नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस)मराठी । National Pension Scheme in Marathi

4/5 - (3 votes)

नमस्कार मित्रांनो,

आज आपण या लेखात नॅशनल पेन्शन स्कीम / एनपीएस (NPS) या अतिशय उपयुक्त योजनेची तपशीलवार माहिती बघणार आहोत.

आर्थिक नियोजनात निवृत्ती नंतर किंवा आपल्या उतार वयात खर्चाची तजवीज करण्याला खूप महत्व आहे.

आपल्यापैकी कोणीही अगदी शेवटपर्यंत काम करू शकणार नाही तेव्हा उतार वयात व्यवस्थित जगण्यासाठी खर्चाची तजवीज करणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे काय? । What is National Pension Scheme ?

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही केंद्र सरकारची एक स्वैच्छिक योजना आहे.

एनपीएस हि सेवानिवृत्ती बचत योजना आहे जी आपल्याला आपण काम करत असतांना बचत करून आपले भविष्य सुरक्षित करण्यास आणि निवृत्ती नंतर सुखकर आयुष्य जगण्यास मदत करते.

एनपीएस नागरिकांमध्ये सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याची सवय वाढवण्यासाठी सरकारचा एक प्रयत्न आहे.

या योजनेद्वारे सरकारने भारतातील प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात सेवानिवृत्ती नंतर देखील उत्पन्न मिळवून देण्यासाठी केलेला एक प्रयास आहे.

या योजनेद्वारे आपण केलेली बचत पेन्शन फंडात जमा केली जाते आणि हि रक्कम व्यावसायिक फंड मॅनेजर्सद्वारे शेअर्स, बॉण्ड्स, कॉर्पोरेट डिबेंचर्स इ ठिकाणी गुंतवली जाते.

अशाप्रकारे आपली गुंतवणूक काही वर्षानंतर आपल्याला चांगला परतावा मिळवून देऊ शकते.

निवृत्तीच्या वेळी आपल्याला हि रक्कम एकाचवेळी देखील काढता येऊ शकते.

राष्ट्रीय पेन्शन योजनेचे फायदे । Benefits of National Pension Scheme

बहुपर्यायी :

गुंतवणुकीचे व्यवस्थित पद्धतीने नियोजन करण्यासाठी आणि पेन्शन कॉर्पसच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी या योजनेत गुंतवणुकीचे अनेक पर्याय आणि पेन्शन फंड (PFs) उपलब्ध आहेत.

या योजनेत आपल्याला एका गुंतवणुकीच्या पर्यायातून दुसर्‍याकडे किंवा एका फंड व्यवस्थापकाकडून दुसर्‍याकडे देखील जाणे शक्य आहे.

सुलभ :

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये खाते उघडल्यानंतर आपल्याला आपला कायमचा सेवानिवृत्ती खाते क्रमांक (PRAN) मिळतो, जो एक युनिक क्रमांक असतो आणि तो आयुष्यभर आपल्याकडे राहतो.

या योजनेची रचना खालील दोन स्तरांमध्ये केली आहे:

१. पहिला स्तर :

पहिल्या स्तराच्या खात्यामधून आपल्याला पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध नसते आणि आपण योजनेसाठी दिलेले पैसे आपल्या फंड मॅनेजरद्वारे गुंतवले जातात आणि आपला पोर्टफोलिओ तयार केला जातो.

२. दुसरा स्तर :

दुसऱ्या स्तराच्या खात्यामधून आपल्याला पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असते आणि आपण योजनेसाठी दिलेले पैसे आपल्याला आवश्यकता भासल्यास काढू शकतो.

टिप :

 • टियर II (दुसरा स्तर )मधील निधी टियर I (पहिला स्तर )मध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो
 • टियर I मधील निधी टियर II मध्ये हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय

नॅशनल पेन्शन स्कीम योजनेवर पीएफआरडीए या सरकारी संस्थेद्वारे देखरेख केली जाते तसेच आपला फंड मॅनेज करत असलेल्या मॅनेजरच्या कामाचा देखील वेळोवेळी आढावा घेतला जातो.

स्वस्त

नॅशनल पेन्शन स्कीम योजने अंतर्गत असणारा खात्याचा देखभाल खर्च जगभरातील यासमान पेन्शन योजनांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

सेवानिवृत्तीसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टासाठी बचत करत असताना, अशा खर्चाला खूप महत्त्व असते कारण ३५-४० वर्षांच्या गुंतवणुकीच्या कालावधीत असे शुल्क आपल्या कॉर्पसमधून लक्षणीय रक्कम कपात करू शकतात.

कर सवलत

नॅशनल पेन्शन स्कीम योजनेमुळे आपल्याला खालील प्रमाणे कर सवलत मिळवता येऊ शकते.

आपण या योजनेत सहभागी असल्यास आपण सेक्शन 80CCD (1B) च्या अंतर्गत ५०,००० पर्यंत कर सवलतीचा लाभ घेऊ शकतो.

याशिवाय हि सवलत सेक्शन 80C च्या १,५०,००० रुपयांच्या मर्यादेतर सवलतीमध्ये समाविष्ट होते.

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये सहभागी होण्यासाठी हफ्ता । NPS Account Opening Contribution

तपशील टियर १ टियर २
खाते उघडण्याच्या वेळी किमान आवश्यक योगदान रु ५०० रु १०००
योजनेचा किमान हफ्ता रु ५०० रु २५०
प्रति वर्ष आवश्यक किमान योगदान रु १०००
एका वर्षात आवश्यक असलेल्या योगदानांची किमान संख्या

नॅशनल पेन्शन स्कीम योजनेत सहभागी असणाऱ्या संस्था ।

नॅशनल पेन्शन योजनेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी खालील विविध संस्था काम करतात.

 • पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) :

पीएफआरडीए (PFRDA) हि नॅशनल पेन्शन स्कीमचे नियमन करणारी संस्था आहे.

भारत सरकारने २३ ऑगस्ट २००३ रोजी पीएफआरडीएची स्थापन केली होती.

पीएफआरडीए (PFRDA)पेन्शन फंडाची सुरूवात, वाढ आणि नियमन करून वृद्धापकाळासाठीच्या आवश्यक उत्पन्नाच्या सुरक्षेला प्रोत्साहन देते आणि पेन्शन फंड तसेच संबंधित योजनांमधील सदस्य हिताचे संरक्षण करते.

 • एनपीएस (NPS) ट्रस्ट :

एनपीएस (NPS) ट्रस्ट ही नॅशनल पेन्शन स्कीमसाठी स्थापन केलेली संस्था आहे.

योजनेत ग्राहकांच्या हिताची खात्री करण्यासाठी नियमितपणे पेन्शन फंड मॅनेजरच्या पोर्टफोलिओचे निरीक्षण/ऑडिट करणे तसेच एनपीएस (NPS) योजनेअंतर्गत निधीची काळजी घेण्याची जबाबदारी देखील याच संस्थेवर आहे.

 • सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी (CRA)

नियामक पीएफआरडीए (PFRDA) ने एनपीएस (NPS) सदस्यांचा डेटा आणि रेकॉर्ड राखण्यासाठी के-फिन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि NSDL ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची नियुक्ती केली आहे.

या दोन्ही संस्था एनपीएस (NPS) च्या सर्व सदस्यांसाठी रेकॉर्डकीपिंग, प्रशासन आणि ग्राहक सेवा कार्यांसाठी जबाबदार आहेत.

पेन्शन फंड मॅनेजर (PFMs) –

आपले योजनेतील योगदान पेन्शन फंड मॅनेजर (PFM) द्वारे व्यवस्थापित केले जाते.

हे फंड मॅनेजर्स पीएफआरडीए (PFRDA) द्वारे नियुक्त केले जातात आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांद्वारे नियंत्रित केले जातात.

आपल्याकडे खालील ७ पेन्शन फंड मॅनेजरपैकी कोणताही पर्याय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.

 • आदित्य बिर्ला सनलाइफ पेन्शन मॅनेजमेंट लिमिटेड
 • एचडीएफसी पेन्शन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
 • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पेन्शन फंड्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
 • कोटक महिंद्रा पेन्शन फंड लिमिटेड
 • एलआयसी पेन्शन फंड लि
 • एसबीआय पेन्शन फंड प्रायव्हेट लिमिटेड
 • यूटीआय रिटायरमेंट सोल्युशन्स लिमिटेड

वार्षिकी सेवा प्रदाते (एएसपी) –
वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर, आपल्याकडे पीएफआरडीए (PFRDA) द्वारे नियुक्त केलेल्या वार्षिकी सेवा प्रदात्यांनी ऑफर केलेल्या वार्षिक योजना निवडण्याचा पर्यायउपलब्ध असतो :

 • एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
 • लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
 • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
 • एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

श्रीमंत होण्यासाठी आणि पैशाच्या व्यवस्थपनाविषयी अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठाच्या लिंकला बुकमार्क करायला विसरू नका.

आपण टेलिग्रामवार आमच्या चॅनेलला फॉलो करू शकता , फेसबुक पेज लाईक करू शकता तसेच अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू शकता.

आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment