विजया डायग्नॉस्टिक्स आइपीओ मराठी: शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ, ग्रे मार्केट प्रिमिअम

Rate this post

Vijaya Diagnostic IPO Marathi: Share Price, Date, Lot Size, Grey Market Premium (GMP) in Marathi

मित्रांनो, येत्या आठवड्यात विजया डायग्नॉस्टिक्स कंपनीचा आईपिओ येत आहे.

आईपिओ च्या माध्यमातून विजया डायग्नॉस्टिक्स जवळपास १८९५.०४ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने हा एक मोठा आईपिओ असून यात आपल्याला गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे

विजया डायग्नॉस्टिक्स स्टॉक सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात म्हणजेच १४ सप्टेंबर २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

विजया डायग्नॉस्टिक्स स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.

विजया डायग्नॉस्टिक्स आईपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Vijaya Diagnostic IPO Subscription Status

खुला झाल्यानंतर विजया डायग्नॉस्टिक्स आइपीओ आत्तापर्यंत ४.५४ पट सबस्क्राइब झाल्याचे समजते.

सब्सक्रिप्शन स्टेटस
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)१३.०७ पट
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)१.३२ पट
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)१.०९ पट

विजया डायग्नॉस्टिक्स आईपिओ शेअर्सची उपलब्धता | Vijaya Diagnostic Availability of Shares

विजया डायग्नॉस्टिक्स आईपिओची किंमत १८९५.०४ कोटी रुपये असून पूर्ण १८९५०४ कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल) उपलब्ध केले गेले आहेत.

विजया डायग्नॉस्टिक्सचे एकूण ३,५६,८८,०६४ शेअर्स उपलब्ध केले जाणार आहे.

उपलब्ध शेअर्सचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असणार आहे.

शेअर्सची उपलब्धता
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)५० %
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)१५ %
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)३५ %

विजया डायग्नॉस्टिक्स आईपिओची किंमत आणि लॉट साईझ | Vijaya Diagnostic IPO Share Price

विजया डायग्नॉस्टिक्स शेअरची दर्शनी किंमत हि १ रुपये आहे.

या आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ५२२ रुपये आणि कमाल किंमत ५३१ रुपये असणार आहे

एका लॉटमधील शेअरची संख्या हि  २८  असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि  २८  *  ५२२ =१४,६१६ रुपये  ते  २८   ५३१  १४,८६८  रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच  १४,६१६  रुपये  तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १९३२८४ रुपये इतकी असणार आहे.

विजया डायग्नॉस्टिक्स आईपिओ ची तारीख | Vijaya Diagnostic IPO Release Date

विजया डायग्नॉस्टिक्स आईपिओ १ सप्टेंबर २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ३ सप्टेंबर २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आईपिओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

विजया डायग्नॉस्टिक्स शेअर्सची अलॉटमेंट ८ सप्टेंबर २०२१ रोजी चालू होणार असून १३ सप्टेंबर २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर १४ सप्टेंबर २०२१ ला विजया डायग्नॉस्टिक्स बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

विजया डायग्नॉस्टिक्स आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Vijaya Diagnostic IPO?

सध्या मार्केटमध्ये ॲपटस इंडिया आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम३५ रुपये ते ४० रुपये असल्याचे समजते

विजया डायग्नॉस्टिक्स आईपिओचा उद्देश | Objectives of Vijaya Diagnostic IPO

  • स्टॉक एक्सचेंजवर स्टॉक लिस्ट झाल्यावर मिळणाऱ्या सुविधांचा लाभ मिळवणे
  • दैनंदिन आर्थिक व्यवहार.

विजया डायग्नॉस्टिक्स कंपनीची माहिती | Information of Vijaya Diagnostic

प्रमोटर्स:

डॉ. एस. सुरेंद्रनाथ रेड्डी हे विजया डायग्नॉस्टिक्स कंपनीचे प्रमोटर आहेत.

विजया डायग्नॉस्टिक्स कंपनीची स्थापना १९८१ मध्ये झालेली आहे.

विजया डायग्नॉस्टिक्स सेंटर हि दक्षिण भारतातील सर्वात वेगाने वाढणारी डायग्नॉस्टिक्स नेटवर्क पैकी एक आहे.

विजया डायग्नॉस्टिक्स आपल्या ग्राहकांना पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी चाचण्यांसारख्या सेवा पुरवते.

विजया डायग्नोस्टिक कंपनी सुमारे ७४० नियमित चाचण्या, ८७० विशेष पॅथॉलॉजी चाचण्या, २२० मूलभूत चाचण्या आणि ३२० प्रगत रेडिओलॉजी चाचण्या देते.

विजया डायग्नॉस्टिक्स आपल्या ग्राहकांना कस्टमाइझ आणि वेलनेस पॅकेजचे विस्तृत पर्याय उपलब्ध करून देते.

विजया डायग्नॉस्टिक्सचे नेटवर्क तेलंगणा, आंध्र प्रदेश, राज्यांमधील १३ शहरे तसेच दिल्ली, कोलकाता शहरांमध्येपसरले आहे.

कंपनीचे सध्या ८० डायग्नॉस्टिक्स सेंटर, ११ लॅबोरॅटरीज आहेत.

३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने जवळपास २.६३ दशलक्ष ग्राहकांना अंदाजे ६.२० दशलक्ष पॅथॉलॉजी चाचण्या आणि ०.८९ दशलक्ष रेडिओलॉजी चाचण्याची सेवा पुरवली.

३१ मार्च २०२१ पर्यंत विजया डायग्नॉस्टिक्सच्या सर्व सेंटरला नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) मान्यता आहे.

विजया डायग्नोस्टिकच्या तीन डायग्नॉस्टिक्स सेंटरमध्ये पेशंट सेफ्टी अँड क्वालिटी ऑफ केअर (एनएबीएच) मान्यता आहे.

विजया डायग्नॉस्टिक्सची उजवी बाजू | Positives of Vijaya Diagnostic

  • दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी डायग्नॉस्टिक्स कंपनी.
  • वाजवी दरात, दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी प्रसिद्ध
  • विजया डायग्नॉस्टिक्सच्या सर्व सेंटर्सला राष्ट्रीय मान्यता आहे.

थोडक्यात महत्वाचे | All Important

विजया डायग्नॉस्टिक्स आईपिओ १८९५.०४ कोटी रुपये
किमान किंमत ५२२ रुपये
कमाल किंमत ५३१ रुपये
लॉट साईझ २८
एकूण गुंतवणूक १४,६१६ रुपये  ते १४,८६८  रुपये
आईपिओ खुला होणार १ सप्टेंबर २०२१
आईपिओ बंद होणार ३ सप्टेंबर २०२१
शेअर्स इश्यू होणार ८ सप्टेंबर २०२१
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार १३ सप्टेंबर २०२१
विजया डायग्नॉस्टिक्स शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार १४ सप्टेंबर २०२१

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात

विजया डायग्नॉस्टिक्स

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment