अपडेट:
- तत्व चिंतन फार्मा शेअर विक्रमी १८० पट सबस्क्राइब झाला आहे
मित्रांनो, या लेखात आपण आज खुल्या झालेल्या तत्व चिंतन फार्मा केमिकल्स या कंपनीच्या आई पि ओ बद्दल माहिती घेणार आहोत.
तत्व चिंतन फार्मा केमिकल्सच्या या आई पि ओ ची एकूण किंमत आहे ५०० कोटी रुपये.
पहिल्याच दिवशी हा आई पि ओ ४.५ पट सबस्क्राइब झाला आहे.
गेल्या काही दिवसापासून केमिकल क्षेत्रातील आई पि ओ आणि कंपन्यांना बाजारात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या शेअरविषयी माहिती घेणे आपल्याला फायद्याचे ठरेल
एकूण आई पि ओ च्या किमतीपैकी २२५ कोटी रुपयांचे शेअर्स हे नवीन असून २७५ कोटी रुपये किमतीचे शेअर्स हे सध्याच्या गुंतवणूकदारांकडून विक्रीस उपलब्ध केले गेले आहेत
तत्व चिंतन फार्मा सब्सक्रिप्शन स्टेटस | Tatva Chintan Pharma Subscription Status
सब्सक्रिप्शन स्टेटस | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स /Institutional Investors) | १८५.२३ पट |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स / Non-Institutional Investors /NII’S) | ५१२.२२ पट |
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors ) | ३५.३५ पट |
एकूण | १८०.३६ पट |
एकूण शेअर्स पैकी ३५% शेअर्स हे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)उपलब्ध असणार आहे
एकूण शेअर्स पैकी ५०% शेअर्स हे गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स /Institutional Investors) साठी उपलब्ध असणार आहे.
एकूण शेअर्स पैकी १५% शेअर्स संस्थात्मक नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी (NII’S) उपलब्ध असणार आहे
या आई पि ओ मध्ये एका शेअरची किमान किंमत १०७३ रुपये तर कमाल किंमत १०८३ रुपये आहे.
एका लॉटमधील शेअरची संख्या हि १३ आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि कमीत कमी १३ * १,०७३ = १३,९४९ रुपये तर जास्तीत जास्त १३ * १,०८३ = १४,०७९ रुपये इतकी असू शकेल.
या आई पि ओ मध्ये आपण जास्तीत जास्त १४ लॉटची खरेदी करू शकतो म्हणजेच एकूण १०,९७,१०६ रुपयाची गुंतवणूक करू शकतो
तत्व चिंतन फार्मा आई पि ओ ची तारीख | Tatva Chintan Pharma IPO Release Date
तत्व चिंतन फार्माचा आई पि ओ आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी खुला झाला असून दिनांक २० जुलै २०२१ पर्यंत खुला असणार आहे.
तत्व चिंतन फार्मा कधीपर्यंत मार्केट मध्ये लिस्ट होणार याची अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी साधारणतः २९ जुलै २०२१ रोजी तत्व चिंतन फार्मा मार्केट मध्ये लिस्ट होईल अशी शक्यता आहे
तत्व चिंतन फार्मा कंपनीची माहिती | Information of Tatva Chintan Pharma
तत्व चिंतन फार्मा केम लि. हि एक गुजरात स्थित कंपनी आहे.
तत्व चिंतन फार्मा ची सुरवात १२ जून १९९६ रोजी झालेली आहे
कंपनीचे प्रमोटर्स:
- चिंतन शाह
- अजय पटेल
- शेखर सोमाणी
तत्व चिंतन फार्मा यू एस ए, चीन, जर्मनी, युनाइटेड किंग्डम, जपान, दक्षिण आफ्रिका अशा २५ पेक्षा जास्त देशांत प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट करते.
कंपनीचे मुख्य ४ प्रकारातील प्रॉडक्ट्स;
- स्ट्रक्चर डिरेक्टिंग एजन्ट्स (SDA)
- फेज ट्रान्स्फर कॅटलिस्ट (PTC)
- इलेक्ट्रो लाइट सॉल्ट्स
- फार्मास्युटिकल केमिकल्स अँड अग्रोकेमिकल
अशाप्रकारे तत्व चिंतन फार्मा एकूण १३८ प्रॉडक्ट्स बनवते
तत्व चिंतन फार्माची उजवी बाजू | Positives of Tatva Chintan Pharma
- तत्व चिंतन फार्मा हि २४ वर्षाहून अधिक काळापासून कार्यरत असणारी कंपनी.
- अनुभवी आणि उत्तम व्यवस्थापन असणारी कंपनी
- जगभर असणारा कंपनीच्या उदयोगाचा विस्तार हि जमेची बाजू
- मोठी प्रॉडक्ट रेंज १३८)
- मागील ३ वर्षांपासून कंपनी सतत नफ्यात आणि आर्थिक स्तरावर कंपनीचे चांगले रेकॉर्ड आहे
तत्व चिंतन फार्माची डावी बाजू | Negatives of Tatva Chintan Pharma
- तत्व चिंतन फार्माचे सप्लायर्स आणि कस्टमर्स लिमिटेड आहे
- तत्व चिंतन फार्माची सर्वात मोठी बाजारपेठ चीन असल्याने भारत-चीन तणावपूर्ण संबंधाचे परिणाम कंपनीच्या कारभारावर होण्याचे संकट असते.
किती सबस्क्राइब झाला तत्व चिंतन फार्माचा शेअर? | How Much is Tatva Chintan Pharma IPO Subscribed ?
तत्व चिंतन फार्माचा आई पि ओ विक्रमी २६ पट सबस्क्राइब झाला असून त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे
- किरकोळ गुंतवणूकदारासाठीचा (Retail Investors) हिस्सा ३५.२५ पट
- गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स /Institutional Investors)१८५.२३ पट
- संस्थात्मक नसलेल्या गुंतवणूकदारांसाठीचा (NII’s) हिस्सा ५१२.२२ पट
अधिक माहितीसाठी तुम्ही तत्व चिंतन फार्मा केम लि च्या वेबसाइट ला भेट देऊ शकतात
हे पण वाचा
झोमॅटो आईपिओ: शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ,आणि माहिती मराठीमध्ये