डबल टॉप आणि डबल बॉटम चार्ट पॅटर्न मराठी । Double Top and Double Bottom Chart Pattern in Marathi

3.8/5 - (6 votes)

या लेखात आपण चार्टवर नेहमी तयार होणारे डबल टॉप आणि डबल बॉटम चार्ट पॅटर्न असे २ चार्ट पॅटर्न बघणार आहोत.

हे दोन्ही चार्ट पॅटर्न हे रिव्हर्सल चार्ट पॅटर्न असल्याने चार्टवर हे पॅटर्न तयार झाल्यावर नवीन ट्रेंडची सुरूवात होते.

नवीन ट्रेंडची सुरवात म्हणजे मोठी मुव्ह आणि मोठी मुव्ह म्हणजे मोठा प्रॉफिट.

डबल टॉप चार्ट पॅटर्न | Double Top Chart Pattern in Marathi

डबल टॉप चार्ट पॅटर्न हा एक खूप जास्त लोकप्रिय, उपयुक्त आणि प्रभावी चार्ट पॅटर्न आहे.

डबल टॉप चार्ट पॅटर्न हा सर्व टाइमफ्रेमवर आणि नेहमी तयार होणारा पॅटर्न आहे.

डबल टॉप चार्ट पॅटर्न हा एक बियरीश रिव्हर्सल पॅटर्न असून चार्टवर डबल टॉप चार्ट पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉक मधिल अपट्रेन्ड संपून डाउनट्रेंडची सुरवात होते

सोबतच्या चित्रात डबल टॉप चार्ट पॅटर्न दाखवला आहे

Double Top Chart Pattern 2 min

मित्रांनो, डबल टॉप चार्ट पॅटर्न चा आधार आहे तो म्हणजे भूतकाळ आणि पुनरावृत्ती.

आता आपण डबल टॉप चार्ट पॅटर्नची रचना बघूया.

चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टॉकची किंमत एका रेझिस्टन्स लेव्हल पासून खाली घसरली आहे आणि स्टॉकमध्ये १ला टॉप तयार झाला आहे.

स्टॉकची किंमत थोडी खाली घसरल्यावर काही अंतरावरून पुन्हा सावरू लागते.

स्टॉकची किंमत पुन्हा वाढून रेझिस्टन्स लाइन पर्यंत येते मात्र यावेळीदेखील स्टॉकची किंमत रेझिस्टन्स लाइन पार करू शकत नाही आणि पुन्हा खाली घसरते.

बुल्स स्टॉकला रेझिस्टन्स लाइनच्या पलीकडे ढकलण्याचा प्रयत्न करतात मात्र बियर्सच्या प्रतिकारापुढे बुल्सचा टिकाव लागत नाही आणि स्टॉकची किंमत पुन्हा पुन्हा रेझिस्टन्सपासून खाली घसरते आणि अशाप्रकारे तयार होतो तो २ रा टॉप.

अशा प्रकारे बुल्स आणि बियर्सच्या या स्पर्धेत बियर्सची सरशी होते आणि तयार होतो तो डबल टॉप चार्ट पॅटर्न.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

डबल टॉप चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करतात

डबल टॉप हा एक बियरीश रिव्हर्सल पॅटर्न असल्याने चार्टवर हा पॅटर्न तयार झाल्यावर आपण सेलिंगचा ट्रेड घ्यायचा आहे.

या पॅटर्नमध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे ती रेझिस्टन्स लाइनची. रेझिस्टन्स लाइनच्या वर सप्लाय झोन असल्याचे समजले जाते व सप्लाय झोनमध्ये बियर्स चे वर्चस्व असते.

१ ला टॉप तयार झाल्यानंतर पुढे सप्लाय झोन असल्याचे समजते आणि २रा टॉप तयार होतो तेव्हा सप्लाय झोन आणि रेझिस्टन्स लेव्हल नक्की/कन्फर्म /confirm होते.

आक्रमक ट्रेडर्स २रा टॉप तयार झाल्याचे संकेत मिळताच ट्रेड घेतात, चित्रात एन्ट्री १ ने हा एन्ट्री पॉईंट दाखविला आहे. स्टॉप लॉस साठी जवळच्या स्विंग हाई पॉईंटचा वापर केला जातो.

काही ट्रेडर्स हे स्टॉक मध्ये डबल टॉप तयार झाल्यानंतर आधीचा लो ब्रेक होईपर्यंत वाट बघतात आणि नंतरचा एन्ट्री घेतात. अशी एन्ट्री जास्त सुरक्षित समजली जाते. एन्ट्रीसाठी एन्ट्री २ आणि एन्ट्री ३ हे दोन पॉईंट चित्रात दाखवले आहेत.

स्टॉकमध्ये एन्ट्री घेण्यासाठी बियरीश कॅन्डलस्टिक पॅटर्नची मदत होऊ शकते. स्टॉप लॉस आपण रेझिस्टन्स लाइन पासून थोड्या अधिक उंचीवर लावू शकतो

डबल बॉटम चार्ट पॅटर्न | Double Top Chart Pattern

डबल टॉप पॅटर्नच्या विरुद्ध पॅटर्न म्हणजे डबल बॉटम पॅटर्न होय

सोबतच्या चित्रात डबल बॉटम चार्ट पॅटर्न दाखवला आहे

Double Bottam Chart Pattern min

डबल बॉटम चार्ट पॅटर्न हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असून चार्टवर डबल बॉटम चार्ट पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉक मधिल डाउनट्रेंड संपून अपट्रेंडची सुरवात होते

आता आपण डबल टॉप चार्ट पॅटर्नची रचना बघूया.

चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टॉकची किंमत एका लेव्हल पासून पुन्हा वाढायला सुरवात होते आहे, या लेव्हल ला आपण सपोर्ट लेव्हल असे म्हणतो.

या सपोर्ट लेव्हल जवळच स्टॉकमध्ये १ला बॉटम तयार झाला आहे. स्टॉकची किंमत थोडी वाढल्यावर काही अंतरावरून पुन्हा घसरू लागते.

स्टॉकची किंमत पुन्हा घसरून सपोर्ट लाइन पर्यंत येते मात्र यावेळीदेखील स्टॉकची किंमत सपोर्ट लाइन पार करू शकत नाही आणि पुन्हा वाढायला सुरवात करते.

बुल्स स्टॉकला सपोर्ट लाइनच्या पलीकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतात तर बियर्स स्टॉकला सपोर्ट लाइनच्या खाली ढकलण्याचा प्रयत्न करत असतात.

थोड्या वेळानंतर मात्र बियर्सचा पराभव होतो आणि स्टॉकची किंमत पुन्हा सपोर्ट लाइन पासून सावरून वाढायला लागते आणि अशाप्रकारे तयार होतो तो २ रा बॉटम.

अशा प्रकारे बुल्स आणि बियर्सच्या या स्पर्धेत बुल्स जिंकतात आणि तयार होतो तो डबल बॉटम चार्ट पॅटर्न.

डबल बॉटम चार्ट पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करतात

डबल बॉटम चार्ट पॅटर्न हा एक बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न असल्याने चार्टवर हा पॅटर्न तयार झाल्यावर आपण बायिंगचा ट्रेड घ्यायचा आहे.

या पॅटर्नमध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे ती सपोर्ट लाइनची. सपोर्ट लाइनच्या खाली डिमांड(मागणी) झोन असल्याचे समजले जाते व सपोर्ट झोनमध्ये बुल्स चे प्रभुत्व असते.

१ ला बॉटम तयार झाल्यानंतर पुढे डिमांड झोन असल्याचे समजते आणि २रा बॉटम तयार होताच डिमांड झोन आणि सपोर्ट लेव्हल नक्की/कन्फर्म /confirm होते.

आक्रमक ट्रेडर्स २रा बॉटम तयार झाल्याचे संकेत मिळताच ट्रेड घेतात, चित्रात एन्ट्री १ ने हा एन्ट्री पॉईंट दाखविला आहे.

स्टॉप लॉस साठी जवळच्या स्विंग लो पॉईंटचा वापर केला जातो.

काही ट्रेडर्स हे स्टॉक मध्ये डबल बॉटम तयार झाल्यानंतर आधीचा हाई ब्रेक होईपर्यंत वाट बघतात आणि नंतरचा एन्ट्री घेतात. अशी एन्ट्री जास्त सुरक्षित समजली जाते. एन्ट्रीसाठी एन्ट्री २ आणि एन्ट्री ३ हे दोन पॉईंट चित्रात दाखवले आहेत.

स्टॉकमध्ये एन्ट्री घेण्यासाठी आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्नची मदत होते.

स्टॉप लॉस आपण सपोर्ट लाइन पासून खाली थोड्या अंतरावर ठेवू शकतो

जर आपण आपली एन्ट्री पॉईंट २ किंवा पॉईंट ३ला घेतली असेल तर २ऱ्या बॉटमचा वापर स्टॉप लॉस ठेवण्यासाठी होऊ शकतो

डबल बॉटम चार्ट पॅटर्न आणि डबल टॉप चार्ट पॅटर्नचा पुढचा प्रकार आहे ट्रिपल टॉप चार्ट पॅटर्न आणि ट्रिपल बॉटम चार्ट पॅटर्न

ट्रिपल टॉप चार्ट पॅटर्न मराठी | Triple Top Chart Pattern in Marathi

डबल चार्ट पॅटर्न मध्ये सपोर्ट लाइन आणि रेझिस्टन्स लाइन हि २ वेळा चेक होते तर ट्रिपल चार्ट पॅटर्न मध्ये सपोर्ट लाइन आणि रेझिस्टन्स लाइन हि ३ वेळा चेक होते एवढाच काय तो या दोन्ही पॅटर्नमध्ये मुख्य फरक आहे.

ट्रिपल टॉप चार्ट पॅटर्न आणि ट्रिपल बॉटम चार्ट पॅटर्न हे दोन्ही चार्ट पॅटर्नचे प्रकार आणि त्याचा वापर अगदी डबल बॉटम चार्ट पॅटर्न आणि डबल टॉप चार्ट पॅटर्न सारखाच असल्याने मी फक्त त्यांची चित्र देत आहे.

Triple TopChart Pattern min

ट्रिपल बॉटम चार्ट पॅटर्न मराठी | Triple Bottom Chart Pattern in Marathi

Triple Bottam Chart Pattern min

आपण या लेखात डबल टॉप, डबल बॉटम, ट्रिपल टॉप आणि ट्रिपल बॉटम असे विविध ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न पाहिले.

लेख आपल्याला कसा वाटला याविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा

धन्यवाद !!!

चार्ट पॅटर्न विषयी अधिक माहितीसाठी आपण खालील लेख जरूर वाचा.

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment