मित्रांनो, जर तुम्ही इन्ट्राडे ट्रेडर असाल तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे.
या लेखात आपण जे इंडीकेटर आणि स्ट्रॅटेजी बघणार आहोत त्या फक्त इन्ट्राडे ट्रेडींगसाठीच शोधल्या गेल्या आहे तेव्हा हा लेख जरूर वाचा.
आपण VWAP इंडीकेटर ची सविस्तर चर्चा करणार आहोत तसेच त्याचा आपण ट्रेडींगसाठी कसा वापर करू शकतो तेदेखील बघणार आहोत.
VWAP म्हणजे प्राइस आणि व्हॉल्युम चे मिश्रण करून तयार होणारे एक साधन असल्याने आपण जरी प्राइस ॲक्शन ट्रेडर असाल तरी आपल्याला या लेखातून नक्कीच उपयोगी माहिती मिळू शकेल.
VWAP चा वापर मोठे इन्व्हेस्टर्स, फंड मॅनेजर्स आणि मोठ्या इन्स्टिट्यूशन्स देखील करतात त्यामुळे VWAP ला एक वेगळे महत्व आहे.
चला तर मग सुरुवात करूया
व्हीवॅप म्हणजे काय?
लेखात मी VWAP चा उल्लेख आपण बोली भाषेत वापरतो तसा व्हीवॅप असा केला आहे.
अगोदरच सांगितल्याप्रमाणे व्हीवॅप हे प्राइस आणि व्हॉल्युम यांचे मिश्रण करून तयार होणारे इंडिकेटर आहे.
सर्वात प्रथम आपण चार्टवर व्हीवॅप बघूया आणि मग व्हीवॅप कसे तयार होते ते समजून घेऊया.
खाली कॅन्डलस्टिक चार्टवर मी पिवळ्या रंगाने व्हीवॅप इंडिकेटर दाखवले आहे.

व्हीवॅप कसे तयार होते ?
खाली मी व्हीवॅप तयार करण्यासाठीचे सूत्र देत आहे.

खाली मी या सूत्रात वापरली जाणारी प्राइस कशी येते त्याचे सूत्र देत आहे. या प्राइसला टिपिकल प्राइस (Typical Price) असे म्हणतात.

आता आपण एक उदाहरण बघूया जेणेकरून आपल्याला व्हीवॅप कसे तयार होते ते अधिक स्पष्ट होईल.
खालील टेबलमध्ये आपल्याला काही डेटा दिला आहे असे आपण समजूया.
प्राइस | व्हॉल्युम | प्राइस x व्हॉल्युम | एकूण (प्राइस x व्हॉल्युम) | एकूण व्हॉल्युम | व्हीवॅप |
१० | १०० | १००० | १००० | १०० | १० |
११ | ११० | १२१० | २२१० | २१० | १०.५२ |
१५ | १५० | २२५० | ४४६० | ३६० | १२.३८ |
१३ | ५० | ६५० | ५११० | ४१० | १२.४६ |
१८ | १७० | ३०६० | ८१७० | ५८० | १४.०८ |
घाबरू नका मित्रांनो आपल्याला व्हीवॅपच्या गणितात घुसण्याची गरज नाही.
आपण आपल्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्म किंवा ऍप मध्ये इंडीकेटरच्या पर्यायातून अगदी सहजपणे व्हीवॅप चार्टवर लावू शकतात.
माझे झिरोधामध्ये अकाउंट असल्याने मी या इथे वापरलेले सर्व चार्ट हे झेरोधा प्लँटफॉर्मचे वापरले आहे.
आपल्याला झेरोधामध्ये अकाउंट ओपन करायचे असल्यास मी खाली लिंक देत आहे.
व्हीवॅप म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स
सपोर्ट म्हणजे एक अशी लेव्हल जिथून खाली स्टॉकची किंमत घसरायचं थांबते किंवा पुन्हा वाढायला सुरुवात होते याउलट रेझिस्टन्स म्हणजे एक अशी लेव्हल जिथून वर स्टॉकची किंमत वाढायचं थांबते किंवा कमी व्हायला सुरुवात होते.
मित्रांनो, आपण याआधीच सपोर्ट आणि रेझिस्टन्स यांची सविस्तर ओळख करून घेतलीच आहे तेव्हा या लेखात मी याबाबत अधिक खोलात जात नाही.
आपल्याला चार्टवर सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल आखाव्या लागतात पण आपण व्हीवॅप इंडीकेटरचा वापर सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणून करू शकतो.
सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हलला लागू असणारे सर्व नियम व्हीवॅपला देखील लागू होतात.
हेच आपण आता चार्टवर बघूया.

सोबतच्या चार्टवर अमराजाबॅट स्टॉकची एक दिवसाची हालचाल दाखवली आहे आणि टाइमफ्रेम आहे १५ मी.
चार्टवर मी उठून दिसणाऱ्या पिवळ्या रंगाने व्हीवॅप इंडीकेटर दाखवला आहे.
आपण स्पष्टपणे बघू शकतो कि स्टॉक ओपन झाल्यानंतर दोन हॅमर कॅण्डल तयार झाल्या आहेत हॅमर कॅण्डल म्हणजे डिमांड होय.
त्यानंतर स्टॉक वरवर जात राहिला आहे आणि स्टॉक जेव्हा जेव्हा व्हीवॅप (पिवळ्या रंगाची लेव्हल) जवळ आला आहे तेव्हा तेव्हा उसळी मारून पुन्हा वर गेला आहे.
अशाचप्रकारे खाली आपल्यासोबत टाटा स्टील कंपनीचा एका दिवसाचा १५ मी टाइमफ्रेमचा कॅन्डलस्टिक चार्ट आहे.

आपण चार्टवर बघू शकतो कि स्टॉकने अतिशय कमजोर ओपनिंग दिली आहे आणि स्टॉक खाली घसरला आहे.
जेव्हा जेव्हा स्टॉक व्हीवॅप लेव्हल पासून वर येण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा तेव्हा बेअर्स पूर्ण ताकदीनिशी स्टॉकची किंमत पुन्हा खाली ढकलत आहे.
यातून आपल्या लक्षात येईल कि आपण व्हीवॅप इंडिकेटरचा वापर सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणून करू शकतो.
व्हीवॅप वापर ट्रेडींगसाठी कसा करावा ?
व्हीवॅपचा वापर ट्रेडींगसाठी करतांना आपल्याला बुलिश क्रॉस ओव्हर आणि बेअरिश क्रॉस ओव्हर ची मदत होते.
बुलिश क्रॉस ओव्हर
बुलिश क्रॉस ओव्हर म्हणजे अगदी ब्रेकआऊट ट्रेडींग करण्यासारखं आहे.
बुलिश क्रॉस ओव्हर होण्यासाठी स्टॉकमध्ये एक हिरवी कॅण्डल व्हीवॅपच्या पलीकडे जाऊन क्लोज व्हावी लागते याशिवाय या कॅण्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा अधिक असल्यास स्टॉक मध्ये मोठी बुलिश मूव्ह होण्याची शक्यता अधिक असते.
आता आपण बुलिश क्रॉस ओव्हर चार्टवर बघूया.

चार्टवर काय घडलय ते आता समजून घेऊ.
आपल्यासोबत बंधनबँकेचा ५ मी टाइमफ्रेमचा कॅन्डलस्टिक आणि व्हॉल्युम चार्ट आहे.
स्टॉकची सुरुवात अतिशय कमजोर झाली आहे मात्र तुम्ही निरखून बघितल्यास तुम्हाला ओपनिंग कॅण्डलला एक मोठी टेल दिसेल.
हि टेल आपल्याला खाली डिमांड दर्शवते आहे.
त्यानंतर एक हॅमर आणि बुलिश क्रॉस ओव्हर तयार झाला आहे आणि क्रॉसिंग कॅन्डलचा व्हॉल्युम सुद्धा सरासरीपेक्षा अधिक आहे.
मित्रांनो, अशावेळी आपण क्रॉसिंग कॅन्डलच्या हाय प्राइस जवळ बाय करू शकतो.
स्टॉप लॉस लावण्यासाठी आपण क्रॉसिंग कॅन्डलचा लो किंवा शेवटचा स्विंग लो वापरू शकतो.
टारगेटसाठी आपण चार्टवर अगोदर तयार झालेल्या रेझिस्टन्स लेव्हलचा आधार घ्यायचा आहे किंवा आपल्या रिस्क-रिवॉर्ड प्रमाणे ट्रेडमधून बाहेर पडायचं आहे.
व्हीवॅप बुलिश रिव्हर्सल
मित्रांनो, रिव्हर्सल ट्रेड करण्यासाठी आपल्याला कॅन्डलस्टिकची पुरेपूर माहिती असणे गरजेचे आहे तेव्हा कॅन्डलस्टिक विषयीचे पैसा झाला मोठा वरील लेख जरूर वाचा.
व्हीवॅप एखाद्या सपोर्ट प्रमाणे काम करतो हे आपण याआधीच पहिले आहे तेव्हा व्हीवॅप जवळ बुलिश रिव्हर्सल सिग्नल मिळाल्यास आपण ट्रेड मध्ये एन्ट्री घेऊ शकतो.
बुलिश रिव्हर्सल सिग्नल मध्ये हॅमर, एनगलफिंग, पियरसिंग इ. कॅन्डलस्टिक पॅटर्नचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
मी खाली ग्रॅसिम कंपनीचा ५ मी टाइमफ्रेमचा कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हॉल्युम तसेच व्हीवॅप इंडीकेटर दाखवले आहे.

आपण बघू शकतो कि स्टॉक ओपन झाल्यानंतर एक बुलिश क्रॉस ओव्हर तयार झाला आहे याशिवाय स्टॉक जेव्हा जेव्हा व्हीवॅप पासून खाली घसरला आहे तेव्हा तेव्हा कॅण्डलला टेल तयार झाल्या आहेत. यावरून व्हीवॅप पासून खाली स्टॉक मध्ये डिमांड असल्याची पुष्टी होते.
अशावेळी आपल्याला व्हीवॅप जवळ बुलिश सिग्नल तयार झाल्यास बाय साइड एन्ट्री घ्यायची आहे.
आपण चार्टवर बघू शकतो कि दोन ठिकाणी आपल्याला एन्ट्री साठी सिग्नल भेटले आहेत.
बेअरिश क्रॉस ओव्हर
आता आपण बेअरिश क्रॉस ओव्हर बघणार आहोत.
बेअरिश क्रॉस ओव्हर म्हणजे अगदी ब्रेकडाउन झाल्यानंतर शॉर्ट ट्रेड करण्यासारखं आहे.
जे नियम बुलिश क्रॉस ओव्हर ला लागू होतात तेच सर्व नियम बेअरिश क्रॉस ओव्हर ला लागू होतात.
बेअरिश क्रॉस ओव्हर होण्यासाठी चार्टवर एक लाल कॅण्डल व्हीवॅपच्या पलीकडे खाली क्लोज व्हावी लागते याशिवाय या कॅण्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा अधिक असल्यास स्टॉक मध्ये मोठी बेअरिश मूव्ह येण्याची शक्यता अधिक असते.
आता आपण बेअरिश क्रॉस ओव्हर चार्टवर बघूया
खाली आपल्यासोबत ग्रॅसिम कंपनीचा एक दिवसाचा ५ मी टाइमफ्रेमचा चार्ट आहे.

आपण चार्टवर बघू शकतो कि एक मोठ्या लाल कॅन्डलने व्हीवॅपच्या पलीकडे जाऊन क्लोझिंग दिली आहे तसेच क्रॉस ओव्हर करणाऱ्या कॅण्डलचा व्हॉल्युम देखील सरासरीपेक्षा पुष्कळ जास्त आहे.
बेअरिश क्रॉस ओव्हर नंतर तयार झालेली हिरवी कॅण्डल अतिशय लहान, कमजोर आणि कमी व्हॉल्युमची आहे.
यावरून असे लक्षात येते कि आता स्टॉकमध्ये बेअर्सने पूर्णपणे नियंत्रण घेतले असून स्टॉकमध्ये बेअरिश मूव्ह येऊ शकते.
अशा प्रकारे खात्री होताच आपण स्टॉक मध्ये शॉर्ट साइड ट्रेड घेऊ शकतो.
स्टॉप लॉससाठी आपण क्रॉस ओव्हर कॅन्डलची हाय लेव्हल किंवा जवळचा स्विंग हाय पॉईंट वापरणार आहोत.
व्हीवॅप बेअरिश रिव्हर्सल
व्हीवॅप एखाद्या रेझिस्टन्स प्रमाणे काम करतो हे आपण याआधीच पहिले आहे तेव्हा व्हीवॅप जवळ बेअरिश रिव्हर्सल सिग्नल मिळाल्यास आपण ट्रेड मध्ये एन्ट्री घेऊ शकतो.
बेअरिश रिव्हर्सल सिग्नल मध्ये इन्व्हर्टेड हॅमर, डार्क क्लाउड कव्हर, एनगलफिन्ग इ. कॅन्डलस्टिक पॅटर्नचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
आता आपण व्हीवॅप आणि बेअरिश रिव्हर्सल बघूया.

मित्रांनो, आपल्यासोबत इथे अमरजाबॅट स्टॉकचा कॅन्डलस्टिक चार्ट आणि व्हीवॅप इंडिकेटर आहे.
आपण बघू शकतो अमरजाबॅट कमजोर ओपन झाला आहे आणि व्हीवॅप इंडीकेटरच्या वर तयार झालेल्या मोठ्या वीक या स्टॉकमध्ये बेअर्सच वर्चस्व असल्याचं प्रतीक आहे.
जेव्हा जेव्हा बुल्सने स्टॉक व्हीवॅपच्या वर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा स्टॉकला मोठ्या रिजेक्शनला सामोरे जावे लागले आहे.
अशावेळी आपण व्हीवॅप जवळ तयार होणाऱ्या बेअरिश सिग्नलचा वापर स्टॉकमध्ये शॉर्ट साइड एन्ट्रीसाठी करू शकतो.
व्हीवॅपचा वापर आपण ट्रेडींगसाठी कसा करू शकतो हे तर आपण बघितलं पण व्हीवॅपचा वापर मोठे फंड मॅनेजर अगदी याच्या विरुद्ध पद्धतीने करतात तो कसा चला बघूया.
व्हीवॅप आणि फंड मॅनेजर
मित्रांनो. मोठया संस्था आणि मोठे इन्व्हेस्टर्स खूप मोठ्या प्रमाणात शेअर्स घेतात आणि जास्त काळासाठी होल्ड करतात.
अशावेळी लाखो शेअर्स खरेदीची मार्केट ऑर्डर टाकल्यास स्टॉकची किंमत अचानक खूप जास्त वाढू शकते आणि मार्केटमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते.
यासाठी शेअर्स खरेदी करतांना ती खरेदी सरासरी किमतीला व्हावी यासाठी मोठे इन्व्हेस्टर्स शेअरची किंमत व्हीवॅपच्या खाली ट्रेड करत असताना खरेदी करतात.
याउलट विक्री करतांना शेअरची किंमत व्हीवॅपच्या वर ट्रेड करत असतांना शेअरची विक्री केली जाते.
आपण असे मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार व्हॉल्युम चार्टवर बघू शकतो.
मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण व्हीवॅप इंडिकेटर ची माहिती घेतली.
आपण आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटबॉक्समध्ये कळवाल अशी मी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो.
अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.
आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
- कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? मराठी | What is Candlestick Chart & Candlestick in Marathi
- व्हॉल्युम आणि व्हॉल्युम ॲनालिसिस मराठी | Volume and Volume Analysis in Marathi
- हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न मराठी । Head and Shoulder Chart Pattern in Marathi
- इन्ट्राडे ट्रेडींग मराठी | Intraday Trading in Marathi
- ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी मराठी | Opening Range Breakout Strategy in Marathi