कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय ? मराठी । What is Commodity Trading in Marathi

5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो,

पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.

ज्याप्रमाणे आपण शेअर मार्केटमध्ये विविध कंपन्यांमध्ये खरेदी-विक्री करू शकतो त्याप्रमाणे आपण कमोडिटी मार्केटमध्ये विविध वस्तूंची खरेदी-विक्री करू शकतो.

आपल्याकडे अनेक लोक ऑप्शन्स आणि इक्विटी ट्रेडिंगमध्ये जास्त काम करतात मात्र कमोडिटी ट्रेडिंग अजूनही काही अंशी दुर्लक्षित आहे.

कमोडिटी ट्रेडिंगचे अनेक फायदे आहेत त्यामुळे आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होत नसल्यास आपण कमोडिटी ट्रेडिंग करू शकतात.

आजच्या लेखात आपण कमोडिटी ट्रेडिंगची ओळख करून घेणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.

कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय ? । What is Commodity Trading ?

कमोडिटी म्हणजे वस्तू होय.

कमोडिटी प्रकारात प्रामुख्याने कच्चा माल समाविष्ट होतो.

उदा. मका, कापूस. धने, नैसर्गिक वायू, खनिज तेल, सोने, चांदी इ.

मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये वरील वास्तूंमध्ये जो व्यापार चालतो किंवा ट्रेडिंग होते त्या ट्रेडींगला आपण कमोडिटी ट्रेडिंग असे म्हणतो.

कमोडिटी ट्रेडिंगचा इतिहास | History of Commodity Trading in Marathi

मित्रांनो, कमोडिटी ट्रेडिंगला स्टॉक ट्रेडिंगपेक्षा देखील अधिक जुना इतिहास आहे.

आपला भारत देश आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे तेव्हा कमोडिटी ट्रेडिंगची सुरुवात कदाचित भारतातच झालेली असू शकते.

भारतात, १८७५ मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशन या पहिल्या संघटित कमोडिटी ट्रेडिंग सेंटरच्या स्थापनेपासून कमोडिटी ट्रेडिंगची सुरुवात झाली आणि भारतात फ्युचर्स ट्रेडिंगचा पाया घातला.

कमोडिटीचे प्रकार मराठी । Types of Commodities in Marathi

आता आपण आपल्याला उपलब्ध असलेल्या कमोडिटीच्या प्रकारांची माहिती घेऊया.

१. शेतीमाल :

पहिल्या प्रकारात शेतीवर आधारित मालाचा समावेश होतो जसे कि चना, कापूस, मका, सोयाबीन, धने, जिरा, गहू, तांदूळ इ.

२. धातू :

धातू या प्रकारात विविध धातूंचा व्यापार केला जातो.

उदा. सोने, चांदी, अल्युमिनियम, तांबे इ

३. ऊर्जा : खनिज तेल, नैसर्गिक वायू इ.

भारतीय कमोडिटी मार्केट । Indian Commodity Exchange

  1. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX)
  2. नॅशनल कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज (NCDEX)
  3. इंडियन कमोडिटी एक्सचेंज (ICEX)
  4. राष्ट्रीय शेअर बाजार (NSE)
  5. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)

कमोडिटी मार्केट कसे काम करते? । How Does a Commodity Market Work?

आपण असे समजूया कि आपण एमसीएक्स (MCX ) वर सोन्याचा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक १०० ग्रॅमसाठी ७२,००० रुपये याप्रमाणे खरेदी केला.

एमसीएक्स वर सोन्याचे मार्जिन ३.५% आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट खरेदी करण्यासाठी फक्त रु. २५२० रुपये द्यावे लागतात.

आता आपण समजूया कि दुसऱ्या दिवशी सोन्याची किंमत रु. ७३००० प्रति १०० ग्रॅम. पर्यंत वाढली.

अशाप्रकारे आपल्याला आपल्या व्यवहारात १००० रुपये नफा होतो याउलट दुसऱ्या दिवशी आपल्या सोन्याच्या कॉन्ट्रॅक्टची प्राईस जर ७१००० पर्यंत घसरली तर आपल्याला १००० रुपये तोटा होईल.

अशाप्रकारे आपल्याला कमी भांडवलात कमोडिटी ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा मिळवता येऊ शकतो पण कमोडिटीजच्या ट्रेडिंगशी संबंधित जोखीम देखील जास्त असते कारण बाजारातील होणारी चढ-उतार देखील असामान्य असते.

भारतात कमोडिटी ट्रेडिंगचे नियमन कोण करते? । Who regulates commodity trading in India ?

सेबी भारतातील कमोडिटी मार्केट ट्रेडिंगचे नियमन करते.

कमोडिटी ट्रेडिंग मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट रेग्युलेशन डिपार्टमेंट (CDMRD) देखरेख करते.

अलीकडे, सेबी (SEBI) ने म्युच्युअल फंड यांना देखील कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची परवानगी दिली आहे.

स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग विषयी अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ची लिंक बुकमार्क करा, आणि ‘पैसा झाला मोठा’ ॲप डाउनलोड करा.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

याशिवाय पैसा झाला मोठा युट्युब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका.

आपण वेळातवेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment