर म्हणजे अगदी ते ९-१० वर्षांचे असतील तेव्हाच झाली होती.

वॉरन बफे यांनी ‘१००० डॉलर्स कमावण्याचे १००० मार्ग‘ या पुस्तकातून प्रेरणा घेतली होती.

लहान असतांना ते च्यूइंग गम विकणे, कोका कोलाच्या बॉटल्स विकणे, दारोदार मॅगझीन विकणे असे छोटे-मोठे उद्योग करत.

वॉरन बफे यांचा जन्म तसा सुखवस्तू कुटुंबात झाला होता मात्र त्यांना व्यवसाय-उद्योगाची लहानपणीच गोडी निर्माण झाली होती त्यातून ते असे लहान लहान व्यवसाय करत असत.

१९४३ मध्ये म्हणजे वयाच्या केवळ १४ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा आयकर (इन्कम टॅक्स) भरला.

१९४५ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी आपल्या एका शाळकरी मित्रासोबत एक पिनबॉल मशीन २५ डॉलर्स ला विकत घेतले आणि भागीदारीत व्यवसाय सुरु केला.

त्यांच्या असे लक्षात आले कि न्हाव्याच्या दुकानात केस कापण्यासाठी आलेले लोक काहीही न करता बसून असतात.

म्हणून मग हे पिनबॉल मशीन त्यांनी आलेल्या ग्राहकांचा वेळ जावा म्हणून न्हाव्याच्या दुकानात लावायचे ठरवले.

थोड्याच दिवसांत त्यांना या व्यवसायातून भरपूर फायदा झाला आणि आता त्यांच्याकडे अशी आणखी ३ पिनबॉल मशीन झाली.

वर्षाअखेर त्यांनी आपला हा पिनबॉल मशीन चा उद्योग एका सैन्यदलातील निवृत्त अधिकाऱ्याला १२०० डॉलर्सला विकला.

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी वॉरन बफे यांनी आपल्या बचत केलेल्या १२०० डॉलर्स वापरून ४० एकर जमीन खरेदी केली होती.

कॉलेज संपेपर्यंत वॉरन बफे यांची एकूण सेविंग्स होती जवळपास ९८०० डॉलर्स म्हणजे आजचे १०,७००० डॉलर्स.

वयाच्या ११ व्या वर्षी वॉरन बफे यांनी न्युयॉर्क स्टॉक एक्सचेंज मधून सिटी सर्व्हिस ऑइल कंपनीचे प्रत्येकी ३८ डॉलर्स प्रमाणे ३ शेअर्स स्वतःसाठी आणि ३ शेअर्स आपली बहीण डॉरीस बफे हिच्यासाठी विकत घेतले आणि शेअर बाजारातील त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली.


वॉरन बफे यांचा जगप्रसिद्ध गुंतवणूकदार म्हणून प्रवास | Inspirational Story of Warren Buffet to World Famous Investor

सिटी सर्व्हिस कंपनीचे शेअर्स वॉरन बफे यांनी ३८ डॉलर्सला विकत घेतले आणि ४० डॉलर्सला विकले आणि पुढे त्याच शेअरची किंमत २०० डॉलर्स इतकी वाढली.
यातून वॉरन बफे यांनी धडा घेतला कि चांगल्या कंपनीचे शेअर्स घेतले पाहिजे आणि १०, २०, ३० वर्षे असे मोठ्या काळासाठी घेतले पाहिजे

वॉरन बफे यांनी बेंजामिन ग्रॅहम या आपल्या गुरूंकडून व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे आणि अंडरव्हॅल्यूड कंपन्या शोधून त्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत शिकून घेतली.

बेंजामिन ग्रॅहम यांच्यासोबत त्यांनी न्यूयॉर्क शहरात २ वर्षे काम केले.

१९५६: पहिली कंपनी

१९५६ साली ओमाहाला परतल्यानंतर त्यांनी बफे पार्टनरशिप नावाची स्वतःची इन्व्हेस्टिंग कंपनी चालू केली.

बफे पार्टनरशिप सुरु केली तेव्हा वॉरन बफे यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट होती १०० डॉलर्स तर आपली बहीण, मावशी आणि सासरे अशा ७ लोकांकडून त्यांनी १,०५,००० डॉलर्सचे भांडवल उभे केले होते.

१९६२ : लक्षाधीश

१९६० सालापर्यंत बफे यांनी इतर अनेक इन्व्हेस्टर्स आणि भागीदार आपल्या व्यावसायात सामील करून घेतले.

१९६२ सालापर्यंत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती ७.२ दशलक्ष डॉलर्स इतकी वाढवली ज्यात त्यांचे स्वतःचे १ दशलक्ष डॉलर्स समाविष्ट होते.

१९६५: बर्कशायर हॅथवे

वॉरन बफे यांनी १९६२ मध्ये प्रथम बर्कशायर हॅथवे, नंतर न्यू इंग्लंड टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये गुंतवणूक केली आणि एका वर्षात कंपनीचा सर्वात मोठे भागधारक बनले.

१९६५ साली वॉरन बफे कंपनीचे संपूर्ण नियंत्रण मिळवले आणि स्वतः अध्यक्ष झाले

वॉरन बफे यांनी गुंतवणूक केली तेव्हा बर्कशायर हॅथवे कंपनी डबघाईला आलेली होती.

बर्कशायरच्या अडचणीत असणाऱ्या कापड व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे घालवली मात्र त्यांना यश आले नाही.

अखेरीस त्यांनी विमा व्यवसायात गुंतवणूक करण्याकडे आपले लक्ष वळवले

१९७८: चार्ली मुंगेर

१९७८ साली, चार्ली मुंगेर बर्कशायरमध्ये सामील झाले.

जवळजवळ दोन दशकांच्या मैत्रीनंतर, बफेने शेवटी त्यांचे दीर्घकाळचे मित्र, चार्ली मुंगेर यांना बर्कशायर हॅथवेमध्ये उपाध्यक्ष म्हणून सामील होण्यास राजी केले.

१०८३, बर्कशायर हॅथवे-१००० डॉलर्स स्टॉक:

वॉशिंग्टन पोस्ट कंपनी, जीईआयसीओ, एबीसी ब्रॉडकास्टिंग आणि आरजे रेनॉल्ड्स सारख्या स्टॉकमध्ये बफे यांनी १९७० दशकात यशस्वी गुंतवणूक केल्यावर १९८३ मध्ये बर्कशायर हॅथवेच्या स्टॉकने प्रति शेअर १,००० डॉलरचा टप्पा गाठला.

१९८५,अब्जाधीश

१९८५ मध्ये फोर्ब्स मासिकाने वॉरन बफे यांची निव्वळ संपत्ती १ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज लावला.

२००६ पर्यंत बर्कशायर हॅथवे प्रति शेअर १,००,००० डॉलर्स पेक्षा जास्त किंमतीचा स्टॉक झाला होता तर गुंतवणूकदाराची स्वतःची निव्वळ संपत्ती वेगाने वाढून ४० अब्ज डॉलर्स झाली होती.

त्याच वर्षी, बफे यांनी प्रथम त्याच्या उर्वरित आयुष्यातील ८५% संपत्ती हळूहळू चॅरिटीला देण्याचे जाहीर केले.

२००६ पासून २०२० पर्यंत ३७ अब्ज डॉलर्स परोपकारी कामासाठी देऊनही वॉरन बफे यांची संपत्ती ८१ अब्ज डॉलर्सच्या वर होती.

बर्कशायर हॅथवे कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अमेझॉन, ॲपल, कोका-कोला, अमेरिकन एअरलाइन्स, अमेरिकन एक्सप्रेस अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत.

आज ६ ऑगस्ट २०२१ रोजी बर्कशायर हॅथवे स्टॉकची किंमत प्रति शेअर ४,२१,३०६ डॉलर्स इतकी आहे

वॉरन बफे यांचे गुंतवणुकीविषयी विचार

वॉरन बफे यांचे संपत्ती आणि गुंतवणुकीविषयीचे विचार खूप प्रसिद्ध आहेत त्यापॆकी मला आवडलेले काही मी खाली देत आहे.

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

“पैसा म्हणजे सर्वस्व नाही असं बरळण्याअगोदर आपल्याकडे भरपूर पैसे असल्याची खात्री करून घ्या “

“जर तुम्ही झोपलेले असतानाही पैसे कमावण्याची व्यवस्था केली नाही तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल “

“किंमत जी तुम्ही अदा करतात आणि मूल्य ते आहे जे तुम्ही बदल्यात मिळवतात”

“जर तुमचा पगार हेच तुमच्या उत्पन्नाचे एकमेव साधन असेल तर तुम्ही दारिद्र्यापासून फक्त १ पाऊल लांब आहात “

“मला खात्री होती कि मी एकदिवस श्रीमंत होणारच आहे. त्याबद्दल मला कुठल्याही क्षणी मनात शंका आलेली आठवत नाही “

“आपण आवश्यक नसलेल्या गोष्टी विकत घेतल्यास आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी विकाव्या लागतात “

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment