आयपीओ म्हणजे काय? मराठी | What is IPO in Marathi ?

4/5 - (4 votes)

मागील महिन्यात पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ आला होता, तेव्हा कंपनीच्या एका शेअरची कमाल किंमत होती १७५ रुपये आणि आज त्याच शेअरची किंमत आहे ६२६ रुपये म्हणजे सुरवातीच्या किमतीपेक्षा ३.५ पट तेही एका महिन्याहून कमी काळात.

नमस्कार मित्रांनो!!!

पैसा झाला मोठा च्या नवीन लेखात आपलं स्वागत आहे.

आज सहजच पारस डिफेन्सच्या शेअरच्या किमतीवर नजर गेली आणि आयपीओ हा गुंतवणुकीचा आणि ट्रेडींगचा एक चांगला पर्याय होऊ शकतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची जाणीव झाली.

म्हणूनच मग लगेच आयपीओ विषयी लेख लिहायला घेतला.

या लेखात आपण आयपीओ आणि त्यासंबंधित जास्तीत गोष्टींची भरपूर चर्चा करणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय ?

आयपीओ म्हणजे काय समजून घेण्याआधी आपण मार्केटचे दोन प्रकार समजून घेऊया.

  • १. प्रायमरी मार्केट
  • २. सेकंडरी मार्केट

आपण असे म्हणू शकतो कि प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स मार्केटमध्ये आणले जातात तर सेकंडरी मार्केटमध्ये या शेअर्सची खरेदी-विक्री होते.

१. प्रायमरी मार्केट:

साध्य शब्दात सांगायचे झालं तर जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स अगदी नव्याने बाजरात येतात तेव्हा त्याला शेअर प्रायमरी मार्केटमध्ये येणे असे म्हणतात.

प्रायमरी मार्केटमध्ये आपण शेअर थेट कंपनीकडून विकत घेत असतो.

प्रायमरी मार्केटमध्ये कंपनीचे प्रमोटर्स ऑफर फॉर सेल म्हणून आपलीकडील होल्डिंग सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतात.

२. सेकंडरी मार्केट:

प्रायमरी मार्केटनंतर शेअरची होणारी सर्व खरेदी-विक्री सेकंडरी मार्केटमध्ये होत असते.

सेकंडरी मार्केटमध्ये आपण शेअर दुसऱ्या गुंतवणूकदाराकडून खरेदी करत असतो.

व्यवस्थितपणे चालणारे सेकंडरी मार्केट चांगल्या प्रायमरी मार्केटसाठी पोषक असतात.

जर सेकंडरी मार्केट जोरदार चालू असेल तर प्रायमरी मार्केटमध्ये कंपन्या आपले आयपीओ आणण्यास अधिक उत्सुक असतात कारण अशावेळी कंपन्यांना आयपीओमुळे फायदा होण्याची खात्री असते.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

आयपीओ म्हणजे काय?

आयपीओ हा एक इंग्लिश शब्द असून त्याचा लॉन्ग फॉर्म इनिशिअल पब्लिक ऑफरिंग असा आहे.

इनिशिअल म्हणजे आरंभीचा, पब्लिक म्हणजे सार्वजनिक आणि ऑफरिंग म्हणजे प्रस्ताव.

जेव्हा कंपनीचे शेअर्स प्रायमरी मार्केटमध्ये उपलब्ध होतात तेव्हा त्याला अमुक कंपनीचा आयपीओ मार्केटमध्ये दाखल झाल्याचे आपण म्हणतो.

आपल्याला शेअर आणि शेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घ्यायचे असल्यास आपण अगोदरचे लेख वाचावे असे मी सुचवतो.

शेअर म्हणजे काय?

शेअर म्हणजे हिस्सा किंवा हिस्सेदारी होय.

शेअर बाजाराच्या भाषेत शेअरला समभाग असे म्हणतात.

समभागाला इंग्रजीत इक्विटी किंवा स्टॉक असे पर्यायी शब्द आहेत.

आपण एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करतो म्हणजे आपण त्या कंपनीचा एक हिस्सा विकत घेतो किंवा आपण त्या कंपनीचे हिस्सेदार होतो.

साध्या भाषेत सांगायचं म्हणजे शेअर खरेदी करणे म्हणजे एखाद्या कंपनीच्या व्यवसायात आपण काही अंशी सहभागी होत असतो

अशाप्रकारे कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपण त्या कंपनीत किंवा कंपनीच्या व्यवसायात गुंतवणूक करत असतो.

म्हणजेच आपण एखाद्या कंपनीचे २ % शेअर्स विकत घेतले तर आपण त्या कंपनीचे २% मालक होतो.

कंपनी बाजारात आयपीओ का आणते?

आता आपण कंपनी बाजारात आयपीओ का आणते ते समजून घेऊया.

भांडवलाची उभारणी

कोणत्याही कंपनीला व्यवसायात वाढ करण्यासाठी भांडवलाची गरज असते. भांडवल उभारणीसाठी उपलब्ध असणाऱ्या पर्यायात वित्तीय संस्था जसे कि बँके कडून कर्जाची तजवीज करणे, ग्राहकांकडून आगाऊ रक्कम जमा करणे आणि शेअर बाजारात आयपीओ आणणे असे पर्याय उपलब्ध असतात. आयपीओद्वारे भांडवलाची उभारणी करणे हा कोणत्याही कंपनीचा प्राथमिक उद्देश असतो.

प्रतिष्ठा

शेअर मार्केटमध्ये कंपनी लिस्ट झाल्यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेत वाढ होते. कंपनीची अधिक चांगली ओळख निर्माण होते ज्याचा फायदा कंपनीच्या बाजारातील उत्पादनांच्या वाढणाऱ्या मागणीच्या स्वरूपात होतो. साध्या भाषेत सांगायचं तर कंपनीचा एक ब्रॅण्ड तयार होण्यास मदत होते.

कर्जाची परतफेड करणे

आयपीओद्वारे भांडवल उभारल्यास आपल्याला कर्जातून भांडवल उभारण्यापेक्षा अधिक फायदे होतात. कर्जाऊ रक्कमेवर कंपनीला व्याज द्यावे लागते. कर्जाची परतफेड रक्कम ठरलेली असते. कर्ज म्हणून मिळालेली रक्कम ठराविक मुदतीनंतर परत करावी लागते.

याउलट कंपनीला आयपीओ मधून मिळणाऱ्या रक्कमेवर व्याज द्यावे लागत नाही. आयपीओ मधून मिळालेली रक्कम परत करणे बंधनकारक नसते आणि उभे राहिलेले भांडवल कुठल्याही मुदतीशिवाय मिळते.

या फायद्यांमुळे अनेक कंपन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बाजारात आयपीओ आणतात आणि कर्जाची परतफेड करतात.

प्रसिद्धी

कोणत्याही कंपनीला मिळालेली प्रसिद्धी हि त्या कंपनीला जास्तीत ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करत असते. मार्केटमध्ये असणाऱ्या कंपन्यांना माध्यमांकडून चर्चेच्या माध्यमातून वेळोवेळी प्रसिद्धी मिळत असते. याशिवाय मिळणारी प्रसिद्धी कंपनीला अजून जास्त प्रतिष्ठा मिळवून देण्यास मदत करते. अशा प्रसिद्ध कंपन्यांना कमी व्याजाने आणि सहजरित्या कर्जे मिळतात आणि अशा कंपन्या गुंतवणूकदारांना देखील आकर्षित करत असतात.

आयपीओमध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याला मिळणारे फायदे

आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला मिळणाऱ्या स्टॉकची किंमत हि सर्वात वाजवी किंमत असू शकते.

आयपीओमध्ये गुंतवणूक केल्याने खूप मोठा आणि खूप लवकर नफा मिळू शकतो.

आयपीओची प्रक्रिया अतिशय पारदर्शी असते म्हणजे ज्या किमतीला एखाद्या कंपनीचे शेअर्स कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदाराला मिळतात त्याच किमतीला किरकोळ गुंतवणूकदाराला देखील मिळतात.

आयपीओची किंमत कशी ठरते ?

आयपीओची किंमत ठरवण्याला शेअर मार्केटच्या भाषेत आयपीओ इव्हॅलूएशन असे म्हणतात.

आयपीओ इव्हॅलूएशन साठी कंपनी एखाद्या इन्व्हेस्टमेंट बँकेची मदत घेते.

कंपनीचे व्यवस्थापन, बाजरातील कंपनीच्या विस्ताराला असणारा वाव, कंपनीचे आर्थिक व्यवहार इ. गोष्टी तपासून मग कंपनीच्या आयपीओची किंमत ठरवली जाते.

ग्रे मार्केट प्रिमिअम म्हणजे काय ?

अनेकदा आपण आयपीओची माहिती घेतांना ग्रे मार्केट किंवा ग्रे मार्केट प्रिमिअम हे शब्द ऐकलेच असतील.

आपण आता ग्रे मार्केट म्हणजे काय ते समजून घेऊया.

ग्रे मार्केटलाच आपण समांतर बाजार असे देखील म्हणू शकतो.

ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स अनाधिकृतरित्या ट्रेड केले जातात.

ग्रे मार्केट ही एक बेकायदेशीर बाजारपेठ आहे जिथे शेअर्स सबस्क्रिप्शनसाठी खुले होण्याआधीच त्यांची खरेदी-विक्री होते.

ग्रे मार्केट दीर्घ काळापासून अस्तित्वात असून, बरेच गुंतवणूकदार आणि व्यापारी ग्रे मार्केटवर लक्ष ठेवून असतात.

याचे कारण असे आहे की ते किरकोळ गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सला शेअरची किंमत वाढणार कि कमी होणार याचा अंदाज बांधण्यास मदत करतात आणि शेअर्स लिस्ट होण्यापूर्वीच खरेदी किंवा विक्री करण्याची उत्तम संधी देतात.

उदा. अमुक एका कंपनीच्या शेअरची किंमत १०० रुपये आहे त्याच ग्रे मार्केट प्रिमिअम २० रुपये आहे म्हणजेच त्या कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्यापूर्वीच लोक ग्रे मार्केटमध्ये १२० रुपयांना खरेदी करण्यास तयार आहेत.

ऑफर फॉर सेल म्हणजे काय ?

ऑफर फॉर सेल ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकण्याची एक पद्धत आहे ज्यात शेअर मार्केटमध्ये असणाऱ्या कंपन्यांचे प्रमोटर्स त्यांची शेअरहोल्डिंग पारदर्शक पद्धतीने कमी करतात.

म्हणजेच कंपनीचे प्रमोटर्स आपल्याकडे असणारे शेअर्स सार्वजनिकरित्या खरेदीसाठी उपलब्ध करून देतात.

सामान्यतः प्रमोटर होल्डिंग कमी करण्यासाठी आणि नॉन-प्रमोटर शेअरहोल्डिंग वाढवण्यासाठी ओएफएस (OFS)मार्ग निवडतात.

आयपीओची प्रक्रिया कशी केली जाते ?

शेअर बाजारात येण्यापूर्वी कंपनी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते तर शेअर बाजारात आल्यानंतर कंपनी पब्लिक लिमिटेड होते.

उदा. अबक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाजारात आल्यानंतर अबक पब्लिक लिमिटेड होते.

बाजारात आयपीओ आणण्यापूर्वी कंपनीला, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी/SEC) निश्चित केलेल्या काही आवश्यकता पूर्ण कराव्या लागतात तसेच कंपनीने व्यापक आयपीओ प्रक्रियेतून जाणे आवश्यक असते.

आपण आता आयपीओच्या प्रक्रियेचि थोडक्यात माहिती घेऊ.

१. सर्वात प्रथम ज्या कंपनीला बाजारात आयपीओ आणायचा आहे ती कंपनी एखाद्या प्रतिष्ठित बँकेकडे आयपीओच्या कामकाजासाठी जाते.

२. त्यानंतर कंपनीचा सखोल अभ्यास करून कंपनीचा आयपीओ बाजारात आणण्यात काही धोका आहे का याची पडताळणी केली जाते.

३ आयपीओ आणण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा केली जातात.

४. मार्केटमध्ये आणि इन्व्हेस्टर्समध्ये आयपीओ विषयी माहितीचा प्रचार प्रसार केला जातो.

५. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन कडून आयपीओ आणण्यासाठीच्या परवानग्या मिळवतात.

६. मागणी आणि मार्केटमधील परिस्थितीचा अंदाज बघून शेअरची प्राइस आणि लॉट साइझ ठरवली जाते.

७. ३ ते १० दिवस आयपीओ प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी खुला केला जातो.

८. आयपीओचे कामकाज बंद झाल्यानंतर आयपीओ स्टॉक एक्सचेन्जवर लिस्ट होतो म्हणजेच सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडींगसाठी उपलब्ध होतो.

आयपीओचे प्रकार कोणते आहेत ?

आयपीओचे पुढीलप्रमाणे दोन प्रकार आहेत :

१. फिक्स्ड प्राइस ऑफरिंग

या प्रकारात आयपीओ आणणारी कंपनी शेअरची एक फिक्स प्राइस ठरवते आणि जाहीर करते. इश्यू बंद झाल्यावर बाजारातील शेअरची मागणी आपल्याला कळू शकते आणि गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये भाग घेतला असेल, तर त्यांना अर्ज करताना शेअर्सची संपूर्ण किंमत भरली असल्याची खात्री करावी लागते.

२. बुक बिल्डिंग ऑफरिंग

बुक बिल्डिंगच्या बाबतीत, आयपीओ आणणारी करणारी कंपनी गुंतवणूकदारांसाठी स्टॉकच्या किमतीच्या २०% पर्यंत एवढी रेन्ज जाहीर करते. इच्छुक गुंतवणूकदार अंतिम किंमतीचा निर्णय होईपर्यंत शेअर्सवर बोली लावतात. या प्रकारात गुंतवणूकदारांनी त्यांना खरेदी करायच्या शेअर्सची संख्या आणि ते प्रति शेअर देण्यास इच्छुक असलेली रक्कम नमूद करणे आवश्यक असते.

आयपीओ मधील गुंतवणूकदारांचे प्रकार कोणते असतात ?

आयपीओमध्ये कंपन्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या तुलनेत, मोठ्या संस्था किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांना जास्त प्राधान्य देतात आणि त्यामुळेच आयपीओमध्ये गुंतवणूकदारांचे वर्गीकरण केले जाते आणि शेअर्स राखीव ठेवले जातात.

खाली मी वर्गीकरणाचे उदाहरण दिले आहे.

किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) :

या गटात निवासी भारतीय आणि अनिवासी भारतीय, तसेच एकत्रित कुटुंब यांचा समावेश आहे. या वर्गात गुंतवली जाणारी जास्तीत जास्त रक्कम रु.२ लाख. असते.

शेअर्सची उपलब्धता
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)५० %
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors)१५ %
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)३५ %

नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) :

ज्या रिटेल इन्व्हेस्टरला २ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल ते गुंतवणूकदार या श्रेणीत अर्ज करू शकतात. या गटाला किमान १५% बोली लावता येते. त्यांच्याकडे वाटपाच्या दिवसापूर्वी निविदा मागे घेण्याचा पर्याय असतो. तथापि, त्यांना कट ऑफ किंमतीवर बोली लावण्याचा अधिकार नाही.

मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors)

या गटात सर्व सार्वजनिक वित्तीय संस्था, व्यावसायिक बँका, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड आणि इतर तत्सम संस्था यांचा समावेश होतो. अशा सर्व संस्थांनी अर्ज करण्यापूर्वी सेबीकडे नोंदणी करणे आवश्यक असते. मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) यांना ५० % बोलीची मर्यादा आहे. त्यांना कट ऑफ किंमतीत बोली लावण्याची परवानगी नाही आणि आयपीओ बंद झाल्यानंतर ते ऑफर मागे घेऊ शकत नाहीत.

अँकर इन्व्हेस्टर्स (Anchor Investors)

अँकर गुंतवणूकदारांना किमान १० कोटीचा अर्ज करणे आवश्यक आहे आणि ते कट ऑफ किंमतीवर बोली लावू शकत नाहीत.

लॉट म्हणजे काय ? । What is a Lot ?

मित्रांनो, आयपीओ मध्ये गुंतवणूक करतांना आपल्याला एक-दोन शेअर घेऊन चालत नाही तर आपल्याला एक लॉट घ्यावा लागतो.

या लॉटमधील शेअरची संख्या ठरवून दिलेली असते.

उदा. एखाद्या कंपनीच्या आयपीओ मध्ये शेअरच्या १ लॉटमध्ये १५० शेअर्स असू शकता.

जर एक शेअरची किंमत १०० असेल तर आपल्याला कमीत कमी १ लॉट घेणे बंधनकारक असते म्हणजेच आपल्याला या उदाहरणात १५,००० इतकी कमीत कमी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

याव्यतिरिक्त प्रत्येक गुंतवणूकदार किती लॉट घेऊ शकतो यावर देखील मर्यादा असतात.

साधारणपणे आपण १३ लॉट घेऊ शकतो आणि लॉटची किंमत सरासरी १४,००० इतकी असते.

याचाच अर्थ आपली गुंतवणूक कमीतकमी १ लॉट आणि जास्तीतजास्त १३ लॉट असू शकते.

आता आपण वर उल्लेख केलेल्या पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आइपीओचे उदाहरण बघूया.

पारस डिफेन्स आयपीओ येण्यापूर्वी पैसा झाला मोठावर खालील माहिती अगोदरच मराठीत उपलब्ध केली गेली होती.

अशाच प्रकारे शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या महत्वाच्या सर्व आयपीओची सविस्तर माहिती आपल्याला पैसा झाला मोठावर मराठीत उपलब्ध होत असते.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आईपिओ १७०.७८ कोटी रुपये
किमान किंमत १६५ रुपये
कमाल किंमत १७५ रुपये
लॉट साईझ ८५
एकूण गुंतवणूक १४,०२५ रुपये ते १४,८७५ रुपये
आईपिओ खुला होणार २१ सप्टेंबर २०२१
आईपिओ बंद होणार २३ सप्टेंबर २०२१
शेअर्स इश्यू होणार २८ सप्टेंबर २०२१
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार ३० सप्टेंबर २०२१
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार १ ऑक्टोबर २०२१

आपण बघू शकतो कि पारस डिफेन्स कंपनी आयपीओद्वारे १७०.७८ कोटी रुपये एवढे भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत होती.

आयपीओ मध्ये एका शेअरची किमान किंमत आणि कमाल किंमत अनुक्रमे १६५ रुपये आणि १७५ रुपये इतकी होती.

आयपीओ मधील १ लॉट ८५ शेअरचा होता आणि लॉट घेण्याची कमल मर्यादा १३ होती.

याशिवाय आपल्याला आयपीओच्या कामकाजाच्या सर्व तारखा उपलब्ध असल्याचे जसे कि आयपीओ कधी खुला होणार, कधी बंद होणार, शेअर कधी इश्यू केले जाणार, कधी आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा होणार आणि स्टॉक कधी सेकंडरी मार्केटमध्ये दाखल होणार.

स्टॉक कधी सेकंडरी मार्केटमध्ये येण्यालाच आपण स्टॉक लिस्ट होणे असे म्हणतो.

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण आयपीओ आणि आयपीओ विषयीच्या काही गोष्टींची माहिती घेतली.

या लेखात अजून जास्त माहिती वाढवण्याचा मी प्रयत्न करेल.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment