वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओ | पेटीएम आयपिओ

Rate this post

One 97 Communications Limited IPO | Paytm IPO

मित्रांनो, येत्या काही दिवसांत पेटीएम ब्रॅण्डचा आयपिओ येत आहे.

पेटीएम हा वन ९७ कम्युनिकेशन्स ली. (One 97 Communications Ltd ) या कंपनीचा ब्रॅण्ड आहे.

आयपिओच्या माध्यमातून वन ९७ कम्युनिकेशन्स ली. जवळपास १६६००.०० कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने हा सध्याच्या काळातील खूप मोठा आयपिओ.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली. एक आर्थिक सेवा पुरवणारी भारतातील अग्रगण्य कंपनी असून आर्थिक सेवा क्षेत्रात आपल्याला गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली. स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.

हा एक बुक बिल्ट इश्यू असणार आहे.

चला तर मग माहिती घेऊया पेटीएम आयपिओची

अनुक्रमणिका hide
One 97 Communications Limited IPO | Paytm IPO

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओ सब्सक्रिप्शन स्टेटस |One 97 Communications Ltd IPO Subscription Status

आइपीओ खुला झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी १.८९ पट सबस्क्राइब झाला आहे.

सब्सक्रिप्शन स्टेटस
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)२.७९ पट
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)०.२४ पट
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)१.६६ पट

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओ शेअर्सची उपलब्धता | One 97 Communications Ltd Availability of Shares

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओची दर्शनी किंमत १/प्रति शेअर आहे.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओची एकूण किंमत १६,६००.०० कोटी रुपये असून ८,३००.०० कोटी रुपयांचे शेअर्स हे नव्याने विक्रीस (फ्रेश इश्यू ) उपलब्ध केले गेले असून ८,३००.०० कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल ) उपलब्ध केले गेले आहेत.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओची किंमत आणि लॉट साईझ | One 97 Communications Ltd IPO Share Price and Lot Size

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपीओ शेअरची दर्शनी किंमत हि १ रुपये आहे.

या आयपीओ मध्ये एका शेअरची किमान किंमत २०८० रुपये आणि कमाल किंमत २१५० रुपये असणार आहे.

एका लॉटमधील शेअरची संख्या हि ६ असणार आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ६ * २०८० = १२,४८० रुपये ते ६ * २१५० = १२,९०० रुपये इतकी असू शकेल.

रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १२,४८० रुपये तर जास्तीत जास्त १५ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९३,५०० रुपये इतकी असणार आहे.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओची तारीख | One 97 Communications Ltd IPO Date

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपीओ ८ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख १० नोव्हेंबर २०२१ असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपीओ शेअर्सची अलॉटमेंट १५ नोव्हेंबर २०२१ रोजी चालू होणार असून १७ नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर १८ नोव्हेंबर २०२१ ला वन ९७ कम्युनिकेशन्स ली बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of One 97 Communications Ltd IPO?

ग्रे मार्केट प्रिमिअम विषयी माहिती मिळताच इथे अपडेट केली जाईल.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपिओचा उद्देश | Objectives of One 97 Communications Ltd IPO

  • ग्राहक वाढवणे आणि सध्याचे ग्राहक टिकवणे.
  • आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवणे.
  • नवीन व्यवसायांत गुंतवणूक करणे आणि नव्या व्यावसायांसोबत भागीदारी करणे.
  • दैनंदिन आर्थिक व्यवहार.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली कंपनीची माहिती | Information of One 97 Communications Ltd

वन ९७ कम्युनिकेशन्स ली. कंपनीची स्थापना २००० मध्ये झाली असून आज वन ९७ कम्युनिकेशन्स ली. कंपनीचा पेटीएम हा अतिशय लोकप्रिय ब्रॅण्ड आहे.

श्री विजय शेखर शर्मा हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोर्डाचे अध्यक्ष आहेत.

श्री विजय शेखर शर्मा यांनी दिल्ली अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.

श्री शर्मा हे कंपनीचे संस्थापक आहेत आणि कंपनीच्या प्रमुख धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी पार पाडत आहे.

वन ९७ कम्युनिकेशन्सने २००९ मध्ये सर्वात प्रथम ग्राहकांना कॅशलेस पेमेंट सेवा देण्यासाठी पहिले डिजिटल मोबाईल पेमेंट प्लॅटफॉर्म “पेटीएम ॲप” लाँच केले आणि आता पेटीएम भारताचे सर्वात मोठे पेमेंट प्लॅटफॉर्म आणि सर्वात मूल्यवान पेमेंट ब्रँड आहे.

“पेटीएम ॲप” ग्राहकांना कॅशलेस व्यवहार करणे, मोबाईल फोन रिचार्ज, ऑनलाईन मनी ट्रान्सफर, विविध बिल भरणे, डिजिटल बँकिंग सेवा, ऑनलाईन तिकिटे खरेदी करणे, ऑनलाइन गेम खेळणे, विमा खरेदी करणे, गुंतवणूक करणे अशा बऱ्याच सुविधा पुरवते.

वन ९७ कम्युनिकेशन्स ली. कंपनीची आर्थिक माहिती

तपशीलदशलक्ष रुपयेप्रति वार्षिक
३१ मार्च २०२१३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९
एकूण मालमत्ता९१,५१३१०३,०३१८७,६६८
एकूण महसूल३१,८६८३५,४०७३५,७९७
एकूण नफा (कर वगळता)१७,०१०२९,४२४४२,३०९

वन ९७ कम्युनिकेशन्स ली ची उजवी बाजू | Positives of One 97 Communications Ltd.

  • भारतातील आघाडीचा डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म.
  • पेटीएम ब्रँडची किंमत ६.३ अब्ज डॉलर्स एवढी मोठी आहे.
  • ३३३ दशलक्ष ग्राहकवर्ग.
  • २१ दशलक्ष नोंदणीकृत व्यापारीवर्ग.
  • डिजिटल सुविधांची मोठी श्रेणी.

थोडक्यात महत्वाचे | All Important

वन ९७ कम्युनिकेशन्स ली आयपीओ १६,६००.०० कोटी रुपये
किमान किंमत २०८० रुपये
कमाल किंमत२१५० रुपये
लॉट साईझ १२
एकूण गुंतवणूक १२,४८० रुपये ते १२,९००
आईपिओ खुला होणार ८ नोव्हेंबर २०२१
आईपिओ बंद होणार १० नोव्हेंबर २०२१
शेअर्स इश्यू होणार १५ नोव्हेंबर २०२१
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार १७ नोव्हेंबर २०२१
शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार १८ नोव्हेंबर २०२१

अधिक माहितीसाठी खालील लिन्कवर क्लिक करा.

पेटीएम आयपिओ प्रॉस्पेक्टस

पेटीएम

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment