बोनस शेअर मराठी । Bonus Share in Marathi

3/5 - (2 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

या लेखात आपण बोनस शेअर्स म्हणजे काय ते बघणार आहोत.

बऱ्याच लोकांना बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट या दोन्ही गोष्टींमध्ये नेमका फरक काय ते समजून घेतांना अडचण येते.

हा लेख वाचल्यानंतर आपल्याला बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट या दोन्ही गोष्टी एकदम स्पष्ट होतील तेव्हा हा लेख जरूर वाचा.

चला तर मग सुरुवात करूया.

बोनस शेअर म्हणजे काय ?

कंपन्या आपल्या शेअर होल्डर्सला किंवा भागधारकांना आपल्या नफ्यातील काही हिस्सा बोनस म्हणून देत असतात आणि या बोनसलाच आपण डिव्हिडंड किंवा लाभांश असे म्हणतो.

अनेकदा कंपन्या गुंतवणूकदारांना रक्कम स्वरूपात लाभांश न देता शेअर्सच्या स्वरूपात देते यालाच आपण बोनस शेअर्स असे म्हणतो.

किंवा

कंपन्या आपल्या शेअर धारकांना कुठलेही अतिरिक्त शुल्क न घेता जे जास्तीचे शेअर्स देते त्या शेअर्सला आपण बोनस शेअर्स असे म्हणतो.

बोनस शेअर्स इश्यू करताना कंपनीला तसेच गुंतवणूकदारांना दोघांना फायदा होतो, हे फायदे लक्षात घेतल्यास कंपनी बोनस शेअर्स का इश्यू करते हे लगेच आपल्या लक्षात येईल.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

बोनस शेअर्सचे फायदे

 • कंपनीकडून बोनस शेअर्स घेताना गुंतवणूकदारांना कोणताही कर भरावा लागत नाही.
 • बोनस शेअर्समुळे मार्केटमधील शेअरची लिक्विडीटी वाढते.
 • गुंतवणूकदारांचा कंपनीप्रती विश्वास वाढतो.
 • गुंतवणूकदारांना फायदा करून दिल्यामुळे कंपनीची प्रतिमा उंचावते.
 • बोनस शेअर्स इश्यू करत असतांना मार्केट व्हॅल्यू कमी होते आणि त्यामुळे लहान गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करणे सोपे होते.

बोनस शेअर्सचे प्रमाण

कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्यापूर्वी, बोनस शेअर्सचे खालीलप्रमाणे प्रमाण जाहीर करते.

बोनस शेअर्स : अगोदरचे शेअर्स

१:१, २:१, ३:१ किंवा १:२, १:५ आता आपण हे प्रमाण समजून घेऊ.

१:१ बोनस म्हणजे आपल्याकडे १ शेअर असेल तर आपल्याला आणखी एक शेअर मिळेल.

आपल्याकडे ५० शेअर्स असतील आपल्याला आणखी ५० शेअर्स मिळतील किंवा थोडक्यात आपले शेअर्स दुप्पट होतील.

३:१ म्हणजे आपल्याला प्रत्येक शेअरमागे शेअर्स मिळतील आणि आपल्याकडे ५० शेअर्स असतील आपल्याकडे अगोदरचे ५० आणि बोनस ५०+५०+५० असे एकूण २०० शेअर्स होतील.

त्याचप्रमाणे १:५ म्हणजे शेअर्समागे आपल्याला शेअर मिळणार आहे.

उदा. आपल्याकडे ५० शेअर्स असतील आणि बोनसचे प्रमाण १:५ जाहीर झाल्यास आपल्याला आणखी १० शेअर्स मिळतील म्हणजॆ आपल्याकडे एकूण ६० शेअर्स होतील.

बोनस शेअर्स आणि गुंतवणूक

मित्रांनो, बोनस शेअर्स मिळतात म्हणजे आपली गुंतवणूक वाढते का हो ?

नाही, आपली गुंतवणूक आहे तेवढीच रहाते.

आपण असे समजूया कि माझ्याकडे सिप्ला कंपनीचे ५० शेअर्स आहेत आणि प्रत्येक शेअरची मार्केट प्राइस ५० रुपये आहे म्हणजे माझी सिप्ला कंपनीतील एकूण गुंतवणूक आहे ५०*५०=२५०० रुपये.

आता आपण असे समजूया कि सिप्ला कंपनीने १:१ बोनस शेअर देण्याचे जाहीर केले म्हणजे माझ्या ५० शेअर्सचे ५०+५०= १०० शेअर्स होतील.

मित्रांनो, बोनस शेअर्स देतांना आपल्या शेअर्सची किंमत मात्र त्याच्या विरुद्ध प्रमाणात कमी होत असते.

म्हणजे माझ्या शेअर्सची संख्या जरी दुप्पट झाली तरी शेअरची मार्केट प्राइस मात्र निम्मी होईल म्हणजे माझी एकूण गुंतवणूक आहे तेवढीच राहील.

आता सिप्ला कंपनीतील माझी गुंतवणूक होईल १०० * २५=२५०० रुपये.

बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट

आपल्याला असे वाटत असेल कि हे तर अगदी स्टॉक स्प्लिट सारखेच आहे.

वरकरणी बघता हे सर्व स्टॉक स्प्लिट सारखेच वाटत असले तरी स्टॉक स्प्लिट होतांना शेअरची फेस प्राइस आणि मार्केट प्राइस या देखील स्प्लिटच्या प्रमाणात विभागल्या जात असतात याची मी आपल्याला आठवण करून देतो.

बोनस शेअर देते वेळी मात्र शेअर्सच्या फेस व्हॅल्यूमध्ये कोणताही फरक पडत नाही.

बोनस शेअर्स आणि फेस व्हॅल्यू, डिव्हिडंड, मार्केट व्हॅल्यू

बोनस शेअर्स इश्यू होत असतांना फेस व्हॅल्यू बदलत नाही मात्र डिव्हिडंड जाहीर होत असतांना फेस व्हॅल्यूच्या प्रमाणात जाहीर होत असतो मग आता तुमच्या अकाउंटमध्ये असणारे शेअर्स रात्रीतून दुप्पट झाले तर तुमच्याकडे असणारी फेस व्हॅल्यूच्या स्वरूपातील गुंतवणूक किंवा मूळ गुंतवणूक आता दुप्पट होईल.

उदा. आपल्याकडे सिप्ला कंपनीचे १० शेअर्स आहेत आणि प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे आता सिप्ला कंपनीने ५००% डिव्हिडंड जाहीर केल्यास आपल्याला ५० रुपये प्रति शेअर प्रमाणे एकूण ५०० रुपये डिव्हिडंड मिळेल.

दुसऱ्या वर्षी सिप्ला कंपनीने आपल्याला १:१ बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले तर आपल्याला आणखी १० शेअर्स मिळतील आणि आपल्याकडे एकूण २० शेअर्स होतील.

आता इथून पुढे कंपनीने पुन्हा ५००% डिव्हिडंड जाहीर केल्यास आपल्याला मिळणारा डिव्हिडंड ५० प्रति शेअर म्हणजे ५०*२०=१००० होईल.

बोनस शेअर्स जाहीर झाल्यास ज्या प्रमाणात बोनस शेअर्स इश्यू केले जाणार आहेत त्याच्या विरुद्ध प्रमाणात मार्केट प्राईस कमी होते.

उदा. सिप्ला कंपनीच्या शेअरची मार्केट प्राईस ६०० रुपये आहे आणि कंपनीने २:३ बोनस जाहीर केला असे आपण समजूया.

२:३ म्हणजे आपल्याला शेअर्समागे आणखी २ शेअर्स मिळणार आहेत अशावेळी मार्केट प्राईस ६०० रुपयांहून कमी होऊन ३६० रुपये होणार आहे जेणेकरून आपली मूळ गुंतवणूक आहे तेवढीच राहील.

म्हणजे आपल्या शेअर्सची किंमत होती ६००*३=१८०० आणि आता तीच गुंतवणूक होईल ३६० * ५ =१८०० रुपये.

बोनस शेअरच्या महत्वाच्या गोष्टी

 • डिक्लेरेशन डेट
 • एक्स डेट
 • रेकॉर्ड डेट
 • बोनस डेट

 • डिक्लेरेशन डेट
 • डिक्लेरेशन डेट म्हणजे कंपनी ज्या दिवशी बोनस शेअर्स देण्याची घोषणा करते ती तारीख होय.

 • एक्स डेट
 • भारतात आपण टी+२ सिस्टम वापरतो म्हणजे शेअर्स खरेदी केल्यानंतर २ दिवसात आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात.

  आपल्याला बोनस शेअर्स किंवा डिव्हिडंड मिळण्यासाठी एक्स डेट पूर्वी आपण शेअर्स खरेदी करणे गरजेचे आहे.

 • रेकॉर्ड डेट
 • रेकॉर्ड डेट म्हणजे अशी तारीख ज्या तारखेला कंपनी आपल्या शेअर्स होल्डर्सची यादी नक्की करते म्हणजे ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंटमध्ये रेकॉर्ड डेटच्या दिवशी शेअर्स असतील त्याच गुंतवणूकदारांना कंपनी बोनस शेअर्स इश्यू करते.

 • बोनस डेट
 • ज्या दिवशी आपल्याला वाढीव शेअर्स इश्यू होतात तो दिवस.

  बोनस शेअर्सचे उदाहरण

  आता आपण बोनस शेअर्सचे एक प्रसिद्ध उदाहरण बघूया.

  खाली इन्फोसिस कंपनीचा बोनस शेअर्सचा इतिहास दिला आहे.

  infosys bonus share history

  इन्फोसिस शेअरची किंमत १९९४ साली फक्त ९५ रुपये होती.

  आपण असे समजूया कि आपण त्यावेळी इन्फोसिस कंपनीचे १० शेअर्स घेतले होते यातून आपल्याला सर्व गोष्टी लवकर लक्षात येतील.

  १९९४ साली आपल्याकडे १० शेअर्स , गुंतवणूक ९५० रुपये.

  १९९७ साली बोनस १:१, १०+१०=२० शेअर्स,

  १९९९ साली बोनस शेअर्स १:१, २०+२०=४० शेअर्स

  २००४ साली बोनस शेअर्स ३:१, १२०+४०=१६० शेअर्स

  २००६ साली बोनस शेअर्स १:१, १६०+१६०=३२० शेअर्स

  २०१४ साली बोनस शेअर्स १:१, ३२०+३२०=६४० शेअर्स

  २०१५ साली बोनस शेअर्स १:१, ६४०+६४०=१२८० शेअर्स

  २०१८ साली बोनस शेअर्स, १:१,१२८०+१२८०=२५६० शेअर्स

  यानंतर अजून इन्फोसिस कंपनीने बोनस शेअर्स दिले नाहीत तरी आपल्या सुरवातीच्या १० शेअर्सचे २५६० शेअर्स झाले.

  आपली सुरवातीची इन्व्हेस्टमेंट होती फक्त १०९५ =९५० रुपये आणि आजची आपली गुंतवणूक आहे २५६० * १६०० =४०,९६,०००.

  शेअर मार्केटविषयी अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ची लिंक बुकमार्क करा, आणि ‘पैसा झाला मोठा’ ॲप डाउनलोड करा.

  अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

  आपण सवड काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

  धन्यवाद!!!

  Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
  Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
  प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
  Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
  Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
  Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

  चला ज्ञान पसरवूया...

  जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

  Leave a Comment