निफ्टी ५० कंपन्या । Nifty 50 in Marathi

4/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो,

पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे.

या लेखात आपण निफ्टी ५० ची थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि येत्या काळात निफ्टी ५० कॅटेगरी अंतर्गत सर्व कंपन्यांची सविस्तर माहिती देखील बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

निफ्टी ५० काय आहे ? । What is Nifty 50?

निफ्टी ५० मध्ये विविध १३ क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.

निफ्टी ५० यादीतील कंपन्या या एनएसइ मधील अग्रगण्य ५० कंपन्या असून निफ्टी इन्डेक्स हा याच कंपन्यांपासून तयार होत असतो.

निफ्टी ५० महत्व । Importance of Nifty 50

आपल्यापैकी कोणीही शेअर बाजारात नवखे असाल तर आपण खालील कंपन्यांमध्येच काम करण्याचा मी सल्ला देईल.

निफ्टी ५० कंपन्यामध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमेचे आणि अधिक सुरक्षित असल्याचे समजले जाते कारण या सर्वात चांगल्या किंवा शेअर मार्केटच्या भाषेत हे ब्लु-चिप स्टॉक आहेत.

याशिवाय या कंपन्या ट्रेडींगसाठी देखील सुरक्षित आहेत कारण या कंपन्यांमध्ये भरपूर व्हॉल्युम, किमतीची पुष्कळ हालचाल आणि लिक्विडीटी आहे.

शेअर बाजारातील महत्वाचा निफ्टी इन्डेक्स या निफ्टी ५० कंपन्यावरच आधारित आहे.  

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

निफ्टी ५० कंपन्यांची यादी । List of Companies in Nifty 50

खाली मी निफ्टी ५० कंपन्यांची यादी देत असून पुढील लेखापासून आपण या प्रत्येक कंपनीची सविस्तर माहिती बघणार आहोत.

१. रिलायन्स इंडस्ट्रीज ली.
२. एच डी एफ सी बँक
३. इन्फोसिस
४. एच डी एफ सी
५. आई सी आई सी बँक
६. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
७. कोटक बँक
८. हिंदुस्थान युनिलिव्हर
९. आई टि सी
१०. ऍक्सिस बँक
११. एल अँड टी

१२. बजाज फायनान्स
१३. स्टेट बँक ऑफ इंडिया
१४. भारती एअरटेल
१५. एशियन पेंट१६. एच सी एल टेकनॉलॉजिज
१७. मारुती
१८. महिंद्रा अँड महिंद्रा
१९. अल्ट्राटेक सिमेंट
२० सनफार्मा
२१. टायटन
२२. टेक महिंद्रा
२३. नेस्टले इंडिया
२४. बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस
२५. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन
२६. इंडसइंड बँक
२७. टाटा स्टील
२८. एन ती पी सी
२९. बजाज ऑटोमोबाइल्स
३०. ओ एन जी सी३१. विप्रो
३२. जे एस डब्लू स्टील
३३. हिंदाल्को इंडस्ट्रीज
३४. डिव्हिस लॅबोरेटरीझ
३५. ग्रॅसिम इंडस्ट्रीज
३६. डॉ रेडडीझ लॅबोरेटरीझ
३७. एच डी एफ सी लाइफ इन्शुरन्स कंपनी ली.
३८. एस बी आई लाइफ इन्शुरन्स कंपनी ली.
३९. सिपला
४०. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस
४१. यु पी एल
४२ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन
४३. ब्रिटानिया इंडस्ट्रीज
४४. श्री सिमेंट४५. हिरो मोटर्स
४६. आयशर मोटर्स
४७. कोल इंडिया
४८. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
४९. टाटा मोटर्स
५०. अदानी पोर्ट्स

निफ्टी ५० क्षेत्राप्रमाणे विभागणी । Nifty 50 Sector Representation

क्षेत्र क्षेत्राचा वाटा %
आर्थिक सेवा (फायनान्शियल सर्व्हिसेस /FINANCIAL SERVICES)३८.२३
माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी IT)१६.७२
ऑइल अँड गॅस (OIL & GAS)१२.३५
(कन्झ्युमर गुड्स /CONSUMER GOODS)१०.५४
वाहन (AUTOMOBILE)५.०६
धातू (मेटल्स /METALS)३.५३
औषधनिर्माण (फार्मा /PHARMA)३.३१
बांधकाम (कन्स्ट्रक्शन /CONSTRUCTION)२.७८
(सिमेंट अँड सिमेंट प्रॉडक्ट्स /CEMENT & CEMENT PRODUCTS)२.५१
दूरसंचार (टेलिकॉम /TELECOM)२.११
ऊर्जा (पॉवर /POWER)१.६५
सेवा (सर्व्हिसेस /SERVICES)०.६६
खते आणि किटनाशके (फर्टिलायझर्स अँड पेस्टीसाइड्स /FERTILISERS & PESTICIDES)०.५३

निफ्टी ५० कंपनीप्रमाणे विभागणी । Nifty 50 Company Representation

खालील विभागणी २९ ऑक्टोबर २०२१ रोजी एनएसइच्या वेबसाइटवरील माहिती प्रमाणे आहे

कंपनी निफ्टी वाटा %
१. रिलायन्स इंडस्ट्रीज ली.१०.७०
२. एच डी एफ सी बँक९.०३
३. इन्फोसिस ८.०७
४. आई सी आई सी बँक ७.२५
५. एच डी एफ सी ७.२५
६. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस४.५९
७. कोटक महिंद्रा बँक३.८९
८. हिंदुस्थान युनिलिव्हर२.७९
९. लार्सन अँड टुब्रो २.७८
१०. बजाज फायनान्स २.५६

अशीच दर्जेदार माहिती मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे ‘पैसा झाला मोठा’ सोबत जोडले जाऊ शकता.

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2

धन्यवाद !!!

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment