व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस मराठी | Volume Price Analysis in Marathi

2/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो!!!

पैसा झाला मोठाच्या नवीन लेखात मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो.

तुम्ही सुद्धा माझ्यासारखे इन्ट्राडे ट्रेडर आणि स्विंग ट्रेडर असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

व्हॉल्युम हे शेअर बाजारातील अतिशय महत्वपूर्ण निर्देशक असून त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.

या अगोदरच्या लेखांमध्ये आपण व्हॉल्युम आणि व्हॉल्युम ॲनालिसिसची ओळख करून घेतलीच आहे या लेखात आपण व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस या महत्वपूर्ण संकल्पनेची ओळख करून घेणार आहोत.

आपण प्राइस ॲक्शन ट्रेडींग शिकत असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्की फायद्याचा ठरेल.

चला तर मग सुरुवात करूया.

व्हॉल्युम आणि प्राइस

सर्वात प्रथम आपण व्हॉल्युम आणि प्राइस यांच्यातील परस्पर संबंध समजून घेऊ.

मित्रांनो, आपण असं समजूया कि एक स्टॉक म्हणजे एक कार आहे.

आपल्या या कारचा वेग म्हणजे प्राइस तर ॲक्सलरेटर म्हणजे व्हॉल्युम होय.

ज्याप्रमाणे आपण ॲक्सलरेटर वर जितका जास्त जोर देणार तितक्या जास्त वेगात आपली गाडी धावणार.

शेअर मार्केट मधील व्हॉल्युमच आणि प्राइसच अगदी तसंच आहे व्हॉल्युम जोपर्यंत जास्त आहे तोपर्यन्त प्राइस वाढत राहणे अपेक्षित असते याउलट व्हॉल्युम कमी व्हायला लागल्यावर प्राइसची गती देखील कमी होणे अपेक्षित असते.

आपल्याला प्रश्न पडला असेलच कि चार्टवर कधीतरी व्हॉल्युम तर वाढतो प्राइस मात्र त्या तुलनेत वाढत नाही.

आपल्या या शन्केच समाधान आपल्याला या पुढील लेखात जो व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस वर असणार आहे त्यात मिळेल.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस म्हणजे काय ?

व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस मध्ये मुख्यत्वे आपण किमतीची होणारी हालचाल आणि व्हॉल्युम यांच्यातील परस्पर सबंध, ट्रेण्ड आणि व्हॉल्युम यांच्यातील संबंध यांचा अभ्यास करणार आहोत.

आपल्याला ट्रेडींग करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉक मधील ट्रेण्ड किंवा स्टॉक मध्ये सध्या कोणाचे नियंत्रण आहे, बुल्स कि बेअर्सचे हे ओळखणे होय.

व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस आपल्याला स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्यापेक्षा स्टॉक मध्ये नेमके काय चालू आहे हे ओळखण्यास अधिक उपयोगी ठरते.

एकदा आपल्याला स्टॉक मधील परिस्थितीचा अंदाज आला कि आपल्याला फक्त योग्य वेळी उडी मारायची आणि प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचे.

आपल्या सोयीसाठी मी बुल्स कडून मोमेन्टम बेअर्स कडे कसा जातो हे खाली एका चित्रावर दाखवले आहे.

व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस | Volume Price Analysis

व्हॉल्युम आणि प्राइस यांचा एकत्रित अभ्यास करतांना आपल्याला संपूर्ण ट्रेण्ड किंवा स्विंगची हालचाल लक्षात घ्यावी लागते.

आपण आता प्रत्येक स्विन्गची चर्चा करूया आपल्या सोयीसाठी मी प्रत्येक स्विंगला क्रमांक दिला आहे.

१. पहिल्या स्विंग मध्ये मार्केटमध्ये बुल्सचे भक्कम वर्चस्व असल्याचे दिसून येते आहे. मार्केटमधील प्राइस आणि आणि व्हॉल्युम दोन्ही वाढत आहे.

२. दुसऱ्या स्विंगमध्ये स्टॉकची किंमत खाली आली आहे मात्र या स्विंगचा व्हॉल्युम क्रमांक १ च्या तुलनेने कमी आहे, यावरून आपल्या असे लक्षात येते कि बाजारात बेअर्स अजूनही कमजोर आहे.

३. तिसऱ्या स्विंगमध्ये बुल्स परत दाखल झाले असून स्टॉकच्या किमतीला वाढायला सुरुवात झाली आहे पण अगोदरच्या अपमूव्हच्या (१ ) तुलनेत या अपमूव्हचा व्हॉल्युम कमी असल्याचे आपल्या लक्षात येते. यावरून आपण बुल्स आता खूप जास्त प्रभावी नसल्याचे म्हणू शकतो.

४. चौथ्या स्विंगमध्ये बेअर्सनि बाजारात जोरदार एन्ट्री केली आहे आणि व्हॉल्युमच्या स्वरूपात बेअर्सने केलेले शक्तिप्रदर्शन स्पष्ट दिसते आहे.

५. पाचव्या स्विंगमध्ये बुल्स बेअर्सचा प्रतिकार करतांना दिसत आहेत मात्र बुल्सचा विरोध अगदीच कमजोर आहे कारण म्हणजे या स्विंगचा कमी झालेला व्हॉल्युम.

६. सहाव्या स्विंग मध्ये व्हॉल्युम खूप जास्त वाढला आहे आणि किंमत मात्र खाली कोसळली आहे. या स्विंगमध्ये बेअर्सची ताकद खूप जास्त मोठी असून स्टॉकमध्ये बेअर्सनी बुल्सचा सपशेल पराभव करीत पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.

अपट्रेन्डसाठी आपण ट्रेण्ड रिव्हर्सलचे उदाहरण पाहिले डाउनट्रेण्डसाठी आपण ट्रेण्ड कॉन्टीनुएशनचे उदाहरण बघणार आहोत.

खालील चित्रात मी एक डाउनट्रेण्ड मधील स्टॉक दाखवला आहे.

व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस | Volume Price Analysis

आता आपण चित्रातील तिन्ही स्विंगची चर्चा करूया.

१. पहिल्या स्विंग मध्ये आपण बघू शकतो कि स्टॉक मजबूत डाउनट्रेण्ड मध्ये आहे म्हणजेच स्टॉकची किंमत घसरते आहे शिवाय स्टॉक मधील वाढणारा व्हॉल्युम स्टॉक मध्ये मोठे सेलर्स असल्याचे सांगतो आहे.

२. दुसऱ्या स्विंग मध्ये स्टॉकची किंमत वाढतांना दिसते आहे मात्र व्हॉल्युम कमी होतांना दिसतो आहे. यावरून आपण स्टॉक मध्ये काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग चालू असल्याचा आणि अजूनही बुल्स न आल्याचा निष्कर्ष काढू शकतो.

३. तिसऱ्या स्विंग मध्ये पुन्हा एकदा स्टॉकची किंमत खाली कोसळायला सुरुवात झाली आहे आणि व्हॉल्युम सुद्धा वाढतो आहे यावरून आपण बेअर्सनि पुन्हा एकदा किंमत खाली खेचायला सुरुवात केली असल्याचे म्हणू शकतो.

आता आपण व्हॉल्युम-प्राइस ॲनालिसिस चार्टवर बघूया

खाली आपल्यासोबत टाटा स्टील कंपनीचा ५ मी टाइमफ्रेमचा एका पूर्ण दिवसाचा चार्ट आहे.

व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस | Volume Price Analysis

चार्टवर मी लाल आणि हिरव्या रंगाने अनुक्रमे डाउनस्विंग आणि अपस्विंग दाखवले आहेत.

आपण चार्टवर नजर टाकल्यास आपल्या असे लक्षात येईल स्टॉक बुलिश मोमेन्टममध्ये आहे.

पण तुम्ही जरा निरखून बघितल्यास आपल्या असे लक्षात येते कि स्टॉक मध्ये अपमूव्ह होतानाच व्हॉल्युम हा डाउनमूव्हच्या व्हॉल्युम पेक्षा जास्त आहे.

या बुलिश मूव्हच्या व्हॉल्युमला आपण बुलिश व्हॉल्युम म्हणू शकतो.

यावरून आपल्याला आपण स्टॉक मध्ये डाउनस्विंग तयार झाला तरी स्टॉक मधील मुख्य ट्रेण्ड हा बुलिश ट्रेण्ड असल्याचा अंदाज बांधू शकतो आणि त्यानुसार आपला निर्णय घेऊ शकतो.

अपट्रेण्डमध्ये कमी व्हॉल्युमवर येणारी डाउनमूव्ह म्हणजे प्रॉफिट बुकिंग किंवा पुलबॅक होय.

या पुलबॅकचा वापर आपण स्टॉक मध्ये एन्ट्री करण्यासाठी तसेच पोझिशन वाढवण्यासाठी करू शकतो.

याशिवाय आपल्यापैकी अनेक मित्र स्टॉक रीट्रेस व्हायला लागला कि घाबरून पोझिशन एक्झिट करतात आणि मोठा नफा मिळवण्यापासून चुकतात.

अनेकदा भीतीपोटी आपण चांगली एन्ट्री भेटलेल्या ट्रेडमधून देखील टारगेट मिळण्याआधीच बाहेर पडतो.

व्हॉल्युमच्या निरीक्षणातून आपण या सर्व चुका टाळू शकतो आणि आपली ट्रेडींग अजून जास्त सुधारू शकतो तेव्हा व्हॉल्युम ॲनालिसिस वरील सर्व लेख नक्की वाचा.

आपल्याला व्हॉल्युमच्या अभ्यासातून स्टॉक मध्ये बुल्स नियंत्रण करताय कि बेअर्स, डाउनट्रेंण्ड आहे कि अपट्रेन्ड, ट्रेण्ड मजबूत आहे कि कमजोर, स्टॉक मध्ये रिव्हर्सल होते आहे कि पुलबॅक अशा गोष्टींचा उलगडा करता येऊ शकतो म्हणूनच व्हॉल्युम ॲनालिसिसला एक वेगळे महत्व आहे.

निष्कर्ष

  • व्हॉल्युम आणि प्राइस दोन्ही वाढत असतील तर तो एक मजबूत अपट्रेन्ड समजावा.
  • व्हॉल्युम कमी होत असेल आणि प्राइस वाढत असेल तर त्याला कमजोर अपट्रेण्ड, पुलबॅक, प्रॉफिट बुकिंग, शॉर्ट कव्हरिंग या प्रकारात मोडता येईल.
  • व्हॉल्युम वाढत असेल आणि प्राइस कमी होत असेल तर तो एक मजबूत डाउनट्रेण्ड समजावा.
  • व्हॉल्युम कमी होत असेल आणि प्राइस देखील कमी होत असेल तर त्याला कमजोर डाउनट्रेण्ड, पुलबॅक, प्रॉफिट बुकिंग, कव्हरिंग असे समजावे.

मित्रांनो, अशा प्रकारे मी आपल्याला या लेखात व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

लेखात काही उणीव असल्यास कमेंटबॉक्स मध्ये मला जरूर कळवा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

वेळात वेळ काढून आपण हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment