मार्केट इझ ऑल्वेज राइट | Market is Always Right

Rate this post

नमस्कार मित्रांनो,

पैसा झाला मोठा‘ या आपल्या मराठमोळ्या प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे कि शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस किंवा फंडामेंटल ॲनालिसिसची माहिती असणे गरजेचे आहे.

याशिवाय आपल्याला आणखी एका गोष्टीवर काम करण्याची गरज असते आणि ती गोष्ट म्हणजे आपली मानसिकता.

शेअर मार्केटमध्ये काम करणे अवघड समजले जाण्याचे एक महत्वपूर्ण कारण म्हणजे काम करत असतांना लागणारी स्थिर आणि भक्कम मानसिकता होय.

आजपासून आपण ‘मेंटल ॲनालिसिस‘ या नवीन कॅटेगरी अंतर्गत शेअर मार्केटमध्ये काम करतांना आपल्याला आवश्यक असणाऱ्या मानसिक क्षमतांची माहिती घेणार आहोत.

चला तर मग लागूया कामाला.

https://www.youtube.com/channel/UCqC4TPrKqwsynH7Ymg9LU6Q

मार्केट इझ ऑल्वेज राइट | Market is Always Right

मार्केट इझ ऑल्वेज राइट“, आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करत असाल तर आपण हे वाक्य नक्की ऐकलं असेल आणि जर आपण हे ऐकलं नसेल तर आजच हे वाक्य तुमच्या मनावर कोरून घ्या.

मार्केट इझ ऑल्वेज राइट” हे प्रसिद्ध वाक्य आहे वॉलस्ट्रीटचा बादशहा अशी ओळख असणाऱ्या प्रसिद्ध ट्रेडर ‘जेस्सी लिव्हरमोर‘ यांच.

मार्केट इझ ऑल्वेज राइट” हा ट्रेडींग सायकोलॉजी किंवा ट्रेडींग करतांना आपल्याला आवश्यक असणाऱ्या मानसिकतेचा पाया आहे असे आपण म्हणू शकतो.

हे सर्व समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया

२६ नोव्हेंबर २०२१ रोजी मार्केट जोरदार कोसळलं, त्याचप्रमाणे ऑटो सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली.

ज्या लोकांनी या दिवशी इंट्राडेसाठी शॉर्ट पोझिशन घेतली असेल त्यांनी भरपूर प्रॉफिट कमावला असेल मात्र एक स्टॉक याला अपवाद होता तो म्हणजे ‘एस्कॉर्ट‘.

आता आपण २६ तारखेचे काही चार्ट बघूया.

nifty 26
निफ्टी
nifty auto
निफ्टी ऑटो
auto stocks
इतर ऑटो स्टॉक
escort
एस्कॉर्ट

अशाप्रकारे सर्व स्टॉक कोसळत असतांना स्टॉकमध्ये बाय साइड ट्रेड घेणे तसे चुकीचे वाटू शकते पण एस्कॉर्ट मात्र २६ तारखेला जोरदार वाढत होता.

अशाप्रकारे आपण मार्केटच्या बाबतीत अंदाज लावण्यात चुकू शकतो.

तसे बघता मार्केट चूक किंवा बरोबर असे काही नसते, मार्केट फक्त कमी होते किंवा वाढते.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

अनेकदा आपले ट्रेड चुकतात आणि आपण दुःखी होतो, अशा मनस्थितीत अजून जास्त ट्रेडींग करणे म्हणजे घोडचूक करण्यासारखे आहे.

ट्रेडींग करतांना लॉस होणे हा ट्रेडींग करण्याचाच एक भाग आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.

अशावेळी आपण आपलेच ॲनालिसिस बरोबर आहे आणि मार्केट असे करू शकत नाही असेच म्हणत राहिल्यास त्यातून आपल्याला काहीही फायदा होऊ शकत नाही.

खाली मी ‘बँक ऑफ बरोडा’ स्टॉकचा १० नोव्हेंबर २०२१ तारखेचा, ५ मी चार्ट घेतला आहे.

bankofbaroda

चार्टवर आपण बघू शकतो कि सेशनमध्ये दुसऱ्या भागात मोठी हिरवी कॅण्डल तयार झाली आणि डे हाय ब्रेक झाला आणि त्यानंतर एक मोठा फॉल आला आणि पुन्हा डे लो देखील ब्रेक झाला आहे.

हिरव्या मोठ्या कॅन्डलने जवळपास सर्व शॉर्ट साइड ट्रेडरचे स्टॉप लॉस हिट केले असणार आणि त्यानंतर आलेल्या मोठ्या लाल कॅन्डलने बाय साइड ट्रेड घेतलेल्या सर्वांचे स्टॉप लॉस घेतले असणार.

मार्केटमध्ये काम करत असताना असे काही सेशन असतात कि ज्यात आपल्या टेक्निकल ॲनालिसिसचा कुठेही उपयोग होतांना दिसत नाही.

मित्रांनो, आपल्याला इंट्राडे ट्रेडर म्हणून काम करत असतांना आपल्याला असे सेशन देखील बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात.

आपण जरा अशा ट्रेडमध्ये सामील असाल आणि तुमचा स्टॉप लॉस गेला तर त्याचा आनंद घ्यायला शिका कारण असे ट्रेड खूप कमी बघायला मिळतात आणि अशा सेशनच्या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही.

आपल्याला ट्रेडींग करतांना असे काही अनुभव आल्यास मनात म्हणायचं ‘मार्केट इझ ऑल्वेज राइट‘ आणि पुढे जात राहायचं.

थोडक्यात सांगायचं तर एक यशस्वी ट्रेडर होण्यासाठी आपल्याला फ्लेक्झिबल किंवा परिवर्तनासाठी तयार असणे खुप गरजेचे आहे.

अनेकदा असेदेखील होऊ शकते कि तुम्ही खूप अभ्यास करून इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडला आणि दुसऱ्या दिवशी त्या स्टॉकमध्ये पाहिजे तेवढी हालचाल झालीच नाही.

आपल्याला असे देखील अनुभव येऊ शकतात कि एखादा स्टॉक आपल्या ॲनालिसिस नुसार दुसऱ्या दिवशी वर जाईल असे वाटत असताना दुसऱ्या दिवशी जोरदार आपटतो किंवा एखादा स्टॉक दुसऱ्या दिवशी कोसळण्याऐवजी अचानक खूप जास्त वाढू शकतो.

आपल्याला ट्रेडर म्हणून काम करतांना अशा सर्व शक्यतांसाठी नेहमी तयार राहणे गरजेचे आहे.

असाच अनुभव आपल्याला स्टॉकमध्ये एन्ट्री घेतेवेळी देखील येऊ शकतो.

ब्रेकआऊट झाल्यानंतर स्टॉक वर जाण्याऐवजी अचानक जोरदार खाली कोसळु शकतो.

शेअर मार्केटच्या भाषेत यालाच फेल्ड ब्रेकआऊट किंवा फेकआऊट असे म्हणतात.

हिच गोष्ट स्टॉक रिव्हर्सलच्या बाबतीत देखील लागू होते.

अनेकदा स्टॉक आपल्या मोठ्या सपोर्ट पासून रिव्हर्स न होता सपोर्ट ब्रेक करून खाली घसरू शकतो.

आपल्याला शेअर मार्केटच्या जगात अशा अनेक अनप्रेडिक्टेबल किंवा अंदाज न करता येणाऱ्या गोष्टींसाठी नेहमी तयार राहणे गरजेचे आहे.

शेअर मार्केटमध्ये आणि विशेषतः ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला मानसिकरीत्या खूप जास्त स्थिर आणि भक्कम असणे गरजेचे आहे.

मानसिकता भक्कम करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आहे कि आपण मार्केटचे जे वातावरण आहे त्याचा पूर्ण स्वीकार करणे होय.

अनिश्चितता हा ट्रेडरच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे.

आपले ॲनालिसिस, आपला अंदाज याच्याशी मार्केटला काहीही घेणं-देणं नाही आणि तशी अपेक्षा करणे देखील रास्त नाही.

असे म्हणतात कि मते, भविष्य, अंदाज चुकीचे असू शकतात मार्केट नाही.

मार्केटमध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारा अपट्रेन्ड येत्या काही सेकंदात डाउनट्रेंडची सुरुवात असू शकतो आणि आपल्याला आपले निर्णय बदलत्या ट्रेंड नुसार बदलावे लागू शकतात.

आपण आपल्या ॲनालिसिसलाच घट्ट चिकटून राहिल्यास आपण एन्ट्री चुकवू शकतो, कमावलेला नफा गमावू शकतो तेव्हा आपल्याला लवचिक असणे खूप गरजेचे आहे.

शेअर मार्केटविषयी अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ची लिंक बुकमार्क करा, आणि ‘पैसा झाला मोठा’ ॲप डाउनलोड करा.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

आपण सवड काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment