नमस्कार मित्रांनो,
पैसा झाला मोठा’च्या नव्या लेखात आपले स्वागत आहे.
या लेखाद्वारे आपल्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या अभ्यासात आणखी एका कॅन्डलस्टिक पॅटर्नची भर पडणार आहे.
आज आपण बुलिश तासूकी लाइन्स या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करणार आहोत.
बुलिश तासूकी लाइन्स हा एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.
हा एक रिव्हर्सल पॅटर्न असून चार्टवर हा पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमधील मंदी संपून स्टॉकमध्ये तेजी येते.
चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया.
बुलिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कसा होतो ?
खालील चित्रात मी बुलिश तासुकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.
या पॅटर्नची वैशिष्ट्ये म्हणजे गॅप-अप ओपनिंग आणि अगोदरच्या कॅन्डलच्या वर जाऊन होणारी क्लोझिंग होय.
हा पॅटर्न दोन कॅन्डलस्टिक पासून तयार होतो म्हणून हा एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.
हा पॅटर्न एका मोठ्या डाउनट्रेण्ड नंतर तयार झाल्यास स्टॉकमध्ये तेजी येणार असल्याचे समजले जाते.
चित्रात दाखवल्याप्रमाणे १ ली कॅण्डल हि डाउनट्रेण्ड नंतर तयार झालेली एक मोठी लाल कॅण्डल आहे.
दुसरी कॅण्डल गॅप-अप ओपन झाली आहे, कॅण्डल गॅप-अप ओपन होणे हा एक बुलिश सिग्नल आहे.
चित्रात तयार होणारी दुसरी कॅण्डल हि एक मोठी बुलिश कॅण्डल आहे आणि ती लाल कॅन्डलची हाय प्राइस लेव्हल ब्रेक करून वर जाऊन क्लोझ झाली आहे.
आपल्याला व्हॉल्युमचे कन्फर्मेशन भेटल्यास आपण स्टॉकमध्ये लगेच बाय साइड एन्ट्री करू शकतो.
लेखात आपण ट्रेडमध्ये एन्ट्री आणि चार्टवर हा पॅटर्न तयार कसा होतो ते बघितलेच आहे तेव्हा हा लेख पूर्ण वाचा.
बुलिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर
आपल्या सोबत खाली बँक ऑफ बरोडा कंपनीचा स्टॉक आहे.
चार्टवर डेली टाइमफ्रेम वापरली आहे.
चार्टवर मी बुलिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.
आपण चार्टवर बघू शकतो कि बँक ऑफ बरोडा ९-१० दिवसांपासून डाउनट्रेंन्डमध्येच होता मात्र चार्टवर बुलिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताच स्टॉक मधील ट्रेण्ड बदलला आहे आणि स्टॉकमध्ये अपट्रेंन्ड चालू झाला आहे.
बुलिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा.
आता आपण बँक ऑफ बरोडा कंपनीचाच चार्ट वापरून ट्रेडींगसाठी बुलिश तासूकी लाइन्सचा वापर कसा करता येतो ते बघणार आहोत.
चार्टवर मी लाल आणि हिरव्या रंगाने दोन लेव्हल मार्क केल्या आहेत.
हिरव्या लेव्हलचा वापर आपण एन्ट्रीसाठी करू शकतो तर लाल लेव्हलचा वापर आपण स्टॉपलॉस सेट करण्यासाठी करायचा आहे.
चार्टवर जरी या दोन लेव्हलने एन्ट्री आणि स्टॉप लॉस लेव्हल मार्क केल्या असल्या तरी आपल्याला स्टॉकमधील सर्व गोष्टींचे निरीक्षण करणे गरजेचे आहे.
चार्टवर बुलिश तासूकी लाइन्स तयार झाल्यावर तयार झालेल्या लाल कॅण्डल हिरव्या कॅन्डलच्या वरच्या भागात ट्रेडींग झाल्याचे दाखवत आहेत.
बुलिश तासूकी लाइन्स पॅटर्न तयार झाल्यानंतर तयार होणाऱ्या दोन्ही बेअरिश कॅन्डलचा व्हॉल्युम कमी होतो आहे तर त्यानंतर तयार झालेल्या दोन हिरव्या कॅण्डल आणि त्यांचा वाढणारा व्हॉल्युम स्टॉकमध्ये बायर्स आल्याचे दर्शवतो आहे.
अशाप्रकारे कन्फर्मेशन भेटल्यानंतर आपण खरेदी करायची आहे आणि जोपर्यंत स्टॉकमध्ये बेअरिश सिग्नल तयार होत नाही तोपर्यन्त स्टॉक होल्ड करायचा आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण बुलिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्नची सविस्तर माहिती घेतली.
लेखात दिलेल्या माहितीविषयी कोणतीही शंका असल्यास मला कमेन्टबॉक्स मध्ये जरूर कळवा.
अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला लाइक करा, इन्स्ट्राग्राम वर फॉलो करा.
मला आशा आहे या लेखातून आपल्या माहितीत भर पडली असेल, आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
- कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? मराठी | What is Candlestick Chart & Candlestick in Marathi
- हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Hammer Candlestick Pattern in Marathi
- एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Engulfing Candlestick Pattern in Marathi
- डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Dark Cloud Cover Candlestick Pattern in Marathi
- पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Piercing Candlestick Pattern in Marathi
- बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bullish Harami Candlestick Pattern
- बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bearish Harami Candlestick Pattern in Marathi
- कॅण्डल (लॉन्ग)ॲनालिसिस मराठी | Long Candle Analysis in Marathi
- शॉर्ट कॅण्डल ॲनालिसिस मराठी | Short Candle Analysis in Marathi
- थ्री व्हाइट सोल्जर्स मराठी | Three White Soldiers in Marathi
- थ्री ब्लॅक क्रोझ मराठी | Three Black Crows in Marathi
- डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Doji Candlestick Pattern in Marathi
- मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Morning Star Candlestick Pattern in Marathi
- इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Evening Star Candlestick Pattern in Marathi
- बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi